Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात यंदा दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असून शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलावे या सामाजिक बांधिलकीतून महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार खताळ यांनी कर्जुले पठार येथील येठेवाडी, गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी आणि डोळासणे येथील दुबेवाडी परिसरातील आदिवासी व गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा, साड्या, मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करून त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मशागतीदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने मोटारीची केबल तुटल्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन ६५ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला शिवीगाळ करत दगडाने व कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या घोडेवहाळ शिवारात शनिवारी (७ नोव्हेंबर) सकाळी ११.४५ ते दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील ६५ वर्षीय शेतकरी बाळू गणपत फापाळे हे आपल्या शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी गणेश भाऊराव गोपाळे यांच्या मोटारीची केबल जेसीबीच्या कामादरम्यान अडकून तुटली. यावरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पवित्र मतदानाच्या माध्यमातून जनतेने लोकशाही मार्गाने आपले प्रतिनिधी निवडले, परंतु याच लोकप्रतिनिधींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खोके सरकारने नवनवीन कायद्यांची खोडसाळ ढाल पुढे केली आहे. ही सरळसरळ लोकशाहीची क्रूर हत्या असल्याचा घणाघाती आरोप आता राज्यभरातून होत असून, संगमनेरमध्ये याविरोधात संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघावर शासननियुक्त सदस्य ठोकण्याच्या या हुकूमशाही निर्णयाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये ‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) आक्रमक झाला आहे. शहरातील ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या रोखठोक फ्लेक्समुळे सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही कारभाराविरोधात संपूर्ण नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघात सभासदांनी परिवर्तनाचा कौल देत माजी…
प्रवीण पुरो काहीही करा पण सत्ता मिळवा, या एका मंत्राने राज्यातले सत्ताधारी विशेषत: भारतीय जनता पक्ष पुरता पछाडला आहे. हा पक्ष सहकारी पक्षाचा आणि सहकारी नेत्यांचा जराही विचार करत नाही, हा अनुभव देशातील सगळ्याच राजकीय पक्षांना आहे. इतर राजकीय पक्षांवर अन्याय करणारे या पक्षाचे मंत्री आणि पदाधिकारी गेल्या आठवड्यात संविधान आणि लोकशाहीच्या बचावाच्या बाता मारत रस्त्यावर उतरले होते. संविधानाचे आपणच राखणदार आहोत, असं सांगणार्या या पक्षाने गेल्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये संविधानाचा खून केला, लोकशाही पायदळी तुडवली, लाजलज्जा विकून खाल्ली. सामान्यत: सत्ता राबवण्यासाठी कोणताही पक्ष आपली सारी शक्ती पणाला लावत असतो. मात्र काहीही न करता केवळ सत्ता आणि पैशांच्या जिवावर सहकार क्षेत्रात…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल आणि महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडे सोपवली जाऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, तरीही खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वृषभ – आजचा दिवस शांततेने आणि संयमाने घालवण्याची गरज आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्रात सावधगिरी बाळगा, विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्याच्या संदर्भात पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो, विश्रांती घ्या. मिथुन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील गुंजाळ पाटील मळ्यात एका लग्नसमारंभादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा संगमनेर शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून तब्बल ३ तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या चेन हस्तगत केल्या आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ०३ मे २०२६ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या दरम्यान गुंजाळ पाटील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करण्याचे काम करतात; मात्र आमचे कार्यकर्ते नगरसेवक नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून जनसेवक म्हणून काम करत आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील, परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत केलेले जुने प्रयत्न आज फळाला येऊ शकतात. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. वृषभ- आजचा दिवस आर्थिक फायद्याचा ठरू शकतो. रखडलेले पैसे परत मिळाल्यामुळे मनाला आनंद होईल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण आणि आनंदी राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः कंबर किंवा पाठीच्या दुखण्यापासून सावध राहा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मिथुन-…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार हे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी रुग्णालयात जात त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक विचारपूस केली. मागील दोन दिवसांपासून खासदार पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर राज्यभरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्येही काळजी आणि आपुलकीची भावना व्यक्त होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक येथील उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत सहभाग घेतल्यानंतर मुंबईकडे प्रयाण केले होते.…
लोकांना आम्ही फक्त गाड्यांमध्ये फिरताना दिसतो, पण…; विखे पाटलांनी सांगितली मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मंत्रिपद म्हणजे केवळ अधिकार नाही तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे लोकांची जबाबदारी स्वीकारणे होय, अशी भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मराठवाड्यात पाण्याचे संकट गंभीर असून, शेतीच्या पाण्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागते. धरणातील पाणीसाठा आणि लोकांच्या गरजा यांचा ताळमेळ साधताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रचंड मानसिक दबाव सहन करावा लागतो. राजकारणात अनेक पदे मिळतात, मात्र सामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आणि त्यांच्या अडचणींना कुटुंबातील समस्या मानून सोडवणे हेच जनसेवकाचे खरे कर्तव्य असते. विकासाचा प्रवास करताना…
प्रवीण बागडे दिवाळी आली की प्रत्येक घरात आनंदाचे दिवे उजळतात. बाजारपेठा सजतात, घराघरांत खरेदीची लगबग सुरू होती आणि नोकरदारांच्या खात्यात जमा होणाऱ्या बोनसची प्रतीक्षा सुरू होते. अनेक कुटुंबांसाठी हा बोनस म्हणजे केवळ अतिरिक्त पैसा नसतो, तर तो मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी, सणाचा गोडवा आणि वर्षभराच्या कष्टांना मिळालेली छोटीशी आर्थिक उसंत असते. पण या बोनसकडे केवळ सणासुदीचा आर्थिक लाभ म्हणून पाहणे म्हणजे त्यामागील कामगार चळवळीचा इतिहास आणि श्रमिकांच्या संघर्षाचा विसर पडणे होय. बोनस हा मालकाचा उपकार नाही; तो कायद्याने आणि श्रमिकांच्या संघर्षाने मान्यता मिळवलेला हक्क आहे! भारतात बोनसची संकल्पना एका दिवसात जन्माला आलेली नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात, १९१७…
