Author: Annant Ppangarkar

मुंबई: विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली असून, दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा…

Read More

मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य आहे, अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्रांच्या मदतीने काही महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात. मिथुन मिथुन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी): नवीन लोकप्रतिनिधीचा कट्टर समर्थक अशी बिरूदावली मिरवून, स्वतःची लायकी नसताना सातत्याने कोणावरही अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरे या विकृत माणसाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेससह तालुक्यातील तरुणांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने संगमनेर तालुक्यातून मोठी संतापाची लाट उठली असून, या प्रवृत्तीविरोधात आता नगरसेवकांसह नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत संगमनेर तालुक्यातील तरुणांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनेश फटांगरे या विकृत व विध्वंसक प्रवृत्तीने सातत्याने चांगल्या गोष्टींना विरोध केला आहे. सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी यांचा कट्टर समर्थक म्हणून वावरताना त्याने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – येथील पंचायत समिती जवळ असलेल्या ‘किसान ऑटोमोबाईल्स’च्या नवीन स्पेअर पार्टसच्या गोडाऊनला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील नवीन मोटार पार्टस जळून खाक झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार शेख शोएब फरीद यांच्या मालकीचे हे किसान ऑटोमोबाईल्सचे गोडाऊन असून, अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये ऑईल आणि रबरी पार्टस असल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली होती. घटनेची माहिती देऊनही अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यास तब्बल दीड तासाचा विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेचे अग्निशमन दल येण्यापूर्वी थोरात कारखान्याच्या फायर फायटरने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकणारा शिवसेना शिंदे गटाचा माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग धरून त्याने ‘दैनिक युवावार्ता’चे संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ‘पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत’ पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या फटांगरे विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिनेश फटांगरे केवळ संपादकांची बदनामी करून थांबला नाही, तर त्याने विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही गलिच्छ भाषेत टीका केली आहे. या विकृतीचा निषेध…

Read More

अकोले, प्रतिनिधी – शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’ वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला अटक केली असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेतमध्ये मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान लॉजिंगच्या…

Read More

संगमनेर: येथील रहिवासी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य भगवानराव जोशी सर यांच्या पत्नी मनिषा (वय ७५) यांचे गुरुवारी, (दिनांक २९ जानेवारी २०२६) सायंकाळी ५:०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जोशी परिवारावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागरिकांनी जोशी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पती प्राचार्य भगवानराव जोशी सर, पत्रकार गिरीश आणि श्रीहरी हे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनिषा जोशी या प्रेमळ आणि सुस्वभावी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी संगमनेर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस शुभ आहे. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल, त्यामुळे…

Read More

श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राहाता तालुक्यातील निमगाव एम.आय.डी.सी. परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर यांनी या मोहिमेत हातभट्टीच्या गावठी दारूने भरलेले एक चारचाकी वाहन पकडले आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक MH.05.AJ.5794 असून, त्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू आढळून आली. याप्रकरणी आरोपी आकाश गोरख गायकवाड (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली गाडी आणि दारू असा एकूण १,३०,५०० रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला आहे. सदरची यशस्वी कारवाई…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संगमनेरचे आक्रमक नेतृत्व आणि माजी शहरप्रमुख अमर कतारी यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या उत्तर भागासाठी अमित चव्हाण आणि दक्षिण भागासाठी फैसल सय्यद यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने संगमनेरमध्ये शिवसेनेची नवी आणि तरुण फळी सज्ज झाली आहे. कतारींच्या नेतृत्वाखाली पक्षाची बांधणी मजबूत होणार – अमर कतारी यांनी यापूर्वी शहरप्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेऊन पक्षाने त्यांना पदोन्नती दिली आहे. तालुक्यात पक्षाची विखुरलेली ताकद एकवटून संघटना पुन्हा आक्रमकपणे उभी करण्याची मोठी जबाबदारी…

Read More

आजचे दैनिक राशिभविष्य मेष –  आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असून गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वृषभ –  आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. मित्रांच्या भेटीमुळे संध्याकाळचा वेळ उत्साहात जाईल. मिथुन –  आजचा दिवस संमिश्र फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी अतिउत्साह…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शहर प्रमुख दिनेश भीमाशंकर फटांगरे याची आमदार अमोल खताळ यांच्या आदेशावरून पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली असून, आता त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत असतानाच, दुपारी दिनेश भीमाशंकर फटांगरे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “जसे ज्याचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – सातत्याने कारवाया होऊन देखील संगमनेर मधील अवैध कत्तलखाने बंद होण्याचे लक्षण दिसत नाहीत. कायद्याची कोणतीही भीती नसलेल्या कसायांकडून हे कत्तलखाने राजरोसपणे सातत्याच्या छाप्यानंतर देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या वाड्यावर धाडसी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३००० किलो गोमांस, ६ जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १०,५७,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी (२७ जानेवारी) दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे केली. या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, संगमनेरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) संगमनेर शहराध्यक्ष दिनेश भीमाशंकर फटांगरे यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांच्या संदर्भात एक अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळल्यानंतर, पक्षाने त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख नेमकं काय म्हणाले… बघा व्हिडिओ… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरलेली असताना, दिनेश फटांगरे यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. या पोस्टमुळे संगमनेरमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. समाज माध्यमातून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि ‘विकासपुरुष’ अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, राज्याने एक कणखर आणि विकासाला गती देणारे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आमदार अमोल खताळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादा पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असणारे आणि जनतेसाठी अखंड झटणारे नेतृत्व होते. त्यांची निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि स्पष्टवक्तेपणा कायम स्मरणात राहील. माझी राजकारणातील सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली असून राजकीय व…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  स्पष्टवक्तेपणा, कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून, संगमनेरमध्येही शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रशासनावर पकड असलेला उमदा नेता गमावला – बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अनेक वर्षे अजित दादा आणि आम्ही एकत्र काम केले. कठोर निर्णय घेण्याची क्षमता…

Read More

संगमनेर –  लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, असं बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते. आज अजितदादांच्या जाण्याने या ओळींची प्रकर्षाने जाणीव होत आहे. एक कर्ता पुरुष गेला की सगळी समीकरणं कशी बदलून जातात, याचा अनुभव आज महाराष्ट्र घेतोय, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. https://x.com/i/status/2016384140682395808 तांबे यांनी आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये अजितदादांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना म्हटले की, लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा आणि अत्यंत स्पष्टवक्ता म्हणून दादांची ओळख होती. पण त्याचसोबत, आपली चूक लक्षात आल्यावर ती मान्य…

Read More

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे वादळ शमले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमानाचा आज बारामती येथे भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास लँडिंग होत असताना विमानाला भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरत असताना धावपट्टीजवळ एका शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. नागरी विमानवाहू महासंचालनालयाने (DGCA) आणि…

Read More

आजचे राशिभविष्य मेष –  आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील, मात्र घरातील मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. व्यवसायात असलेल्या व्यक्तींना आज मध्यम स्वरूपाचा लाभ होईल. सकारात्मक विचार केल्यास दिवसाचा शेवट गोड होईल. मिथुन – तुमच्या…

Read More

संगमनेर, २७ जानेवारी –  महावितरण कार्यालयात वीजबिल, नवीन वीज जोडणी आणि ट्रिपिंग यांसारख्या विविध तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक असून, यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सक्त सूचना त्यांनी महावितरणच्या आढावा बैठकीत दिल्या. संगमनेर शहर आणि तालुक्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय कार्यालयात ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे उपअभियंता उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर…

Read More