Author: Annant Ppangarkar

आजचे राशिभविष्य  मेष – कामाच्या ठिकाणी उत्साह राहील आणि रखडलेली कामे पुढे सरकतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ – आर्थिक बाजू भक्कम राहील आणि कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल, खर्चावर थोडे लक्ष ठेवा. मिथुन – संवाद साधताना काळजी घ्या, नवीन कल्पना सुचतील आणि मित्रांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कर्क – मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते, घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पण संयमाने परिस्थिती हाताळा. सिंह – आत्मविश्वास वाढलेला राहील आणि मानसन्मान मिळेल, महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कन्या – कामाचे नियोजन नीट करा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अनावश्यक वाद टाळा. तूळ – नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील आणि कला किंवा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मानव-बिबट संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासह आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात शुक्रवार (दि. २०) वनविभागाच्या कामकाजाचा आमदार खताळ यांनी आढावा घेतला. या बैठकीत प्रस्तावित वनभवन इमारतीचे काम तसेच निझर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर येथील वनपर्यटन विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेत वनविभागाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी जिल्हा नियोजन…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी नवे विचार मांडण्यास संकोच करू नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील आणि महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. वृषभ – आर्थिक बाबींमध्ये आज संयम ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. जुन्या ओळखींमधून एखादी चांगली संधी चालून येण्याची शक्यता आहे. मिथुन – संवादातून अनेक प्रलंबित प्रश्न सुटतील. मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबतचे मतभेद मिटवण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. प्रवासाचा योग संभवतो, मात्र आरोग्याची काळजी घ्या. कर्क – भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरण शांत ठेवण्यासाठी सामंजस्याने वागा. कामाचा ताण थोडा जाणवेल, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात (गु.र.नं. १२०२/२०२६) संघटित गुन्हेगारी टोळीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १११ अन्वये वाढीव कलम लावण्याची कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केली आहे. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, टोळीप्रमुखासह पाच जण अद्याप फरार आहेत. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विनीत विक्रांत शिर्के (उपविभागीय अधिकारी, राहुरी) हे आपल्या शासकीय वाहनातून चालकासोबत मालुंजा येथील शासकीय लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून लाख, जातप, बेलापूर मार्गे चिंचोली गावाकडे जात होते. गंगापूर गावच्या शिवारात रस्त्यावर त्यांना विना क्रमांकाचा हायवा डंपर आढळून आला. त्यांनी डंपर थांबवून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करण्यापूर्वी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकासाचा हिशेब द्यावा, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी आमदार अमोल खताळ यांना दिले आहे. संगमनेरचा स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीचा इतिहास-भूगोल उकरण्यापेक्षा तालुक्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटापर्यंतचा राजकीय प्रवास करणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या इतिहासावर भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकांचा इतिहास तपासावा, अस शेलकर यांनी म्हटलं आहे. लोणीच्या मालकांची परंपरा पुढे नेत ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे उचकून’ अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. संगमनेरच्या हक्काची पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे वळवली…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आज कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह वाढलेला राहील आणि नवीन संधी समोर येऊ शकतात. आर्थिक नियोजन नीट करा आणि अनावश्यक खर्च टाळा. वृषभ – कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे, मात्र बोलण्यावर संयम ठेवा. मिथुन – आज नवीन संपर्क निर्माण होतील आणि प्रवासाचा योग संभवतो. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कर्क – भावनिक निर्णय घेताना काळजी घ्या. घरगुती वातावरण आनंदी राहील आणि जुन्या ओळखीमधून एखादा फायदा होऊ शकतो. सिंह – तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण आज उठून दिसतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे, पण अहंकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील एसटी प्रवाशांची ऊन, वारा आणि पावसापासून होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, तालुक्यातील लोहारे, निळवंडे, मांची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द आणि वरवंडी फाटा या सात महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत प्रवासी निवारा थांबे उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयाअंतर्गत संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ७५ प्रवासी मार्ग थांबे उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एसटी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी-साकूर दरा परिसरातील खोल दरीत ४५ वर्षीय विवाहित महिलेचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मनिषा रामनाथ चाचण असे मृत महिलेचे नाव असून, ती बेपत्ता असल्याची नोंद घारगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीच करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मनिषा चाचण आपल्या कुटुंबीयांसह खंडेरायवाडी-साकूर दरा येथे वास्तव्यास होती. गुरुवारी सकाळी काही तरुण या परिसरात गेले असता त्यांना रक्ताचे डाग निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत याची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज गुरुवारी संगमनेरमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी आरोप केला की, राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन पाळला जात असताना शायना एनसी आणि संजय निरुपम यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला आहे. हेच यांचे बेगडी प्रेम आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. या कृत्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘Belonging : Journey of Love’ या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या प्रकाराचा संगमनेरमध्ये निषेध करण्यात आला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने शहरात जाहिर निषेधाचा फलक बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर लावण्यात आला असून, या माध्यमातून संबंधित कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. थेट राहुल गांधी समर्थक संघाने या प्रकाराचा निषेध केला आहे. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडण्याचा प्रकार हा केवळ एका राजकीय नेत्याचा अपमान नसून भारतीय लोकशाही, महिलांचा सन्मान आणि काँग्रेसच्या विचारधारेचा अपमान असल्याची भूमिका या फलकावर मांडण्यात आली आहे. पुस्तकाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळ्याचा संशय आल्याने एक पोलीस शिपाई रकमेसह पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. हरेश्वर यशवंत शेंडे (वय २६, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, व्ही. पी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे, तर धनंजय दिलीप वायसे (व्ही. पी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) हा पसार झालेल्या आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास हरेश्वर शेंडे यांच्याकडे होता.…

