Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे संपन्न झालेल्या ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट २०२६’ मध्ये बँकेला देश पातळीवरील सर्वोच्च ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. या मुख्य पुरस्कारासोबतच बँकेला इतर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या समिटमध्ये अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना ‘बेस्ट चेअरमन’, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना ‘बेस्ट सीईओ’ आणि बँकेने सातत्याने राखलेल्या शून्य टक्के नेट एनपीएबद्दल ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसाम राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: अकोले व संगमनेर परिसरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड आणि महाकाय वटवृक्ष या ठिकाणी तिसऱ्या अभ्यास सहलीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम पार पडला. सकाळी संगमनेर बसस्थानकातून या अभ्यास सहलीला प्रारंभ झाला. पेमगिरी येथे पोहोचल्यानंतर सहभागी सदस्यांनी शहागडाचा इतिहास, तेथील स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. यावेळी इंजिनिअर नानासाहेब खर्डे यांनी प्राचीन ते…
संगमनेर | मोहसीन शेख मुंबईवरून संगमनेरकडे परतत असताना समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरीडोरवर रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील रावसाहेब रेवजी काकड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती शरद नाना थोरात, विनोद गिरी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोर्वे येथील हे सर्वजण स्विफ्ट गाडीने मुंबईहून संगमनेरकडे परतत होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घोटीच्या जवळ आले असता अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका तीव्र होता की, गाडीमधील रावसाहेब रेवजी काकड यांचा…
मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलो वजनाचे २४ कॅरेट सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली असून, सोने तस्करीचे मोठे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी डीआरआयने भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आणि मुंबई विमानतळ कर्मचारी असलेला अजित आचरेकर याच्यासह सात जणांना अटक केली आहे. ६ जून २०२६ रोजी पहाटे विमानतळाजवळील ‘हॉटेल फेअरमॉँट’ परिसरात डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने विमानतळाबाहेर पोहोचवण्याचा कट होता, मात्र गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहात पकडले. अटकेत…
बुलढाणा: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या जळगाव जामोद येथील कथित ‘फेक मर्डर केस’ प्रकरणात तपासात गंभीर हलगर्जीपणा केल्या ठपक्यावरून तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तपास अधिकारी नितीन पाटील या दोन अधिकाऱ्यांना अमरावती पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर धरण परिसरात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वी आणि डीएनए अहवाल येण्याआधीच पोलिसांनी तो मृतदेह ‘शिवानी’ नावाच्या तरुणीचा असल्याचा दावा केला. धक्कादायक बाब म्हणजे, शिवानी प्रत्यक्षात जिवंत असतानाही पोलिसांनी तिला मृत घोषित केले आणि तिच्या कथित हत्येच्या आरोपाखाली तिच्या वडील व भावाला अटक केली. पोलिसांनी आपल्याला उलटे टांगून मारहाण केली…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही लीलया पेलून न्याल. आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची भक्कम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग दिसून येत आहेत. घरात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याची रूपरेषा ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधूर होतील. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयम…
पुणे: पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात शनिवार मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल ‘प्रोजेक्ट एक्स’ हाऊस पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात पोलिसांनी हा छापा टाकला. या हाय-प्रोफाईल हाऊस पार्टी प्रकरणात पोलिसांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल केला असून, आयोजकांसह तब्बल ७८ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकूण ७ आयोजकांनी मिळून या पार्टीचे आयोजन केले होते. या धडक कारवाईमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संगमनेर: अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली असून, या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सप्ताह समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या गावभेटी आणि अहोरात्र परिश्रमांमुळे या सोहळ्याचे वारे संपूर्ण तालुक्यात वाहू लागले आहेत. भक्ती, अध्यात्म, संस्कार, कृषी, ज्ञान आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या सप्ताहाबद्दल भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विश्वगौरव विभूषित महायोगी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा यंदा ८ ते १५ जून या कालावधीत राजापूर रोड येथील जयवंतराव व बाळासाहेब गुंजाळ पाटील गुंजाळवाडी मळा येथे मोठ्या थाटात पार पडणार आहे. सप्ताह समिती, गगनगिरी…
मुंबई: मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अद्याप सर्वदूर सक्रिय झालेला नाही. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात कुठेही समाधानकारक आणि सार्वत्रिक पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन…
