Author: Annant Ppangarkar
मेष (Aries) – आजचा दिवस अनुकूल आहे. कामांमध्ये यश आणि सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाची प्राथमिकता ठरवून पुढे जा. वृषभ (Taurus) – मेहनतीने स्थिती मजबूत होईल. वेळ आणि कामाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. दीर्घकाळापासूनचे अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन (Gemini) – तुमच्या सूझबूझ आणि कल्पनाशक्तीमुळे मोठे लाभ मिळतील. साख (प्रतिष्ठा) आणि सन्मानात वाढ होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer) – भावूकतेवर नियंत्रण ठेवा. आरोग्य थोडे मध्यम राहू शकते. कुटुंबात सौहार्द राखणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. सिंह (Leo) – सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग…
अहिल्यानगर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांचा एक मेसेज समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. काय म्हटले आहे तांबे यांनी या मेसेजमध्ये… प्रिय मित्र-मैत्रिणींनो, खरंतर 27 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे… दरवर्षी आपण सर्वजण मला प्रत्यक्ष अथवा डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देता. तुमचे प्रेम व आपला ऋणानुबंध साजरा करण्याचा तो दिवस असतो. त्यामुळेच अनेकदा मला आवडत नसतानाही मी हा दिवस साजरा करतो, कारण तो दिवस आपल्याला भेटण्याची एक संधी असते. राजकीय-सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होऊन जातो. आणि स्पर्धेच्या…
संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या कार आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एमएच १२ एफ १४२१ क्रमांकाची कार पुण्याकडे जात होती, तर एमएच १३ सीयू ९१५६ क्रमांकाचा आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्यावतीने शहरात नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाला महिलांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच आनंददायी मनोरंजनाचा अनुभव मिळाला. संगमनेरमधील गणेश नगर, महाराणा प्रताप चौक, आदर्श कॉलनी, मालदाड रोड, ऑरेंज कॉर्नर आणि आझाद चौक या भागांमध्ये हा कार्यक्रम बुधवारी रात्री उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रत्येक ठिकाणी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता पहिल्याच दिवशी दिसून आली. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत ‘आय लव्ह…
संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाला आणखी बळ मिळाले आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरण कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. या निधीमुळे तालुक्याचे रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत आणि सुलभ होणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या निधी मंजुरीबद्दल सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे एकेकाळी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आज ‘वैभवशाली तालुका’ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ अंतर्गत ३०५४, ३०६८ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून जिल्हा…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील आश्वी जवळील खळी येथील कांगणवाडी येथे एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने आजी आणि तिच्या पाच वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना ८ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. खळी कांगणवाडी येथील रहिवासी श्रीमती सिंधुबाई नामदेव सोसे (वय ५२) आणि तिचा नातू राहुल प्रकाश सोसे (वय ५) अंघोळीसाठी गरम केलेले पाणी वापरत असताना, ते अनावधानाने त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात दोघेही गंभीररित्या भाजले. त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग भाजला होता, विशेषतः पाठीचा मागील भाग आणि…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची प्रशंसा मिळेल आणि तुमचे मान-सन्मान वाढेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. यश मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण एकाग्रतेने काम करावे लागेल. कोणत्याही प्रकारची शंका किंवा गोंधळ टाळा. सरकारी कामे मार्गी लागतील. मिथुन: आज तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. भागीदारीमध्ये व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कर्क: तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जिव्हाळा आणि प्रेम वाढेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे पथक आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. अग्नि शस्त्र विक्रीसाठी काही संशयित श्रीरामपूरमध्ये आल्याची माहिती मिळतात या संयुक्त पथकाने कारवाई करत दोघाजणांना पकडले. कारवाईदरम्यान आरोपींकडून ३ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतूस, ६ मॅगझिन आणि इर्टिका कारसह तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इर्टिका कार मधून दोघेजण शस्त्र विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने संजयनगर रोडवरील मिल्लतनगर येथे पाटाच्या कडेला आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला होता. संशयित वाहन तेथून जात असताना पोलिसांनी ते…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळ एका ६८ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसाद देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी एका वृद्धाकडून दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढून घेतल्या. या अंगठ्यांची अंदाजे किंमत ६०,००० रुपये आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर विठोबा दिघे (वय ६८, रा. जोर्वे, ता. संगमनेर) हे २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता त्यांच्या मोटारसायकलवरून बाळेश्वरहून जोर्वे येथे परत येत होते. चंदनापुरी घाटाखालील ढगाडी मंदिराजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबवले. या दोन्ही आरोपींनी दिघे यांचा विश्वास संपादन करून, हा प्रसाद देवाला द्या, असे सांगत त्यांच्याकडील सोन्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका खासगी व्यक्तीला १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे अशी लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल्सची नावे आहेत, लाच घेणारे दोन्ही पोलीस कर्मचारी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीला आहेत. त्यांच्यासोबत उमेश बारी नावाच्या एका खासगी व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमळनेर येथील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या सहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. याच व्यवसायासाठी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे यांनी तक्रारदाराकडे दरमहा १५ हजार…
