Author: Annant Ppangarkar
रविवार, ०३ नोव्हेंबर अहिल्यानगर – महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात विविध यंत्रणांमध्ये समन्वय, निवडणूक प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मिश्रा यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारत निवडणूक आयोगाने विविध विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक पोलीस निरीक्षक, सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, निवडणूक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आनंदी जाईल. प्रवासाचे योग आहेत. प्रेमिकांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. वडिलार्जित संपत्तीबाबत काही विशिष्ट निर्णय होतील. महिलांना मैत्रिणी भेटतील. वृषभ – आजचा दिवस जास्त कामाचा आहे, त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा आणि मगच काम करा. त्यामुळे कामाचा त्रास जाणवणार नाही. आर्थिक देणी देऊन टाका. मनोबल वाढवा.मिथुन – जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. एखादे मोठे धाडसाचे काम हाती घ्याल आणि त्यात यश मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल. जुन्या आठवणीत रमाल. मुलांच्या प्रगतीने आनंद वाटेल. कर्क – आई-वडिलांची काळजी घ्यावी, त्यांच्या आरोग्याला जपणे आवश्यक आहे. कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही…
शनिवार, ०२ नोव्हेंबर संगमनेर बस स्थानकातील व्यापारी गाळे बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संबंधित ठेकेदार, एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे व्यापारी गाळ्या बाहेर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली असून ती रोखण्यात संबंधित यंत्रणेला पूर्णतः अपयश आले आहे. याचा परिणाम शनिवारी दोन व्यापाऱ्यांमधील मोठ्या वादात तसेच हाणामारीत झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. हाणामारी काठ्यांचा वापर झाल्याचे दिसून येत असून दुपारी घडलेल्या हाणामारीच्या प्रकरणात दुकान मालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची…
शनिवार, ०२ नोव्हेंबर राहुरी – भाऊबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन तो आपल्या दुचाकीवरून संगमनेरला येत होता. बहिणीकडे येऊन भाऊबीज साजरी करण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. राहुरीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ऐन दीपावलीत दुःखद वातावरण निर्माण झाले. अपघातामुळे भाऊबीज साजरी करण्यापूर्वीच या बहिण भावाची ताटातूट झाली. शुक्रवारी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दत्ता पांडुरंग मोरे असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील कान्होबाची वाडी येथील तरुण दत्ता पांडुरंग मोरे (वय २७) हा १ नोव्हेंबरच्या रात्री एम.एच.१७- सी- यु-३७६४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून संगमनेर येथे…
शनिवार, ०२ नोव्हेंबर बेलापूर – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व विज्ञान भारती यांच्यावतीने तसेच गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान, बेलापूर यांच्या विशेष प्रयत्नाने राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी (३ नोव्हेंबर) सकाळी १०. ३० ते सायंकाळी ७. ०० वाजेपर्यंत आझाद मैदान बेलापूर बुद्रुक (ता. श्रीरामपूर) येथे इस्त्रो स्पेस ऑन व्हील हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप साळुंके, अँड. मयुर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके यांनी दिली. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले, बेलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत घडामोडींची ओळख करून देण्यासाठी…
शनिवार, ०२ नोव्हेंबर पुणे – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्यावर महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या असून त्यांनी रुग्णालयातून कार्यकर्ते, उमेदवार आणि आरक्षणवादी जनतेला एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाचा हा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवर टाकण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटर वरून शेअर केला आहे. https://x.com/URupwate/status/1852640976184979663?s=19 नेमकं काय म्हणाले ॲड. प्रकाश आंबेडकर… मी सध्या आयसीयूमध्ये आहे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्ही झालेले आहेत डॉक्टरने निरीक्षणात ठेवलेले आहे. निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. ही निवडणुक अत्यंत महत्त्वाची असून ओबीसीसाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, विधानसभेनंतर…
शनिवार, ०२ नोव्हेंबर राहाता – गणेश कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तीन हजार रुपये उसाला दर मिळाल्याने चैतन्याचे वातावरण पसरले आहे. कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद, शेतकरी यांनी आनंदोत्सव साजरा केला. कर्मचाऱ्यांना पगार बोनस यासह रिटेन्शन रक्कम मिळाल्याने प्रथमच इतकी आनंदात दिवाळी आम्ही साजरी करतो आहोत, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ज्यांनी योगदान दिले असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी अध्यक्ष अॅड. नारायण कार्ले, भगवान टिळेकर, डॉ. एकनाथ गोंदकर, संपतराव चौधरी, अनिल…
