Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील पुनर्वसन कॉलनीजवळ असलेल्या नाल्यात शुक्रवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी, या तरुणाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात मृताच्या आतेभावाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत सुरेश नवले याचा मृतदेह पोलिसांना शहरालगतच्या पुनर्वसन कॉलनीशेजारी असलेल्या एका नाल्यात आढळून आला होता. घातपाताचा संशय असल्याने सुरुवातीला अनोळखी असणाऱ्या या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांना करावे लागले. त्यासाठी पोलिसांनी समाज माध्यमांचा वापर केल्याने मृतदेहाची ओळख पटविणे सोपे गेले. हा मृतदेह संकेत नवले याचा…
रविवार विशेष शिक्षण हा तिसरा डोळा, असे आपण म्हणतो. त्याचा प्रत्यय येथील इंदिरा नगरमध्ये राहणार्या एरंडे कुटुंबात आला असून विडी कामगार म्हणून काम करणार्या श्रीमती इंदुबाई एरंडे यांचा नातू तुषार उत्तम एरंडे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन कणकवली येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून रुजू झाला आहे. सामान्य कुटुंबांना लढण्याचं बळ देणारी ही यशकथा होय. गणपत एरंडे व इंदुबाई एरंडे हे दांपत्य संगमनेरच्या भिकुसा यमासा क्षत्रिय विडी कारखान्यात विड्या वळण्याचे काम करीत. त्यांना रवींद्र, उत्तम व सुदाम ही तीन मुले. मुले लहान असतानाच वयाच्या ३० व्या वर्षी १९७३ मध्ये गणपत एरंडे यांचे निधन झाले. त्यामुळे नंतर निर्माण झालेल्या…
रविवार विशेष | प्रवीण पुरो राज्य निर्मितीच्या उत्सवापासून बेळगाव, कारवार, निपाणी या क्षेत्रावर अधिकार कोणाचा, हा प्रश्न संपता संपत नाहीए. या प्रश्नाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकार आपलं तुणतुणं वाजवत राहातं. कर्नाटकात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाग आपल्याकडे घेण्यासाठी काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्याची संधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मिळाली आहे. कर्नाटकचे आजचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना नापास राजकारणातून बाहेर काढण्यासाठी सीमा प्रश्नाने हात दिला आहे. पाकिस्तानात निवडणुका आल्या की भारताविरोधी गरळ ओकावी तसं कर्नाटकात निवडणुका आल्या की महाराष्ट्राच्या सीमा भागांवर दावा सांगायचा हा सातत्याचा परिपाठ होय. दस्तरखुद्द मुख्यमंत्रीच वादग्रस्त वक्तव्य करत सीमा भागात अशांतता निर्माण करत आहेत. हे…
रविवार विशेष शनिवारी सकाळीच ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचा फोन आला आणि त्यांनी सुलोचना चव्हाण ऊर्फ माईंच्या प्रकृतीबद्दल काही माहिती घ्यायला सांगितलं. जेमतेम अर्धा तास गेला आणि माई गेल्याची बातमी आली. क्षणार्धात एक सांगितिक पट डोळ्यासमोर उभा राहिला. काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर ढोलकीच्या तालावर नावाचा लावण्यांचे सादरीकरण असलेला एक रियालिटी शो गाजत होता. माझे मित्र पानिपतकार विश्वास पाटील त्याचे परीक्षक होते. त्यांच्या निमंत्रणावरून या शोचे शूटिंग बघायला मुंबईला गेलो. त्या दिवशी या शो साठी पाहुण्या परीक्षक म्हणून सुलोचना चव्हाण हजर होत्या. माईंनी परीक्षक म्हणुन लावणी सादर करणाऱ्या कलावतींना त्या दिवशी केलेले मार्गदर्शन ऐकून त्यांचा लावणीचा अभ्यास थक्क करून गेला. त्या…
रविवार विशेष लेख ‘‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.’’ अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (११ डिसेंबर) नागपूर येथून करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने समृध्दी महामार्गाविषयी ठळक…
महाराष्ट्र संवाद न्यूज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहे. या कार्यक्रमाचे शिर्डी इंटरचेंज येथून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने या प्रक्षेपण कार्यक्रमाची पूर्व तयारी, सोयी-सुविधांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी शिर्डी इंटरचेंज येथे पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपूते, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरूडे आदी उपस्थित होते. रविवारी सकाळी होणाऱ्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रेक्षपण कार्यक्रमास महसूलमंत्री तथा…
महाराष्ट्र संवाद न्यूज आठवडाभरात दुसऱ्यांदा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हारमध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले तीन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक केली आहे. आठवडाभरातील सततच्या दोन घटनांमुळे कोल्हार बुद्रुक गावठी कट्टे विक्रीचे शहर बनत चालले आहे, शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हार मध्ये तीन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसांसह दोन जणांना अटक केली होती. कोल्हार येथे काही लोक गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरातच दुसऱ्यांदा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत पाच जणांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरानजिक