Author: अनंत पांगारकर

अहमदनगर, २२ ऑगस्ट –  लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा तसेच यासाठी स्वतःच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शवत यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांना दिले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे गुरुवारी अहमदनगर दौऱ्यावर असतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी डॉ. गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ओला यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील त्याचा उपयोग…

Read More

अहमदनगर, २२ ऑगस्ट महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी तुमची अडवणूक केली तर बँकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बँकांना दिला. मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. यानिमित्ताने अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. माजी महापौर शीला शिंदे, संपर्कप्रमुख उज्वला भोपळे, जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, जिल्हाप्रमुख मीरा शिंदे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख…

Read More

नराधम आरोपींना चौकात जिवंत जाळा – दुर्गाताई तांबे गुरुवार, २२ ऑगस्ट संगमनेर – बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी व महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत या आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी केली. तर अशा नराधम आरोपींना चौकामध्ये जिवंत जाळा, अशी मागणी महिला नेत्या दुर्गाताई तांबे यांनी केली. संगमनेर शहरात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्यावतीने भव्य निषेध मोर्चा झाला. यामध्ये दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, मनीषा शिंदे, नम्रता पवार, अमृता राऊत, यांच्यासह ३ हजार मुली सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट संगमनेर : बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी (२४ ऑगस्ट) संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार असून आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन संगमनेर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले असून या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे घडली. या घटनेचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून राज्यभरातून या घटनेचा निषेध होत आहे. खरे तर महिला शक्ती ही देशाची ताकद आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांमध्ये घबराट आहे. आरोपींना कोणतीही जरब नाही. कायदा सुव्यवस्था ढासाळली…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (२२ ऑगस्ट) सकाळी झालेल्या एमपीएससी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी रात्री सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारीही सुरू ठेवले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्रीपासून शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले ओके. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधन संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन चंदनापुरी येथील ‘विठ्ठल विसावा’ या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून छायाचित्रकार दिन साजरा केला. स्वच्छता दूत आदित्य घाडगे व राजेश शहा यांना प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ओंकार राठी होते. ज्येष्ठ छायाचित्रकार काशिनाथ गोसावी, राम भागवत व शांताराम कोल्हे व्यासपीठावर होते. सकाळी सुरुवातीलाच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यशस्वी फाऊंडेशनचे आदित्य घाडगे व त्यांची कन्या यशस्वी यांनी यासाठी मदत केली. त्यानंतर छायाचित्र, व्हिडिओ कॅमेऱ्याचे पूजन करून उपस्थितांचे मनोगत पार पडले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार निसर्ग देशमुख, कैलास खोले, सतीश जम्बुकर, दीपक घुले, राम भागवत, राजू…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट नाशिक : सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्या पहाटे निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. फोन केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून पंचवटी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहे. गगन प्रवीण कोकाटे (वय २४, रा. राधेश्याम निवास, वृंदावननगर, म्हसरूळ) असे खून झालेला पोलीस पुत्र युवकाचे नाव आहे. गगनच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. मंगळवारी रात्रीपासून तो घरी आला नसल्याने त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला गगन याचा मृतदेह कॉलनी रस्त्यावर आढळून आला. त्यानंतर त्याचे वडील प्रवीण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट मुंबई : बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी येत्या शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवत बदलापुरातील घटनेवर चर्चा करण्यात आली. आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी होणार असून डॉक्टर, वकील, पालक यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी…

Read More

आजचे राशीभविष्य  गुरुवार २२ ऑगस्ट २०२४ मेष— धन स्थानातील हर्षल गुरु आज अगदी आनंदी दिवस दर्शवतात. दुपारनंतर मात्र चीडचीड वाढेल. एखाद्या अप्रिय घटनेमुळे मन अस्वस्थ होईल. वृषभ— जन्मस्थ मंगळ हर्षल मुळे मानसीक ताणतणाव वाढण्याची शक्यता. स्वस्थानी असलेला भाग्येश अचानक धनलाभ दर्शवतो. मिथुन— धन स्थानातील रवी आज पैशासाठी संघर्ष करायला लावेल. मित्रांबरोबर वादविवाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी मानहानी होण्याची शक्यता. कर्क— धन स्थानातील बुध शुक्रामुळे आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. चतुर्थ स्थानातील चंद्र वाहन योग दर्शवतो. सिंह— आज सगळ्यांशी प्रेमाने वागाल. आज प्रवास योग संभवतो. पराक्रमातील चंद्र भावांबरोबरचे संबंध सुधारण्यास मदत करील. कन्या— जोडीदाराबरोबर वाद संभवतो. आर्थीक समस्या, चिंता दुर होतील. आनंदी…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट मुरूम उत्खननासंदर्भात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध गुन्ह्यात पंचनाम्यात तक्रारदाराला लाभ मिळवून देण्यासाठी पंचा समक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एसीबीने रंगेहात पकडले आहे. सचिन भागवत सानप (वय ३९ वर्ष) रा. एमएसजी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक चार जुना नगर नाका, बीड असे बीडच्या लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचखोर सानप याला लाच लचकत च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात मुरूम उत्खननासंदर्भात गुन्हा दाखल…

Read More