Author: Annant Ppangarkar

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज): संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत सुरू असतानाच एका दुर्मिळ घटनेत नर आणि मादी बिबट्याची जोडी वनविभागाच्या पिंजऱ्यात एकाच वेळी अडकल्याची घटना घडली आहे. मिलनाच्या उद्देशाने एकत्र आलेली ही जोडी जेरबंद झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. मिर्झापूर (संगमनेर) येथील ‘गणेश मळा’ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याने शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास, भक्ष्याच्या शोधात किंवा मिलनाच्या ओढीने आलेले हे नर-मादी बिबट्यांचे जोडपे वनविभागाच्या…

Read More

मेष : आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. वृषभ : आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मिथुन : तुमच्या संवाद कौशल्यामुळे आज कठीण कामे सोपी होतील. मित्र-मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कर्क : आज थोडे भावूक राहाल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. जोडीदारासोबत वेळ घालवणे चांगले ठरेल. सिंह : तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कन्या : नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. तूळ : जोडीदाराशी असलेले संबंध…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात मंजूर झालेली आणि नंतर राजकीय कारणास्तव रद्द करण्यात आलेली रस्ते कामे पुन्हा मार्गी लागली आहेत. एकूण ३०.५७० किलोमीटरपैकी १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना राज्य सरकारने नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील चार मोठ्या ग्रामीण भागांतील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. राजकीय वळणांनंतर कामांना पुन्हा संजीवनी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील ८ महत्त्वाचे रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र, ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका अनपेक्षित निर्णयाद्वारे शासनाने या सर्व कामांची प्रशासकीय…

Read More

अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपले… पदराखाली दोन काळजाचे तुकडे घेऊन माऊली माहेरी आधार शोधायला आली होती पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वीरगाव (ता. अकोले) येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्या बहीण-भावंडांचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका दुर्दैवी मातेचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीरगाव येथील एका शेतातील विहिरीत दोन बालके पडल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेत पीयूष पोपट मेंगाळ (वय ८ महिने) आणि श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) या दोन निष्पाप जीवांचा करुण अंत…

Read More

अहिल्यानगर (महाराष्ट्र संवाद न्यूज): बनावट नाव, पत्ता आणि कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांचा मोठा गैरप्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, या चौघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की,…

Read More

मेष – आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे चीज होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यात गोडवा ठेवा, ज्यामुळे वादाचे प्रसंग टळतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्यावर लक्ष द्या. मिथुन – नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल. प्रवासाचे योग आहेत जे फायदेशीर ठरतील. कर्क – नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सिंह – आज नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेशाशी…

Read More

नाशिक: राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा कायदेशीर दणका दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली दोन वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंड सत्र न्यायालयाने कायम ठेवला असून, कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांचेही अपील फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. काय आहे नेमके प्रकरण?- हे संपूर्ण प्रकरण १९९५ सालातील असून नाशिक शहरातील व्ही.यू. अपार्टमेंटमधील सदनिकांशी संबंधित आहे. शासनाकडून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या ४ वर्षीय सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या तातडीच्या आणि आक्रमक पाठपुराव्यातून महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्यावतीने १० लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात आली आहे. सकाळी जन आक्रोश आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह अवघ्या ६ तासांत पूर्ण केला. १३ डिसेंबर २०२५ रोजी जवळेकडलग येथील सिद्धेश कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, यात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.…

