Author: Annant Ppangarkar

संगमनेर/नागपूर –  संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल अभिलेखात मणियार कुटुंबाची मालकी असतानाही प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या या जमिनीच्या नोंदी रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. या किचकट कायदेशीर प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची नावे कमी करून रहिवाशांना ‘कन्फरमेशन डीड’ करून देण्याची विनंती केली होती. मणियार कुटुंबीयांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल बाजूने लावण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.  तक्रारदाराकडून तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांची सिन्नर तालुक्यातील दोडी शिवारात जमीन आहे. या जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी नायब तहसीलदार संजय धनगर याने त्यांच्याकडे सुरुवातीला १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. वाटाघाटीनंतर लाचेची…

Read More

अहिल्यानगर – घारगांव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकून दिलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बालकाचे खुनी अखेर जेरबंद झाले आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवांशचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीनेच त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये अंदाजे ०३ ते ०४ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ७४/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात…

Read More

संगमनेर-  नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे महत्त्व ओळखून, संगमनेर रेल्वे कृती समितीने येथील लोकप्रतिनिधींना केवळ छायाचित्रांसाठी स्टंटबाजी न करता, नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे वळवल्याबद्दल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आणि पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. समितीने शहरातील नवीन लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला असून, मागील एका वर्षात शहरात अमली पदार्थ आले पण विकासाची रेल्वे पळाली, असा थेट आरोप केला आहे. शिर्डीमार्गे वळवलेल्या रेल्वेला विरोध करा- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता, मात्र विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवली आहे. हा निर्णय संगमनेर, अकोले परिसराच्या औद्योगिक, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांच्या नोकरी-व्यवसायासाठी अत्यंत नुकसानदायक ठरणारा आहे.…

Read More

नागपूर –  पुणे–नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे, या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (महायुती) आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एक आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी ‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे’ या मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान केला तसेच हातात फलक घेऊन थेट विधानभवनात प्रवेश केला. या कृतीने विधानभवनातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि संगमनेरकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या. शिर्डी मार्गे मार्गाला विरोध; संगमनेरकरांमध्ये संताप – नारायणगाव जवळील ‘जीएमआरडी’ (दुर्बीण) च्या तांत्रिक अडथळ्याचे कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत हा रेल्वेमार्ग शिर्डी मार्गे करण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संगमनेरकरांमध्ये…

Read More

संगमनेर-  ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कल्चर फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत संगमनेरच्या संस्कार-बालभवनच्या नृत्यांगणांनी नेत्रदीपक यश संपादन करत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. पारंपरिक भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकारांवर आधारित या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, ओडिशा, केरळ अशा विविध राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, संस्कार-बालभवनची विद्यार्थिनी वेदीका हासे हिने उत्कृष्ट लोकनृत्य सादर करत ज्युनिअर गटात सुवर्णपदकासह पहिला क्रमांक पटकावून संगमनेरचे नाव उंचावले. याव्यतिरिक्त, इतर दोन्ही गटांमध्ये रौप्यपदकासह दुसरे स्थान मिळवत बालभवनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली. देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन- भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारांना…

Read More

घारगाव (संगमनेर) –  पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघा बाप-लेकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक ठप्प झाली असताना, पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे हे कुटुंबियांसह नाशिकहून पुण्याकडे प्रवास करत होते. घारगाव येथे वाडगे याने अचानक आपली गाडी आडवी लावली. यानंतर, झालेल्या वादातून अण्णासाहेब वाडगे याने लोखंडी रॉडने पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केली. या…

