Author: Annant Ppangarkar
बुधवार १८ डिसेंबर संगमनेर – मोमीनपुरा ते राजस्थान चौक या भागात महिलांच्या वस्तू विक्रीचे दुकाने उघडण्यात आली आहे. या दुकानदारांकडून महिलांचे नंबर घेतले जात असून यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारचे मेसेज समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियातील अशा मेसेज मुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. या मेसेज मागील सत्य सायबर सेल आणि पोलिसांनी समोर आणण्याची मागणी होत आहे. यंत्रणांनी या मेसेज मागील सत्यतेची खात्री करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा व्हायरल होणाऱ्या मेसेजमधून दोन धर्मियांमध्ये तेढ देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात देखील धार्मिक तेढ निर्माण होणारे…
बुधवार १८ प्रतिनिधी नाशिक – परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली ‘कार-टी सेल’ (CAR-T) थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलतीत उपलब्ध झाली आहे. या सवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे. ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये १७ वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्यापेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी सांगितले. कार-टीसेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे…
विशेष प्रतिनिधी / नागपूर राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या याचिकेवर निर्णय प्रलंबित असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात राज्यपालांनी सात जणांना विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त केले. ही नियुक्ती बेकायदा असून, या नियुक्त केलेल्या आमदारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यातील सुनावणीत न्यायालयाने नियुक्त झालेल्या सातही आमदारांना प्रतिवादी म्हणून नोटीसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी मंगळवारी मंगळवारी झाली. चित्रा वाघ, विक्रांत…
बुधवार १८ डिसेंबर छत्रपती संभाजीनगर : आईसोबत शेतात गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खेळताना कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मंगळवारी (१७ डिसेंबर) पैठण तालुक्यातील रजापूर शिवारात घडली. गाळ्यात फसलेल्या चिमुकल्यांच मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रणव कृष्णा फणसे (वय ६) आणि जय कृष्णा फणसे (वय ९, दोघेही रा. आडूळ ता. बुद्रुक पैठण) अशी मृत पावलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात गट क्रमांक २८ मध्ये दोन एकर शेती आहे. दरम्यान, काल मंगळवारी कृष्णा यांची पत्नी वर्षा या कामानिमित्त शेतात…
मंगळवार १७ डिसेंबर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावाच्या जवळ असलेल्या बेलसोंडावाडीमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयाकडून संबंधित महिलेला संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाईट नसल्याने मंगल सिताराम घुले या महिलेने आपल्या घरात तेलाचा दिवा लावला होता. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या घुले एकट्याच घरात राहावयास आहे. घरात तेलाचा दिवा लावून घुले शेजारी गेल्या असताना तेलाचा दिवा अचानकपणे खाली पडल्याने संपूर्ण घराणे हळूहळू पेट घेतला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात…
मंगळवार १७ डिसेंबर संगमनेर – शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने सध्या गटारी आणि आणखी काही कामे सुरू आहे. मात्र या कामांसाठी अचानकपणे रस्ते बंद करण्यात आल्याने संगमनेरकर नागरिकांची मोठे गैरसोय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भागातील रस्ते, चौक बंद करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच संबंधित रस्ते किती कालावधीसाठी बंद राहणार आहे याची माहिती नागरिकांना देण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेच्या पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा या परिसरात, कवी अनंत फंदी नाट्यगृहापाशी, बाजारपेठेत नगर परिषदेच्यावतीने काम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र रस्ते बंद…
ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक. ‘वन नेशन, नो इलेक्शन’ हे विधेयक लोकशाही व्यवस्था संपवण्यासाठी. मंगळवार, १७ डिसेंबर ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी…
मंगळवार १७ डिसेंबर | अनंत पांगारकर संगमनेर – संगमनेर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. दोन तासाच्या अंतरात संगमनेर बस स्थानकावर दोन प्रवासी महिलांच्या जवळील दीडशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात लता शरद घुगे (रा. सायखेडा, निफाड) व शुभांगी रवींद्र कासार (रा. खराडी, पुणे) या दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दागिने चोरीचे स्वतंत्र दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार नोंदविण्यात आले आहेत. संगमनेर शहरातील दागिने चोरीच्या घटना लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस…
सोमवार १६ डिसेंबर विशेष प्रतिनिधी | मुंबई महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अनेकांना डच्चू देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते नाराज आहे. या नाराजांची मनधरणी करून त्यांची समजूत कशी काढायची, त्यांना शांत कसे करायचे याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर आहे. नाराज असलेल्या या दिग्गज नेत्यांना अडीच वर्षानंतर खांदेपालट झाल्यावर संधी मिळणार की पक्षातील आणखी कुठली मोठी जबाबदारी मिळणार यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. महायुतीच्या…
