Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी ठरेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. वृषभ – आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. जुन्या मित्रांशी झालेली भेट मनाला प्रसन्नता देईल. मिथुन – आज मानसिक शांतता लाभेल. बौद्धिक आणि सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कर्क – आजचा दिवस सामान्य राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर | संगमनेर  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगर परिषदेच्या माध्यमातून बुधवारी शहराच्या नाशिक-पुणे मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नेहमीप्रमाणे पालिकेच्या या कारवाया केवळ फार्स ठरत असून बुधवारची कारवाई देखील यातलाच प्रकार असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या कारवाया सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये फेरफटका मारत नेमकी राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम कशी असते हे बघावे असा सूर उमटत आहे. अतिक्रमण मोहीम राबविताना निवडक अतिक्रमणांना हात लावू नये, आसपासची रस्ता अडविणारी अतिक्रमणे सोडून मध्येच एखाद्या व्यावसायिकाचे नुकसान करणे जेसीबीचा पंजा मारणे आणि अतिक्रमण मोहीम राबविल्याचा फार्स राबविणे हा येथील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर | संगमनेर:  संगमनेर शहरातील देवाचा मळा परिसरात दोन दिवसांपूर्वी शहर पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत गोरगरिबांना मिळणारे शिधापत्रिकेवरील रेशनचे धान्य पकडले होते. मात्र मोठ्या प्रमाणात कागदपत्र रंगविण्यात आल्यानंतर देखील या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी पकडलेल धान्य शासकीय मालकीचे होते की ते काळया बाजारात विक्रीसाठी जात होते याचा खुलासा न झाल्याने पुरवठा महसूल आणि पोलीस यांच्या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. संगमनेर शहरालगतच्या शहर आणि गुंजाळवाडी सीमेवर एका बड्या हॉस्पिटल जवळ पोलीस पथकाने केलेली ही कारवाई सुमारे सात-आठ तास सुरू होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन ट्रक, एक छोटा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातीलच नेतृत्वावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महिला आघाडीची कमान वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले. वैशाली…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता घेऊन येईल. जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल आणि भावनिक बंध मजबूत होतील. आर्थिक क्षेत्रात भविष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी चांगला काळ आहे, परंतु घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वृषभ – आजचा दिवस संतुलन आणि स्थैर्य घेऊन येईल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि समाधान राहील. धार्मिक कार्यात किंवा अध्यात्मात मन रमल्याने मानसिक शांती मिळेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते आणि आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन – कामाच्या ठिकाणी तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाची जबाबदारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या एका तक्रारीच्या अर्जात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच स्वीकारताना पीएसआय साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश सादरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर असलेल्या मौजे वलवाडी येथील घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका फायनान्स कंपनीकडून सुमारे ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज काढून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी अर्ज…

