Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर, दि. ११ – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीच्या विनियोगातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या सूचना जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. तालुक्यांचा विकास आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीस सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, आमदार मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, विक्रम…
संगमनेर, दि. ११ मे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमधून साकारलेली आणि ५० लाख रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडली आहे. यामुळे संगमनेर शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असा परखड सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी संगमनेर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तांबे यांनी संगमनेर मधील सीसीटीव्ही शोभेचे बाहुले बनले असल्याचे वास्तव समोर आणले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे जर चालू राहिले तर यात अनेक अवैध चालणाऱ्या गोष्टी देखील छायाचित्रे होऊन त्याची मदत पोलीस यंत्रणेला होऊ शकणार आहे. मात्र यासाठी पोलीस यंत्रणेची मानसिकता दिसत…
संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आता ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या देवस्थानाला हा मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. वेल्हाळे आणि परिसरातील भाविकांसाठी हरीबाबा देवस्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या मंदिर परिसरात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, भौतिक सुविधांच्या अभावामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार सत्यजित तांबे यांनी या समस्येची दखल घेत, जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे पुण्यातील कात्रज परिसरात एका धक्कादायक घटनेत एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे मेहुणीने प्रियकराच्या मदतीने हा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय व्यावसायिक मनोहर शिंदे हे त्यांच्या कुटुंबासोबत कात्रज परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. घरात त्यांचा मुलगा, सासू आणि मेहुणी (पत्नीची बहीण) सोबत ते राहत होते. शिंदे यांच्या मेहुणीचे बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रोहित असोरे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मनोहर शिंदे यांनी या प्रेमसंबंधाला विरोध दर्शवला होता. याच…
अहिल्यानगर – आता राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नागरिकांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि नागरिकांना आवश्यक सेवा पुरवल्या जातील. यापूर्वी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र ग्रामपंचायती आणि खाजगी व्यक्तींमार्फत चालवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या १२४२ ग्रामपंचायती आणि ८४१ खाजगी केंद्रांच्या माध्यमातून एकूण २०८३ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागांच्या एकूण ७० अधिसूचित सेवा ऑनलाइन पद्धतीने पुरवल्या जातात. आता याच सेवा शहर भागातील नागरिकांसाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.…
पहेलगाममध्ये बंदुकींच्या गोळ्यांचा उच्छाद मांडणार्या पाकपुरस्कृत दहशतवादाला जशास तसं तोंड देणार्या भारतीय संरक्षण दलाच्या जवानांचं सुरुवातीलाच कौतुक.. दहशतवादाचं मुळ असलेल्या पाकिस्तानच्या तळांवर सुरू असलेल्या छुमश्चक्रीने देशवासीय आनंदले नसते तर नवलच. सरकारच्या नीतीवर कोणताही संशय न घेता संरक्षण दलांनी सुरु केलेल्या या कारवाईला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका देशातील विरोधी पक्षांनी घेतल्याने सरकार म्हणून सत्ताधार्यांची जबाबदारी अधिकच वाढलीय. याचा अर्थ सैनिकांच्या नावाने स्वत:च्या छब्या नाचवणं नव्हे. वायू दलाने सियालकोटसह नऊ ठिकाणांना लक्ष्य करत पाकिस्तानला अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. याबद्दल तिन्ही दलाचं आणि केंद्रातल्या सरकारचं कौतुक केलंच पाहिजे. मात्र तरीही मागे वळून पाहिलं नाही तर पहेलगामसारख्या घटना घडतच राहतील. इतिहास विसरला तो…
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळं नष्ट करुन ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर दिलं होतं. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत झाले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही युद्धबंदीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं, पाकिस्तानच्या डीजीएमओने ३.३५ मिनिटांनी भारतीय डीजीएमओला फोन केला. चर्चेनंतर आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली आहे. जमीन, हवा आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये १२ मे रोजी डीजीएमओ स्तरावरील चर्चा…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याच्या रागातून योगेश एकनाथ जाधव (वय २३, रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) या युवकाची त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोळी घालून हत्या करणाऱ्या आरोपी पोपट गणपत अदमाने (रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर २०१८ रोजी पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथे घडली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी सोपान शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर झालेल्या विशेष बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत चेअरमनपदासाठी सुनिल तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची सूचना मांडली, ज्याला अशोक घोलप यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी किरण दिघे यांनी सोपान शिरसाठ यांच्या नावाची सूचना मांडली आणि अनिल भोसले यांनी त्याला अनुमोदन दिले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि मागील संचालक मंडळाच्या एकत्रित कामाचे…
मुंबई, ०८ मे भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. तसेच राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर धावपळीच्या जीवनात सकस आहाराची गरज असताना, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अन्नाची गुणवत्ता घटत आहे. निरोगी समाजासाठी विषमुक्त शेती अत्यावश्यक आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी हॉलमध्ये ‘शाश्वत शेती व युवा उद्योजक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर पाचोरे होते. व्यासपीठावर राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यातील एका तरुणीला फसवून मुंबईतील मालाड येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. पेपर दिल्यानंतर कॉलेजबाहेर असताना तिला एका अज्ञात मुलाचा फोन आला. त्याने तिला घुलेवाडी येथे एका महिलेच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ती तिथे गेली. त्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या दोन संशयित तरुणांनी तिला जबरदस्तीने थार गाडीमध्ये बसवून मालाड येथे नेले. मालाडमधील एका हॉटेलमध्ये तिला चार ते पाच दिवस डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान,…
नवी दिल्ली – भारतीय सुरक्षा दलांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गुरुवारी (८ मे) या संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “आज सर्वपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. हे ऑपरेशन योग्य दिशेने सुरू आहे आणि सुरक्षा दलांनी यात मोठे यश मिळवले आहे. मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत आणि दहशतवादी संघटनांचे कंबरडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय २२, रा. सोनई, ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने मोठ्या युक्तीने जेरबंद केले आहे. आरोपी वैरागर याला जमावाच्या मारहाणीनंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय वैरागर याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. २ मे २०२५ रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत तो जखमी झाला होता, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ७ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने रुग्णालयातील पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. आरोपी फरार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर पोलिसांनी काल (०७ मे) शहरातील मदिनानगर परिसरात छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या एक लाख रुपये किमतीच्या १० गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी जावेद इसाक शेख (वय २७, रा. संगमनेर खुर्द) या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लगेचच कार्यालयातील पोलीस नाईक राहूल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज – श्रीरामपूर श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडने दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीरामपूर न्यायालयाने या प्रकरणी आमदार पाचपुते यांच्यासह साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या व्यवस्थापकांनाही पकड वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २३ ठिकाणी धाडी टाकून एलसीबीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे काल दुपारी (दि. ७ मे) एक दुर्दैवी घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास कळस परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात असलेले कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाकचौरे (वय अंदाजे ६० वर्षे) आपल्या मोटारसायकलवरून त्यांच्या सुनेसोबत जात होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे महारुखचे झाड त्यांच्या अंगावर पडले. या अपघातात त्यांच्या सुनेला कोणतीही दुखापत झाली नाही, तर शिवाजी वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, ०८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे अमलदारांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्गावरून एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाच्या ट्रक मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्तीवर असलेले पो. कॉ.…
नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला. खरंतर एकीकडे सत्ता, संस्था, संपत्ती आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघ, अनेक वर्षापासूनची तालुक्यात निर्माण केलेली वचक व सत्तेमुळे सामान्य लोकांवर आलेले दडपण अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधण्याची अडचण…
