Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कैद्याला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे. विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रजेवर बाहेर आल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार झाला होता. २०१४ मध्ये बीड येथे ही धक्कादायक घटना घडली होती. विठ्ठलला त्याच्या बहिणीचे प्रेमप्रकरण आणि प्रियकरासोबतचे लग्न मान्य नव्हते. यातून त्याने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रुग्णालयातच विष पाजून प्राणघातक हल्ला केला होता. दुर्दैवाने या हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर बचावला. या गुन्ह्यासाठी विठ्ठलला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, १७ जुलै:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांचा आढावा घेतला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शिर्डी विमानतळाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विधानभवनात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे सध्या संथगतीने सुरू असून, ती कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्रातील सहकारी संकल्पना ही जागतिक स्तरावर नावाजली जात असून, सहकारातूनच सामान्य माणसाची खरी प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी केले.  विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार दिंडी’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सहकार दिंडी व सहकार परिसंवादात बारी बोलत होते.  राजहंस दूध संघापासून सुरू झालेली ही दिंडी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून अमृतवाहिनी बँकेपर्यंत काढण्यात आली. “विना सहकार, नाही उद्धार” या घोषणांनी अमृत उद्योग समूह दुमदुमून गेला. या…

Read More

महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरचे सुपुत्र, सीआरपीएफ जवान, मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मरणार्थ संगमनेरमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दिल्लीत निधन झाले होते. मेजर घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या मागणीसाठी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेदखान पठाण, मुजिक खान, वसीम शेख, आवेद खान, डॉ. विजय पवार, शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, एकनाथ श्रीपत,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. देशसेवा बजावताना घोडेकर यांना वीरमरण आले आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा उल्लेखनीय असल्याने त्यांचे संगमनेरात यथोचित स्मारक उभारण्याची मागणी करत यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे)शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दिल्लीत कर्तव्य बजावत असताना जवान संदीप घोडेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये त्यांच्यावर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली वाहताना सूर्यवंशी यांनी ही मागणी केली. सामान्य कुटुंबात परिस्थितीवर मात करत संगमनेरकर असलेल्या संदीप घोडेकर यांनी सीआरपीएफ जवान म्हणून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आणि महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसच्या फिटनेसचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांना शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनी जबाबदार आहे. या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे…

Read More

पुणे – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेरमधील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व अहिल्यानगर काँग्रेस कमिटीचे (अ.जा.) जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे यांना पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पायावरील उपचारासाठी ११ जुलैला रुग्णालयात दाखल झालेल्या गावित्रे यांच्यावर मंगळवारी (१५ जुलै) रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गावित्रे यांना पुढील काही दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरामाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते संगमनेरात परतणार आहे.

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  रोटरी केवळ एक सेवाभावी संघटना नव्हे, तर ‘समाजसेवक घडवणारी जीवनशाळा’ आहे, एक उत्तम रोटेरियन कसा असावा आणि समाजाशी त्याचे नाते किती घट्ट असावे असे संबोधत रोटरीच्या ४२ वर्षांच्या समाजकार्याचा डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी गौरव केला. २०२५-२६ या वर्षासाठी विश्वनाथ मालाणी यांची अध्यक्षपदी, सौरभ म्हाळस यांची सचिवपदी, तर संकेत काजळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब संगमनेरने नुकताच आपला वार्षिक पदग्रहण सोहळा मालपाणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा केला.  रविवार, १३ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्याला डॉ. कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  तत्कालीन गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या बदलीनंतर गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या जागेवर अखेर नव्या गटविकास अधिकाऱ्यांची ग्रामविकास विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता संगमनेरला नव्हे गटविकास अधिकारी मिळणार आहे.  श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी असलेले पी. ए. सिनारे यांची विनंतीवरून संगमनेरच्या गटविकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सिनारे यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी (15 जुलै) काढण्यात आले. सिनारे यांची जिल्हा अंतर्गत बदली करण्यात आले आहे. नवे गटविकास अधिकारी संगमनेरचा पदभार कधी स्वीकारता याकडे लक्ष लागले आहे. नागणे यांची मंत्रालयात बदली झाल्यानंतर संगमनेरला येण्यास अधिकारी उत्सुक नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचे गटविकास अधिकारी…

Read More

अहिल्यानगर, दि. १५-  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने जुलैच्या सुरुवातीलाच दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. हे पाणी नदीमार्गे अगदी शेवटपर्यंत पोहोचले असले तरी, धरणाच्या लाभ क्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी ८ जुलै २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या ‘हनी ट्रॅप’ची एक मोठी चर्चा सुरू आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही प्रकरणे केवळ हनी ट्रॅपची आहेत की अधिकाऱ्यांच्या ‘रासलीला’ आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा असून, नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात नाशिकच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. संगमनेरच्या घुलेवाडी येथील सध्याचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय यापूर्वीच २०२२ मध्ये १०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात श्रेणीवर्जित करण्यात आले असून, या नवीन रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात दिली. आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी, (१४ जुलै) संगमनेरमधील साकूर आणि घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयांच्या सद्यस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले होते की, या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचारी, औषधे आणि उपकरणांची मोठी कमतरता आहे, ज्यामुळे रुग्णांना उपचारात अडचणी येत आहेत. विशेषतः, साकूर येथील ग्रामीण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर बुद्रुकमधील सर्वे नं. १०६ (४४२) येथील गेल्या ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी काल (सोमवार १४ जुलै) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत तांबे यांनी संगमनेरमधील रहिवाशांच्या जमिनीच्या या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करत तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे नेमका प्रश्न? संगमनेर बुद्रुक, सर्वे नं. १०६ (४४२) येथील अनेक कुटुंबे गेल्या चार ते पाच दशकांपासून त्यांच्या प्रत्यक्ष…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आज (सोमवारी, १४ जुलै) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेरच्या विविध आरोग्यविषयक प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांची प्रमुख उपस्थिती होती.  खताळ म्हणाले, बैठकीत संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री रुग्णालय मंजूर करण्याच्या मागणीसह, घुलेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, तसेच चंदनापुरी, धांदरफळ खुर्द आणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची व त्यासाठी नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.  गणेशनगर येथील नगरपालिका योग भवनात आयोजित एका कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स आणि दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहर प्रमुख कैलास कासार, जालिंदर लहामगे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार खताळ यांनी आपल्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी: अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक:  निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लोकसंख्येनुसार सदस्य संख्या आरक्षणासह निश्चित केली आहे. ही सदस्य संख्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामुळे आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी या ११ नगरपरिषदा आणि नेवासे नगरपंचायत अशा एकूण १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका प्रस्तावित आहेत. सर्वाधिक ३४ सदस्य श्रीरामपूर नगरपरिषदेत असतील, तर नेवासे नगरपंचायतीमध्ये सर्वात कमी १७ सदस्य असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम- सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  मुंबई/संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून, गेल्या वर्षभरापासून शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे स्मारकाचे स्वप्न अजूनही अपूर्णच असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संगमनेर बस स्थानकावर स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आणि नगरपालिकेने निधीसाठी प्रस्तावही पाठवला. सुरुवातीला, जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) च्या बैठकीत हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर धरणाचे पाणी आता थेट दुष्काळी भागापर्यंत पोहोचणार आहे.  आमदार अमोल खताळ यांनी रविवारी (आज) भोजापूर धरणाचे जलपूजन केले आणि ग्रामस्थांसोबत भोजापूर पूरचारीची पाहणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागाला आता टँकरमुक्त पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना, आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, आता भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काने मिळेल. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की केवळ टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते, मात्र आता ही परिस्थिती बदलणार…

Read More