Author: Annant Ppangarkar

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील १२ विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्यांमधून २०२५-२६ या वर्षासाठी ही निवड केली जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रातून डॉ. गायकवाड यांना हा बहुमान मिळाला आहे. कार्यक्रमास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महात्मा फुले जन्मद्विशताब्दीच्या औचित्याने सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे १० वे पुष्प सोमवारी, (७ सप्टेंबर) गुंफले जाणार आहे. या विशेष कार्यक्रमात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) प्रसिद्ध प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय वक्ते प्रा. डॉ. शरद बाविस्कर हे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ या महत्त्वपूर्ण विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा वैचारिक सोहळा सायंकाळी ६ वाजता संगमनेर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील पडतानी कॉम्प्लेक्समधील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये पार पडणार आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेणे आणि समकालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास संगमनेर शहर व परिसरातील सर्व नागरिक, विचारवंत,…

Read More

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश असतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आरोग्य उत्तम राहील. वृषभ – आज तुम्हाला व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. घरात मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत. मनातील ताणतणाव दूर होऊन शांतता लाभेल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन – आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास कौटुंबिक वाद टाळता…

Read More

प्रवीण पुरो कोणीही कितीही तरबेज असला तरी त्याच्या खोटं बोलण्याच्या कृतीला मर्यादा ही असतेच असते. तिथे जबाबदार व्यक्तीचीही सुटका नाही. त्याने तर अधिक समजदारीचे वर्तन केले पाहिजे. तसं न केलं तर ती व्यक्ती तोंडावर पडू शकते. त्यातच खोट्याला खर्याचे लेबल लावले तर पराकोटीची फजिती होत असते. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असंच काहीसं होऊ लागलं आहे. आपल्या देशाचा विकास दर म्हणजे जीडीपी हा ७.८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला असल्याचं त्यांनी ज्या कौतुकाने देशाला ऐकवले, त्याच कौतुकाने त्यांच्या घोषणेचा समाचार घेतला जाऊ लागल्याने खोटेपणाने केलेल्या घोषणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्यतः देशातील तरुणांना त्यांच्या गरजेचे शिक्षण का मिळत नाही, हाताला रोजगार का मिळत…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी आणि विचारांची दिशा दिली आहे. जात, पात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन मानवता हाच सर्वात महत्त्वाचा धर्म असून संगमनेर तालुक्याला या वारकरी संप्रदायाचा अत्यंत समृद्ध आणि मोठा वारसा लाभला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी आणि भाविकांशी संवाद साधला. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील कोल्हेवाडी, कवठे कमळेश्वर, कोकणगाव आणि जोर्वे येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांना उपस्थिती लावली. यावेळी सर्वच ठिकाणी महिला आणि नागरिकांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या आठवड्यात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने सर्वत्र गणेश मंडळांच्या तयारीला जोरदार वेग आला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारपेठेत मागितलेली वर्गणी दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली असून समाजमाध्यमांवरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बातमी लिहीपर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. तक्रार दाखल नसल्यामुळे…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन सोमवारी, (७ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचा कायापालट झाला असून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून नागरिक व विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात व्यापक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अकोले नाका, त्रिमूर्ती…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहरात मोठी कारवाई केली. सुकेवाडी ते समनापूर रस्त्यावरील एका कांद्याच्या चाळीजवळ छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५ लाख १० हजार रुपये किमतीचे १७०० किलो गोमांस आणि ६ लाख रुपयांचे महिंद्रा पिकअप वाहन (क्र. MH-17-BD-4661) असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल डोके, अमृत आढाव, योगेश कर्डीले व भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आधीच हवालदिल झाले असताना, महावितरण विभागाने सुरू केलेल्या मनमानी लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कोणतीही लोड शेडिंग न करता पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरू ठेवावा, या मुख्य मागणीचे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. यावेळी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी लोड शेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. सायंकाळी शाळा सुटून घरी परतताना अंधार असल्याने हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढतो, तसेच याच वेळेत…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळ आणि संगमनेर तालुका कला शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, (६ सप्टेंबर) आणि सोमवारी, (७ सप्टेंबर) दोन दिवसीय ‘बालकला महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकासह मातीकाम, पेंटिंग, ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण, वॉटर कलर, संगीत, झुम्बा डान्स, कागदी फुले तयार करणे, थ्रीडी पेंटिंग, डूडल आर्ट, कॅलिग्राफी, बाहुली काम, म्युझियम आणि स्टील ऑन विल प्रशिक्षण यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा कायदेशीर आदेश असतील, तर ते त्वरित जनतेसमोर जाहीर करण्यात यावेत. आणि जर अधिकृत आदेश नसतील तर संगमनेर शहर आणि तालुक्यातील विजेचे भारनियमन कोणाच्या दबावाखाली केले जात आहे? असा थेट हल्लाबोल संगमनेर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केला आहे. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात सध्या दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सुरू असलेल्या अघोषित भारनियमनाविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, महावितरणच्या अनधिकृत कारभारावर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अघोषित वीज खंडिततेच्या प्रश्नावर संगमनेरकर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरणच्या संगमनेर कार्यालयावर धडक…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर तालुक्यातील अवैध धंदे, वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘मोक्का’, ‘तडीपारी’ व ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कठोर पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.  शुक्रवारी जिल्हाधिकारी आशिया संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांवर व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कंजारभाट समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भटक्या व विमुक्त जमाती प्रवर्गातील या समाजाची कागदपत्रांअभावी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली अडचण महसूल प्रशासनाच्या संवेदनशील…

