Author: Annant Ppangarkar
गुरुवार, १७ ऑक्टोंबर अहिल्यानगर – जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेटवस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अविनाश बारगळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. शेजारील जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम…
गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – निवडणूक आयोगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अहिल्यानगर शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ “खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील” ठरविले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त पथके तैनात केली जाणार आहेत. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील ठरवला गेला होता. यावेळी मात्र संगमनेरसह अहिल्यानगर शहर मतदारसंघाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणजे काय? केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी खर्चाच्या…
गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे…
गुरुवार, १७ ऑक्टोबर आरपीआय (आठवले) पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अशोक अभंग यांचे नुकतेच निधन झाले. दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या अभंग यांच्या कुटुंबियांचे सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आठवले यांच्या समवेत अहिल्या नगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, भीमा बागुल, शहराध्यक्ष कैलास कासार, आशिष शेळके, शानू बेगमपुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले सोमवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. ज्यावेळी त्यांनी अभंग यांच्या कुटुंबियांचे भेट घेत दुःख व्यक्त केले.
गुरुवार, १७ ऑक्टोंबर अहिल्यानगर – निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी म्हटले असून तसे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ही बंदी राहणार आहे. बंदी दरम्यानच्या या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स बॅनर्स पॅम्प्लेटस्, कट आऊटस् किंवा जाहिरात फलक लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे, निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर…
गुरुवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष – विरोधकांनी तोंड वर काढले तरी त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. आजचे धोरण ठरवताना पूर्ण विचार करून मगच अमलात आणावे. वृषभ – नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश येण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. काही कुयोग जरी असले, तरी तुम्ही सर्व चांगल्या तहेने निभावून नेणार आहात. प्रगती होणार आहे. मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा, अति धाडस करू नका. बोलताना संयम पाळा, फसवणुकीपासून सांभाळा. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही याची काळजी घ्या. कर्क – व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे आपले काम चांगल्याप्रकारे होतील. जर आपण कलाक्षेत्र, साहित्य याच्यामध्ये…
प्रवीण पुरो | बुधवार, १६ ऑक्टोबर मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन २४ तासांचा अवधीही झाला नाही, तोच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. जानकर यांचा पक्ष आता राज्यात २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आपल्या पक्षाला विचारात घेतलं गेलं नसल्याच्या कारणाने महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला, अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख जानकर यांनी महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. जानकर यांच्या निर्णयामुळे महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी एक-दोन दिवसात जाहीर होणार असून, त्यात…
बुधवार, १६ ऑक्टोंबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसिल अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहे. परवानगीसाठी अर्ज व डी-१ नमून्यात अतिरिक्त माहिती, नगरपालिका/महानगरपालिकेचे जाहिरात लावण्याचे शुल्क व नाहरकत दाखला तसेच अनूसूची १६ आवश्यक आहे. सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व महानगरपालिका,…
बुधवार, १६ ऑक्टोंबर नाशिक – तक्रारदाराला ओमनी गाडीवर सोडा विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला एसीबीच्या (अँटी करप्शन) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. एजाझ काझी असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कार्यालयातच लाच स्वीकारणाऱ्या काझी याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून सदरचा व्यवसाय करू देण्यासाठी व कोणतेही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाचखोर पोलीस हवालदार एजाझ काझी (वय- ५२ वर्ष, नियुक्ती देवपूर पोलीस स्टेशन) याने तक्रारदाराकडे चार…
बोगस लाभार्थ्यांना जमीन देण्यासाठी आढळा नदीचा केला ओढा.. सुमारे ४०० एकर राखीव वनक्षेत्राचे वाटप बुधवार, १६ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावात केंद्र सरकारच्या राखीव वन जमिनीचे परस्पर वाटप करण्याचा प्रताप तत्कालीन तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाने देखील सदर जमीन ही राखीव वनक्षेत्र असल्याने ती वनविभागाची असल्याचे पत्र दिले आहे. आता जवळेकडलग येथील बारा शेतकऱ्यांनी या संदर्भात संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून बोगस लाभार्थ्यांनी मिळवलेली जमीन पुन्हा सरकारने ताब्यात घ्यावी आणि सर्व नोंदणी व फेरफार रद्द करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे स्थानिक महसूल, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाला हाताशी धरून बोगस लाभार्थ्यांनी…