Read More

नवी दिल्ली | दि. 15 डिसेंबर 2025 नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा आधी निश्चित करण्यात आलेल्या मूळ मार्गानेच राबवण्यात यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन रेल्वेमंत्र्यांकडे सादर केले. नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–राजगुरुनगर–चाकण मार्गे पुणे अशी पूर्वी निश्चित करण्यात आलेली नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची मूळ अलाइनमेंट भौगोलिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत योग्य असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. या भेटीत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, हा मूळ मार्ग केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक आणि पुणे…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा राहील. तुम्ही उत्साहाने काम कराल, परंतु काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आजचा दिवस लाभदायक आणि अनुकूल आहे. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल आणि प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. मित्र आणि कुटुंबाकडून मदत मिळू शकते, तसेच जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. मिथुन: आज तुम्हाला प्रत्येक काम विचारपूर्वक करण्याची गरज आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. नवीन आव्हाने स्वीकाराल. प्रवासाचे योग आहेत, जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. कर्क: आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल, परंतु आत्मविश्वासाने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘अमली पदार्थ’ प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणावरून आमदार अमोल खताळ यांच्यावर काँग्रेसने अत्यंत गंभीर आरोप करत त्यांचे सभागृहातील वक्तव्य आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेले व्हिडिओ ‘छेडछाड’ केलेले असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. मूळ व्हिडिओ आणि फोटो पत्रकार परिषदेत सादर करत काँग्रेसच्या नेत्यांसह संबंधित युवकांनी या व्हिडिओची पोलखोल करत खताळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नवीन लोकप्रतिनिधी आमदार खताळ समर्थकांकडून ‘खोटे व्हिडिओ बनवण्याचा उद्योग’ सुरू असून, यामुळे निष्पाप तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हा उद्योग त्वरित बंद करा, अन्यथा तालुक्यातील तरुणाईच्या प्रचंड उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा संतप्त…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्यासाठी आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, दि. १५ डिसेंबर) संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. न्याय मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असताना प्रशासनाचे मात्र अनास्था दिसून आली. जनतेला उत्तरदायित्व असलेल्या प्रांताधिकार्‍यांनी निवेदन घेण्यास आचारसंहितेचे कारण दाखवत टाळाटाळ केल्याने संतापलेल्या आंदोलकांपुढे मात्र अखेरीस त्यांना नमते घेऊन निवेदन स्वीकारण्यासाठी नागरिकांमध्ये यावे लागले. गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, बिबट्यांची वाढलेली संख्या तालुक्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. या गंभीर प्रश्नावर प्रभावी उपाययोजना व्हावी यासाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे चार वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. शनिवारी (दि. १३) या बिबट्याच्या हल्ल्यात सिध्देश कडलग या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संतप्त ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनामुळे वनविभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती आणि अखेर रविवारी (दि. १४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जाळ्यात अडकला. शनिवारी बिबट्याने हल्ला करून सिध्देशचा बळी घेतल्यामुळे जवळे कडलगसह संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे रेस्क्यू टीमसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वृषभ – तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळेल. विचारपूर्वक बोलल्यास संबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – आज तुम्हाला समाधानी वाटेल. मित्रांशी संवाद वाढेल आणि नवीन कल्पनांवर काम सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. अनावश्यक खर्च टाळा. कर्क – आज मानसिक शांतता मिळेल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल. सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे कार्यक्षेत्रात प्रगती…

Read More

अहिल्यानगर – प्रतिनिधी जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका मोटार अपघात दाव्यात तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अपघातात मयत झालेल्या महेश काठमोरे यांच्या वारसांना व विमा कंपनीमध्ये यशस्वी मध्यस्थी होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील महेश तुकाराम काठमोरे (वय ३४) यांचा २० डिसेंबर २०२३ रोजी अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार गमावल्याने त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता, अज्ञान मुले व वयोवृद्ध आई-वडील यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर, वारसांना जलद न्याय व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा खटला लोकअदालतीत ठेवण्यात आला होता. मयत काठमोरे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. विशेष म्हणजे बाळ सुखरूप असले तरी, प्रसूतीच्या आनंदाऐवजी या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली असून, नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर उपचारात घोर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे नाव आहे. प्रसूतीसाठी त्या माहेरी आल्या होत्या. गर्भधारणेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ सुखरूप जन्माला घातले. मात्र, त्यानंतर रुपाली यांची प्रकृती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील हृदयद्रावक घटनेनंतर, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश सूरज कडलग (वय 4) या बालकाच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात केली आहे. जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर शनिवारी (१३ डिसेंबर) ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धेश हा घराजवळ खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या दातांनी गळा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. सिद्धेशचे कुटुंब शेती आणि दुग्ध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य शेतात…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – संगमनेर तालुका बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे भयभीत झाला असून, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी, (१५ डिसेंबर) २०२५ संगमनेरात भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय यादरम्यान हा जन आक्रोश मोर्चा हजारो संगमनेर करांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना जखमी व्हावे लागले आहे, तर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्याला बिबट्याच्या वाढत्या दहशतीने ग्रासले असतानाच, जवळे कडलग गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास सिद्धेश हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता, तर त्याचे आजी-आजोबा आणि कुटुंबीय शेतीत व्यस्त होते. याच वेळी गवतात लपून बसलेल्या एका बिबट्याने संधी साधून सिद्धेशवर झेप घेतली. आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने या निष्पाप बाळाच्या मानेला धरून त्याला शेतात ओढत…

Read More

राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कारभाराची वर्षपूर्तीचे बरेच नगारे वाजले. वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने विविध वर्तमानपत्र आणि त्यांच्यासाठी काम करणार्‍या कथित सर्वेक्षण संस्थांच्या निकालांनी या सरकारची भलतीच भलामण केली आहे. सर्वच आघाड्यांवर हे सरकार कसं यशस्वी ठरलंय, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना जणू आपण राज्यातल्या तेरा कोटी जनतेचाच हवाला देत असल्याचा आवही या सर्वेक्षणांनी आणला. हव्यासापोटी आपण किती लाचार बनतो आहोत, याचं भान न राहिल्याचं हे उत्तम उदाहरण. गोदी म्हणून इतरांना हसण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावल्याचं हे चित्र. आता तर आपण दिल्लीतील लाचारांहून भाट झालोत की काय, असं वाटावं, अशी ही सर्वेक्षणाची मांडणी म्हणावी लागेल. आपल्यासोबत कोणी तरी आहे, याचा आनंद…

Read More