Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर, १८ जून २०२५:  पाथर्डी (अहिल्यानगर) येथील शिवनेरी मिसळच्या हॉटेल चालकाकडून मासिक हप्ता म्हणून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार लक्ष्मण सुखदेव पोटे (वय ३५) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय २२) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पाथर्डी येथे ‘शिवनेरी मिसळ’ नावाचे हॉटेल असून, ते रात्री १० नंतरही सुरू असते. यावरून कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदाराकडे मासिक २००० रुपये हप्त्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने १५ जून २०२५ रोजी नाशिक…

Read More

अहिल्यानगर, १८ जून:  नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अहिल्यानगरमध्ये  मंगळवारी एका खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घर जप्तीच्या नोटीसची तारीख वाढवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराला भिंगारच्या मंडळ अधिकारी कार्यालयाकडून घर जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसची तारीख मंडळ अधिकाऱ्यांकडून वाढवून देण्यासाठी, जहीर अहमद इक्बाल मुलानी (वय ३०, रा. एकनाथ नगर, केडगाव, अहिल्यानगर) या खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याने २०,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, १७ जून २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता जहीर मुलानी याने पंचांसमक्ष २०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

Read More

मुंबई, दि. १७- विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्याची माहिती आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गरज भासल्यास तातडीने अधिक खतांची मागणी करावी, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन “विठ्ठल-नाम” च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या. यावेळी, निवृत्तीनाथ महाराज पालखी…

Read More

संगमनेर, १७ जून  पावसाळ्याला सुरुवात होताच संगमनेर विद्युत महामंडळाचा (महावितरण) गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अनेक उपनगरे आणि गावठाण भागांत विजेचा लपंडाव सुरू असून, यामुळे नागरिक आणि विशेषतः छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरणच्या या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत, अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. कानकाटे यांनी आरोप केला आहे की, वादळ, वाऱ्यामुळे झाडे पडून किंवा तारा तुटून वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांना समजण्यासारखे आहे. मात्र, दर शनिवारी शहरातील जवळपास ७०-७५ टक्के भागात दिवसभर वीज गायब असते. रविवारी कोणतेही कारण नसतानाही विजेचा ये-जा करण्याचा खेळ सुरू होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक…

Read More

अहिल्यानगर, १७ जून –  अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दरोडा टाकणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद येथील दरोड्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेही उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भैय्या कडू काळे (वय १८, रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय ३५, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय २३, रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले (वय २०, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर),…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज (सोमवारी, १६ जून) अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरविल्या. रिमझिम पाऊस आणि भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले. पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीमध्ये सुमारे २० हजार वारकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. तांबे आणि थोरात यांनी पालखीचे पूजन केले. या प्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  आईवडील लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत नातेवाईकाने तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यातील मुख्य आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  पंडित हिरामण वैराट असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकारातील अन्य तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे याप्रकरणी पुढील तपास करत आहे.  रविवारी ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातून समोर आली होती. घटनेतील पीडित मुलीवर जवळच्या नातेवाईकाने आई-वडील घरी नसल्याचे संधी साधत बलात्कार केला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधलेल्या पुलाचे श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. तसेच, सत्तांतरानंतर सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी पुलाचे काम रखडवल्याचा आरोप करत त्यांनी पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा आरसा दाखवला.  या संदर्भात दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुलाच्या रखडलेल्या कामाचा घटनाक्रम विशद करत म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा जुना पूल खचला होता. पूल वाहतुकीला बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पाहणी केली होती. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर…

Read More