शनिवार, ०२ नोव्हेंबर पुणे – दोन महिन्यांपूर्वी संगमनेर मधील झरेकाठी येथील विवाहितेने पुण्यामध्ये आत्महत्या केली होती. पतीसह सासू-सासऱ्या विरोधात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयाने सासू-सासऱ्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.हुंड्याच्या मागणीच्या कारणावरून झरेकाठी येथील विवाहित महिलेने पुण्यामध्ये आपल्या आईच्या घरी आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी ०१ सप्टेंबरला पुण्यात घडली होती. यासंदर्भात पुण्याच्या रावेत पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.रावेत पोलिसांनी याप्रकरणी विवाहितेच्या पती आणि सासर्याला १९ सप्टेंबरला पहाटेच्या वेळी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथून अटक केली होती.संगमनेर येथील वकील ऋषिकेश वाणी यांच्या वतीने आरोपी पती आणि सासऱ्याने नियमित जामिनासाठी तर…
दीपावली पाडवा आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – आज आपण खूप धाडसी असाल, आक्रमकही असाल. आज कार्यमग्न असाल. कामांमध्ये प्रगती होईल. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे संधीचा फायदा घ्या. अध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ – आज आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे सहकाऱ्यांकडून आणि कुटुंबातील व्यक्तींकडून पूर्णपणे सहकार्य मिळणार आहे. आपल्या धैर्याने सर्व कामे पूर्ण करणार आहात. मिथुन – आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. आपला दृष्टिकोणही सकारात्मक असेल. आपल्या भावंडांच्या प्रकृतीविषयी कुरबुरी असू शकतील. कोणतेही मोठे बदल टाळा. कर्क – आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कार्यावर प्रकाश पडणार आहे. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. आर्थिक प्राप्ती चांगल्यापैकी होणार आहे.…
शुक्रवार, ०१ नोव्हेंबर पुणे – कोलकत्ता न्यायालयाने काढलेल्या तक्रारदार आणि त्याच्या मुलाला अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. शरद दशरथ कणसे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शरद कणसे याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तक्रारदार व त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध कोलकत्ता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी वॉरंट काढले आहे. हे वॉरंट बजावणीकामी हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद कणसे याच्याकडे देण्यात आले होते. या वॉरंटमध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना अटक न करण्यासाठी शरद कणसे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५ हजार रुपये अगोदरच घेतले होते. उर्वरित लाचेच्या…
शुक्रवार, ०१ नोव्हेंबर महायुती सर्वाधिक १४८ जागा घेऊन देखील मित्र पक्षांचा सतरा जागांवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे तब्बल १६५ उमेदवार मैदानात उतरले आहे. यात पहिल्या नगर जिल्ह्यात भाजपच्या वसंत देशमुख या नेत्याच्या बेताल वक्तव्यामुळे सर्वाधिक चर्चेचा ठरलेल्या संगमनेरसह नेवासे मतदारसंघाचा समावेश आहे. संगमनेरमध्ये महायुतीकडून भाजपचे अमोल खताळ आणि नेवासेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. शिवसेनेला मिळालेल्या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येकी पाच-पाच जागांवर भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागांवर शिवसेनेकडे मेरीट नसलेले, निवडून येण्याचे…
शुक्रवार, ०१ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी एक मोठे विधान केलं आहे. यावर्षीची दिवाळी अतिशय साध्या पद्धतीने साजरी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात ट्विट करत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली केसेस कोणत्याही ‘मेडल’पेक्षा कमी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये आमदार तांबे नेमकं काय म्हणाले वाचा… संगमनेर येथे घडलेल्या घटनेनंतर खोट्या गुन्ह्यांमध्ये माझ्या ५० हून अधिक सहकाऱ्यांना विनाकारण गुंतवले, दिवाळीसारख्या महत्वाच्या सणात ते सहकारी मित्र घरी राहू शकत नाहीत यापेक्षा मोठे दुःख माझ्या मनात नाही व त्यामुळेच ही दिवाळी अतिशय साध्या पध्दतीने साजरी करण्याचे मी…
शुक्रवार, ०१ नोव्हेंबर निवडणूक आचारसंहिता काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर-पुणे मार्गावरील सुपे टोल नाक्यावर पथकाला कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले. प्राथमिक माहितीनुसार पथकाला आढळून आलेल्या सोने, चांदी, डायमंड, दागिन्यांची किंमत २३ कोटी ७१ लाख ९४ हजार रुपये आहे. गुरुवारी पुणे मार्गावरील सुपा टोल नाक्यावर निवडणूक आयोगाचे अधिकारी, तपासणी पथक व सुपा पोलिसांनी ही एकत्रित कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. कारवाई दरम्यान पकडण्यात आलेला ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून पुण्याहून अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे बीबीसी लॉजिस्टिक कुरिअर कंपनीची बोलेरो व्हॅन जात होती. ही…
दीपावली – लक्ष्मीपूजन आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष : आज कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्हाला परदेशात राहणाऱ्या नातेवाईकाकडून काही माहिती मिळू शकते. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात देऊ नका कारण ते परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. नोकरदारांच्या सूचनांचे कार्यालयात स्वागत होईल आणि अधिकारीही तुम्हाला सहकार्य करतील. तुमचे कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. मुलाची तब्येत बिघडू शकते, पण संध्याकाळपर्यंत त्यात सुधारणा होईल. वृषभ : सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर त्यासाठी वेळ…
गुरुवार, ३१ ऑक्टोबर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीच्या कामाच्या बिलाची फाईल मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीने सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे. महेश गजानन देवगिरीकर (वय ३५ वर्ष) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड पंचायत समितीमध्ये एसीबीने बुधवारी (३० ऑक्टोबर) लाचेची ही कारवाई केली. तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेल्या शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीचे काम करण्यात आले होते. या कुशल कामाच्या एक लाख पाच हजार रुपयांच्या बिलाची फाईल मंजूर करून देण्यासाठी आरोपी महेश देवगिरीकर याने सहा हजार रुपये लाचेची तक्रारदाराकडे मागणी केली होती.…
गुरुवार, ३१ ऑक्टोंबर संगमनेर – बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते .देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या स्वर्गीय इंदिराजी या देशाचे सर्वात कणखर नेतृत्व ठरले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानाच्या शक्ति स्थळावर इंदिरा गांधी यांच्या चाळीसाव्या स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, आर. बी. राहणे, राजेंद्र गुंजाळ, निर्मलाताई…
गुरुवार, ३१ ऑक्टोबर पुणे – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी पहाटे पुण्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. आंबेडकर यांना पहाटे साडेचार वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समजताच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सजवून रुग्णालयात गर्दी केली होती. पहाटे प्रकाश आंबेडकर यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी कऱण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम सध्या त्यांच्यावर उपचार करत आहे. तर प्रकाश आंबेडकर यांची…
गुरुवार, ३१ ऑक्टोबर मुंबई – राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली. महाविकास आघाडी महायुती सह सर्वच पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असले तरी बंडखोरांचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. बंडोबांचे बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाने आपल्या चोवीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे पक्षाचे हे स्टार प्रचारक असलेले नेते विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात सभांच्या माध्यमातून मैदान गाजवत महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील. सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या तोफा मैदानावर धडकणार असून ठाकरेंची शिवसेना देखील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेनेने राज्यभरात ९० हून अधिक उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठी आता राज्यात शिवसेनेचे दिग्गज नेते स्टार…
गुरुवार, ३१ ऑक्टोंबर संगमनेर – मराठा आरक्षण आंदोलनाने चर्चेत आलेले आणि लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत देखील निर्णायक ठरणार असल्याचे चिन्ह आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले दत्तात्रय रावसाहेब ढगे हे जरांगे यांचे उमेदवार असतील. छात्र भारती संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राज्य स्तरावर काम करणारे, सातत्याने व्यवस्थेची झगडणारे ढगे विधानसभा निवडणुकीत उतरले असून संगमनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात, सत्ताधारी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना फाईट देतील. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ढगे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी एक सर्वसामान्य…
दीपावली नरक चतुर्दशी, आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – कुटुंब परिवारातील मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. एखादा जवळचा प्रवास सहकुटुंब सहपरिवार करू शकाल. वृषभ – व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. काही नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. सार्वजनिक तसेच सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल. मिथुन – आपल्या रोजच्या जीवनातील दैनंदिन कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण कराल. जमिनी विषयक किंवा स्थावर मालमत्तेच्या विषयक असलेले व्यवहार गतिशील होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कर्क – आजचा दिवस अनुकूल जाईल. महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या. वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांची शक्यता असल्यामुळे वादग्रस्त बाबींवर…
