Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी- जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या ४ वर्षीय सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या तातडीच्या आणि आक्रमक पाठपुराव्यातून महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्यावतीने १० लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात आली आहे. सकाळी जन आक्रोश आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह अवघ्या ६ तासांत पूर्ण केला. १३ डिसेंबर २०२५ रोजी जवळेकडलग येथील सिद्धेश कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, यात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.…
नवी दिल्ली | दि. 15 डिसेंबर 2025 नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा आधी निश्चित करण्यात आलेल्या मूळ मार्गानेच राबवण्यात यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन रेल्वेमंत्र्यांकडे सादर केले. नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–राजगुरुनगर–चाकण मार्गे पुणे अशी पूर्वी निश्चित करण्यात आलेली नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची मूळ अलाइनमेंट भौगोलिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत योग्य असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. या भेटीत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, हा मूळ मार्ग केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक आणि पुणे…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा राहील. तुम्ही उत्साहाने काम कराल, परंतु काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आजचा दिवस लाभदायक आणि अनुकूल आहे. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल आणि प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. मित्र आणि कुटुंबाकडून मदत मिळू शकते, तसेच जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. मिथुन: आज तुम्हाला प्रत्येक काम विचारपूर्वक करण्याची गरज आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. नवीन आव्हाने स्वीकाराल. प्रवासाचे योग आहेत, जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. कर्क: आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल, परंतु आत्मविश्वासाने…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘अमली पदार्थ’ प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणावरून आमदार अमोल खताळ यांच्यावर काँग्रेसने अत्यंत गंभीर आरोप करत त्यांचे सभागृहातील वक्तव्य आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेले व्हिडिओ ‘छेडछाड’ केलेले असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. मूळ व्हिडिओ आणि फोटो पत्रकार परिषदेत सादर करत काँग्रेसच्या नेत्यांसह संबंधित युवकांनी या व्हिडिओची पोलखोल करत खताळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नवीन लोकप्रतिनिधी आमदार खताळ समर्थकांकडून ‘खोटे व्हिडिओ बनवण्याचा उद्योग’ सुरू असून, यामुळे निष्पाप तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हा उद्योग त्वरित बंद करा, अन्यथा तालुक्यातील तरुणाईच्या प्रचंड उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा संतप्त…
संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्यासाठी आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, दि. १५ डिसेंबर) संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. न्याय मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असताना प्रशासनाचे मात्र अनास्था दिसून आली. जनतेला उत्तरदायित्व असलेल्या प्रांताधिकार्यांनी निवेदन घेण्यास आचारसंहितेचे कारण दाखवत टाळाटाळ केल्याने संतापलेल्या आंदोलकांपुढे मात्र अखेरीस त्यांना नमते घेऊन निवेदन स्वीकारण्यासाठी नागरिकांमध्ये यावे लागले. गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, बिबट्यांची वाढलेली संख्या तालुक्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. या गंभीर प्रश्नावर प्रभावी उपाययोजना व्हावी यासाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे चार वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. शनिवारी (दि. १३) या बिबट्याच्या हल्ल्यात सिध्देश कडलग या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संतप्त ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनामुळे वनविभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती आणि अखेर रविवारी (दि. १४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जाळ्यात अडकला. शनिवारी बिबट्याने हल्ला करून सिध्देशचा बळी घेतल्यामुळे जवळे कडलगसह संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे रेस्क्यू टीमसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वृषभ – तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळेल. विचारपूर्वक बोलल्यास संबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – आज तुम्हाला समाधानी वाटेल. मित्रांशी संवाद वाढेल आणि नवीन कल्पनांवर काम सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. अनावश्यक खर्च टाळा. कर्क – आज मानसिक शांतता मिळेल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल. सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे कार्यक्षेत्रात प्रगती…
अहिल्यानगर – प्रतिनिधी जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका मोटार अपघात दाव्यात तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अपघातात मयत झालेल्या महेश काठमोरे यांच्या वारसांना व विमा कंपनीमध्ये यशस्वी मध्यस्थी होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील महेश तुकाराम काठमोरे (वय ३४) यांचा २० डिसेंबर २०२३ रोजी अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार गमावल्याने त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता, अज्ञान मुले व वयोवृद्ध आई-वडील यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर, वारसांना जलद न्याय व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा खटला लोकअदालतीत ठेवण्यात आला होता. मयत काठमोरे…
संगमनेर, प्रतिनिधी बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. विशेष म्हणजे बाळ सुखरूप असले तरी, प्रसूतीच्या आनंदाऐवजी या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली असून, नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर उपचारात घोर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे नाव आहे. प्रसूतीसाठी त्या माहेरी आल्या होत्या. गर्भधारणेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ सुखरूप जन्माला घातले. मात्र, त्यानंतर रुपाली यांची प्रकृती…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील हृदयद्रावक घटनेनंतर, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश सूरज कडलग (वय 4) या बालकाच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात केली आहे. जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर शनिवारी (१३ डिसेंबर) ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धेश हा घराजवळ खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या दातांनी गळा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. सिद्धेशचे कुटुंब शेती आणि दुग्ध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य शेतात…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – संगमनेर तालुका बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे भयभीत झाला असून, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी, (१५ डिसेंबर) २०२५ संगमनेरात भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय यादरम्यान हा जन आक्रोश मोर्चा हजारो संगमनेर करांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना जखमी व्हावे लागले आहे, तर…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याला बिबट्याच्या वाढत्या दहशतीने ग्रासले असतानाच, जवळे कडलग गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास सिद्धेश हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता, तर त्याचे आजी-आजोबा आणि कुटुंबीय शेतीत व्यस्त होते. याच वेळी गवतात लपून बसलेल्या एका बिबट्याने संधी साधून सिद्धेशवर झेप घेतली. आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने या निष्पाप बाळाच्या मानेला धरून त्याला शेतात ओढत…
राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कारभाराची वर्षपूर्तीचे बरेच नगारे वाजले. वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने विविध वर्तमानपत्र आणि त्यांच्यासाठी काम करणार्या कथित सर्वेक्षण संस्थांच्या निकालांनी या सरकारची भलतीच भलामण केली आहे. सर्वच आघाड्यांवर हे सरकार कसं यशस्वी ठरलंय, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना जणू आपण राज्यातल्या तेरा कोटी जनतेचाच हवाला देत असल्याचा आवही या सर्वेक्षणांनी आणला. हव्यासापोटी आपण किती लाचार बनतो आहोत, याचं भान न राहिल्याचं हे उत्तम उदाहरण. गोदी म्हणून इतरांना हसण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावल्याचं हे चित्र. आता तर आपण दिल्लीतील लाचारांहून भाट झालोत की काय, असं वाटावं, अशी ही सर्वेक्षणाची मांडणी म्हणावी लागेल. आपल्यासोबत कोणी तरी आहे, याचा आनंद…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. कामात गती मिळेल आणि अपेक्षेनुसार प्रगती कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आर्थिक बाजू बळकट होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. धार्मिक कार्यात मन रमवा. मिथुन : नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यांचा भविष्यात फायदा होईल. मित्रांशी संवाद वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. प्रवासाचे योग आहेत. कर्क : घरातील वातावरण शांत आणि समाधानी राहील. आई-वडिलांकडून विशेष प्रेम व सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो, पण तो व्यवस्थापित कराल. सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी उत्तम दिवस…
नागपूर – नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा तिढा आता विकोपाला गेला असून, हा प्रस्तावित मार्ग संगमनेरवरून अचानक शिर्डी मार्गे वळवल्याने आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता आणि ‘महारेल’ विभागाने सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, चाकण या मार्गासाठी सर्वेक्षणही पूर्ण केले. तांबे यांनी सभागृहात सांगितले की, या मार्गासाठी राज्य शासनाने 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले असून त्यावर 316 कोटी रुपयांचा मोठा खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे कोणत्या उद्देशाने वळवला गेला, असा थेट सवाल आमदार तांबे यांनी…
संगमनेर – शेतकरी कष्ट करून अन्न पिकवतो आणि जवान ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करतो. या दोघांचेही देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे महत्त्व आहे. ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाचे आणि तालुक्याचे नाव मोठे करावे, सैनिकांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१३ डिसेंबर) संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलात निवड झालेल्या ६१ तरुण-तरुणींचा आणि त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ…
संगमनेर – सुकेवाडी (संगमनेर) येथील गांजा तस्करी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या याला अखेर संगमनेर पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या नारकोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. टास्क फोर्सच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आल्याने स्थानिक पोलिसांचे अपयश समोर आले होते. शहरालगत ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान मुख्य आरोपी असलेला तुषार पडवळ उर्फ…
मेष: आजचा दिवस जोमाने भरलेला असेल. कोणतेही नवे काम सुरू करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी काळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थैर्य आणि धीर अत्यंत महत्त्वाचे ठरतील. पैसा गुंतवण्यासाठी चांगला दिवस आहे. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. मिथुन: प्रवास होण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय राहाल आणि नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कर्क: तुमच्या मनात आज शांतता अनुभवायला मिळेल. तुमच्या जुन्या अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल.…
नागपूर: नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे नियोजन सिन्नर-संगमनेर-जुन्नर मार्गेच करावे, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. या मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीचे पर्यटन महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे तांबे यांनी सभागृहात सांगितले. विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना आमदार तांबे यांनी महाराजांच्या जन्मभूमीचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा आहे आणि त्यांचे जन्मस्थळ जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आहे, असे तांबे म्हणाले. सध्या नियोजित असलेला नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड मार्गे पुण्याला जोडला जाणार आहे. या नैसर्गिक मार्गामुळे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, तसेच…
संगमनेर – संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटलाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहे. ०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १८५/२०१५ नुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस…
