Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुका हा एकेकाळी दुष्काळी होता, पण आज तो आपल्या विकासकामांच्या जोरावर राज्यात ओळखला जातो. या विकासात दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला असून संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. या कष्टाच्या व्यवसायात महिलांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.  आंबीखालसा येथील मुळेश्वर महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या २५ व्या रौप्यमहोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. व्यासपीठावर थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, माजी जिल्हा परिषद सदस्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेची सोनोग्राफी करताना, तिच्या पोटाला जेलीऐवजी चक्क ॲसिड लावण्यात आले. या गंभीर चुकीमुळे महिला भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस आणि सुखरूप बाळाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला प्रसूतीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनोग्राफीसाठी तिच्या पोटावर जेली लावण्याऐवजी, एका नर्सने चुकून ॲसिड लावले. यामुळे महिलेच्या पोटाला आणि काही अवघड जागांना गंभीर इजा झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोनोग्राफी रूममधील औषधांच्या ट्रेमध्ये एका ब्रदरने सोल्युशनऐवजी ॲसिड ठेवले होते, ज्यामुळे ही चूक झाली. या घटनेनंतर, महिला वेदनेने ओरडू…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शिक्षकाकडून लाच स्वीकारताना संस्थेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह लेखनिक संगमनेरमध्ये नासिक एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे. शुक्रवारी झालेल्या या कारवाई संदर्भात शनिवारी मध्यरात्री उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बाबूराव राजाराम गवांदे (वय ७५, सेवानिवृत्त शिक्षक व संस्थेचे सहसेक्रेटरी) आणि चंद्रभान काशिनाथ मटकुळे (वय ६२, लेखनिक) या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने शहरातील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी (२७ जून) सायंकाळी चार वाजता कारवाई केली होती. त्यानंतर मध्यरात्री ३.४८ वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५९३/२०२५ नुसार नोंदवण्यात आला. संस्थेमध्ये शासनातर्फे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधील गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता विधान परिषदेच्या सदस्यांबाबत योग्य राजशिष्टाचार पाळला नाही, तर थेट नगरपालिकेला टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा संगमनेरचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. संगमनेर शहरातच राहणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांना नगरपालिका प्रशासन जाणूनबुजून डावलत असल्याच्या आरोपावरून हा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषद हे राज्याच्या विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह आहे आणि त्याचे सदस्य महत्त्वाचे संवैधानिक स्थान भूषवतात. त्यामुळे नगरपालिकेच्या विविध विकासकामांबाबत त्यांना निमंत्रित करणे आणि त्यांना सूचित करणे हे नगरपालिका प्रशासनाचे, मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही दिवसातील चित्र बघता असे घडताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  एकेकाळी ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या संगमनेर शहरावर सध्या अस्वच्छतेचे मोठे सावट पसरले आहे. शहरातील वाढलेल्या दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि रोगराईच्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी, (२७ जून) माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेवर जोरदार ‘एल्गार’ मोर्चा काढला. प्रशासनाच्या उदासीन आणि मनमानी कारभारावर नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहराने स्वच्छतेच्या बाबतीत अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिके मिळवून एक आदर्श निर्माण केला होता. तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती.…