संगमनेर – संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांची मुदतीपूर्वीच येथून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर प्रतिनियुक्ती केली आहे. आपल्या कामाचा ठसा संगमनेरमध्ये उमटवू न शकणारे कोकरे राजकीय दबावामुळे संगमनेरमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय वर्तुळामध्ये होती. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये कोकरे यांचा समावेश होता. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. राज्यातील अनेक शहरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकरे संगमनेरमध्ये मात्र आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाही. ते कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी मार्ग काढतील अशी अपेक्षा संगमनेरकरांना होती. त्यांनी सुरुवातीपासून तसे प्रयत्नही केले. मात्र, त्यांच्या कामकाजात होणाऱ्या…
मेष: आज तुम्ही तुमच्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. मुलांच्या नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ: आज तुम्हाला कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच कामे करावी लागतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन: तुमच्या मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आज अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचे योग आहेत. कर्क: प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येऊ शकतात. तुमचे आरोग्य उत्तम राहील. कार्य करण्याचा उत्साह वाढेल. सिंह: तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरी आणि व्यवसायात…
संगमनेर: सध्या संगमनेर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरातील रस्ते, आरोग्य, वाहतूक आणि अनधिकृत फ्लेक्ससारख्या गंभीर प्रश्नांवर तातडीने लक्ष घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम अरगडे यांच्यासह काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात केवळ समस्या नमूद केल्या नसून नेमकी समस्याग्रस्त ठिकाणेही दर्शवण्यात आली आहेत. यामुळे, मुख्याधिकारी या संदर्भात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाहतूक आणि सिग्नल व्यवस्था – संगमनेर शहरातील बस स्थानक, अकोले नाका आणि दिल्ली नाका येथील सिग्नलचा वेळ (टायमिंग) चुकीचा आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अनेक वाहनचालक नियम तोडून…
संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव संगमनेर’ चळवळीच्यावतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर शहरात २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ या काळात दररोज रात्री ७ ते १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. महिलांमध्ये मैत्री आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुक्याने विकासातून वैभव प्राप्त केले आहे. शहराची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ‘सौ शहरी एक संगमनेरी’…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रसिद्ध श्री खंडोबा देवस्थानाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना’ अंतर्गत ‘ब वर्ग’ दर्जा मिळाल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, खंडोबा महाराज हे संगमनेर तालुक्याचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या वार्षिक यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. मात्र, सोयी-सुविधांची कमतरता जाणवत होती. आमदार खताळ यांनी ही बाब लक्षात घेऊन शासन स्तरावर अथक प्रयत्न केले, ज्याला आता यश आले आहे. यामुळे आता देवस्थानाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. या निर्णयामुळे देवस्थान परिसरात पाणीपुरवठा, स्वच्छता, निवास, रस्ते, प्रकाशयोजना आणि शौचालये यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. यामुळे यात्रेकरूंचा अनुभव अधिक…
संगमनेर (प्रतिनिधी): राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास सुरूच आहे. तालुक्यात विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, आता आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा विकास होणार आहे. हा निधी श्रीक्षेत्र वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आणि इतर चार गावांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मंजूर झाला आहे. आमदार तांबे यांनी वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी वेळोवेळी या देवस्थानला विविध योजनांमधून…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ- आज तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. मिथुन- आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार जपून करा. कर्क- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सिंह- आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहाल. कामाचे योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कन्या- आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल. तूळ- आज तुम्हाला आर्थिक…
संगमनेर – मोहसीन शेख उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ (I Love Muhammad) चा बोर्ड लावल्याबद्दल 25 मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात संगमनेर येथील मुस्लिम समाजाने आज (सोमवार) जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सय्यदबाबा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर, कानपूरमधील अन्यायकारक कारवाईचा निषेध करत, प्रांत अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले. काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात (मिलाद-उन-नबी) च्या धार्मिक उत्सवादरम्यान, 25 मुस्लिम तरुणांनी ‘आय लव्ह मुहम्मद’ असा बोर्ड रस्त्यावर लावला होता. या संदर्भात संगमनेरमध्ये मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ही कृती पैगंबर मुहम्मद…
सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. पडळकर यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भावना व्यक्त करत अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच…
संगमनेर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कात 20% वाढ केल्याच्या निषेधार्थ, ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने सोमवारी संगमनेरमध्ये आंदोलन केले आहे. ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याबाबत बोलताना अनिकेत घुले म्हणाले, पुणे विद्यापीठ खोटं बोलत आहे की त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही शुल्कवाढ केली नाही. पूर्वी 25,000 रुपये असलेले बीसीएचे शुल्क आता 40,000 रुपये झाले आहे. तसेच, 14,000 रुपये असलेली इतर अभ्यासक्रमांची फी 30,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारी आहे. घुले…
