Author: Annant Ppangarkar
बुधवार २० नोव्हेंबर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने वीस वर्षं सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. रुझान समीर पठाण (वय २०, रा. जुना ओठा रोड, नाशिकरोड नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र विठोबा देवरे (२४) व रोशन नरेश कोमरे (१९) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०९ चे न्यायाधीश व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी यांनी सोमवारी या संदर्भातील निर्णय दिला. २७ मे २०२१ रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या नाशिकरोड येथील बिटको…
बुधवार २० नोव्हेंबर श्रीरामपूर – शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच अहिल्या नगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन परतत असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे यांचे वाहन भरधाव वेगात असल्याने आणि हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने झाडलेल्या गोळ्या त्यांच्या वाहनाजवळून हवेत निघून गेल्या. या संदर्भात मंगळवारी रात्री कांबळे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी १९ नोव्हेंबर मध्यरात्री गोळीबाराचा हा प्रकार अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे…
बुधवार २० नोव्हेंबर मंगळवारी (ता. १९ नोव्हेंबर) भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजपा आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. विरारमध्ये घडलेल्या पैसे वाटपाच्या राजकीय नाट्याविषयी बोलताना थोरात म्हणाले की, निःपक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत, त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील…
विशेष प्रतिनिधी मुंबई – १९ नोव्हेंबर सत्यवचनाच्या आणि सुचिर्भुततेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पाय आणखी खोलात गेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रांगेहाथ पकडलं. तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही माहिती भाजपच्याच एका नेत्याने आपल्याला दिल्याचा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यामुळे भाजपची देशभर नाचक्की झाली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे सुरु केले आहेत. बटेंगे तो कटेंगेच्या संकटाची तलवार समोर दिसत असताना अचानक हे प्रकरण पुढे आल्याने भाजपची बोलती बंद झाली आहे. विनोद तावडे हे…
पुणे: कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. आरोपींकडून तीन पिस्तुले आणि तीन कोयते जप्त करण्यात आले होते. तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी हा निकाल दिला. दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमर दिनकर शेवाळे, अमोल नारायण शिंदे, प्रकाशसिंग चंदनसिंग बायस आणि श्याम चंद्रकांत जगताप अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रकाश चव्हाण हे महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. प्रकाश चव्हाण…
नाशिक – १९ नोव्हेंबर नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असून यामध्ये तब्बल पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. एका नेत्यालाही वाहनासोबत ताब्यात घेतलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची राज्यभर करडी नजर आहे. गस्तही वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आज नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये छापा मारला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी एका राजकीय नेत्याकडे ५ कोटीची रोकड आढळून आली. अधिकाऱ्यांनी लागलीच त्या नेत्याला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतलं. दरम्यान त्याच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली कुठे घेऊन…
अहिल्यानगर जिल्ह्यात बाराच्या बारा जागी महाविकास आघाडी निवडून येणार ३५ वर्ष सत्ता असून राहत्याचा विकास का नाही? एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान देऊ नये ते का स्वीकारले नाही? काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते शिर्डीच्या हॉस्पिटलला कोण अडथळे आणतय मंगळवार १९ नोव्हेंबर संगमनेर – आचारसंहिता काळातही जिल्हा प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असून एकतर्फीपणे वागत आहे. राजकारणासाठी जनतेच्या प्रश्नांची कोणी खेळू नये असे सांगत यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तीन तक्रारी केल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार अशी शक्यता असतानाच ‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्याने वातावरण निर्मितीत महायुती मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ‘लाडकी बहीण’मुळे निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारामुळं पुरती रसातळाला गेल्याचं दिसू लागलं आहे. याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो, असे अंदाज बाहेर येऊ लागले आहेत. मे 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. यावेळी महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर ‘भटकती आत्मा’ आणि ‘उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे ‘नकली संतान’ अशी टीका केली होती.