Author: Annant Ppangarkar
नाशिक: अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे. आता खरात विरोधात सातवा गुन्हा दाखल झाला असून, एका पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पीडित तरुणी आणि तिचे कुटुंब शेतात घर बांधण्याबाबत विचारणा करण्यासाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी २०२१ मध्ये अशोक खरातला भेटले होते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार तिने सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीनुसार, खरातने शैक्षणिक सल्ला देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या आई-वडिलांना केबिनबाहेर काढले. त्यानंतर, तांब्याच्या पेल्यात मंत्रोच्चार केलेले पाणी पिण्यास देऊन तरुणीला बेशुद्ध केले किंवा तिचे मानसिक नियंत्रण मिळवले. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूर गावात ‘सीएल-३’ दारू विक्री परवान्यावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. या प्रकरणी स्थानिक महिलांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावाची संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रशासनाने ग्रामसभेच्या निर्णयाला दिलेली बगल आणि संशयास्पद कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, गुंजाळवाडी येथील दारू परवाना समनापूर येथे स्थलांतरित करताना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, अंतर नियम आणि ग्रामपंचायत कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने संबंधित परवान्याचा ठराव स्पष्टपणे नामंजूर केलेला असतानाही, तो परवाना मंजूर कसा झाला, हा संशोधनाचा…
मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधींचा असेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आहारविहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ: आज आपल्या कामात काही अडथळे निर्माण होऊ शकतात, परंतु धैर्याने त्यावर मात करणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे ठरेल. धनलाभाचे योग आहेत, मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रवासाचे योग असून प्रवासात सतर्क राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मिथुन: आजचा दिवस संमिश्र…
अहिल्यानगर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या दुर्दैवी ॲसिड हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ‘पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२’ अंतर्गत पीडितेसाठी एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले असून, ही संपूर्ण रक्कम वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.…
संगमनेर, प्रतिनिधी- पंचायत समितीमधील एका सीआरपी महिलेच्या मानधनाचा प्रश्न आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेली कथित गैरवर्तणूक यावरून संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित महिलेची तक्रार पोलीस प्रशासनाने दाखल करून घ्यावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी संगमनेर शहर पोलीस स्थानकासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. गेल्या दहा महिन्यांपासून सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित महिलेचे मानधन थकीत होते. हे मानधन मिळवण्यासाठी ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली असता, त्यांच्याकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना माहिती मिळताच काही युवक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर ही…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई केली आहे. या टोळीने केलेल्या विविध गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत, आता त्यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या नवीन कलमान्वये संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवत कलम १११ अंतर्गत वाढीव कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आरोपींच्या जामिनावर बाहेर येण्याच्या शक्यता मावळल्या असून त्यांना मोठा कायदेशीर दणका मिळाला आहे. या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र दाढ रोड, आश्वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ उभे होते. यावेळी रवींद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अभियान व्यवस्थापकानेच महिला कर्मचाऱ्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी ही एका महिला बचत गटात समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडलेले होते, त्यासाठी त्या सातत्याने पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करत होत्या. याच संदर्भात २३ मार्च रोजी दुपारी त्या पंचायत समिती कार्यालयात गेल्या होत्या. तिथे भेटल्यावर त्यांनी अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना आपल्या रखडलेल्या मानधनाबाबत विचारणा…
दैनिक राशिभविष्य: २४ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येऊ शकतात, ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळावी आणि जोडीदारासोबतचे मतभेद संवादाने मिटवण्याचा प्रयत्न करावा. वृषभ: आजचा काळ प्रगतीकारक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आजचा दिवस योग्य आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे समाधान मिळेल. प्रकृतीची थोडी काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मिथुन:…
संगमनेर, प्रतिनिधी- इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. संगमनेर शहरासह परिसरातील विविध पेट्रोल पंपांवर आज सकाळपासूनच वाहनधारकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान अचानक पेट्रोल पंपावर उसळलेल्या वाहनधारकांच्या गर्दीमुळे खरोखर पेट्रोलचे त्यांचाही निर्माण झाली का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या संदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही अथवा माहिती देण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची किंवा इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या भल्या मोठ्या…