Read More

अहिल्यानगर, दि. २८ –  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ जून ते ११ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधील गुंजाळ मळा परिसरात सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार अमोल खताळ यांच्यावर होत असलेली टीका खोटी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्याच्या उद्देशाने नुकतीच या ट्रक टर्मिनलला भेट दिली होती. पंचायत समितीजवळील या कामाची गती कमी असल्याने, त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना कामाला गती देण्यासोबतच कामाचा दर्जा चांगला राखण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कामाचे श्रेय घेण्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आमदार खताळ हे तालुक्याच्या विकासकामांवर वेगाने लक्ष केंद्रित करत…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  नाशिक येथील एका ट्रॅव्हल कंपनीला दुबईच्या टूरसाठी बनावट विमान तिकिटे देऊन तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर येथील ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ या ट्रॅव्हल एजन्सीचे संचालक संशयित आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरसह नाशिकमध्येही एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या एका कंपनीने त्यांच्या ५० प्रवाशांसाठी दुबईच्या प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी संगमनेरच्या ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ या कंपनीला १० लाख ८२ हजार ५०० रुपये दिले होते. मात्र, संगमनेरच्या या कंपनीने प्रवाशांना बनावट विमान तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केली. प्रवाशांना मुंबई विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जोर्वे ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. गुरुवारी (दि. २६ जून २०२५) संगमनेर पंचायत समितीवर दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले, ज्यामुळे जोरदार घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रकरण नेमके काय? जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या कामकाजात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बाळासाहेब थोरात समर्थकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीने अनेक वस्तू खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे, मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात गावात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  शासकीय कामांसाठी शालेय विद्यार्थी, गावागावातील ग्रामस्थांना संगमनेर शहरात येण्याची आता गरज नाही! आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने महसूल विभागामार्फत आता मंडलनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरां’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या शिबिरांमुळे संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच उत्पन्नाचा, जातीचा, रहिवासी, नॉन-क्रिमीलेअर यांसारखे महत्त्वाचे दाखले मिळणार आहेत. याशिवाय, नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेटेशन, मतदार नोंदणी, फेरफार अर्ज आणि विविध शासकीय योजनांचा लाभही या शिबिरात एकाच छताखाली उपलब्ध होईल.  वर्षभरातून दोन वेळा हे शिबिर आयोजित केले जाणार असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संधीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन शिक्षकांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या दोन शिक्षकांची नावे असून, ते दोघे बीड शहरात खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, प्रशांत खाटोकर (फिजिक्स शिकवणारे) हे तिला क्लास संपल्यावर केबिनमध्ये एकटे बोलावून तिचे चुंबन घ्यायचे आणि तिच्या छातीला व गुप्तांगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. इतकंच नाही, तर ते तिचे कपडे काढायला लावून फोटोही काढायचे. क्लासरूममध्ये कोणी नसतानाही ते तिच्यासोबत असेच गैरवर्तन करायचे. “जर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहरात वर्दळीचा भाग असलेल्या पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा परिसरात प्रस्तावित ट्रक टर्मिनसच्या कामावरून सध्या राजकारण तापले आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने गुंजाळ मळ्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधी या कामाची सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा, असा थेट सवाल करत नागरिकांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे, असे म्हटले आहे. स्थानिक नागरिक शुभम गुंजाळ आणि राहुल गुंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, या ट्रक टर्मिनसचे काम मार्च २०२४ मध्ये नगरपरिषदेने निविदा प्रसिद्ध करून सुरू केले आहे. हे काम ‘भांडवली गुंतवणुकीतील राज्यांना विशेष सहाय्य योजने’…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज असून त्याचा प्रत्येक समाज बांधवाला अभिमान आहे. येथील समाज बांधवांचे ऐक्य पाहून आनंद झाल्याचे प्रतिपादन ‘लय आवडतेस तू मला’ फेम अभिनेते तन्मय जक्का यांनी केले. अभिनेते तन्मय जक्का आणि एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी यांच्या उपस्थितीत रविवारी (२२ जून) मालपाणी उत्सव हॉल येथे संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक व विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी, आणि संगमनेरच्या विवाहित महिलांचा (लाडक्या लेकी) गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  शहरातील प्रवरा नदीकाठी असलेल्या श्री साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई सच्चरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत हा सामुदायिक अखंड पारायण सोहळा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे पारायण आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक संकल्पाने होईल. या पारायणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व भाविकांना संकल्प सोडण्यासाठी श्री साई मंदिराच्या पारायण हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा आठ दिवस चालेल. भाविक आपल्या सोयीनुसार पहाटे ५:३० ते रात्री १० या वेळेत श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे वाचन करू शकतात. पारायणाची सांगता १० जुलै रोजी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जोर्वे ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभार आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ गुरुवारी (२६ जून) आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या आंदोलनांची दखल न घेतल्याने संतप्त गावकऱ्यांनी थेट पंचायत समितीवर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. एका महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतीवर पालकमंत्री विखे यांच्या गटाची सत्ता आहे. या काळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी कागदोपत्री दाखवण्यात आली आहे, मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात गावात आलेल्याच नाहीत. गावातील…

Read More

अहिल्यानगर, २६ जून:  जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी आणि बेकायदेशीर गर्भपातांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशेष पथके तयार करून ही तपासणी केली जाणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया यांनी बैठकीत सांगितले की, जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रे यांची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी महायुती कटिबद्ध असून आगामी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला जनतेने साथ दिल्यास शहराच्या विकासाचा वेग दुप्पट होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आमदार खताळ यांनी नुकतीच संगमनेर नगरपरिषदेमार्फत पंचायत समितीजवळ सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त करत ते काम चार-पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ट्रकचालक आणि क्लिनर यांच्यासाठी टर्मिनलमध्ये चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. खताळ म्हणाले की, संगमनेर शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

अहिल्यानगर, दि. २६:  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या आढावा बैठकीत समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनावर आणि विशेषतः अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या पशुधनाला गोशाळांकडून प्रवेश नाकारल्याच्या तक्रारींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीला उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर आणि उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी गोशाळा संचालकांना सक्त निर्देश दिले. ते म्हणाले की, अनाथ किंवा अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या गायवर्गीय पशुधनाला गोशाळांमध्ये दाखल करून घेण्यास…

Read More

अहिल्यानगर:  छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत एका खाजगी एजंटसह एका मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराकडून ओव्हरलोड कारवाई टाळण्यासाठी १८,००० रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. ३३ वर्षीय तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन असून, ते जालना ते मुंबई तुरीची डाळ आणि इतर कडधान्याची वाहतूक करतात. त्यांचे वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून विनाअडथळा चालू देण्यासाठी आणि त्यांच्या वाहनावर ओव्हरलोडची कारवाई न करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथील खाजगी एजंट संदीप रामदास ढोले (वय ४२) यांनी २०,०००…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  चित्रपटातील एखाद्या नायक-नायिकेला लाजवेल अशा थाटात कॅमेऱ्याला पोज देणाऱ्या एका बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर न्याय दूध संस्थेच्या शेजारील शेतात ही थरारक घटना घडली, जिथे बिबट्या चक्क बगळ्यांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता. बुधवारी (२५ जून) सायंकाळच्या सुमारास, आश्वी खुर्द येथील तरुण शेतकरी अभिषेक भवर हे आपल्या ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत होते. नांगरलेल्या शेतात बगळे किटकांना टिपत असताना, जवळच असलेल्या उसाच्या शेतात एक बिबट्या बगळ्यांची शिकार करण्याच्या तयारीत दबा धरून बसला होता. ट्रॅक्टर आणि उसाच्या शेतीतील अंतर केवळ पाच फुटांचे असतानाही, बिबट्याने अत्यंत शांतपणे दबा धरून…

Read More