Read More

संगमनेर / पुणे –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप करत, धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी (व्होटचोरी) करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा बनला असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाहीची हत्या व व्होटचोरी यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. थोरात यांनी ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या शंकांवरही भाष्य केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातूनच झाला पाहिजे, या मागणीसाठी आपण लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सातत्याने पाठपुरावा करत असून, रेडिओ दुर्बिणीचे कारण न देता हा मार्ग संगमनेरवरूनच नेण्याचा आपला आग्रह कायम आहे, असे ठाम प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार वाकचौरे म्हणाले, २००९ ते २०१४ या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आम्ही या मार्गासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीमार्गे वळवल्यामुळे संगमनेर तालुक्यासह सिन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या भागांमध्ये आता प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासाठी जमिनी आरक्षित करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला होता, तो मार्ग अचानक बदलल्याने जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने हा मार्ग बदलण्याचा घाट घातल्याबद्दल रेल्वे जनआंदोलन समितीने महायुतीमधील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले असून, आता राजकारण न करता या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्वपक्षीय नागरिकांना केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही रेल्वे शिर्डीमार्गे जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांना…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमवरील सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळासाठी बंद पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल संगमनेरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही माहिती मिळताच उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका या घटनेमुळे आणखी गडद झाल्या आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये नगरपालिका निवडणुकीतील सर्व १५ प्रभागांतील ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सील करण्यात आलेल्या या स्ट्रॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात…

Read More

सिहंस्थ कुभमेळ्याच्या निमित्ताने नाशिककरांच्या पर्यावरण अस्तित्वाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कुंभमेळ्यात उपस्थित राहणार्‍या साधूंच्या निवासासाठी सरकारला साधूग्राम उभारायचंय. यासाठी तपोवनाची अनेक वर्षांची शान बनलेली 1800 मोठाली झाडं तोडण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. आपल्या कारकिर्दीला एक वर्षाचा काळ पूर्ण होत असताना स्वत:चे ढोल बडवणार्‍या सरकारचा या प्रश्‍नावरून होत असलेला निषेध खूपच बोलका आहे. सरकारमध्ये सारं काही अलबेल नाही, हे दर्शवणारा हा विरोध आहे. वाढता विरोध लक्षात घेता झाडं तोडून साधूग्राम बनवण्याचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मागे घेतला पाहिजे. त्याऐवजी साधूग्राम न बनवल्यास कुंभमेळा कसा होईल, असले फालतू प्रश्‍न विचारत ते नाशिककरांच्या संतापात तेल ओतत आहेत. आपलं…

Read More

आजचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीचा असल्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. मेष : आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम आणि उत्साहवर्धक असेल. तुमच्या कामात नवीन ऊर्जा जाणवेल आणि अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिकदृष्ट्या हा दिवस लाभदायक ठरू शकतो, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. महत्त्वाच्या कामांची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कार्यपूर्तीचा असेल. हाती घेतलेले जुने प्रकल्प आणि कामे वेळेत व्यवस्थित पूर्ण होतील. घरात खरेदीचा किंवा महत्त्वाच्या वस्तू घेण्याचा योग आहे. आर्थिक बाबींमध्ये स्थिरता…

Read More

संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत, आयोग पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवत असून आयोग त्याची अंमलबजावणी करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला. तसेच, मतदान आणि मतमोजणीतील २० दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेत, EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) पेट्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि अचानक मतदान स्थगित केले जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नाही. सावळा गोंधळ…

Read More

मेष (Aries): घर-परिवारातील कार्यांसाठी उत्तम दिवस, अडकलेले धन परत मिळण्याची शक्यता, नोकरी आणि व्यवसायाच्या योजना चांगल्या, आरोग्य उत्तम. वृषभ (Taurus): व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल, बुद्धिमत्तेने कामात यश, वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील, आर्थिक बाजू बळकट करण्याचे निर्णय घ्याल. मिथुन (Gemini): दिवस उत्साहवर्धक आणि शुभ, नोकरीत समाधान, व्यवसायात प्रगती, भावंडांशी सलोखा वाढेल आणि आर्थिक लाभ संभवतो. कर्क (Cancer): संयम आणि विचारपूर्वक व्यवहार ठेवावा, आर्थिक व्यवहारात काळजी घ्या आणि जास्त खर्च टाळा, कौटुंबिक जीवनात लवचिक धोरण ठेवा. सिंह (Leo): दिवस शुभ फलदायी, कार्यक्षमता वाढेल, नवीन योजना यशस्वी होतील, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आणि सामाजिक मान-सन्मान वाढेल. कन्या (Virgo): सुख-समृद्धी लाभेल, बऱ्याच दिवसांची चिंता कमी होईल,…