सुकेवाडी रस्त्यावरील नाल्याच्या कडेला आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात व त्याची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढण्यात शहर पोलिसांना यश आले असले तरी या तरुणाची हत्या कशासाठी करण्यात आली आणि कोणी केली याचा शोध मात्र अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे आहे. शुक्रवारी सकाळी सुकेवाडी रस्त्यावर पुनर्वसन वसाहतीच्या जवळ असलेल्या नाल्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा घातपात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याने त्याचे छायाचित्र पोलिसांनी समाज माध्यमांवर प्रकाशित केले होते. समाज माध्यमाच्या मदतीने पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आले. मृत तरुण हा अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिंदे फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडील नऊ खात्यांचा अतिरिक्त पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपविला गेल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वीस मंत्री कार्यरत आहेत. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जावा अशी मुख्यमंत्री शिंदे गटातील समर्थक आमदार आणि भाजपच्या आमदारांची मागणी होती. त्यामुळे नव्याने मंत्रिमंडळ विस्तार करून पुन्हा खातेवाटप जाहीर केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज माळी महासंघाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी संगमनेर येथील कैलास लक्ष्मण भरीतकर यांची निवड झाली त्यांच्या निवडीची घोषणा माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी केली. कैलास भरीतकर यांनी यापूर्वी समता परिषद, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेच्या केलेल्या अविरत कार्याची दखल माळी महासंघाने घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. माळी महासंघाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे कैलास भरीतकर यांनी सांगितले. माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी भरीतकर यांचे निवड जाहीर केले त्यावेळी महासंघाचे सचिव चंद्रशेखर दरवडे, दत्तूशेठ गडगे, रामचंद्र मंडलिक, संपतशेठ गलांडे, बंटी मंडलिक, अतुल अभंग, सचिन भरीतकर, अविनाश वाव्हळ, संतोष पठाडे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज पत्रकारांचे मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीवर दैनिक लोकसत्ताचे संगमनेर प्रतिनिधी सुनील नवले यांची निवड केल्याची माहिती संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. वैद्य यांनी प्रदेश प्रतिनिधी, मार्गदर्शक, सल्लागार आणि उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. लोकसत्ताचे अकोले तालुका प्रतिनिधी प्रकाश टाकळकर यांच्यासह पुण्यनगरीचे विकास अंत्रे, दैनिक सार्वमतचे अशोक गाडेकर, दैनिक दिव्य मराठीचे नवनाथ दिघे व गुरुप्रसाद देशपांडे, दैनिक सामनाचे बाळासाहेब भांड, दैनिक लोकमतचे प्रमोद आहेर व संगमनेर येथील मुक्त पत्रकार संदीप वाकचौरे यांचा मार्गदर्शकांमध्ये समावेश आहे. संघटनेच्या सल्लागारपदी दिव्य मराठीचे संगमनेर प्रतिनिधी गौतम गायकवाड, दैनिक आपलं महानगर अकोलेचे प्रतिनिधी विद्याचंद्र सातपुते, लोकमंथनचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज लोकांचे प्रश्न घेऊन ज्यावेळी एखादा आमदार उपोषणास बसतो त्यावेळी त्याच्याशी चर्चा करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते. नगरचे जिल्हाधिकारी देखील उपोषणार्थी आमदार लंके यांच्याशी चर्चा करावयास तयार नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. यात जिल्हाधिकारी दोषी आहेतच, आणि त्यांना सूचना देणारे जास्त दोषी आहेत. सूड, जिरवाजिरवीच राजकारण यापूर्वी जिल्ह्यात कधीही नव्हतं ते आता सुरू असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. माजी मंत्री आमदार थोरात यांनी नगरमध्ये सुरू असलेल्या आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला शुक्रवारी संध्याकाळी भेट देत पाठिंबा दर्शविला, यावेळी पत्रकारांची ते बोलत होते. राहुरीचे आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांच्या सोबत होते. थोरात म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज त्या अबोल तारा छेडल्यानंतर उमटलेले शब्द, बोल, ताल आणि लय यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि हृदयाच्या तारा छेडल्या. ‘झणझण छेडल्या तारा, बरसती अमृतधारा’ याची साक्षात अनुभूती घेत उपस्थित विद्यार्थ्यांसह सुमारे दोन तास सगळेच मंत्रमुग्ध झाले. सतारीच्या त्या स्वर्गीय स्वरांची जादू उपस्थितांच्या मनावर कायमची कोरली गेली. निमित्त होते विदुरजी कृष्णनाथ महाजन यांच्या सतारवादन कार्यक्रमाचे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय या उपक्रमशील शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालय शाळा समूह योजनेच्या वतीने आयोजित ‘सतारवादन आणि विद्यार्थी संवाद’ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, उपाध्यक्ष कैलास काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिकच्या शिंदे-पळसे टोल नाक्यावरील एसटी बसची थरारक दुर्घटना ताजी असतानाच शुक्रवारी सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील मृतक महाविद्यालयीन विद्यार्थी असून ते नाशिकच्या नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार आठ-नऊ विद्यार्थी स्विफ्ट कारने एका मित्राच्या विवाह सोहळ्यानिमित्त संगमनेरला आले होते. विवाह सोहळा आटोपून सायंकाळच्या वेळी ते पुन्हा नाशिकला परतत असताना सिन्नरच्या मोहदरी घाटामध्ये गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. कार विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या इनोव्हा आणि स्विफ्ट जाऊन धडकली. त्यामुळे विचित्र पद्धतीने झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू…
समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी (ता.११ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी मेट्रो ट्रेन आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने तातडीने कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी शुक्रवारी संगमनेर शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सह्यांची मोहीम उघडली आहे. बस स्थानक चौकात एका भल्या मोठ्या फ्लेक्स बोर्डवर ही सह्यांची मोहीम सुरू आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करत आहे. राज्य त्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असताना केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. राज्यातील सत्ताधारी देखील त्यांची पाठराखण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. विरोधी पक्षाने देखील त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून…
महाराष्ट्र संवाद न्यूज पहाटेच्या सुमारास घरात घुसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ८० वर्षीय वयोवृद्ध गंभीर जखमी झाला. उपचारासाठी या वयोवृद्ध व्यक्तीला नाशिकला हलविण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील तिटमे वस्ती शिवारात ही घटना घडली. निवृत्ती सयाजी उघडे असे या वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या उजव्या कांद्याजवळ दंडाला बिबट्याने चावा घेतला. गुरुवारी रात्री निवृत्ती उघडे हे नेहमीप्रमाणे आपल्या घरातील उंबरठ्यावर झोपलेले होते. त्यांच्या घराला दरवाजा नाही. घरालगत बकऱ्या आणि शेळ्या बांधण्यात आलेल्या होत्या. त्या बंदिस्त होत्या. त्यांच्या घरालगत ऊसाचे शेत आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या शेतातून आलेला बिबट्या थेट उघडे यांच्या घरात घुसला. उंबरठ्यात झोपलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या तीन दिवसापासून शहर व परिसरात सातत्याने अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळत आहेत. शुक्रवारी सकाळीही शहरानजीकच्या संगमनेर-सुकेवाडी रस्त्यावरील नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय वर्तविला जात असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. सुकेवाडीकडे जाणार्या पुनर्वसन वसाहतीच्या काही अंतरावरील नाटकीनाल्यात एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी संगमनेर पालिकेच्या कुटीर रुग्णालयात आणला आहे. अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने सर्वप्रथम त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान नाल्यात आढळलेल्या शरीरावर मारहाणी सदृश्य जखमा आढळून आल्याने या…
महाराष्ट्र संवाद न्यूज एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी बस तीन चार वाहनांवर आदळल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नासिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे येथील टोल नाक्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली असल्याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर आजाराची ही एसटी बस असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमध्ये ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने मदत पथके पोहोचले असून मदत कार्य सुरू झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जवळील शिंदे पळसे टोल नाक्यावर कारचालक…
महाराष्ट्र संवाद न्यूज मोठ्या शहरातील वेश्याव्यवसायाचे लोन संगमनेरच्या ग्रामीण भागात पोहोचले आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन पीडित मुलींची सुटका केली. ग्रामीण भागात पोलिसांनी केलेल्या कारवांमुळे खळबळ उडाली आहे. लॉजेससह अन्य काही ठिकाणी चालणारे अनैतिक धंदे सर्वश्रुत असले तरी ग्रामीण भागातही आता अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले. नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटालगत पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीराम पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानंतर मिटके यांनी आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले होते. गुरुवारी पहाटेच्या वेळी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी बनावट ग्राहकाला…
