Author: अनंत पांगारकर
नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसोबत झालेल्या बैठकीत आणि गोळीबाराचा कट रचण्यात पाटील यांचा सहभाग आढळल्यामुळे ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे खून…
प्रवीण पुरो – महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गलाबोट लावणार्या विकृत जमातीने भाजपची चांगलीच उतरवली आहे. राज्याचा सर्वांगीण चांगुलपणा खड्ड्यात काम त्या पक्षात अविरत सुरू आहे. पक्षातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी विराधकांवर चिखलफेक करतो, अशी स्पर्धा सुरू आहे. सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्यांची अवस्था काय करू आणि काय नको, अशी झाली आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने या सार्यांचं धाबं दणाणलं आहे. यामुळे संधी घेत विरोधकांना चेपण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा पध्दतशीर प्रयत्न होतो आहे. भाजपवर संकट आलं की हे चवताळखोर कामाला लागतात. प्रवक्ते तर चेकाळले आहेतच. पण प्रवक्ते नसलेल्यांची अवस्थाही विचित्र झाली आहे. आपल्या पक्षात ज्यांना काडीची किंमत नाही,…
मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन (Gemini)- आज तुम्हाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. नवीन लोकांशी संपर्क साधल्याने फायदा होईल. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने आनंद मिळेल. कर्क (Cancer)- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल. शांत राहून काम करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तींसोबत वेळ…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी – नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला असून, कुख्यात गुंड गौरव घायाळ आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तलवार, आणि इतर साहित्य असा एकूण ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई नगर-पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ रात्रीच्या वेळी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय…
संगमनेर – संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा निर्णय घेत ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावेळी चंद्रशेखर चौकात उत्सव होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. यावर्षी पोलीस प्रशासनाकडे चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी दिनांक २२/०९/२०२५ ते ०२/१०/२०२५ या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, याच चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या हनुमान जयंती रथोत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये…
संगमनेर – सीबीएसईच्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने आपला डंका वाजवताना दहा पदकांसह चार चषके पटकावली. शिर्डीच्या द्रोणा अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या एरोबिक्सपटूंनी सर्व गटात उत्कृष्ट प्रदर्शन केले. वैयक्तिक सादरीकरणाच्या अकरा, चौदा आणि सतरा वर्षांखालील वयोगटात इशान उगले, राजवीर आवारी आणि स्पर्श घुले यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवले. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात अनिका चांडक, लब्धी कटारिया, ऋद्धी दरडा, त्रिशा गांधी, आराध्या जोशी, गुंजल करवा व यशश्री लाहोटी यांच्या संघाने फिटनेस एरोबिक्समध्ये रौप्य पदकासह विजेतेपदही मिळवले. या स्पर्धेत ध्रुवच्या एरोबिक्सपटूंनी विविध गटांमध्ये एकूण 10 पदकांसह चार चषकं पटकावले. कुलदीप कागडे यांनी मार्गदर्शन…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चिखली गावाच्या ग्रामपंचायतीने निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरून दडपशाहीने टाकण्यात येत असलेल्या 33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत या संदर्भात केलेल्या ठरावानंतर ग्रामपंचायतीने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही वीज वाहिनी तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ या कंपनीने 7 मे 2024 रोजी चिखली सबस्टेशन ते वाडापूर आणि मेमाणे वस्तीपर्यंत वीज वाहिनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे NOC (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते. मात्र, 30 मे 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत, ग्रामपंचायतीने ‘चिखली सबस्टेशन ते वाडापूर ते…
संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांनी बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर कॉलेज आणि १३२ केव्ही सबस्टेशनजवळ घडला. हा अपघात एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला. व्हिडिओमध्ये, यश अनुप अरगडे (वय २०), रा. गुंजाळवाडी, संगमनेर, हा त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (क्रमांक एमएच ०४ एलए २५३१) दुचाकीला मुख्य रस्त्याऐवजी भरधाव वेगात फूटपाथवरून चालवत होता. २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात यश स्वतः आणि त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाळ (वय १८) दोघेही गंभीर जखमी झाले. हा…
संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक बदल झाले असले तरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे संगमनेरमधील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे मदत केंद्र म्हणून उभे आहे. हे कार्यालय, राजकीय स्थिती कशीही असो, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरचे राजकीय समीकरण बदलले असले तरी, बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालयाने आजही सामान्य नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मदतीचे आणि विश्वासाचे केंद्र म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे कार्यालय कायमच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील, असा विश्वास…
संगमनेर – मोहसीन शेख गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले. कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित…