Read More

मेष : आज तुम्हाला संबंधांमध्ये जुळवून घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. संयम आणि क्षमावृत्तीने वागल्यास ऐक्य टिकून राहील. शांत राहून जोडीदाराला त्यांचे विचार मोकळेपणाने मांडण्यास मदत करा. वृषभ : आज तुम्ही भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि समाधानी असाल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे, पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करा. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल, विशेषत: करिअरमध्ये. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करा आणि लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. कर्क : तुमचे आरोग्य आणि तंदुरुस्ती आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असेल. मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान केल्यास…

Read More

दिल्लीतील केंद्र सरकारची प्राथमिकता काय हे आता जनतेला पुरतं कळून चुकलं आहे. सत्तेच्या पाच वर्षात मंदिरांची उभारणी आणि या मंदिरांवर झेंडे फडकवले की आपलं भागलं, असं वाटणार्‍या सरकारकडून फार अपेक्षा ठेवायचे दिवस राहिलेले नाहीत. देशात नव्या उद्योगाच्या मुहूर्ताचा झेंडा रोवला म्हणून कुठे गंध नाही. मात्र धर्माच्या नावाखाली लोकांना जखडून ठेवण्यासाठी सरकारच मंदिरांचे झेंडे लावणार असेल तर? असं आजवर कधी झालं नाही. प्रयागराजच्या कुंभमेळ्यासाठी एकीकडे 7500 कोटी खर्च केले आणि देशावर 2100 कोटींचा भार टाकला. कुंभ मेळ्यासाठी जर्जर झालेल्या उत्तर प्रदेशने 5435 कोटी रुपये खर्ची घालून स्वत:च्या तिजोरीला खाली केलं. या कुंभमेळ्यावर झालेल्या खर्चातील अधिकतर रक्कम सत्ताधारी पक्षाशी जवळकी साधणार्‍या कंत्राटदारांनी…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी उत्साह असेल आणि तुम्ही दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि लहान खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. वैयक्तिक आयुष्यात, जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल आणि अविवाहितांना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आज तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील. वृषभ – आज तुम्हाला शांतता आणि संयम ठेवण्याची गरज आहे. कामावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाऊ शकते, पण अनावश्यक खर्च टाळून तुम्ही आर्थिक स्थिती चांगली राखू शकता. घरात शांतता राखण्यासाठी तुमचा समजूतदारपणा वापरा. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान किंवा योगासने केल्यास फायदा होईल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष…

Read More

संगमनेर –  श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या संगमनेर शाखेला दिलेला धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी न्यायालयाने विजू शांताराम नवले (रा. मालदाड, ता. संगमनेर) या आरोपीला दोषी ठरवले आहे. न्यायदंडाधिकारी सी. पी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने आरोपीला दोन महिने साधा कारावास आणि चेक रक्कम अधिक वीस हजार रुपये दंड भरण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने आरोपीला चेक रक्कम आणि दंड अशी एकूण रक्कम एका महिन्याच्या आत फिर्यादी कंपनीस देण्याचे निर्देश दिले आहेत. जर आरोपीने या मुदतीत दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अतिरिक्त वीस दिवस साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपी विजू शांताराम नवले यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर येथून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर  गुरुवारच्या सभेत कोणीतरी ‘टायगर’ आला होता. टायगर हा स्वार्थी असल्याने एकटा येतो, तर जंगलचा राजा ‘सिंह’ (बाळासाहेब थोरात) सर्वांना बरोबर घेऊन येतो. राजकीय कार्यकर्त्याचे भाषण हे मुद्द्याचे असावे, करमणुकीचे नसावे, असा टोला नाव न घेता आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांना लगावला. उपमुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे खंडन करत, सत्ताधाऱ्यांचे राजकारण केवळ ‘करमणुकीचे’ असल्याचे सांगत संगमनेर सेवा समितीच्या विराट सभेत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भाषणातून महायुतीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना फोन करून मंजूर केलेल्या कामाचा दाखला दिला, परंतु ते काम माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात…

Read More