Author: Annant Ppangarkar
संगमनेर – सहकाराचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ सप्टेंबर ते रविवार, १४ सप्टेंबर २०२५ या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थांमुळे शेतकरी, उत्पादक, नागरिक, महिला, व्यापारी आणि कामगार अशा सर्वांचा विकास झाला असून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील नवीन प्रशासकीय…
संगमनेर – जगातील सर्व दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते शोधण्याची कला अरविंद गाडेकर यांना असून त्यांच्या “मनातलं पानावर” हे पुस्तक वाचकांना आनंद देईल आणि जीवनातील दु:ख विसरून आनंदी राहण्यास मदत करेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केला आहे. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या “मनातलं पानावर” या पुस्तकाचे प्रकाशन संगमनेर येथे सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, अनिल देशपांडे,…
मुंबई- राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, काही ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू- नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, बोरगड येथे चंदर नथू माळेकर (वय २९) यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी धरणातही ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय ४०) यांचा बुडून मृत्यू झाला. धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी…
मेष (Aries)- आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ किंवा उत्पन्न वाढवण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला नवीन कल्पना किंवा प्रकल्प सुरू करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. हा दिवस शिकण्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी चांगला आहे. नातेसंबंधांमध्ये, मोकळेपणाने संवाद साधा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. मिथुन (Gemini)- तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती दिसून येईल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. कर्क (Cancer)- आजचा दिवस सामाजिक कामांसाठी आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी उत्तम आहे.…
संगमनेर- यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाच्या आरतीवरून निर्माण झालेल्या वादावर मंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव (आप्पासाहेब) खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी मानपत्रावरून नाराजी व्यक्त करत मिरवणुकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद समोर आला होता. रंगारगल्लीतील १३० वर्षांची परंपरा असलेल्या सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदा चर्चेचा विषय ठरली. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत आमदार झालेले अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आरतीसाठी उपस्थित होते. संभाव्य वाद टाळण्यासाठी मंडळाने दोन्ही नेत्यांसाठी स्वतंत्र आरतीच्या ताटांची व्यवस्था केली होती. दरम्यान सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक आप्पासाहेब खरे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, आरती व्यवस्थित पार पडली. मात्र, त्यानंतर…
श्रीरामपूर – गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून, मोठी खळबळ उडाली आहे. महेश डोरले (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी होता. ५ जुलैपासून महेश अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला. गणेश विसर्जन…
गेल्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणानंतर सुरू झालेल्या चर्चा प्रचंड अस्वस्थ करणार्या आहेत. जरांगेंचं उपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारने ठेवलेल्या प्रस्तावाचा स्वीकार मराठा समाजातील असंख्य बांधवांना विशेषत: प्रस्तावाची चिकित्सा करणार्या अनेक मान्यवरांना अमान्य वाटतो आहे. न्यायालय आणि कायद्याची भीती दाखवून मुंबई खाली करण्यासाठी सरकारने सरकारने मनोज जरांगेंना गळी पाडलं, असा आरोप केला जातो आहे. अशा आंदोलनाचा राजकीय फायदा उपटता येईल, असे प्रयत्न सत्ताधारी भाजपने पध्दतशीर केले. आंदोलनाचा एकनाथ शिंदेंना यापूर्वी झालेला फायदा आता होऊ नये, म्हणून पध्दतशीर फिल्डिंग लावली गेली. 16 ऑगस्ट 2011 या दिवशी दिल्लीच्या रामलिला मैदानात आमरण उपोषण पुकारून अण्णा हजारेंनी सार्या…
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. संयम ठेवा, यश निश्चितच मिळेल. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रवास करण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer) – आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात, पण…
संगमनेर : गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. साकुर गावातील बन परिसरात दोन सख्ख्या चुलत बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दोन मुलींची नावे तन्वी अजय सगळगिळे (वय १७) आणि मानसी राजेंद्र सगळगिळे (वय १५) अशी आहेत. दोघीही चुलत बहिणी होत्या. रविवारी दुपारी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला आणि पुढील तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या दोन तरुणींनी आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं…
संगमनेर – संगमनेर शहरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. या गणेशोत्सवाचा समारोप एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीमुळे अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली या युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना मदत केली आणि प्रवरा नदीकाठची स्वच्छता करून निर्माल्य संकलन केले. या उपक्रमासाठी एकविरा फाऊंडेशन आणि संगमनेर नगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रवरा नदीकाठी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साडेपाचशे युवक-युवतींनी नागरिकांना विसर्जनासाठी मदत केली आणि…
संगमनेर- शहरातील गणेश नगर येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक श्रीमती प्रभावती गंगाधर गोरडे (वय ७३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ आणि शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती गोरडे यांची सप्तशृंगी देवीवर अपार श्रद्धा होती. त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील योगदान मोठे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि नातू असा मोठा परिवार आहे. गुंजाळवाडी येथील माजी उपसरपंच रामदास रामचंद्र राहणे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रनाथ राहणे यांच्या त्या भगिनी होत्या. तसेच, सेवानिवृत्त सहायक निबंधक ॲड. अनिल भांगरे यांच्या त्या सासू होत्या.
संगमनेर – संगमनेरचे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीची छायाचित्रे…
जामखेड: शहराच्या शिवाजीनगर भागात एका 15 वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे शहरात शोककळा पसरली आहे. भक्ती गणेश गायकवाड (वय 15, रा. शिवाजीनगर, जामखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. भक्तीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नातेवाईक तुकाराम मोरे आणि इतरांनी तिला तातडीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव…
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण घेऊ नका. वृषभ (Taurus) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. मिथुन (Gemini) – आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कर्क (Cancer) – आजचा…
संगमनेर – अनंत पांगारकर यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. शहराच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ आमदार झाले आहेत. खताळ यांच्या विजयाने संगमनेरमध्ये शिवसेनेला पहिल्यांदाच आमदारकी मिळाली आहे. तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा असलेल्या खताळ यांच्याकडे आता राजकीय सत्ताकेंद्र आल्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. मानाच्या मंडळांची मिरवणुकीतून माघार- यंदाच्या मिरवणुकीत आणखी एक लक्षणीय बदल दिसतोय. नेहरू चौक मित्र मंडळ आणि तानाजी युवक मित्र मंडळ यांसारख्या पाच प्रमुख मानाच्या गणेश मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नवघर गल्ली…
संगमनेर- व्यंगचित्रकार आणि साहित्यिक अरविंद गाडेकर यांच्या विविध ललित कथांचा संग्रह असलेले ‘मनातल पानावर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी, (७ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री कॉलेज येथील के. बी. दादा सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. लेखक गाडेकर यांनी या पुस्तकाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांमधून मनावर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि भावनांचा संग्रह या पुस्तकात ललित कथांच्या स्वरूपात मांडण्यात आला आहे. यापूर्वी त्यांचे ‘सासू वर्सेस सून’ हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले होते. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार…
आश्वी | वार्ताहर संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आश्वी बुद्रुक येथील ताजणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. विखे यांनी ताजणे यांच्या योगदानाला आदराने गौरवताना सांगितले, कै. एकनाथ ताजणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानदानाच्या कार्यात समर्पित केले. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या, जे आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि…
संगमनेर- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणाचा जाहीर केलेला अध्यादेश (जीआर) संभ्रम निर्माण करत असून, केवळ ‘गॅझेट’च्या आधारावर आरक्षण देणे शक्य नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण ते ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता स्वतंत्रपणे देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. जरांगे पाटलांच्या निर्णयाचे कौतुक- जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन थांबवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत परिपक्व आणि महत्त्वाचा असल्याचे थोरात म्हणाले. आंदोलन चिघळले असते, तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागले…
मेष (Aries)- आज तुमच्या कामात यश मिळेल आणि तुम्ही उत्साही असाल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus)- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी विचार करा. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मिथुन (Gemini)- तुमची कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्ये आज खूप प्रभावी असतील. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer)- आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल. जुन्या आठवणी तुम्हाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित करा आणि वाद टाळा. सिंह (Leo)- तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला यश मिळेल. समाजात…
अहिल्यानगर – गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, त्यांनी जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न (दबाव हॉर्न) आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर ८ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. हा आदेश बुधवारपासून (३ सप्टेंबर) लागू झाला आहे आणि तो ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अमलात राहणार आहे. मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या साधनांच्या वापरामुळे श्वसन संस्थेला हानी…