बुधवार, १६ ऑक्टोबर २०२४ मेष- आर्थिक बाबी सुधारतील, अडकलेले पैसे परत मिळतील, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. चांगली बातमी मिळेल. मुलाची स्थिती समाधानकारक असेल. मनात थोडी चिंता असू शकते. आरोग्य, प्रेम आणि व्यवसायासाठी हा आनंददायी काळ आहे. वृषभ- व्यवसायात सुधारणा होईल. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. वडिलोपार्जित संपत्ती वाढेल. आरोग्य आणि प्रेम पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमचा व्यवसाय उत्तम चालेल. मिथुन- तुमच्यासाठी काही कामे यशस्वी होतील. तुम्ही प्रतिकूलतेवर मात केली आहे. तब्येतीत सुधारणा होईल. तुमचे मन धार्मिकतेकडे जाईल. आरोग्याची स्थिती समाधानकारक आहे. व्यवसायातही नफा मिळेल. कर्क- तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या समस्येत अडकू शकता. सावध…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर अहिल्यानगर – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांनी निवडणूक आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील आणि विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय इमारती आणि त्यांच्या संरक्षक भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, कापडी फलक, कट आऊट, जाहिरात फलकावरील संदेश, झेंडे…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर संगमनेर नगर परिषदेकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना देखील शहराच्या विविध भागात, नवीन नगर रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करणारे पथक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारवाई करणाऱ्या माणसांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अथवा कारवाईसाठी प्राधिकृत केल्याचे पत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या नावावर कारवाई करणारे हे कर्मचारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी दुपारी नवीन नगर रस्त्यावर काही फळ विक्रेत्यांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करत ते जप्त करण्याचे काम दोन-तीन तरुण करत होते. या कर्मचाऱ्यांना पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी याबाबत विचारणा केली असता, तुम्ही नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांशी बोला. त्यांनी आम्हाला कारवाईसाठी पाठवले, अशा…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होईल.दीपावली पूर्वीच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तसेच ऐन दीपावली दरम्यान निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार असल्याने मतदारांची देखील दिवाळी गोड होण्याची चिन्ह आहे. २९ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सणाचा जल्लोष राहणार असल्याने याच दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तसेच मागे घेण्याची अखेरची तारीख असल्याने ऐन दिवाळीत आता निवडणुकीचा देखील माहोल रंगणार आहे. त्यातच राज्यभरात…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात या मुलांचा शोध व बचाव सुरू असताना सुगाव बुद्रुक (अकोले) येथे शोध कार्य करणाऱ्या पथकाची बोट उलटून तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई व अन्य लाभ म्हणून गृह विभागाने ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच काढण्यात आले. २३ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती. पाण्याचा प्रवाहात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या बुडून मृत्यू झालेल्या मुलांपैकी एकाच्या शोधासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली. बचाव कार्य सुरू…
मंगळवार, १५ ऑक्टोबर संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. समृद्ध म्हणून गौरविल्या जाणाऱ्या तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायच असल्याचे प्रतिपादन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या युवा संवाद यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारो तरुणांच्या सहभागाने तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण तयार झाले…
मंगळवार, १६ ऑक्टोबर संगमनेर – सन २०२४-२५ या गळीप हंगामात श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याने साडेपाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप आणि चांगला साखर उतारा मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली. विजयादशमीच्या दिवशी बिरोले यांच्या हस्ते पठाण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल व बॉयलिंग हाऊसमधील मशिनरीचे विधिवत पूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब वर्पे, संचालक हरिभाऊ गीते, जनरल मॅनेजर अण्णासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर रोहिदास रसाळ, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, इंजिनीयर केशव वर्पे, संतोष नान्नर, शिवाजी…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नावे निश्चित झाली असून मंगळवारी दुपारी बारा वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तास उरले असतानाच या सात जणांना आमदारकीची संधी मिळाली आहे. राज्यपाल नियुक्त सात सदस्यात महायुतीचा ३-२-२ असा फॉर्मुला वापरण्यात आला असून यात भारतीय जनता पक्षाच्या तीन, शिवसेना शिंदे गटाच्या दोन, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यांमध्ये श्रीमती चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील व धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांचा समावेश…
असा असेल तुमचा आजचा दिवस मंगळवार, दि. १५ ऑक्टोंबर मेष – आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. कामामध्ये यश मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या, तो आपणास लाभकारक ठरेल. नोकरीत दिवस नॉर्मल जाईल. वृषभ – नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. काम जास्त असलं तरी कामात अडचणी येतील, मात्र आज कोणाचेही सहकार्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. मिथुन – आपणास आज जिद्द व चिकाटीने काम पूर्ण करावे लागणार आहे. नवीन ओळखी होतील. ओळखीचा फायदा सामाजिक क्षेत्रात आपणास होईल सामाजिक क्षेत्र विस्तारेल. संतती सौख्य मिळेल. कर्क – आज आपले मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासाने कामे कराल.…
सोमवार, १४ ऑक्टोबर अहिल्यानगर – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सोमवारी बैठक पार पडली असून या बैठकीत ऊर्जा मित्र बैठक पूर्ववत सुरू करणे, अवैध गुटखा विक्री, स्वयंपाक गॅस वितरणातील गैरप्रकार, सेतू कार्यालयातील अवैध सेवाशुल्क, भेसळयुक्त मिठाईची विक्री, एसटी थांबा आदी विषयावर चर्चा झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव हेमा बडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुराडे, विलास जगदाळे, शाहूराव औटी, अमित कोहली, दिनेश थोरात, अशोक शेवाळे, रणजित श्रीगोड, उमा म्हेत्रे, बाबासाहेब भालेराव, डॉ. राजेंद्र कळमकर, विलास सोनवणे, सुनिल दळवी, डॉ. गोरख बारहाते व प्रकाश रासकर आदी उपस्थित होते.…
