Author: Annant Ppangarkar

मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरशी संबंधित विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने तांबे यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तांबे यांनी या भेटीत पुन्हा एकदा संगमनेरशी संबंधित मागण्यांचा राज्यातील जनतेच्या हिताच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या ऐकून घेत याविषयी सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास दिला असल्याचे म्हटले आहे. या प्रश्नांवर तांबे यांनी केली उपमुख्यमंत्र्यांची चर्चा… 📌 नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करा. 📌 संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या…

Read More

दिल्ली – रस्ते अपघातातील जखमींना दिलासा देणारी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांनी देशभरात कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केले असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जखमींवर दीड लाखापर्यंतचा खर्च केला जाणार आहे. योजनेअंतर्गत सात दिवसांपर्यंत सरकार या उपचाराचा खर्च करेल. मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरू केली जाणार – देशभरातील सर्व राज्यांमधील वाहतूक मंत्र्यांची दिल्लीत भारत मंडपम येथे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत गडकरी देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी अपघातग्रस्तांना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्यासाठी सुरू असलेल्या प्रायोगिक उपक्रमाचा मार्च २०२५ पर्यंत विस्तार केला जाणार असल्याची घोषणा…

Read More

संगमनेर – गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेला संगमनेरचा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चा नंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे टोल नाका बंद होण्याची आशा मावळली आहे. तसेच या टोल नाक्याच्या ठेकेदाराचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे. समाज माध्यमात एका पोस्टच्या माध्यमातून कतारी यांनी याचा उलगडा केला आहे. कोणी कितीही आरडाओरडा केला तरी हा टोल बंद होऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेशी (शिंदे गट) संबंधित आंदोलकांना थेट नागपूरहून फोन आल्याने या कार्यकर्ते, आंदोलकाचा टोल नाक्या विरोधातील आवाज बंद झाला आहे. त्यामुळे संगमनेरात या टोलनाक्यावरून मोठे वादंग होऊन देखील टोल नाका बंद करण्याची मागणी…

Read More

संगमनेर – संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतल्यानंतर रस्त्यावरच हातगाड्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे करून वाहतुकीची कोंडी निर्माण करणारी बस स्थानकाबाहेरील अतिक्रमण पालिकेच्या माध्यमातून हटविण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून कोणतेही नुकसान न होता व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून घेतल्याने वारंवार या परिसरात अतिक्रमण मोहीम हटावचा फार्स ठरलेली ही अतिक्रमणे खरंच कायमस्वरूपी हटविली गेली का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. बस स्थानक परिसर मोकळा करण्यात आला असला तरी शहराच्या अन्य भागात नगरपालिकेने ही कारवाई करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वारंवार होणारी अतिक्रमणे संगमनेरकरांसाठी डोकेदुखी बनली असून ही अतिक्रमणे काढण्याची संकेत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिले होते. याचाच एक…

Read More

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरमध्ये स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने ११, १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण केली आर्थिक शिस्त विकासाची परंपरा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला वैभवशाली बनवले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. यावर्षी ही जयंती व डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ…

Read More

मुंबई – महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या दृष्टीने एक जीवनदायी योजना ठरलेली आहे. २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे समाजातील सर्वसामान्य माणसाला खूप मोठा दिलासा मिळतोय. तथापि, या योजनेत आणखी सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेले उपचार दर मुंबई, पुणे आणि सर्वच जिल्ह्यांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे या मोठ्या शहरांमधील रुग्णालये योजनेत समाविष्ट होण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. तसेच पुरेशा बेड अभावी किंवा एखादा आजार योजनेत बसत नाही म्हणून रुग्णांना नाकारले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची ससेहोलपट होते. त्यामुळे आणखी आजारांचा यात समावेश करण्याची व रुग्णालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी व दातांवरील…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई देशातील सार्वत्रिक आणि विविध राज्यांच्या मतदानात विरोधकांनी ईव्हीएमवर घेतलेला आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निकालात काढला. जागतिक किर्तीचे तज्ज्ञ एलन मस्क यांनी केलेला ईव्हीएम हॅकिंगचा दावा मोडीत काढताना ज्या देशात ईव्हीएम वापरले जात नाहीत त्या देशातील लोकंच ईव्हीएमला दोष देत असल्याचा दावा कुमार यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.  यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले. मात्र, राजीव…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज एक महिना झाला, मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल नाही. यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त होत आहे. राज्यातील सरपंचांनी आझाद मैदानात परिषदेचे आयोजन करुन संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला. या परिषदेला भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुखची हत्या आपल्याला विसरायची नाही. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका. त्यासोबतच आमदार धस यांनी सरकारकड आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, अशी मागणी केली. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर…

Read More

संगमनेर – संगमनेर शहर व तालुक्यात विशिष्ट राजकीय पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स हे अनाधिकृत व अधिकृत वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ ठेवले गेले आहेत. प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष होणे हे अत्यंत चुकीचे असून संगमनेर शहरामध्ये मुख्याधिकारी व तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने सूचना देऊन हे सर्व फ्लेक्स त्वरित काढावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवसांपासून काही पक्षांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचे फ्लेक्स संगमनेर बस स्थानक परिसर व संपूर्ण शहरांमध्ये आहे. याला कोणतीही परवानगी नाही. किंवा परवानगीच्या मुदती…

Read More

संगमनेर – खाजगी क्लास संपवून बस स्टॅन्ड कडे जाणाऱ्या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींची छेड काढत विनयभंग व लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश राजेंद्र वाडेकर (रा. चास पिंपळदरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, पीडित फिर्यादी तरुणी दररोज तालुक्यातील एका गावाहून संगमनेरला एसटी बसने आपल्या मैत्रिणीसह ये-जा करते. सोमवारी दुपारी ती संगमनेरमध्ये आली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्लास संपवून ती मैत्रिणीसह गावाकडे…