Read More

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या आजचे राशिभविष्य मेष – आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतील आणि मेहनतीचे चांगले फळ दिसेल. कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक नियोजन नीट केल्यास फायदा होईल. वृषभ – आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अनावश्यक खरेदी टाळा. कामात स्थिरता राहील आणि जुन्या प्रलंबित बाबी मार्गी लागतील. जोडीदारासोबत शांत वेळ घालवता येईल. मिथुन – आज संवादातून अनेक प्रश्न सुटतील, तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. प्रवासाचा योग संभवतो आणि नवीन ओळखी होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्क – आज भावनिक निर्णय घेताना थोडा विचार करा, मन अस्वस्थ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मंत्रालयातील विविध कामांच्या निमित्ताने मुंबईत गेलेले आमदार अमोल खताळ यांनी मूळचे संगमनेरचे असलेले टॅक्सीचालक महेश चकोर यांच्या टॅक्सीतून प्रवास करत आपुलकीने संवाद साधला. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता ही आपली ओळख त्यांनी मुंबईसारख्या महानगरातही जपली असून, त्यांच्या या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महेश चकोर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आमदार खताळ मुंबईत आल्याचे समजताच चकोर यांनी त्यांना आपल्या टॅक्सीतून प्रवास करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर आमदार खताळ यांनी कोणतीही पदाची प्रतिष्ठा आड न आणता टॅक्सीतून सफर केली. या प्रवासादरम्यान आमदार खताळ यांनी चकोर यांच्या कुटुंबाची, व्यवसायाची आणि मुंबईतील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र ते व्यक्त करताना सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये कोणत्याही पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात आणि त्यावर टीका करण्याचा किंवा असहमती व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, त्यासाठी संबंधित पुस्तक वाचून त्यातील विचार समजून घेत वैचारिक चर्चा करणे अपेक्षित असते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुस्तकाच्या प्रती फाडण्यासारखे कृत्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि साठवणुकीविरुद्ध महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत खांडगाव आणि निमज परिसरातून लाखों रुपयांचा वाळूसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खांडगाव येथील फाट्यापासून खांडेश्वर मंदिर रोडच्या आतील बाजूस एका ठिकाणी विनापरवाना मोठा वाळूसाठा करून ठेवल्याची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार कार्यालयाच्या भरारी पथकाने आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी खांडगाव परिसरात छापा टाकून पाहणी केली. यावेळी मंगेश बाबू केदारी याच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही पूर्वपरवानगी किंवा परवाना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनने दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात महत्त्वाची कारवाई करत जप्त केलेले १८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड फिर्यादीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार परत केले आहेत. नोव्हेंबर २०२५ दरम्यान तेजस मारुती परदेशी या संशयिताने फिर्यादी चंद्रशेखर विलास शिंदे यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून तिच्याकडील सोन्याचे विविध दागिने घेतले होते. मात्र, ते दागिने परत न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून विश्वासघात केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड जप्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये बॅनरबाजीचा कांगावा करण्यापेक्षा नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमदार अमोल खताळ यांच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासशून्य कारभाराचा हिशोब द्यावा, अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी करत काँग्रेस पुढाऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आमदार खताळ हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले संघर्षशील नेतृत्व असून त्यांना सामान्यांच्या अडचणींची जाणीव आहे. ते संगमनेरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवून केवळ बॅनरबाजीचा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे जनतेचे लक्ष विकासापासून विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, खताळ यांच्यावर टीका करून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दुसऱ्यांना सल्ले देणे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश येईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस शांततेने पार पाडावा. कामाच्या ठिकाणी काही किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. संयम बाळगल्यास सर्व गोष्टी अनुकूल होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रवासाचे योग आहेत. मिथुन – बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी आनंद देतील. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण कमी होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चांगली बातमी कानावर पडेल. कर्क – कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतता नांदेल. आई-वडिलांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने लक्षवेधी धडक कारवाई करीत वाळू तस्करांविरोधात उघडलेल्या मोहिमेत चार गुन्हे दाखल करून सुमारे ५० वाळूतस्करांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून ११ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षातील महसूल विभागाची ही मोठी कारवाई ठरली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत काही अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याचा फायदा उठवत वाळूतस्करांनी प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारच्या जनता दरबारात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आढावा बैठकीत दिलेल्या कठोर कारवाईच्या निर्देशांनुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल पथकांना कारवाईच्या सूचना दिल्या…

Read More