Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या कारभारावर ‘टोल वसुली’ आणि ‘खोट्या आश्वासनांची बनवाबनवी’ ही दोन प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचा गंभीर आरोप करत संगमनेर येथील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर संगमनेर सेवा समितीच्या विराट जाहीर सभेत बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले. शुक्रवारी सायंकाळी संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसहाकखान पठाण, अजय फटांगरे, प्रमिला अभंग यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने…

Read More

मेष: आज तुमचा वैवाहिक जीवनातील तणाव संपेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन योजना सुरू कराल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल आणि जुन्या मित्रांकडून मदत मिळेल. वृषभ: शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडतील. परदेशात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रेमसंबंधात नवीन गोडवा येईल आणि नाते मजबूत होईल. नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल. मिथुन: तुम्हाला आर्थिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आनंद आणि पैशाच्या बाबींवर आज सारखे लक्ष द्या. तरुण-तरुणींना प्रेमाच्या बाबतीत यश मिळू शकेल. कर्क: आजच्या महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये तुम्ही मोठे निर्णय सर्वांच्या सहमतीने घेऊ शकाल. आर्थिक नियोजनात तुम्हाला अधिक बचत करण्यावर भर द्यावा…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या विकासाचा अभिमान व्यक्त करत, गेल्या एका वर्षात शहरात वाढलेल्या अमली पदार्थांची तस्करी आणि गुंडगिरीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संगमनेर शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली पुणे-नाशिक रेल्वे दुसऱ्या तालुक्यातून कशी गेली, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जनता नगर येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह उमेदवार विश्वासराव मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, सोमेश्वर दिवटे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे डॉ. किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तीस वर्षांमध्ये नगरपालिका अत्यंत आदर्श पद्धतीने चालवली. शहराला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर  नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रतिक्षा संपली! संगमनेर 2.0 जाहीर सभा!’ या समाज माध्यमातील व्हायरल पोस्टमुळे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. तांबे यांची ही नवी पोस्ट काय आहे? याची संगमनेरकरांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे स्थानिक विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असल्याने अपेक्षा वाढल्या आहे. ‘संगमनेर 2.0’ च्या माध्यमातून आमदार तांबे हे शहराच्या विकासाचा एक नवा अजेंडा नागरिकांसमोर मांडणार असल्याची चर्चा आहे. या सभेच्या घोषणेमुळे नगराध्यक्षपदाच्या या लढाईला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तांबे समर्थकांमध्ये ही निवडणूक केवळ उमेदवारांमधील नसून, संगमनेरला ‘मुक्त’ करण्याची लढाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (भाजप-शिंदे गट) सभेसाठी जागा आरक्षित करण्याच्या नावाखाली, संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांसाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक जागा नाकारल्याचा गंभीर आरोप सेवा समितीने केला आहे. सभांसाठीच्या या जागा ‘ब्लॉकिंग’च्या धक्कादायक घडामोडींमुळे प्रशासनावर राजकीय ‘दबाव’ असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात होतील का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. सेवा समितीने २७ नोव्हेंबर रोजी नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने महायुतीच्या प्रचारासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नियोजित असल्याने ही मागणी थेट नाकारली. परंतु, सर्वात…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. विशेषत: आर्थिक आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा दिवस चांगला आहे. पैसे कमविण्यासाठी नवीन संधी मिळतील आणि जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे आणि नशिबाची साथ मिळेल. मात्र, वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीपूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या. वृषभ: आज तुम्हाला नेतृत्व करण्याची वेगळी भूमिका पार पाडावी लागेल. तुमच्या कामामध्ये चांगली कमाई होईल आणि संपत्ती वाढल्याने कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आर्थिक परिस्थिती बरी असली तरी काही गोष्टींबाबत उदास वाटेल. मिथुन: आज कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. कामावर जास्त लक्ष…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी आणून संगमनेर शहर घडवले, त्याला नावारूपाला आणले. हीच विकासाची परंपरा आपण कायम ठेवणार असून, शहराच्या विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम विश्वास संगमनेरवासियांना देत थोरात यांचे राज्याच्या राजकारणातील स्थान मोठे आहे. त्यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध असून, मंत्रालयात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेल्यास ते सर्वप्रथम थोरात साहेबांची चौकशी करतात आणि त्यांचा आदर करतात. थोरात साहेबांनी सातत्याने निधी आणून संगमनेर शहर घडवले, त्याला नावारूपाला आणले असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. मालदाड रोड, अलकानगर, गणेश नगर आणि मोमीनपुरा येथे झालेल्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये ते…

