Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचारात वेग घेतला असतानाच एकापाठोपाठ एक शिक्षक संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस नेते आमदार सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. यापूर्वी तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक विभागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुधीर तांबे यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भरधाव स्विफ्ट कार चालकाने नाशिक पुणे बाह्यवळण रस्त्यावर दोघा परप्रांतीय मजुरांना उडविल्याची घटना संगमनेरमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. अपघातामध्ये दोघाही मजुरांचा मृत्यू झाला. संगमनेर शहराबाहेरून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यावर बॅरिकेट लावून काही मजूर हे काम करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालपाणी इस्टेट जवळ या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने डिव्हायडरला लावलेले बॅरिकेट तोडून रस्त्यावर काम करणाऱ्या गिरीजा मुनसी तुरिया, वय 52 वर्ष आणि सुरेश चेतू खैरवार वय 55 वर्ष (दोघे रा. गहलोर बडकी, मरकाना बिहार) यांना गंभीर जखमी केले. अपघातात दोघेही मजुरांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर / संगमनेर : नगर जिल्ह्यातील चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात संगमनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून त्यांनी आपल्या जागेवर परस्पर डमी बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्ती केल्याचे, तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली. सीईओ येरेकर यांनी यासंबंधीचे आदेश मंगळवारी काढले आहेत. या शिक्षकांच्या धक्कादायक करामती यामुळे समोर आल्या आहेत. यांच्यावर झाली कारवाई उपाध्यापक रमेश शिवाजी आहेर (कारेवाडी, संगमनेर), प्रभाकर सखाराम रोकडे (जवळे बाळेश्वर संगमनेर), उपाध्यापक मदन रंगनाथ दिवे (राहुरी), पारनेरचे केंद्रप्रमुख अविनाश गुलाबराव गांगर्डे, उपाध्यापक बाजीराव शंकर पानमंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई – नासिक पदवीधर मतदार संघामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये वातावरण फारसे समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची वाताहत झाली आहे. नासिक पदवीधरचे आमदार सुधीर तांबे यांनी उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करणे, उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत असलेल्या दोन गटातील मतप्रवाहांचे जाहीरपणे प्रदर्शन होणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळगणे यासह कारणा निमित्ताने काँग्रेसमधील वादही चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचे कुटुंबीय व काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. २९ जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशा अन्वये २९ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / अहमदनगर : ३० जानेवारीला होणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली. पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसले तरी देखील अपक्ष म्हणून दोन्ही पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पक्षीय उमेदवारीची सस्पेन्स मुव्ही अद्यापही सुरू असली तरी त्यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने आपला पाठिंबा दर्शविला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांना निवडणुकीत पहिली पसंती दर्शविण्याचे आवाहन शिक्षकांच्या मस्ट या संघटनेने केले. महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शहरानजीकच्या वडगाव पान येथील एका लॉजवरील वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकांनी सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. कारवाई पोलिसांना येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे संगमनेरमध्ये सर्रासपणे लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांवर अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. शहरालगतच्या वडगाव पान शिवारामध्ये वडगाव पान फाटा ते कोपरगाव रोडलगत असलेल्या हॉटेल विशाल गार्डनच्या मागे साईमाया लॉजमधील खोलीत हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नोकरीमध्ये कायम करण्याची ऑर्डर मिळवून देण्यासाठी घटस्फोटीत महिला शिक्षिकेकडून ५ लाख ८० हजार रुपये घेऊन ऑर्डर न देणाऱ्या महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिना सलीम शेख रा. कुरण ह. मु. मालदाड रोड, संगमनेर असे फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे. फसवणूक झालेल्या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून अमिना शेख हिच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, शहरातील जोर्वे रोडवरील उस्मतनगरमध्ये राहणाऱ्या महिला शिक्षिका शहरातील एका शाळेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून नोकरीस आहे. पतीसोबत घटस्फोट झाल्याने संबंधित शिक्षिका आपल्या दोन मुलांसह वडिलांकडे राहावयास…
महाराष्ट्र संवाद न्यूज # वाढदिवस विशेष संगमनेर तालुक्यातील जोर्वे माझे माहेर. गावातील थोरात कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा. गावची पाटीलकी. आजोबा संतुजी पाटील पुरोगामी विचारांचे इंग्रजी मेट्रीक झालेले. जातपात न पाळणारे. वाचनाची आवड. वडील भाऊसाहेब थोरात व आई मथुराबाई यांची मी सर्वात धाकटी मुलगी. नाजूक उंचीने जरा कमी, घरात सामाजिक वातावरण, पाहुणे, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, माझी आई सर्वांची विचारपूस करायची. चहा, जेवण, मुक्कामी कार्यकर्त्यांच्या अंथरूण, पांघरुणाची सोय लावली की नाही. हे ती स्वत: पाहायची. त्यांच्या कृतीतून आम्ही भांवड घडत गेलो. शिक्षण पूर्ण झाले आणि माझ्यासाठी स्थळ सूचविली जावू लागली. माझे आतेभाऊ अनिल अण्णासाहेब शिंदे यांनी डॉ. सुधीर तांबे यांना सेट लूक हॉस्पीटलला…
