Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्कारांची घोषणा संगमनेर इनरव्हील क्लबने केली आहे. पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील बेचाळीस शिक्षक, पाच शाळा आणि आदिवासी सांदण चळवळीची निवड केल्याची माहिती इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रकल्पप्रमुख सुनिता कोडे व शुभलक्ष्मी बेलापूरकर यांनी दिली. रविवारी (ता. १२ फेब्रुवारी) संगमनेरमधील मालपाणी लॉन्स येथे दुपारी २ वाजता माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी. जी. शेखर, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने तसेच नव्याने हा रस्ता खड्डे मुक्त होत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालक वेगाने वाहने चालवत आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असल्याने अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्याने व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेली जात असलेली तब्बल पंचेचाळीस जिवंत गोवंश जनावरे राहुरी पोलिसांनी पकडली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. यामुळे संगमनेरची बदकीर्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका आयशर टेम्पोतून या जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदिम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपने, चालक साखरे या पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेदरम्यान सापळा लावला होता. त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 2478) आला. पथकाने त्या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असलेल्या महिलेकडून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्त्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला डॉक्टरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बारागाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी या लाचखोर महिला डॉक्टरवर अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असलेल्या २६ वर्षीय राहुरी येथील महिलेकडे लाचेची मागणी केली होती. ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी विधानपरिषदेत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात पत्र देत चर्चेसाठी वेळ मागितली आहे.गेली तेरा वर्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांनी सभागृहात लक्षवेधी कामगिरी केली आहे. शिक्षक पदवीधरांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहात सातत्याने आवाज उठविला. यावेळी मात्र तांबे यांनी उमेदवारी मिळवून देखील आपले पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी निवडणूक न लढवत त्यांना अपक्ष निवडून आणले आहे. राज्याच्या राजकारणात आक्रमक नेता म्हणून ओळखले जाणारे सत्यजित तांबे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कामकाजाला धडाकेबाज सुरुवात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘एकच वादा… सत्यजित दादा’ पाठोपाठ ‘एकच वादा… अजित दादा’ अशा घोषणांनी विधान परिषदेचे सभागृह बुधवारी दुमदुमून गेले होते. सत्यजित तांबे यांच्या शपथविधी सोहळ्यातील या घोषणांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या विचारधारेचा वारसा सांगितला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांसह भाऊसाहेब थोरात यांच्या नावाचा उल्लेख करत तांबे यांनी शपथ घेतल्याने सध्या तरी ते भाजपापासून चार हात दूर असल्याचे स्पष्ट झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिक्षक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषदेच्या सभागृहात पार पडला. तांबे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून हा वाद आता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी वारकरी संप्रदाय आणि संत सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्यातील आलोंडे-कोकणपाडा येथील हभप श्रावण महाराज कुवरा यांना यावर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी बुधवारी पुरस्काराची घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सन २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखालील भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील (ठाणे) व प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ…