…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडत आहे. त्यानंतर शनिवारी (२३ नोव्हेंबर) येथील भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडणार आहे. मतदान ते मतमोजणी दरम्यान प्रशासनाने नेमकी काय तयारी केली आहे, मतदारांनी काय काळजी घ्यावयाची याबाबत संगमनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी माहिती दिली. काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी बघा व्हिडिओ…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुका हा एकनिष्ठ विचारांचा आहे. आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाशी तर संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेरमध्ये पाऊल ठेवू शकणार नव्हते. मात्र त्यांच्या नावाखाली तालुक्यातील तरुणांना बनवाबनवी करून संगमनेरात बोलावून फसवले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेचा बार फुसका ठरल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि संगमनेरमध्ये गद्दारीला माफी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथे येणार नव्हते. हे सर्वश्रूत…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी राज्यातील मतदारांमध्ये महायुतीच्या कारभाराबद्दल प्रचंड रोषाचे वातावरण असून महाविकास आघाडीबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत असंविधानिक, बेकायदेशीर भ्रष्ट सरकार सत्तेवरून घालून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे याला आमचे प्राधान्य असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यापूर्वी थोरात सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जयश्री थोरात यादेखील उपस्थित होत्या. थोरात म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र सायंकाळी प्रचाराची सांगता होत आहे. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही.…
२४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान ८५ वर्षांवरील २१०६ ज्येष्ठ नागरिक, ३३२ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान सोमवार, १८ नोव्हेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात तीन दिवस गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात २४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – बी. जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून समोरील व्यक्ती प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे अशी टीका करताना भाजपकडून तालुक्यात सुरू झालेला धाक व दडपशाही प्रकार निंदनीय असल्याची टीका भाजपच्या आयटी सेलचे सहसंयोजक व नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विक्रमसिंह खताळ यांनी केली आहे. हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत पत्नी शिवांगी खताळ होत्या. विक्रमसिंह खताळ म्हणाले, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – साखर धंदा मोठ्या अडचणीतून वाटचाल करत आहे. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत भाव देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कौठे मलकापूर येथील ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या कारखान्याच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांच्या पत्नी अश्विनी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी विधीवत व शास्त्रोक्त पद्धतीच्या वैदिक मंत्रोपचारात पार पडला. यावेळी बिरोले बोलत होते. बिरोले म्हणाले, कारखान्याच्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून या गळीप हंगामात दैनंदिन साडेतीन हजार…
अहिल्यानगर दि.१७- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. कोणत्याही मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल सोबत बाळगता येणार नाही. उमेदवारांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीलादेखील सोबत मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल बाळगल्यास मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. छुप्यारितीने मोबाईल बाळगल्यास व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट…
मुंबई दि. १७ : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १८ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय-…
शनिवार, १७ नोव्हेंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पोस्ट लिहून आदरांजली व्यक्त केली आहे. या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसाठी दोन शब्द तरी राहुल गांधींकडून वदवून दाखवा. त्यामुळे राहुल गांधी यांची पोस्ट व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातले नेतेमंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे…
रविवार, १७ नोव्हेंबर येत्या २० तारखेला विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. मात्र मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत मतदान न करता अनेक जण बाहेरगावी सहलीसाठी जातात आणि त्याचा परिणाम मतदानावर होतो. निवडणुकीनंतर सध्याच्या राजकारणाला कंटाळल्याने मतदान न केल्याचे अनेक जण सांगतात. मात्र यामुळे निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरतो, त्यामुळे उमेदवार मान्य नसेल तर मतदान यंत्रावरील नोटाचे बटन दाबा मात्र मतदान आवश्य करा, मतदानाचे पवित्र कर्तव्य पूर्ण करा, असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक दीपक साळुंके यांनी केल आहे. बहुतेक मतदार संघात प्रमुख उमेदवारांच्या मतानंतर नोटाच्या मतांचा समावेश गेल्या काही निवडणुकांपासून…
विधानसभा निवडणूक स्पेशल अनंत पांगारकर राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन ठेपला असतानाच आता संगमनेर मतदार संघात उभ्या असलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कोट्यावधीच्या निधीबाबत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यावधीच्या पेड न्यूजचे प्रकरण समोर आले असतानाच आता विविध उमेदवारांना मिळालेल्या निधीच्या चर्चा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक आयोगाने आर्थिक संवेदनशील जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पथके मतदार संघात कार्यरत असली तरी अद्याप शहरात समोर आलेले हवालाचे एक प्रकरण वगळता या भरारी पथकाच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन…
नागपूर – मुस्लीम मतदारांना प्रभावित करून महाविकास आघाडी वोट जिहाद करीत असल्याचा आरोप करत आपल्याला एक होऊन त्या विरोधात धर्मयुद्ध पुकाराव लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर मधून निवडणूक लढविणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रचार रॅली काढली होती. या रॅली त्यांनी पुन्हा एकदा वोट जिहाद संदर्भात पुनरुच्चार केला. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करीत असून ते खेदजनक आहे. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी आम्ही कधी बघितले नव्हते. अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी असले प्रकार करीत असेल तर त्याविरुद्ध आपल्याला एक व्हावे लागेल. धर्मयुद्ध पुकारावे लागेल. ऑल…