Read More

मेष –  आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन कार्याचा आरंभ करण्याचा असू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि तुम्ही इतरांना प्रेरित कराल. तुमच्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता. कोर्ट-कचेरीच्या कामातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ –  आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. बऱ्याच दिवसांपासून असलेली जुनी समस्या संपुष्टात आल्याने मानसिक समाधान मिळेल. चांगल्या आरोग्यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे. व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रात एखादी चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. मिथुन –  तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये आज इतरांना प्रभावित करतील. आज एखादा जुना मित्र किंवा परिचित व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते,…

Read More

संगमनेर – संगमनेरच्या श्रीराम फायनान्स लिमिटेडला कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश (चेक) अनादरीत झाल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरोपी संदीप सावळेराम पगारे (रा. संजयनगर, कोपरगाव) याला सहा महिने साधा कारावास आणि चेक रकमेच्या दुप्पट रक्कम फिर्यादी कंपनीला देण्याची शिक्षा माननीय न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. आरोपी संदीप सावळेराम पगारे यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संगमनेर शाखेकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने कंपनीला जो धनादेश दिला होता, तो बँकेत बाऊन्स झाल्यानंतरही आरोपीने कायदेशीर मुदतीत रक्कम परतफेड न केल्यामुळे कंपनीने त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी चौथे वरिष्ठ व ॲडिशनल मॅजिस्ट्रेट जे. व्ही. भेंडे यांच्या…

Read More

संगमनेर – संगमनेर नगरपालिका निवडणुकीत ऐनवेळी मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ आला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचे कारण देत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी नगरसेविका मेघा दीपक भगत यांनी थेट बंडखोरी केली आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली असून, पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे. भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी ही कारवाई केली आहे. भगत यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असताना पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवत, त्यांना तात्काळ पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे नितीन दिनकर यांचे अधिकृत पत्र समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. मेघा भगत या…

Read More

संगमनेर / प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला निर्णायक गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.  त्यांच्यासोबतच जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. ही सभा गुरुवारी (दिनांक २७ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता, नवीन नगर रोड येथे होणार असून याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. आमदार अमोल खताळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ आणि महायुतीचे सर्व प्रभागांतील उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचून विकासाभिमुख योजना आणि नगरपरिषदेचा आगामी रोडमॅप मांडत आहेत. प्रत्येक प्रभागात मोठे जनसंपर्क अभियान, पदयात्रा आणि…

Read More

संगमनेर: सहकार हा संगमनेर तालुक्याचा श्वास राहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसात तालुक्याचे सहकार समृद्धीची घडी विस्कटक चालली असून तालुक्यात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील शांतता व समृद्धी कायम राखण्यासाठी या गैर अपप्रवृत्तींचा सर्वांनी एकत्र येऊन बीमोड करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. हंगेवाडी (संगमनेर) येथे सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शरद नाना थोरात, आर. बी. राहणे, राजेंद्र चकोर,…

Read More

मेष –  सकाळच्या वेळी काही महत्त्वपूर्ण सिद्धी मिळाल्यानंतर दिवसभर उत्साह टिकून राहील. धन आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाशी जवळीक वाढेल. व्यावसायिक कामांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही गोष्टीवर जास्त हट्ट आणि कठोरता ठेवल्यास नुकसान होऊ शकते. तांत्रिक कामांशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. वृषभ –  आज सल्ला आणि परिस्थिती या दोन्हींचे चांगले सहकार्य मिळेल. विरोधक त्रास देतील, पण वेळेची अनुकूलता तुमच्या बाजूने असल्याने फायदा होईल. आजचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने कमी प्रयत्नात जास्त यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. मिथुन –  आज विश्वस्त…

