Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर कश्मिरातील पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून, कलमा पढायला लावून व कपडे उतरवून विटंबना करत निर्घृण गोळीबार केला. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पठार भागातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज यांच्यावतीने भव्य हिंदू जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या या जनसभेमध्ये पाकिस्तानातील अतिरेक्यांचा व साकुर येथील पाकिस्तान समर्थक जिहादी प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानी आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तुटलेल्या चपलांचा हार घालून, जोड्यांनी मारून जाहीर निषेध केला व पुतळ्याचे दहन करण्यात आले. यानंतर सर्व राष्ट्रभक्त हिंदूंनी घारगाव पोलिस ठाण्यात जात पोलिस…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर “संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये पठारभागातील कार्यकर्त्यांनी मला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. मग ते साखर कारखाना असो, दूध संघ, शेतकी संघ, जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा बँक; या प्रत्येक संस्थेत मला मिळालेले सहकार्य मी कधीही विसरू शकत नाही,” असे उद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. आंबीखालसा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व युवक हितचिंतकांसाठी एका स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक पांडुरंग घुले, लक्ष्मण पावडे, सभापती शंकर खेमनर, अजय फटांगरे, बबन कुर्हाडे, अरूण वाघ, विजय राहणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरात हनुमान जयंती रथोत्सवादरम्यान उसळलेल्या दोन गटांतील वादामुळे ऐतिहासिक मिरवणुकीला गालबोट लागले होते. या घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी शहर पोलिसांनी काही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आता, या प्रकरणी पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत घटनेच्या पंधरा दिवसांनंतर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शहरातील दोन वकिलांसह एकूण दहा जणांचा समावेश आहे, यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. १२ एप्रिल रोजी झालेल्या हनुमान जयंतीच्या रथोत्सवात पोलीस आणि जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीत वाद निर्माण झाला होता. यानंतर, रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विश्वनाथ भालेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध प्रथम गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज – आश्वी संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) सायंकाळी मोठ्या उत्साहात झाले. याप्रसंगी बोलताना डॉ. विखे यांनी उंबरी बाळापूर ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले आणि छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ. विखे पाटील म्हणाले, उंबरी बाळापूरमधील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार झाले आहे. विशेष म्हणजे, हे स्मारक उभारणीत गावातील १५ ते ८० वर्षांपर्यंतच्या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सक्रिय योगदान दिले आहे. महाराजांच्या आगमनाने गावाची शोभा वाढली आहे. गावात काही अंतर्गत वाद होते, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर कुंभार समाजाच्या वीट व्यवसायावरील प्रदूषणाची अट सरकारने रद्द केली आहे त्याचप्रमाणे, भविष्यात बिगरशेतीची अट रद्द करून अवकाळी पावसाने वीट व्यवसायाचे नुकसान झाल्यास विमा योजना लागू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी कुंभार समाज बांधवांना दिला. संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त कुंभार गल्लीतील गोरोबाकाका मंदिरात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र जोर्वेकर, उपाध्यक्ष राजेंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, दिलीप वाकचौरे, मधू नालकर, अनिल जोर्वेकर, पंकज जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, संजय वाकचौरे, निलेश खुळे, रामदास…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे महाराष्ट्र राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, पुणे येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळे’त बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ग्रामविकास विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची काळजी घ्यावी.” प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. “उत्तम प्रशासनासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग…
काश्मीरचं नंदनवन असलेल्या पहेलगामच्या मिनी स्वीझर्लंडवरील दहशतवादी हल्ल्याने सारा देश हादरून गेला नसल्यास नवलच. आजवरच्या हल्ल्यांची परिसिमा गाठलेला हल्ला म्हणून या हल्ल्याकडे पहावं लागेल. दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ले झाले, पण असा हल्ला झाला नव्हता. 2005 च्या एप्रिल महिन्यात श्रीनगरमधील पर्यटन केंद्रात बॉम्बस्फोट घडवून केलेल्या घातपातात एका महिलेचा मृत्यू ओढवल्यानंतर काही अपवादात्मक घटना जरूर घडल्या. मात्र पर्यटकांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं असं पाहायला मिळालं नव्हतं. दहशतवादी सुरक्षा रक्षकांना आणि सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पला लक्ष्य करायचे. पर्यटकांना लक्ष्य केलं आणि पर्यटकांचा काश्मीरमधील ओघ कमी झाला तर ज्यांच्या मदतीने हे आपण घडवत आलो तेच आपल्या विरोधात जातील, अशा भीतीने दहशतवादी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांवर हल्ले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या कार्यकाळात उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील १८२ गावांसाठी वरदान ठरलेले निळवंडे धरण आणि त्याचे उजवा व डावा कालवे पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज रखरखत्या उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी आहेत. परिणामी लाभक्षेत्रातील पाण्याचे टँकरही कमी झाले आहे. थोरात यांच्या दूरदृष्टीमुळेच धरणाच्या लाभक्षेत्रात आज समाधानाचे सुखद वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी व सिन्नर या तालुक्यातील एकूण १८२ गावांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. ९७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यामुळे २ हजार ३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, तर ८५ किलोमीटर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई, दि. २६ आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासाला गती दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांनी शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता दिली. यासोबतच, विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी मंजुरी दिली. शिर्डी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम जलद गतीने सुरू आहे. नाशिकपासून जवळ असल्याने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना हे विमानतळ अधिक सोयीचे ठरेल. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि नाशिक विमानतळाची क्षमता लक्षात घेऊन शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. या विकास योजनेत आठ वाहनतळे, दोन हेलिपॅड आणि टर्मिनलच्या आधुनिकीकरणाचा समावेश आहे. कुंभमेळ्यादरम्यान विमाने आणि हेलिकॉप्टरच्या वाहतुकीसाठी याचा मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई बदलापूरमधील एका खासगी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट आदेश देऊनही संबंधित 5 पोलिसांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाने शुक्रवारी (25 एप्रिल) पोलिसांना फटकारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बदलापूर एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेल्या दिरंगाईवर गंभीर चिंता व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने 7 एप्रिल रोजी दिले होते. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील २०२५-३० यादरम्यान मुदत संपणाऱ्या १४४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी राखीव जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. शुक्रवारी या ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण पदासाठीची सोडत काढण्यात आली. महिला आरक्षण निश्चित झाल्याने संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत गाव कारभारी निश्चित झाल्याने काही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे. महत्त्वाच्या काही ग्रामपंचायतींचे सूत्रे महिलांच्या हाती जाणार असल्याने पुरुषांमध्ये निराशा बघावयास मिळाली. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने जाहीर केलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम, तर संपूर्ण नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील तब्बल ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यासाठी निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी कसून तपासणी करून विविध निकषांनुसार मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनात २०२३-२४ या वर्षासाठी संगमनेर कृषी उत्पन्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या जिहादी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरात शनिवारी, (२६ एप्रिल) भव्य तिरंगा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजासह शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पहलगाम येथे झालेल्या अमानुष हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना धर्म विचारून, त्यांना कलमा वाचायला लावून त्यांचे कपडे उतरवून विटंबना केली. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देशविघातक शक्तींना कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या तिरंगा मोर्चाचे आयोजन केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सोशल मीडियावर समर्थन केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान शौकत पटेल (रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पहायला मिळतील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारे स्टेटस ठेवले होते. त्याचा मित्र मुजाहिद आरिफ पठाण (रा. साकूर, ता. संगमनेर, सध्या रा. अहमदनगर) याने हे स्टेटस लाईक करत समर्थन दर्शविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कृत्यामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याने, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत…
अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. आता ही बैठक मुंबई येथे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून या उपक्रमांना अधिक गती देण्याचा सरकारचा विचार होता. यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी देखील सुरू होती. मात्र, अनपेक्षितपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर गुरुवार, दि. २४ एप्रिल – लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पत्रकार रमजान नजीर शेख याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांच्याकडे खडी वाहतूक करणारे चार ट्रक आहेत. २० मार्च २०२५ रोजी तलाठी अक्षय ढोकळे यांनी दोन ट्रकवर खोटी कारवाई करून प्रत्येकी एक लाख तेवीस हजार रुपये दंड आकारला होता. अर्जदार रमजान शेख हे मांडवे गावात पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी फिर्यादीला तलाठी अक्षय ढोकळे यांच्याशी भेट करून देण्याची मध्यस्थी केली, जेणेकरून ‘सेटलमेंट’ करता येईल. मात्र, तलाठी लाच मागणार, या विचाराने फिर्यादीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वत्र या आदेश लागू असतील. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या आदेशाचा भंग करत कायदा व सुव्यवस्थेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने फिल्मी स्टाईलमध्ये पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २४) बागलाण तालुक्यातील ततानी येथे घडली. जितेंद्र खंडेराव सोनवणे (वय ४५) असे फरार मुख्याध्यापकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचला असताना सोनवणे यांनी कार्यालयातील टेबलावर लाचेची रक्कम ठेवून मागच्या दरवाजाने धूम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३३ वर्षीय असून ते आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक आहेत. त्यांची स्वतःची पिठाची गिरणी आहे. त्यांना ततानी शासकीय आश्रमशाळेतील धान्य दळणाचे कंत्राट मिळाले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संगमनेर शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (२३ एप्रिल) सायंकाळी तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी बोलताना, पूर्वी काँग्रेसच्या काळात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनता वैतागली होती, त्यामुळे त्यांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, भाजपच्या काळातही पुलवामा आणि पहलगामसारखे हल्ले होत असतील, तर जनतेला भाजपलाही घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. शहरप्रमुख पप्पू कानकाटे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह…
संगमनेर – प्रतिनिधी जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 23) तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर कॅण्डल मार्च काढण्यात आला, कॅण्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘अतिरेक्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘फाशी द्या…
