Author: Annant Ppangarkar

सोमवार, ०२ डिसेंबर – संगमनेर  तब्बल चार दशके संगमनेरकरांचे लोकप्रतिनिधी व करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आहे. त्यानंतर विविध पद्धतीने पराभवाचे विश्लेषण होत असतानाच आता मंगळवारी (३ डिसेंबर) प्रथमत:च स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात संगमनेरकरांशी संवाद साधणार आहे. या मेळाव्यात थोरात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे होणार – थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयालगतच्या पटांगणात मंगळवारी दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह थोरात यांच्यावर विशेष स्नेह असलेल्या राज्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. डॉ. तांबे…

Read More

सोमवार, ०२ डिसेंबर – मुंबई  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पाटील, जानकर प्रतोदपदी – तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील तसेच, आमदार उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. क्षीरसागर गैरहजर – शरद पवारांनी कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर टाकल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत रविवारच्या बैठकीत निर्णय झाला नाही. बैठकीसाठी दहा पैकी नऊ सदस्य उपस्थित होते, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते.…

Read More

रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई  लाडक्या बहिणींच्या बळावर मोठ्या बहुमताने महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होईल तत्पूर्वी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा १५०० ऐवजी २,१०० रुपये दिले जाणार आहे. बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा – राज्यात महायुतीला २३० पेक्षा अधिक जागांवर स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर निवडणुकीपूर्वी पाच महिने आधी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळतो याची प्रतीक्षा राज्यातील दोन कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना लागली आहे. ६०० रुपयांची वाढ – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा…

Read More

रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई  राज्यभरात सातत्याने महागाईत वाढ होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेल्या योजनांमध्ये आता बदल सुरू केला आहे. रविवारी झालेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीपाठोपाठ आता लालपरीचा प्रवास देखील महागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, फळे, साबण, खाद्य तेल अशा कित्येक गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसणार आहे. पंधरा टक्के वाढ होणार – समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्यांचे लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसच्या तिकिटामध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नसल्याने विधानसभा निवडणूक संपतात एसटी महामंडळाकडून १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. यामुळे लालपरीच्या तिकीट दरात आता…

Read More

महायुतीने विधानसभेच्या २३४ जागा पटकवत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ५०%अधिक मते घेत बाजी मारली. महाविकास आघाडीला फक्त ४९ जागेवरती समाधान मानावे लागले. युती सरकारच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे दिसून येते. तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ४८ पैकी ३० जागा मिळवलेल्या विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जाऊ लागले आहे. खरंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून निवडणूक प्रक्रिया बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. खरतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हरियाणा निवडणुका पार पडल्या, त्यात जनता अनेक वर्ष सरकार असल्यामुळे व प्रबळ गुज्जर व जाट समाज भाजप सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. परंतु भाजपाच्या…

Read More

रविवार ०१ डिसेंबर पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात.  मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली…

Read More

रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. दोन दिवसात मागविला खुलासा – नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप करून पक्षशिस्तीला काळीमा फासला असून त्यांना निलंबित का करू नये यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टिळक भवनात बैठक – विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे दिनांक…

Read More

राज्य विधानसभेची निवडणूक एकदाची पार पडली. ती कशी झाली, यासंबंधी या राज्यातील प्रत्येक व्यक्ती भरभरून बोलते आहे. निवडणूक लागली तेव्हा बोलत होती, मतदान करायला जाताना बोलत होती आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावरही बोलते आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी विद्यमान सत्ताधार्‍यांच्या नावाने दोष आहे. ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असंच या प्रत्येकाचं मत आहे. ज्याची नोंद ना निवडणूक आयोगाने घेतली ना आयोगाच्या इव्हीएमने घेतली. सारं काही ठरवून होत होतं. सत्ताधार्‍यांचा आयोगावर प्रचंड दबाव असल्याने आयोग मुर्दाड बनलं होतं. ‘बटेंगे तो कटेंगे’पासून सुरू झालेला प्रचार सार्‍या मर्यादा पार करणारा ठरला. तरीही आयोगाने दखल घेतली नाही. यामुळे निवडणूक आयोगाची विश्‍वासार्हता पुरती रसातळाला गेली. ती…

Read More

शनिवार ३० नोव्हेंबर – पुणे  राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी, निवडणुकांचा संदर्भ देऊन बाबा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेर्धार्थ ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष उपोषण सुरू केले होते. ठाकरेंनी सोडले आढावांचे उपोषण – महात्मा फुले वाडा येथे सुरू असलेल्या या आत्मक्लेष आंदोलनावेळी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी आढाव यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ सायंकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची भेट घेत केलेल्या विनंतीनंतर ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन आढाव यांनी आपले आत्मक्लेष आंदोलन मागे घेतले आहे. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत. यांची उपस्थिती -…

Read More

शनिवार ३० नोव्हेंबर – संगमनेर  संगमनेरमधून महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. उमेदवाराचे अभिनंदन करणारे फलक शहरासह तालुक्यात सर्वत्र लागले असून या फलकावर महायुतीचे प्रमुख नेते असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने आठवले गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कैलास कासार, आशिष शेळके यांचा सवाल – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ निवडून आले आहे. महायुतीचा धर्म पाळत आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विजयात आमचाही महत्त्वाचा वाटा आहे. मात्र शहर आणि तालुक्यात लागणाऱ्या कोणत्याही बॅनरवर आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने महायुतीला आठवले यांचा विसर पडला का असा सवाल रिपब्लिकन…

Read More

शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई  राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्रीपदावर आडून असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य चार मंत्र्यांच्या नावाला आता भाजपने विरोध केल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाकडून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय देखील भाजपच घेत असल्याचे समोर आल्याने शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. फडणवीसच मुख्यमंत्री – महायुतीचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून सत्तेवर येणाऱ्या महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून होणार…

Read More

शनिवार, ३० नोव्हेंबर  हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९५ वर्षीय योद्धा अर्थात डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. शरद पवारांनी घेतली भेट – दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. आज उपोषण थांबविणार – डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार,…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने एकच चर्चा होत आहे. तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला मात्र गृहमंत्री पदावर दावा – विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२ जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई अनेक अडथळे पार करत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू पाहणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नवाच अडथळा निर्माण झाला आहे. फडणवीस यांच्या विरोधात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शडडू ठोकला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपलं आंदोलन पुन्हा सुरु होईल, अशा शब्दात जरांगे यांनी फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यावरून आक्षेप नोंदवला असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा व्हायला उशीर होत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम – राज्यात महायुतीने एकहाती सत्ता स्थापन केली असली तरी मुख्यमंत्रिपदावरून अजूनही पेच कायम आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा…

Read More

शुक्रवार २९ नोव्हेंबर – संगमनेर  विधानसभा निवडणूक होताच संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाची मिमांसा करत नव्या जोमाने कामाला लागतानाच निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणारा ठराव शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आला आहे. चिंतन बैठक – विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. थोरात यांची पारंपारिक विरोधक असलेली ठाकरेंची शिवसेना यावेळी थोरात यांच्या सोबत असतानादेखील थोरात यांचा पराभव आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष आदेशाशी गद्दारी करत मतदार संघात विरोधी काम केले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संगमनेरमध्ये शिवसैनिकांची चिंतन बैठक पार…

Read More

शुक्रवार, २९ नोव्हेंबर – संगमनेर  देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २००२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्यावतीने स्पेशल…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या त्यानुषंगाने महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाची नौतिक जबाबदारी घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठीनी फेटाळून लावला आहे. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र याला भाजपची बदमाशी कारण असल्याचं सांगत पटोलेंचा राजीनामा फेटाळण्यात आला. पटोले दिल्लीला – राज्यात एकीकडे सत्तास्थापनेची गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. राजीनामा – त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झालं, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के कसं झालं असा सवाल प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाला विचारला आहे. व्हिडिओ फुटेज जाहीर करा – ही वाढ चक्क ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसने…

Read More

गुरुवार २८ नोव्हेंबर – अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र व जमावबंदी आदेश लागू केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र आदेश लागू – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २९ नोव्हेंबरपासून १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र हे आदेश लागू करण्यात आले आहे. यांना वगळले – जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्नाच्या मिरवणुका, प्रेतयात्रेच्या जमावास, याशिवाय पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परवानगी घेतलेल्या मिरवणुकांना हे आदेश लागू राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आदेशाचा भंग केल्यास कारवाई – उर्वरित सर्व ठिकाणी हे आदेश लागू असून या…

Read More

महाराष्ट्र संवाद – गुरुवार, २८ नोव्हेंबर  नाशिक – लासलगावच्या दत्तनगरमधील अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अतिष दगडु ढगे (वय २४ रा. टाकळी विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बा. द. पवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती बंगले यांनी काम बघितले. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करत फिर्यादीच्या १७ वर्षीय वयाच्या मुलीस ‘तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत का फिरते, अशी विचारणा करत यावरून वाद घालत कुरापत…

Read More