सोमवार १६ डिसेंबर अहिल्यानगर – गरजू महिलां व मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. योजने अंतर्गत महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
सोमवार १६ डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावे. विविध महामंडळांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. नाविन्यपूर्ण कल्पना वापरून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात. गाव कचरामुक्त किंवा…
सोमवार १६ डिसेंबर नागपूर – बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र…
बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप, सरकारने उत्तर द्यावे… माजी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तरुणाला किडनॅप करून अत्याचार. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक, ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. सोमवार १६ डिसेंबर नागपूर – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीडमधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र…
सोमवार १६ डिसेंबर रविवारी संध्याकाळी महायुतीच्या सरकारमधील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मंत्रीपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरुवातीलाच मंत्रिपदावरून आमदारांमधील खदखद बाहेर आली आहे. भोंडेकर म्हणाले, मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटतं. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. एवढे मोठे पद असताना अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं. मागच्या अडीच वर्षापूर्वी १० अपक्ष…
सोमवार १६ डिसेंबर संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात सन २०२४-२५ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १,८०,९११ साखर पोत्यांचे पूजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. उच्चांकी भाव देण्याची परंपरा कारखान्याने कायम जपली असून चालू हंगामातही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त…
सोमवार १६ डिसेंबर – नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना घराणेशाही मोडून काढण्याचा संकल्प केला होता. दुसरीकडे राज्यात काँग्रेसची वाताहात करणाऱ्या महायुतीने आपल्या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा ठसा उमटविला असल्याचे दिसत आहे. ३९ मंत्र्यांच्या यादीत बहुतांश मंत्री घराणेशाहीतून आले असल्याचे दिसते. रविवारी नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या ४२ वर गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमध्ये चेहऱ्यांना संधी दिली असली तरी मंत्रिमंडळात या मंत्रिमंडळात आपल्याच पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला तडा देत मंत्रिमंडळात घराणेशाहीतील मंत्र्यांची वर्णी लावली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत…
सोमवार १६ डिसेंबर सासऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आपल्या नावावर करावे तसेच एक एकर जमीन आपल्या नावावर करावी, या मागणीसाठी सुनेने आणि तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करत दिलेल्या त्रासाला वैतागून नैराश्य आलेल्या सासऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. भाऊसाहेब ब्राम्हणे असे दुर्दैवी सासऱ्याचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब ब्राम्हणे यांची पत्नी लताबाई ब्राम्हणे (रा. चिंचोलीफाटा, ता. राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले पती हे ए.डी.सी.सी. बँकेत नोकरीला होते. २०१६ साली ते सेवानिवृत्त झाले. मुलगा विशाल याचा विवाह १३ वर्षांपूर्वी चंद्रकांत ओहोळ (रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी वर्षा…
सोमवार १६ डिसेंबर न्यूयॉर्क – जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांची वयाच्या ७३ व्या वर्षी कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री प्राणज्योत मालवली. त्यामुळे अखेरीस आता तबला अबोल झाला आहे. रविवारी सकाळी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पद्मविभूषण, ग्रॅमीसह विविध पुरस्कारांनी सन्मानित … उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. उस्ताद झाकीर…
रविवार १५ डिसेंबर नागपूर – सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर मध्ये प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्याने कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नवे मंत्री उपस्थित होते. या बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोक प्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्य सरकार विरोधकांना देखील सोबत घेऊन काम करेन, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
रविवार, १५ डिसेंबर संगमनेर – परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करत अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर होऊन देखील त्याचा मृत्यू कोठडीत झाल्याने पोलिसांनी त्याचा खून केल्याचा दलित समाजातील कार्यकर्त्यांचा समज झाला असल्याने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून संगमनेर बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. आरपीआयचे कैलास कासार, राम सुरळकर, बापू रणधीर, राम दारोळे, रवी दिवे, आशिष शेळके, विशाल वैराळ, वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई व्होरा आधी विविध संघटनांच्यावतीने प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज…