गेल्या काही वर्षांपासून भारताची एकूणच परिस्थिती गंभीर आणि वेगळ्या वळणावर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी केलेल्या आवाहनाकडे पाहता, आगामी काळात देशावर पुन्हा एकदा लॉकडाऊनची आफत येऊ शकते असं दिसतं. आजवर केलेल्या ‘देश मजबुती’च्या बाता फोल ठरल्याचं हे लक्षण आहे. देशापुढील संकटाची चाहूल आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. कोव्हिड काळात लोकांच्या मदतीला सरकार होतं, कारण तेव्हा ते जागतिक संकट होतं. मात्र, हे संकट आपण स्वतः ओढवून घेतलं असल्याने, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता लोकांना स्वतःच तयार व्हावं लागणार आहे. अन्नधान्य साठवून ठेवण्याबरोबरच मुलांच्या नोकऱ्या राखण्यासाठीही आतापासूनच प्रयत्नाला लागलं पाहिजे. कंपन्यांनी कामगार कपातीचा सपाटा लावला आहेच, पण जिथे हे शक्य…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या पराक्रमाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. धन संचय करण्याच्या योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: आजचा दिवस मानसिक शांतता आणि आनंद घेऊन येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन भागीदार मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. नाजिम असगरअली अन्सारी असे न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२० अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी येथील ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्या न्यायालयासमोर सुरू होती. या खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच विविध कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता. मात्र, सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबांमधील परस्पर विसंगती, पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चांगलाच तापला असून, यामध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीवर नगरपरिषदेने अखेर कायदेशीर बडगा उगारला आहे. संगमनेरमधील भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या मुलाविरुद्ध विनापरवाना व बेकायदेशीर इमारत बांधकाम केल्याप्रकरणी आणि पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे थेट आदेश संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी शहर पोलिसांना दिले आहेत. या धडक कारवाईमुळे शहरातील भूमाफिया आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक इथापे यांनी संगमनेर येथील सुकेवाडी रोड परिसरातील सर्व्हे नंबर १५३/१/१ मधील अंदाजे ६५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक दाखवून पिकअप वाहनावरील चालकाला मारहाण करत ९५,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून सातत्याने गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर नवीन कायद्यानुसार ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या टोळीचा म्होरक्या अक्षय दादा चव्हाण याच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: अपघातात गंभीर जखमी झालेल्या निमगाव टेंभी येथील एका १८ वर्षीय तरुणाचा ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभव विलास कदम (वय १८, रा. देवगड वस्ती, निमगाव टेंभी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. एका अपघातात वैभव गंभीर जखमी झाला होता, यामुळे त्याला उपचारकामी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ५ जून २०२६ रोजी दुपारी १४:१५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या मेमोच्या आधारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: बँकेतून पैसे काढून घराकडे चाललेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे लक्ष विचलित करून, दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीला लटकवलेली पैशांची पिशवी चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३ जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुकेवाडी कुरण रस्त्यावर घडली. शेतकऱ्याकडील पिशवीत १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ३ लाख रुपयांचे सह्या केलेले दोन धनादेश होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकेवाडी येथील ६९ वर्षीय शेतकरी सुरेश बाळकृष्ण शेटे यांनी एका व्यवहारापोटी मिळालेल्या तीन धनादेशांपैकी १ लाख ७५ हजार रुपयांचा एक धनादेश येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून वटवला होता. मिळालेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात वीज चोरी प्रकरणावरून हॉटेल चालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी वायरमनला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. गणेश माधव दातीर (रा. पिंप्रीलौकी, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. या कारवाईनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई काल (शुक्रवार ५ जून) दुपारी १ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हेवाडी रोड परिसरातील एका नामांकित हॉटेलला मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा लागतो. या हॉटेल चालकाने विजेचे पैसे वाचवण्यासाठी डीपीवरून चोरून वीज वापरण्यास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ५) संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला. ३० मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी मोर्चेकर्यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे आपले नादुरुस्त वाहन घेऊन मालपाणी बजाज शोरूममध्ये गेले होते. वाहनाची जबाबदारी स्वीकारून त्याची पावती देण्याबाबत चर्चा सुरू असताना, शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ लाभल्यामुळे रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबापेक्षा स्वतःच्या कष्टावर अधिक विश्वास ठेवावा लागेल. वादविवादापासून दूर राहणे तुमच्या हिताचे राहील, विशेषतः कार्यालयात सहकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगा. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे. वाढती उष्णता, घटलेला पाऊस, सातत्याने जाणवणारा दुष्काळ आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला असमतोल हा मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे असून, येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित ‘दंडकारण्य अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या…
