Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोरवाडी धरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. वरवंडी येथे आमदार खताळ यांच्या पेढेतुला कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की, पठार भागासाठी मोरवाडी धरण व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या धरणासाठी पूर्वी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण बांधले गेले. सद्यस्थितीत मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. दुर्दैवाने, पिंपळगाव खांड धरणाच्या…

Read More

मुंबई । प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी १०० अथवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांकडून स्टॅम्पपेपरची मागणी करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात विद्यार्थी, पालक, पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत.…

Read More

संगमनेर / छत्रपती संभाजीनगर – श्रीमंत घरच्या मुलांची ‘स्थळं’ शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला बीडच्या वडवणी पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी संगमनेरच्या तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक बनावट नवरी असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन आणि एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभवी शेटे (बनावट नवरी), मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण), रणजीत अहिरे (कारचालक, तिघेही रा. संगमनेर) आणि यमुनाबाई (मध्यस्थी) यांचा समावेश आहे. या टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अनेक गरीब,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरातील राहाणेमळा परिसरात असलेल्या हॉटेल सुरजच्या व्यवस्थापकाला चॉपरचा धाक दाखवून गल्ल्यातील सुमारे साडेअकरा हजाराची रोख रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणांनी हा प्रकार केला असून त्यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढीस लागले असल्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरामनगर येथील रहिवासी असलेले धीरज राजेंद्र पावडे, अक्षय रामा भुजबळ आणि शुभम दिवे या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास राहाणे मळा येथील हॉटेल सूरजमध्ये प्रवेश केला. पावडे याने हॉटेलचे व्यवस्थापक हरीश थोरात यांना…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले. मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून धरण व कालव्यांच्या कामासाठी निधी मिळवला व काम सुरू ठेवले. आता उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरणासह कालव्यांचे निर्माते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. घुलेवाडी येथे जलपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच निर्मला राऊत, भाऊसाहेब पानसरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, भास्कर पानसरे आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते व युवक कार्यकर्ते तसेच घुलेवाडी विविध कार्यकारी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वांनी आत्मसात करावेत, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. महायुतीच्यावतीने संगमनेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शिवराज्याभिषेक दिन आमदार खताळ यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी, आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना खताळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे रयतेच्या हितासाठी काम केले, त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्श विचारांचा अंगीकार करून रयतेच्या भल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार झाल्यावर आपण संगमनेर शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती आणि उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते. त्यानुसार, संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती…

Read More

मुंबई –  राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला हा निधी आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरला जात असल्याने या निर्णयावर पुन्हा एकदा टीकेची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय विभागाला वारंवार फटका… ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला होता. याआधी निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा त्यांच्या विभागातून ४१०.३० कोटी रुपये वळवण्यात आले आहेत, यामुळे ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, पुणे पुणे शहरातील महात्मा फुले मंडईजवळील मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने एका व्यक्तीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कातरड येथील रहिवासी रमेश प्रकाश सत्रे (वय २१) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली. शहराच्या विविध भागांमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या सात दिवसीय शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्यास खरी क्रांती घडते, असे प्रतिपादन केले. हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराजांचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, आमदार अमोल खताळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि हरी ओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. शिवगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना हिंदू धर्माचा…

Read More

प्रतिनिधी, संगमनेर –  ऊस आणि दूध ही शाश्वत पिके असून, संगमनेर तालुका एक कुटुंब आहे आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, आगामी काळात एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठीच्या पहिल्या मिल रोलर पूजनावेळी थोरात बोलत होते. या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे,…

Read More