निरोगी समाजानिर्मीतीसाठी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवा संघटन,युवा उपक्रम, आरोग्य शिबीरे, बचत गट चळवळ, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतीक स्पर्धा, नोकरी विषयक मेळावे, व्यक्तीमत्व विकास शिबिरे, वाचन मंडळ, अभ्यास मंडळ असे विविध उपक्रम राबवून समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता या विषयांवर जागृती करुन करुन निकोप व निरोगी समाज निर्मीतीसाठी कार्यरत असणारे नाशिक पदवीधर मतदार संघाचे मनमिळावू स्वभावाचे आ. डॉ. सुधीर तांबे हे समाजकारणातील अभ्यासू व सृजनशील व्यक्तीमत्व म्हणून संपुर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. प्रत्येकासाठी आरोग्य हि जगातील सर्वात मोठी संपत्ती असून वैद्यकिय सेवाही जनसेवा म्हणून काम करतांना जनतेच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष ते विधान परिषद सदस्य या काळात साहित्य संस्कृती वाचन यांची आवडही त्यांनी जपली. 2009 मध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ह्यूमन राईटचा पदाधिकारी व पुरोगामी पत्रकार संघाचा सदस्य असल्याचे सांगत महिलेकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या शौकत पठाण याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधात शहरातील एकता चौकात राहणाऱ्या संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पठाण याने १८ डिसेंबरच्या रात्री महिलेला फोन करून तुमच्याबद्दल माझ्याकडे लेखी तक्रार आली आहे, तुम्ही लोकांना त्रास देतात. त्याबाबत माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि तुमचे अश्लील फोटो माझ्याकडे आले आहेत. मला अर्जंट भेटा असे सांगत फोन कट केला. या संदर्भात संबंधित महिलेने अधिक माहिती घेतली असता, शौकत पठाण व त्याला मदत करणारी मोसिन मणियार,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर: ग्रामीण भागातील विद्यार्थी आजच्या प्रगत विज्ञानवादी स्पर्धेत टिकला पाहिजे, यासाठी त्याच्यातील व्यवहार ज्ञानाचा विकास होणे आवश्यक आहे, हे ओळखून तालुक्यातील देवगड विद्यालयात “बाल आनंद मेळावा” आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात हे विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. मेळाव्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 43 खाऊची, 38 भाजीपाल्याची छोटी-छोटी दुकानं लावली होती. तसेच घोडसवारीदेखील या बाल आनंद मेळाव्यात करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे रजिस्ट्रार एम. एम.फटांगरे यांनी आजची बदलेली शिक्षण प्रणाली व आपली जबाबदारी या संदर्भात मार्गदर्शन करताना शाळा ही आदर्श नागरिक घडवणारी प्रयोगशाळा असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव (ता. इगतपुरी) व नाशिक शहरातील मुंबई नाका येथील एसएमबीटी क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. येत्या २३ जानेवारीपासून या शिबिरास सुरुवात होणार असून २८ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी प्रतिबंधात्मक तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे. महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे गर्भाशय, स्तनांशी निगडीत महिलांना त्रास…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे. हे आहेत उमेदवार : रतन कचरु बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), यांच्यासह अनिल शांताराम तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, अविनाश महादू माळी, इरफान मो इसहाक, ईश्वर उखा पाटील, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, ॲड. जुबेर नासिर शेख, ॲड.सुभाष राजाराम जंगले, सत्यजित सुधीर तांबे, नितीन नारायण सरोदे, पोपट सिताराम…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मारुती व्हॅनमधून आलेल्या चौघा तोतया पोलिसांनी रोकड रकमेसह टेम्पो लांबविण्याची घटना शहरालगतच्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावर घडली आहे. थेट पोलीस असल्याची बतावणी करत टेम्पो लांबवल्याने संगमनेरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भात मुंबई येथील शामू रज्जु गौड याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक गौड हा १२ जानेवारीला पुणे येथून टेम्पोमध्ये टिशू पेपरचा माल घेऊन नाशिक येथे जात होता. संगमनेरच्या पावसा येथील टोल नाक्यावर चहापाणी घेऊन तो नाशिकच्या दिशेने सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान मार्गस्थ झाला असताना बाह्यवळण रस्त्यावर मालपाणी तंबाखू कारखान्याजवळ पिवळ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सिन्नर येथील उडान फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार संगमनेरच्या आर्या सुनील नवले हिला प्राप्त झाला. एका जीवघेण्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवत आपल्या आईचे प्राण आर्या नवले हिने वाचवले होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिन्नर नगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर व नाशिक येथील जीवन मार्गदर्शक व्याख्यात्या नीता अरोरा यांच्या हस्ते आर्या नवले हिला ‘बालशौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा बाल विकास मंडळाचे न्यायाधीश गणेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे यासंदर्भात आमदार तांबे यांनी एका ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक पदवीधर मतदार संघात महा विकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊनही उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या शिस्त विषयक समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. तांबे यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही याची चौकशी होईपर्यंत राहणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी, बंडखोरी आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे या मतदारसंघासोबत राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या डॉ. तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलाच नाही. उलट त्यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस १७ जानेवारीला आहे. पुस्तक प्रेमी असलेले तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तांबे यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारचे हार तुरे न आणता सामाजिक जाणीवेतून नागरिक व कार्यकर्त्यांनी पुस्तके भेट देऊन हा दिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन जयहिंद युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, विधान परिषद गटनेते अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या तांबे यांच्या नेतृत्वात, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…