Read More

मुंबई, दि. ७ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात सोमवारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे.…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या कारवायांमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही, असा आरोप शिष्टमंडळाने केलाय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय. माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांचा…

Read More

सोमवार, ०६ जानेवारी  संगमनेर – नाशिक-पुणे मार्गावर बस स्थानकानजीक दारूच्या नशेत तर्र झालेल्या मद्यपी तरुणाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास विश्रामगृहासमोर चार मुलींची छेडछाड केली. त्यामुळे नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडत चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. मद्यपी तरुणाने मुलींची छेडछाड केल्याने येथे काही वेळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सोमवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नाशिक पुणे मार्गावरून शासकीय विश्रामगृहापासून शहरातील चार मुली जात असताना या ठिकाणी असलेल्या व अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका मद्यपी तरुणाने या मुलींची छेड काढली. घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडले. छेड काढणाऱ्या या तरुणाची नागरिकांनी चांगलीच धुलाई…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) राज्यस्तरीय पुरस्कारासाठी लोकमत ‘सातारा’च्या प्रतिनिधी श्रीमती प्रगती पाटील यांची तर वृत्तवाहिनी उत्कृष्ट पत्रकार (दृकश्राव्य) पुरस्कारासाठी ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार ‘पुढारी’चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली. …

Read More

संगमनेर – विधानसभा निवडणुकीत संगमनेरात सत्ता बदल झाल्यानंतर येथील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. लोकविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा राहत असून होऊ घातलेल्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविली जाणार असून या संदर्भातील कृती कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे रजत अवसक व दत्ता ढगे यांनी दिली. स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानमध्ये लोकशाही समाजवादी विचारांच्या नागरिकांची व्यापक बैठक पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमामाई शेख यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात झाली होती. बैठकीत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या लोकशाही समाजवादी विचारांचे राजकीय सामाजिक व सांस्कृतिक काम उभे करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच लोकविकास आघाडीच्या…

Read More

संगमनेर – संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू तालुक्यातील समनापुर येथील सुरू असलेल्या पोक्सो संदर्भातील विशेष खटल्यात न्यायालयाने ६ महिलांसह ३ पुरुष आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या दोन वर्षात निकाली निघालेल्या या खटल्याकडे लक्ष लागले होते. समनापुर (संगमनेर) येथे फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीवरून चुलत भाऊ व भावांसोबत न्यायालयात वाद सुरू होते. २ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संगणमताने आलेल्या आरोपींनी फिर्यादीला पाया खोदण्यास मनाई केली. फिर्यादी व तिच्या बहिणींना शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी आरोपीपैकी एकाने जवळच पडलेली व बांधकामासाठी आणलेली वीट उचलून फिर्यादीच्या पाठीत फेकून मारली. तर…

Read More

संगमनेर – शहरातील दिल्ली नाका येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी अखेर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. अखेरीस गुन्हा दाखल झाल्याने आता या गुन्ह्याच्या तपासाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी विकास दीपक गायकवाड (रा. निळवंडे, संगमनेर) याच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(१) नुसार लकी पान स्टॉल दुकानातील इसम व अनोळखी १५ ते २० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी त्यांच्या दोन मित्रांसोबत पान…

Read More

मुंबई – ०५ जानेवारी शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघनाताईं यांचे रविवारी !दिनांक ५ जानेवारी) अल्‍पश: आजाराने दु:खद निधन झाले. शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मेघनाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन अंत्यदर्शन घेतले. यावेळी डॉ.गोर्हे यांनी गजानन कीर्तिकर, अमोल, गौरी, हर्षदा, सुप्रिया यांचे सांत्वन केले.

Read More

रविवार, ०५ जानेवारी  संगमनेर – परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने अंतर्गत मतभेद आता पोलिसांपर्यंत पोहोचले असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी घडलेल्या प्रकारामुळे हा दौरा वादग्रस्त ठरला आहे. रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुयोग पंढरीनाथ गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक भगत व साहेबराव वलवे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५, ३५२, ३५२(२) प्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. परस्पर विरोधी तक्रारीमुळे पोलिस आता याप्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान नववर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीला शनिशिंगणापूर येथून त्रंबकेश्वर येथे जात असताना काही काळ संगमनेरमध्ये…

Read More

कफल्लक देशाला वळणावर आणणारे पंतप्रधान म्हणून ज्यांचा सर्वदूर उल्लेख होतो त्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या दु:खद निधनाच्या कळा प्रामाणिक देशभक्तांसाठी आजही कष्टप्रद आहेत. डॉ. सिंग यांनी देशाला घालून दिलेली अर्थव्यवस्थेची घडी नादान सत्तेमुळे आता पुरती विस्कटून गेली आहे. देशभक्तीचं स्तोम माजवणार्‍या आजच्या सत्ताधार्‍यांनी डॉ. सिंग यांच्या दु:खद निधनाचं राजकारण करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. धार्मिक अधिष्ठानात मनुष्य प्राण्याला मरणांती परमेश्‍वराचं रूप दिलं आहे. मनमोहन हे तर देशासाठी अशाच परमेश्‍वराचं रूप असताना त्यांच्या वाट्याला मात्र या सत्ताधार्‍यांनी राजकारण आणलं आणि महान व्यक्तीच्या मृत्यूचंही भांडवल करत आपण किती नालायक आहोत, हे जगाला दाखवून दिलं. संकटात देशाला आणि देशवासीयांना जगण्याचा मार्ग ज्या महान…

Read More