Read More

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि उत्साह राहील. आरोग्य उत्तम राहील, परंतु आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांतता राखण्याचा आहे. वादविवादापासून दूर राहणे हितकारक ठरेल. व्यापारात मध्यम स्वरूपाचा लाभ होईल. अचानक खर्च वाढल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मिथुन – आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश प्राप्त होईल. मित्रांच्या मदतीने एखादी महत्त्वाची समस्या सुटेल.…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर (ता. अकोले) येथील कर्जदाराला संगमनेर येथील न्यायालयाने सहा महिने कारावास आणि चेकच्या दुप्पट रक्कमेसह ९ टक्के व्याजाचा दंड ठोठावला आहे. मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगवावा लागणार आहे. संगमनेर येथील तिसरे वरिष्ठ व अतिरिक्त न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. समशेरपूर येथील आरोपी संजय भाऊराव सावंत यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर कडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी दिलेला धनादेश बँकेत अनादरित (बाऊन्स) झाला. यानंतर कायदेशीर मुदतीत रक्कमेची परतफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीने आरोपीविरुद्ध…

Read More

Annant Ppangarkar संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरात बेकायदेशीररीत्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला संगमनेर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून १ लाख १७ हजार रुपये किमतीची ‘एम.डी.’ (मेफेड्रोन) पावडर आणि दुचाकीसह एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या काशीफ कुरेशी याला शुक्रवारी पहाटे शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दिनांक ३ सप्टेंबर) सायंकाळी सात ते मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरातील रस्त्यावरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी काशिफ असद कुरेशी (वय २७, रा. कादरी मशिदीजवळ, भारतनगर, संगमनेर) हा अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी स्वतःच्या ताब्यात एम.डी. बाळगून उभा…

Read More

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’निमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या उपक्रमांतर्गत यंदा सलग तिसऱ्या वर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ या भव्य राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील कलावंत आणि नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा खुली असून, यामध्ये राज्यातील जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. ही स्पर्धा प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबर अखेर विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार असून, किमान १० प्रवेशिका येणाऱ्या प्रत्येक…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील राजहंस मिल्क पार्लरचे शटर वाकवून रोकड लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. २ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते सव्वा तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी समनापूर चौफुलीवरील राजहंस मिल्क पार्लर-साई अमृत मठ्ठा हे बंद दुकान लक्ष्य केले. दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी गल्ल्यातील ४३ हजार ८०० रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी दुकानमालक सुधीर उत्तम राहींज यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीष भवर यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. गुरुवारी (३ सप्टेंबर) गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून हे छापे मारले. या कारवाईदरम्यान कोपरगाव…

Read More

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ असून कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, परंतु घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळावे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आज आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अचानक खर्च वाढल्यामुळे मन थोडे चिंताग्रस्त होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांशी जुळवून घेणे फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळच्या वेळी कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवता येईल, ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहील. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी यश…

Read More

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी रुग्णालयात जाऊन अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राहुल पांडे यांनी अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. अण्णांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समजताच त्यांनी समाधान व्यक्त करून त्यांच्या निरामय आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपचारादरम्यानही अण्णा हजारे यांनी मुख्य माहिती आयुक्तांशी राज्यातील माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सुमारे दहा मिनिटे संवाद साधला. या कायद्यांतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील प्रगती पाहून महाराष्ट्रातील काम खरोखरच लोकाभिमुख असल्याचे सांगत…

Read More