विशाल काळे- मला आठवते त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या आईला विड्या बांधताना पाहत आलो आहे. हा प्रसंग सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे, आईच्या या कष्टाळू कामाचे आणि दिवाळीचे वर्षानुवर्षांचे एक अतूट नाते आहे. वर्षभर विड्या बांधून मिळणाऱ्या मोबदल्यासोबतच, दिवाळीच्या सणाला आईला एक विशेष बोनस मिळायचा. याच बोनसच्या पैशांवर आमच्या घरची दिवाळी साजरी व्हायची. आज मी स्वतः कमावता झालो आहे आणि मलाही चांगला बोनस मिळतो; पण माझ्या आईला त्या काळात मिळणाऱ्या त्या छोट्याशा बोनसचे अप्रूप आजही माझ्या मनात कायम घर करून आहे. खरं तर, आईच्या हाताला लागलेला कष्टाचा गंध आणि तिच्या घामातून उभे राहिलेले संसाराचे विश्व, यांची तुलना जगातील कोणत्याही संपत्तीशी होऊ…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी, कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल आणि आरोग्याची साथ लाभेल. वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक लाभाचा आणि प्रगतीचा असेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवासात सामानाची काळजी घ्या. मिथुन – आजचा दिवस वैचारिक पातळीवर थोडा गुंतागुंतीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वादविवाद टाळावेत आणि शांत राहून कामे पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खांबा गावासाठी वरदान ठरणारी ‘कामधेनू उपसा जलसिंचन योजना’ सध्या निकृष्ट काम आणि भोंगळ कारभारामुळे चहूबाजूने चर्चेत आली आहे. मुळा धरणावरून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याच्या या १६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ठेकेदाराने केलेल्या मनमानी कारभाराची आणि निकृष्ट कामाची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी थेट जमिनीत गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून दर्जा तपासण्याचे सक्त आदेश दिले आहेत. या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि संबंधित ठेकेदारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सन २०२४ मध्ये मंजूर झालेली ही १६ कोटी खर्चाची योजना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रखडलेली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण होत नसल्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दूध उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला सातत्याने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर चालू हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंतचे आगाऊ पेमेंट, वाहतूक भाडे, वितरक कमिशन, कर्मचाऱ्यांचा पगार आणि बोनस अशा विविध माध्यमातून एकूण १७ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम दूध उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आबासाहेब थोरात यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हा समूह गेल्या ३३ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील असून थोरात डेअरीने नेहमीच गुणवत्तापूर्ण दूध संकलन, स्वच्छता आणि पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा विश्वास संपादन केला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजहंस दूध संघाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक, शेतकरी व कामगारांचे दूध दर फरक, बोनस व अनामत रकमेपोटी सुमारे ५० कोटी रुपये बँक खात्यात वर्ग केले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दूध संघाचे माजी चेअरमन तथा अहिल्यानगर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे तालुक्यातील हजारो दूध उत्पादकांची दिवाळी गोड होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने यंदाही आपली परंपरा कायम राखत दीपावलीपूर्वीच ही मोठी आर्थिक मदत जमा केली आहे. संघाची वार्षिक उलाढाल ६०९ कोटी रुपयांच्या घरात असून, दूध…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील गिऱ्हेवाडी जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या अचानक भेटीत चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठ आणि नऊचे पाढे न आल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षकांना खडे बोल सुनावले. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणाऱ्या गिऱ्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार समोर आला. आमदार अमोल खताळ यांनी शालेय कामकाजाची व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी करण्यासाठी या शाळेला अचानक भेट दिली. अचानक आलेल्या या भेटीमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मोठी तारांबळ उडाली. आमदारांनी थेट वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मूलभूत ज्ञानाची चाचपणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना गणिताचे पाढे विचारण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि ऊर्जावान असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि उच्च अधिकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हिवाळा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत प्रवासाचा योग येऊ शकतो. वृषभ- आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी काही जुनी आव्हाने पुन्हा समोर येऊ शकतात, परंतु तुमच्या संयमामुळे तुम्ही त्यावर मात कराल. व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर हे अत्यंत विकसित आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते. नागरिकांना अत्याधुनिक नागरी सुविधा पुरवण्यासोबतच शहरात स्वच्छतेची एक नवी संस्कृती रुजली आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या या चळवळीत स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असून नगरपरिषदेने सेवेत दाखल केलेल्या नवीन अत्याधुनिक वाहनांमुळे ‘आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेर’ ही संकल्पना आता पूर्णत्वाकडे जात आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर यशोधन कार्यालय येथे संगमनेर नगरपालिकेच्या वतीने ‘एक पणती स्वच्छतेची’ या विशेष उपक्रमांतर्गत सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या विविध स्वच्छता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये २ अत्याधुनिक स्वीपिंग मशीन, १० नवीन घंटागाड्या, ५ जुन्या घंटागाड्यांचे नूतनीकरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळीच्या ऐन तोंडावर संगमनेर तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांची दिवाळी अत्यंत गोड आणि आनंददायी ठरणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तब्बल २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग केले आहेत. या मोठ्या निर्णयामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक व्यापाराला मोठी आर्थिक गती मिळणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी ही माहिती दिली. घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरची सहकार चळवळ आणि कारखान्याची यशस्वी वाटचाल…
