Author: Annant Ppangarkar
शुक्रवार, १५ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १६ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ७० हून अधिक वृत्तपत्रांना ‘पेड न्यूज’ देण्यात आलेल्या आहेत व त्यासाठी कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम देण्यात आली, अशी धक्कादायक पुराव्यासह माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे. या संदर्भातील त्यांची ट्विटरवरील पोस्ट समाज माध्यमात व्हायरल होत आहे. काय म्हटले आहे यात… निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सुमित शेलार या पुण्यातील व्यक्तीची निवड केली. या शेलारने मुंबईतील एका जाहिरात एजन्सीला हाताशी धरले व महाराष्ट्रातील जवळपास ७० हून अधिक मराठी, गुजराथी व उर्दू या तीन भाषेतील वृत्तपत्रांची यादी गोळा केली.…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना ‘धन्यवाद साहेब’ म्हटले आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ शिर्डीमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना थोरात यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले होते. या अनुषंगाने थोरात यांनी पवार यांना धन्यवाद म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले होते शरद पवार… येथे कधीही आल्यानंतर एका गोष्टीची चर्चा व्हायची, निळवंडे. हे धरण व्हावं यासाठी प्रयत्न होते. येथे कधीही आल्यानंतर आम्ही काही लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या. पण त्या कामाला अनेक वर्षे झाली गतीच येत नव्हती. आणि ज्यावेळी या…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर संगमनेर – मोहसीन शेख संगमनेर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजासाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा कळीचा बनला आहे. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य प्रमुख उमेदवारांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लिम समाजातून होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी यासंदर्भात समाजासोबत राहण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते वोहरा यांच्या पारड्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम चरणाकडे जात असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी विविध समाजातील बहुचर्चित प्रश्नांवर बोट ठेवत त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत…
गुरुवार १४ नोव्हेंबर अहिल्यानगर – ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने गृह मतदानाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत गुरुवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघ वगळता उर्वरित अकरा विधानसभा मतदारसंघात गृह मतदानास (होम वोटिंग) सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १३७९ मतदारांनी गृह मतदान केले. या मतदारांचे मतदान टपालात बंद झाले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६…
गुरुवार, १४ नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी १२२ मतदारांनी आपले मतदान नोंदविले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. गृह मतदान करणाऱ्यांमध्ये ८५ वर्षावरील ९८ जेष्ठ नागरिकांचा तर २४ दिव्यांग नागरिक मतदारांचा समावेश आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमूना १२ डी…
गुरुवार, १४ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कळमनुरी विधानसभेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर मतदारांना पैसे वाटप करणे, विनापरवाना मंडप उभारणी करणे तसेच कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरीतील वाकोडी शिवारात महिलांना एकत्र करून पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया कारवाईनंतर शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर…
संगमनेर – मोहसीन शेख विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख उमेदवारांची मोठे दमछाक होत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा मात्र वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहे. मतदारांच्या भेटीनंतर मतदार मतदानाच्या रूपाने त्यांच्या पाठीशी राहतील याबाबत त्यांना आशा आहेत. प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत आपल्या मर्यादित अशा प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात ते यशस्वी ठरले आहे. प्रस्थापित आणि धनशक्ती विरोधात लढणारा सामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून अजीज वोहरा यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले. वाड्या वस्त्यांवर जात ते आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत. शहरातील मतदारांच्या गाठीभेटीनंतर वोहरा यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बुधवारी त्यांनी…
गुरुवार, १४ नोव्हेंबर नाशिक – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून दुःखद बातमी समोर आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यामुळे या मतदारसंघात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पेठ-सुरगाणा या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहेत. दोन्हीही बाजूंनी प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरलेली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. असाच तिढा मुख्यमंत्रिपदाबद्दल होणार का असा प्रश्न निर्माण आहे. मविआचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांना वहिनीने केला असता उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित…
विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. केवळ गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांनी तात्काळ डॉ. विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ, अशी आक्रमक…