Read More

शिर्डी महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणून मिरवून घेणारे आता हतबल का झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काॅग्रेसमध्ये  सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर  त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले बाळासाहेब थोरात हे लोकनेते असून संगमनेर तालुका व नगर जिल्ह्यासाठी ते केवळ नेते नव्हे तर आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील वेल्हाळे येथे हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुखयांच्या कीर्तनाने मंगळवारी या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. थोरात यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असून काँग्रेस हाय कमांड या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे . दरम्यान थोरात यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संबंधित असलेले थोरात काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस मधील काही नेत्यांवर थोरात नाराज असून या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना सविस्तर पत्र पाठवले असल्याची माहिती दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर येथील एका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील खंडोबा देवस्थानच्या गडावर देवदर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेसह तिघींचे सुमारे लाखभर रुपयांचे दागिने दोन अज्ञात महिलांनी लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धारणगाव देवपूर तालुका सिन्नर येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सिंहगड रोड धायरी फाटा पुणे येथे राहत असलेल्या वनिता भगवंत घुगे वय 29 वर्ष या संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील खंडोबा मंदिराच्या गडावर देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी वनिता घुगे यांच्या पर्समधील दागिने ठेवलेला पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा बॉक्स लंपास केला. याशिवाय अन्य दोन महिलांच्य गळ्यातील मनी मंगळसूत्र व सोन्याची पोत त्यांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक-पुणे महामार्गावर बोटा गावच्या शिवारामध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या नाशिक-पुणे महामार्गावर सोमवारी (ता. ६ फेब्रुवारी) रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.बोटा गावाच्या शिवारामध्ये असलेल्या विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात भक्षाच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने या तरसाला जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्याने तरसाचा जागीच मृत्यू झाला. मादी जातीचा दोन वर्ष वयाचा हा तरस असल्याची माहिती मिळाली. घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांनी यासंदर्भात वनविभागाचे रामदास थेटे यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी ज्ञानदेव कोरडे, बाळासाहेब वैराळ दीपक वायाळ आदी कर्मचाऱ्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर कृषी क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पध्दती, दुग्धव्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक उपक्रम सावरगाव तळने राज्याला दिले असून सावरगाव तळच्या उपक्रमाचे व शेती प्रयोगांचे अनुकरण केल्यास गावे समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले. सावरगावतळ गावाने पर्यावरण, जलसंधारण, कृषी, दुधव्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिध्द ओरेगॉन विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा.अँड्र्यू मिल्सन यांनी सपत्नीक सावरगावतळ गावास नुकत्याच दिलेल्या भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी गावचे सरपंच दशरथ गाडे, पोलीस पाटील गोरक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी पदवीधर निवडणुकीत कोणतीच भूमिका स्पष्ट न करणाऱ्या थोरातांनी काँग्रेस पक्षाला सोयीनूसार वापरण्यापेक्षा भूमिका स्पष्ट केली पाहीजे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून तुम्ही व्यथित आहात काॽ असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. काँग्रेस पक्षाची भूमिका मांडा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, असे थेट आव्हान देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, तुम्ही काँग्रेस पक्षाला सोयीनुसार वापरू शकत नाही. नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत मुळातः बाळासाहेब थोरात व्यथित झाले आहेत. त्यांच्या तालुक्यातील जनता त्यांना सोडून चालली आहे. त्यांच्या तालुक्यातील चार महत्वपूर्ण गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळेच थोरात व्यथित झाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये जय राजकारण झाले आहे ते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेच झालं असल्याचा दावा अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. खासदार विखे पाटील सध्या दिल्लीमध्ये असून तेथे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. विखे म्हणाले, ज्यावेळी विधान परिषदेचे राजकारण सुरू होते त्याचवेळी गौण खनिजाच्या प्रश्नावरून संगमनेर मध्ये काही ठेकेदारांचा मोर्चा प्रांताधिकारी कचेरीवर काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी या मोर्चाला मोबाईल वरून संबोधित केले होते. मग आज नेमकं असं काय झालं की, विधान परिषदेच्या घडणाऱ्या राजकारणावर ते बोलू शकले नाहीत. जर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या संदर्भात थोरात यांनीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून या संदर्भात माहिती दिली असून पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने ट्विटरवर हे खोटे (फेक) अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंट वरून नियमितपणे ट्विट देखील केले जात होते. त्यामुळे काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी हे ट्विट अकाउंट फॉलो केले आहे.ट्विटर वरील हे बनावट खाते तयार करताना आरोपींनी थोरात यांच्या कन्या शरय देशमुख यांच्या फोटोचा वापर केला असून डीपीवर शरयू देशमुख…

Read More

संगमनेर काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले. अगदी उमेदवारीही वाटून टाकली. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे, असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात विधान परिषदेच्या निमीत्ताने झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने जाणता राजा मैदानावर ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन पद्धतीने तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, २६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर…

Read More

संगमनेर एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली. जाणता राजा मैदान येथे नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधरचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी…

Read More

१८८५ साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख या नेतृत्वाची मोठी समृद्ध परंपरा या पक्षाला लाभली आहे. या समृद्ध परंपरेचा विचार जोपासत अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळत या पक्षाला सन्मानजनक विजय मिळवून देत महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे बाजीप्रभू माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षासाठी यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. १९८५ मध्ये समाजकारणातून राजकारणात आलेल्या बाळासाहेब थोरात यांची आमदारकी चढत्या क्रमाने वाढत गेली तसे मंत्रीपदही चढत्या क्रमाने वाढत गेले. १९९९ मध्ये राज्यमंत्री, २००४ मध्ये कॅबिनेट, कृषी व जलसंधारण…

Read More

लोणी शासकीय कार्यालयांमधून आवश्‍यक असलेल्‍या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरीकांना सहज सोप्‍या पध्‍दतीने उप‍लब्‍ध व्‍हावेत म्‍हणून सर्व तालुक्‍यांमध्‍ये ‘शासन आपल्‍या दारी’ हा उपक्रम सुरु करण्‍यात येणार असून, या माध्‍यमातून जनतेच्‍या समस्‍याही जाणून घेण्‍याच्‍या सुचना महसूल विभागातील आधिका-यांना दिल्‍या असल्‍याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. महसूल विभागातून आवश्‍यक असलेले दाखले मिळण्‍यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कागपत्रांमध्‍ये त्रृटीही असतात. त्‍यामुळे सामान्‍य माणसाला योजनेच्‍या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्‍या कामकाजासाठी आवश्‍यक असलेल्‍या दाखल्‍यांकरीता विद्यार्थ्‍यांना निर्माण होणा-या अडचणी प्रवेशापुर्वी दूर व्‍हाव्‍यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्‍यक असलेले कागदपत्र नागरीकांना सहज उपलब्‍ध…

Read More