Read More

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आले असून अध्यक्षपदी समीर शाह, सचिवपदी संकेत काजळे तर खजिनदारपदी मोहित मंडलिक यांचा पदग्रहण सोहळा रविवारी (२ ऑगस्ट) पार पडला.  सामाजिक बांधिलकी जपत सेवा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या ४३ व्या पदग्रहण समारंभ सोहळ्यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल जयेशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, उद्योजक राजेश मालपाणी आणि सहाय्यक प्रांतपाल भागनाथ काटे आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात मागील वर्षाचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी व सचिव सौरभ म्हाळस यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून सार्वजनिक शांतता भंग करणे आणि जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणे श्रीरामपूरमधील एका सराईत गुन्हेगाराला चांगलेच महागात पडले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात मंगळवारी (४ ऑगस्ट) श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. श्रीरामपूरच्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी आणि सराईत गुन्हेगार अज्जू उर्फ अजिम अन्वर पठाण याने आपल्या ‘ajjupathan998’ या इंस्टाग्राम आयडीवरून सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचे समोर आले. या माहितीच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कोल्हापूर: देशातील प्रमुख शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारविजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ढासळली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्र आणि देशभरात अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्थांची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागाची पाण्याची गरज भागवणारे आणि बोटा परिसरासाठी वरदान ठरणारे कोटमारा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात मुबलक जलसाठा निर्माण झाल्यामुळे बोटा, आंबीदुमाला, कुरकुटवाडी यांसह लगतच्या गावांमधील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३) दुपारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. १९९३ मध्ये उभारणी झालेल्या १५५ एमसीएफटी क्षमतेच्या या धरणावर परिसरातील शेती आणि पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात असताना निसर्गाच्या कृपेने झालेल्या चांगल्या पावसामुळे रविवारी रात्री हे धरण पूर्ण भरून वाहू लागले. याप्रसंगी बोलताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरातील एका व्यावसायिकाकडे पाकिस्ताननिर्मित कथित ‘ग्लोरी’ ब्रँडच्या सौंदर्यवर्धक क्रीमची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, देशाची सुरक्षा, स्वाभिमान आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे.  सूर्यवंशी यांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या संगमनेर शहर पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिसांचे विशेष अभिनंदनही केले आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर प्रकरणाच्या तपासात वेळ काढूपणा केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, कथितरित्या पाकिस्तानमध्ये उत्पादित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, फार्मर आयडी आणि ई-केवायसी (e-KYC) कामासाठी संगमनेर तहसील कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून ई-केवायसी डेस्कवरील संबंधित कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना तासंनतास ताटकळत राहावे लागत असून त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. ही गैरसोय तातडीने न थांबल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र ‘घंटानाद आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ६० ते ७० वयाचे शेतकरी दररोज तहसील कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र, या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडे अकोले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  शिर्डी: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत शिर्डीच्या उप माहिती कार्यालयाचा डॉ. मीरा ढास यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला.  २००८ मध्ये मंत्रालयातून उपसंपादक म्हणून शासकीय सेवेस प्रारंभ करणाऱ्या डॉ. ढास यांनी यापूर्वी पुणे, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रशासकीय पदे यशस्वीरीत्या सांभाळली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची सदिच्छा भेट घेतली; यावेळी गाडीलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विविध समाजमाध्यमे आणि प्रभावी संवाद कौशल्याच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजना तसेच साईभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सकारात्मकरीत्या पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असा विश्वास डॉ. ढास…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभाचे योग बनत आहेत. कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण निर्माण होतील. वृषभ – आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस अतिशय चांगला राहील. थांबलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाची शक्यता आहे. आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – व्यवसायात किंवा नोकरीत नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल आणि प्रवासाचे बेत ठरतील. मन प्रसन्न राहील आणि सकारात्मक विचारांमुळे यश मिळेल. कर्क – कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु तुमच्या संयमामुळे सर्व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र शाखेत कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांचे प्रभावी दृकश्राव्य दस्तावेजीकरण, जनजागृतीपर माहितीपट निर्मिती तसेच जनसंपर्कविषयक विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी चालवण्यात आलेल्या विशेष ३८ बससेवेच्या माध्यमातून संगमनेर एसटी आगाराने १० हजार भाविकांना सुरक्षित दर्शन घडवत तब्बल साडे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संगमनेर आगारातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ आणि ‘लालपरी’ या बसेसचा समावेश होता. गेल्या १० दिवसांच्या कालावधीत या बसेसनी ३८ हजार ५०० किलोमीटरचे अंतर कापून एकूण १३६ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या विशेष सेवेचा फायदा घेत तब्बल १० हजार २९ भाविकांनी सुखकर व सुरक्षित प्रवास करत पांडुरंगाचे दर्शन घेतले. भाविकांनी या नियोजनाबद्दल आणि…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या प्रयत्नांना आज यश लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि खानपानावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस संयम आणि धैर्याने काम करण्याचा आहे. व्यापाऱ्यांना पैशांच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी लागेल. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. संध्याकाळच्या वेळी थोडा विरंगुळा लाभेल. मिथुन – तुमच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यामुळे आज अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल जो भविष्यात फायदेशीर ठरेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील जनता नगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी १२ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले होते. या बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून मध्ये ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती. पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांच्या फिर्याद दिली असून या प्रकरणी मयुर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. खामगाव), उमेश कांबळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सातवा मैल येथे रविवारी सकाळी अपघात घडला आहे. स्कार्पिओ आणि स्कुटी दुचाकीच्या या अपघातात आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील रहिवासी असलेली आरुषी अनिल कर्पे ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीवरून क्लाससाठी संगमनेरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. भंडारदरा परिसरामध्ये पर्यटनासाठी निघालेल्या एका भरधाव स्कॉर्पिओ (MH 10 DV 3447) कारने तिच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आरुषीला या वाहनाने काही अंतर फरफटत नेले, यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या अंदाजानुसार, दुसऱ्या वाहनाला धोकादायक रीतीने ओव्हरटेक करत असताना स्कॉर्पिओचा वेग भरधाव होता. सदर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेरमधील एका दुकानावर धाड टाकून औषध प्रशासन आणि शहर पोलिसांनी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणाऱ्या १२ हजार ९०० रुपयांच्या बेकायदेशीर पाकिस्तानी ‘गोरी ब्युटी क्रीम’चा साठा जप्त केला आहे.  पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळालेल्या माहितीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अहिल्यानगरचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आणि राहुल पांडे यांच्या मदतीने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे बाबासाहेब सातपुते विजय आगलावे सागर नागरे यांचा या पथकात समावेश होता. याप्रकरणी मोगलपुरा, शिकलकर लाईन येथील रहिवासी दुकानदार शाहिद रियाज शेख (वय ३६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुकानाची पाहणी केली असता तेथे ‘मेड इन पाकिस्तान’ व ‘पाकिस्तान…

Read More