संगमनेर | प्रतिनिधी दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारातील मुख्य आधारस्तंभ आणि संस्थापक संपादक शिवपालसिंह ठाकूर यांच्या पत्नी व संपादक धीरज ठाकूर यांच्या मातोश्री अनिता शिवपालसिंह ठाकूर (वय ५५) यांचे आज सोमवारी (२३ मार्च) पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगमनेर शहरासह माध्यम क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता ठाकूर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने ठाकूर परिवाराचा मुख्य आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. श्रीमती अनिता ठाकूर या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सात्विक स्वभावाच्या होत्या. ‘प्रवरातीर’च्या जडणघडणीत आणि…
दैनिक राशिभविष्य: २३ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील मात्र अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असली तरी संवादाने प्रश्न सुटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक राहील. मिथुन आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. घाईघाईने घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायक ठरू…
संगमनेर, प्रतिनिधी- कायदे, नियम आणि नीतिमत्ता यांचे पालन करणारा प्रत्येक जागरूक नागरिक हीच देशाची खरी ताकद असून, अशा नागरिकांच्या संघशक्तीच्या बळावरच भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उदयाला येत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. संगमनेर येथील राजस्थान युवक मंडळाच्या वतीने, मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘मंथन’ व्याख्यानमालेचा समारोप ‘विकसित भारत आणि आपण सगळेच’ या विषयाने झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना सांगितले की, देशालाच दैवत मानून प्रामाणिकपणे कार्य करणारे शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर आणि अभियंते हे घटक…
संगमनेर, प्रतिनिधी- नाशिक येथे हजारो भाविकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील राजकीय लागेबांधे पाहता, खरात याच्यासह त्याला पाठबळ देणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची व प्रशासकीय घटकांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पीडित नागरिकांना तातडीने न्याय व आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पक्षाने लावून धरली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना माकपने म्हटले आहे…
संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या अवकाळी पावसाने आणि पठार भागातील काही गावांमध्ये झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक या दोन गावांना सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहर आणि तालुक्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणगाव, साकूर, घारगाव, जांबुत यांसह अनेक गावांत पाऊस झाला, मात्र पठार भागातील काही ठराविक पट्ट्यात पावसासोबतच मोठी गारपीट…
दैनिक राशिभविष्य: २२ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारामध्ये वृद्धी होईल आणि नवीन गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. नोकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल,…
संगमनेर | मोहसीन शेख तालुक्यातील वडगाव पान येथे तीन दिवसांपूर्वी एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध केला जात असतानाच, संगमनेर शहरातील मुस्लिम समाजाने रमजान ईदच्या निमित्ताने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मुस्लिम बांधवांनी आज पीडित मुलीच्या निवासस्थानी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचा हात दिला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे पीडित कुटुंब सध्या मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. अशा कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी संगमनेर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढाकार घेतला. ईदचा सण असतानाही त्याचे औचित्य साधत मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी पीडित…
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील तहसील कार्यालयात आपली ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत मंजूर झालेले ३० हजार रुपये मिळवून देण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने सापळा रचला आणि बाबासाहेब राऊत याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.…
आजचे सविस्तर राशिभविष्य : शनिवार, २१ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा उत्साह घेऊन येईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल असून नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. वृषभ आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. मिथुन व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस प्रगतीकारक राहील. नवीन…
मुंबई: नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रूपाली चाकणकर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे. खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे आणि त्याच्यासोबतचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून त्या कार्यालयात उपस्थित नव्हत्या आणि आपल्या पथकाच्या संपर्कातही नसल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रंगारगल्ली परिसरातील शनिमंदिरासमोर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम गेल्या १५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत टाकून देण्यात आले आहे. ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून अन्य कामांकडे लक्ष वळवल्याने या भागातील रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यामुळे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी आणि भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रंगारगल्ली परिसरातून शनिमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, साईबाबा मंदिर, संतोषी माता मंदिर आणि गंगामाई मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. प्रवरा नदी तीरावर जाण्यासाठी देखील हा मुख्य मार्ग आहे. मात्र, या ठिकाणी एसटीपीच्या कामासाठी…