बुधवार १३ नोव्हेंबर संगमनेर – सोमवारी तालुक्यातील साकुर येथे भरदिवसा कान्हा ज्वेलर्सवर दरोडा टाकून संपूर्ण दुकान लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. या दोन्ही आरोपींना बुधवारी पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अन्य तीन प्रमुख आरोपींसह चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांचे कसब पणाला लागणार आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या साकुरच्या बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या कान्हा ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीनदा हवेत गोळीबार करत दुकानदाराला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रकार घडला होता. या दरोड्यात ५० लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी…
दहशत आणि दडपशाही उध्वस्त करण्याची ताकद मतदारांमध्ये… निळवंडेचे काम बाळासाहेब थोरातांमुळेच – शरद पवार
राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशत आणि दडपशाही असल्याचे मला सांगितले गेले. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर कोणी दहशत आणि दडपशाही करत असेल तर ती उध्वस्त करण्याची ताकद तुम्हा मतदारांमध्ये आहे. इथल्या दहशतवादाला घाबरू नका, या दडपशाहीचा बंदोबस्त करावाच लागेल असा इशारा देतानाच निळवंडे धरणाचे काम फक्त बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच झाले. नगरच्या विकासात जर कोणाचा हात असेल तर तो बाळासाहेब थोरात यांचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवार यांची बुधवारी दुपारी राहाता येथे सभा झाली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब…
बुधवार, १३ नोव्हेंबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरं जावं, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरू नये, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली…
बुधवार १३ नोव्हेंबर संगमनेर मतदार संघात स्वतःला टायगर संबोधणाऱ्यांनी या मतदारसंघातील दहशतीचा मुद्दा समोर आणत परिवर्तनासाठी साद घातली आहे. मात्र त्यांची परिवर्तनाची साद ही केवळ सत्तेच्या लालसेने असून आमची परिवर्तनाची साद सामान्यांच्या, वंचितांच्या हक्कासाठी असल्याचे वंचितचे संगमनेर विधानसभेतील उमेदवार अजीज वोहरा यांनी म्हटले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या दोन मोठ्या शक्ती विरोधात, आर्थिक बलाढ्य उमेदवारांविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून अजीज वोहरा निवडणूक लढवत आहे. एकीकडे सहकाराच्या माध्यमातून निर्माण केलेले मोठे साम्राज्य सत्ता कायम राखण्यासाठी तर दुसरीकडे प्रवरेची यंत्रणा तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढे सरसावली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील उमेदवार देऊन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने…
बुधवार, १३ नोव्हेंबर पुणे – ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल, तर नागरीकांना १०० रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तशा सूचना देखील मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे दस्तऐवज करण्यासाठी ५०० रुपयांचाच स्टॅम्पपेपर वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. परंतु, बाजारात आता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे समोर येत आहे. ५०० रुपयांचा स्टॅम्प वापरण्याचा निर्णय सरकारने अचानक पणे घेतल्याने शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद झाले आहे. मात्र या स्टॅम्प पेपरची मोठ्या प्रमाणात छपाई झाले असल्याने शिल्लक…
संगमनेरचा वाघ राज्यात गर्जना करतो यांना मतदारसंघाच्या बाहेर पडता येईना आ. थोरात यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याची आवाहन संगमनेर – प्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांची सुसंस्कृत नेता म्हणून राज्याला ओळख आहे. दडपशाही करणाऱ्यांना आम्ही दक्षिणेत झटका दिला आहे. वाघाची झुल मांजराने अंगावर घेतल्याने कोणी वाघ होत नाही. तो टायगर नव्हता. खरा टायगर हा संगमनेरमध्ये असून येत्या विधानसभेत संगमनेरमधील खबरीलालचा राजकीय कडेलोट करा. थोरात यांना दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले. युवक काँग्रेस व महाविकास आघाडीच्यावतीने तळेगाव दिघे येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार डॉ.…
मंगळवार १२ नोव्हेंबर संगमनेर – भरदिवसा दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील साकुरच्या गजबजलेल्या बस स्थानक चौकातील कान्हा ज्वेलर्सवर गावठी कट्टाचा भाग दाखवून तसेच हवेत फायर करून दुकानात दरोडा टाकत पन्नास लाखाहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या पाचपैकी दोघा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरोडा प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाळासाहेब वावरे, (वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) व स्वप्नील किशोर येळे, (वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे…
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १ हजार २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण मंगळवार, १२ नोव्हेंबर संगमनेर – मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. वसंत लॉन्स येथे संगमनेर विधानसभा मतदार संघातील १ हजार २४२ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे उपस्थित होते. हिंगे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे गरजेचे आहे. यावेळी मतदान यंत्राची जोडणी, मतदान यंत्र हाताळणी, घोषणापत्र व फॉर्म अचूक…
मंगळवार, १२ नोव्हेंबर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याजवळ सोमवारी रात्री काढली. जखमी पोलीस उपनिरीक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश अभिमान नेमाणे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे. अशी घडली घटना……
मंगळवार, १२ नोव्हेंबर सर्वधर्म समभावाचे आणि शांतता असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असताना काही राजकीय शक्ती फक्त राजकारणासाठी विनाकारण दोन समाजात वाद पेटवत आहे. सोमवारी मारहाण झालेल्या घटनेतील साधू आणि मारहाण करणारे दोन्ही हिंदू समाजाचे असून केवळ बुद्धिभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी साधूना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. संगमनेर शहर हे शांतता प्रिय आहे. परंतु काही शक्ती संगमनेर शहरात तणाव निर्माण करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून आपली…