Read More

मेष –  आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होतील आणि आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामात उत्साह टिकून राहील आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नवीन कार्यांना सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. वृषभ –  तुम्हाला आज संयमाने वागावे लागेल. कोणाकडूनही जास्त मदतीची अपेक्षा न ठेवणे चांगले. एखादे काम पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डोळ्यांसंबंधित समस्या संभवतात. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन जपून करा. मिथुन –  आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारीच्या व्यवसायात असलेल्या लोकांसाठी दिवस सुयश घेऊन येईल. सामाजिक स्तरावर तुमचे महत्त्व वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळू शकतात, जे…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्याला आणि शहराला विकासाची मोठी परंपरा आहे. आपण सातत्याने निधी आणून निळवंडे पाईपलाईन, हायटेक बस स्थानक आणि विविध वैभवशाली इमारतींसारखी अनेक मोठी विकासकामे मार्गी लावली आहेत. शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव हे संगमनेर शहराचे कायमचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मागील एका वर्षात शहरात अशांतता निर्माण झाली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी काळात संगमनेरमध्ये विकासासोबतच शांतता आणि बंधुभाव वाढीस लागेल, यासाठी संगमनेर सेवा समिती काम करेल, असा विश्वास लोकनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबा यांचे दर्शन घेऊन सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला, त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले,…

Read More

मेष – प्रेम जीवनात उत्साह राहील. व्यवसायातून पैसे मिळायला थोडा उशीर होऊ शकतो, त्यामुळे काळजी करू नका. कुटुंबात छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. मुलांच्या हट्टीपणामुळे थोडी चिंता वाटू शकते. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांच्या मदतीने अभ्यासात यश मिळेल. नवीन व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आज आपले भाग्य ९०% सोबत आहे. शिव चालीसाचे पठण करणे लाभदायक ठरेल. कामाच्या बाबतीत मात्र आज कंटाळा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगल्या बातम्या घेऊन येण्याची शक्यता आहे, विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत शुभ संकेत आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्णत्वास जाईल. द्विग्रह…

Read More

देशाच्या प्रशासनात कधीकाळी सनदी अधिकारी असणार्‍या काहींना वाटतं देश आपल्यामुळेच चालतो. डोक्यात बसलेल्या या अहंकारापुढे त्यांना जग ठेंगणं वाटतं. आपण म्हणू ती पूर्वदिशा म्हणून ते कोणालाही जुमानत नाहीत. कोणालाही अति महत्व देतात आणि मनात येईल त्याची रेवडी उडवतात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या मोहिमेला गैर ठरवणार्‍या 272 सनदींना असंच झालंय. म्हातारचळ यावा तसा दावा करत त्यांनी राहुल गांधी यांना देशाविरोधी ठरवून टाकलं आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या निवडणूक आयोगाने केलेल्या ‘कसरती’ उघड्या पडू लागल्यावर आणि मोदी सरकार यात गुंतत असल्याचं पाहून या 272 जणांना उपरती झाली आणि त्यांनी राहुल गांधींनाच दोष देण्याची करामत केली. अर्थात ती त्यांच्या…

Read More

मेष रास –  आज तुमचा मन हलके आणि उत्साही राहील. नवीन कामे सुरू करण्याचा उत्साह असेल आणि छोट्या-छोट्या समस्या तुम्ही सहज हाताळू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल. वृषभ रास –  आज तुमचे मन शांत राहील आणि कामे हळू-हळू पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे पार पाडू शकाल. व्यवसायात संयम बाळगण्याची गरज आहे. ज्यादा काम केल्यास फायदा होईल, पण खर्चही वाढू शकतो. मिथुन रास –  आज तुमच्या खाजगी जीवनातील समस्या संपतील. तुम्ही व्यवसायात कोणतीही मोठी डील करू शकता. बाजारपेठेत अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी वाद संभवतो, त्यामुळे…

Read More

संगमनेर –  मागील एका वर्षापासून शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली असून, दडपशाहीसह अमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याची गंभीर चिंता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी (२२ नोव्हेंबर) मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी के. के. थोरात, शांताराम कढणे, विवेक कासार, सादिक तांबोळी, सौरभ कासार, शोभाताई पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर शहर आणि तालुक्याने शिक्षण, सहकार आणि अर्थव्यवस्था या क्षेत्रांत केलेल्या विकासामुळे राज्याच्या अग्रगण्य शहरांमध्ये आपले स्थान निर्माण केले. विकासाच्या दीर्घ परंपरेचा उल्लेख करत माजी मंत्री थोरात यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्यापासून दुर्गाताई तांबे…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी): थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा २० वर्षांचा ‘आनंद मेळावा’ उद्या, (रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता सायखिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या आनंद मेळाव्यास महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य समन्वयक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी लावलेल्या या अभियानाच्या रोपट्यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती रुजली आणि वाढली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More