Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अस्थिर असलेल्या राजकीय वातावरणात आता आणखी एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधकांची धार कमी होत असतानाच, राज्यातील तीन प्रमुख नेते – राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर – यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि महादेव जानकर यांचा ओबीसी मतदारांवरील जनाधार एकत्र येणार आहे. “खोट्या आश्वासनांना…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिला मतदारांना देताना दिलेल्या आश्वासनाचा युती सरकारला पद्धतशीर विसर पडला आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणीच्या दीड हजाराच्या रक्कमेतून चक्क हजार रुपये कमी होणार आहेत. ज्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरली त्या योजनेलाच हात घालण्यात आल्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर युती सरकारला बहिणींचा शाप लागेल असं म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर सहकारातील दोन दिग्गजांच्या समेटानंतर दोन्ही कारखान्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडीची औपचारिकता बाकी आहे तर दुसरीकडे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही बिनविरोध निवडीकडे असून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या निवडीमध्ये अन्य उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा अडसर असल्याचे दिसून येते. मात्र छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाच्या गटातून बिनविरोध निवड झाली आहे. अन्य मतदार संघातून कोणाची कारखान्याच्या संचालकपदी वर्णी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश आजपासून (१५ एप्रिल २०२५) ते २४ एप्रिल २०२५ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला शस्त्र बाळगण्यास किंवा जमाव करून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन करणे, लाठ्या-काठ्या, तलवारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची शस्त्रे घेऊन फिरणे कायद्याचे उल्लंघन ठरेल. तसेच, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही जमाव करणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरात नुकत्याच पार पडलेल्या हनुमान जयंती उत्सवादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ११ आणि १२ एप्रिलला घडलेल्या या घटनांप्रकरणी १४ एप्रिलला रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहूलकर व पियुष संतोष गोडसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ भालेकर (वय ६२, धंदा निवृत्त, रा. चंद्रशेखर चौक,…

Read More

मुंबई, दि. १५ – विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा तपशील खालीलप्रमाणे…. १. चिखलोली-अंबरनाथ येथे नवीन दिवाणी न्यायालय: ठाणे जिल्ह्यातील चिखलोली-अंबरनाथ येथे कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. २. कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई धोरणाला मंजुरी: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पीडित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेर आणि पारनेरला दिलेला जोरदार झटका विरोधकांच्या कायम लक्षात राहील. आता श्रीरामपूरकडे लक्ष देणार असून, योग्य वेळी त्यांनाही झटका देऊ, असा स्पष्ट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. दत्तनगर गावठाण येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले की, राजकारण हे गरीब लोकांना घरे मिळवून देणे, शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या मोठ्या गोष्टींवर आधारित असावे. श्रीरामपूरमध्ये बदल घडवायचा असेल, तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी…

Read More

संगमनेर, दि. १४ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते संतोष रोहम, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, रणजीत जाधव, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात,…

Read More

अहिल्यानगर, दि. १४ प्रतिनिधी –  जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच जलसाक्षरता वाढवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या जलसंपदा पंधरवड्याचा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी होईल. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान आणि जल पुनर्भरण यावर भर दिला जाईल. १८ एप्रिल रोजी शेतकरी आणि पाणी वापर संस्था यांच्यात संवाद साधला जाईल, तर १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणींचे…

Read More

संगमनेर दि.१४ – प्रतिनिधी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्‍या माध्‍यमातून जनतेला हक्‍क आणि अधिकार मिळवून दिले. त्‍यामुळेच भारताच्‍या संविधानाचा संपूर्ण जगात होणारा गौरव सर्वांना अभिमानास्पद आहे. देशामध्‍ये संविधान दिन सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्‍यघटनेच्‍या पवित्र ग्रंथाचे महत्‍व अधोरेखित केले असल्‍याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३४ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून लोणी खुर्द येथे समता युवा संघटनेच्‍यावतीने तसेच लोणी बुद्रुक येथे जनसेवा युवा प्रतिष्‍ठाणच्‍यावतीने आयोजीत करण्‍यात आलेल्‍या अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संविधानाच्‍या उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्‍यात आले. संविधान…

Read More