Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ: काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला गती मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. कर्क: तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वैवाहिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये गुरुवारी (२१ ऑगस्ट) एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेरमधील सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, वारकरी संप्रदाय आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाची माहिती देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या कामातून संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही त्यांची संकल्पना राज्यात आदर्श मानली जाते. अशा संयमी आणि सर्वधर्म समभाव जपणाऱ्या नेत्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तथाकथित महाराजाच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आपण तत्वासाठी आणि विचारांसाठी जगणारे असून, नथुराम गोडसेसारख्या व्यक्तीकडून मारले जाण्याची धमकी मिळाली, तर असे बलिदान मी आनंदाने स्वीकारेल, असे विधान थोरात यांनी केले. मी महात्मा गांधी नाही, मात्र विचारांसाठी बलिदान देण्यास तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादानंतर गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर राजकीय वादाने धुमसत आहे. संगमनेरमधील शांततेला गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली असतानाच कीर्तनकार म्हणविणाऱ्या आणि वादाला कारणीभूत ठरलेल्या संदेश भंडारे या महाराजाकडून माजी मंत्री थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर घटनेनंतर संगमनेरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तांबे यांनी समाज माध्यमांवर एक सविस्तर पोस्ट लिहून ही धमकी संगमनेरची सामाजिक घडी आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता असल्या विकृत मानसिकतेचा निषेध करते, असेही त्यांनी म्हटले आहे. राजकीय टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात- आपल्या पोस्टमध्ये सत्यजीत तांबे म्हणतात, ‘संत-महात्म्यांच्या परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यावर टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात. पण स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे सुसंस्कृत आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्हिडिओमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे याने ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे म्हणत थोरात यांना थेट धमकी दिली. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. नेमकं प्रकरण काय? संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनात संग्राम भंडारे राजकीय विषयांवर बोलत असताना काही गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि अभंग शिकवण्याची विनंती केली. यानंतर काही धार्मिक संघटनांनी राजकारण करत गोंधळ निर्माण केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी शांततेचं आवाहन केलं.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचे प्रक्रिया सुरू होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार असून त्यासाठीच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात सर्वाधिक प्रभाग श्रीरामपूर आणि त्या पाठोपाठ संगमनेर, कोपरगाव नगर परिषदेमध्ये राहणार आहे. श्रीरामपूरमध्ये 17 प्रभागांमधून 34 सदस्य, संगमनेर व कोपरगावमधून 15 प्रभागातून प्रत्येकी 30 सदस्य असतील. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यांच्या सीमांचे प्रारूप खालील प्रमाणे प्रभाग क्रमांक १ * श्रमिक नगर, गोविंद नगर आणि गणेश नगर या भागांचा समावेश आहे. * एकूण लोकसंख्या ४१३६…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, दि. १८ ऑगस्ट: पुण्यात पोलिसांचे ‘जंगलराज’ सुरू आहे का, असा संतप्त सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार असूनही, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका सपकाळ यांनी केली आहे. १ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित तरुणींनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नेवासा फाटा येथील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नेवासा फाटा परिसरातील ‘कालिका फर्निचर’ या दुकानाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुकानाच्या मागील बाजूला राहत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय ११) आणि चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे. सुदैवाने, मयूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये विनायक वाडेकर यांची तालुका अध्यक्षपदी, तर प्रज्ञा शिंदे यांची महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे, जिल्हा सचिव दिनेश थोरात, जिल्हा कोषाध्यक्ष अप्पासाहेब नरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान गायकवाड आणि जिल्हा ग्राहक मार्गदर्शन आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्याने जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी अशी, विनायक वाडेकर (अध्यक्ष), प्रज्ञा शिंदे (महिला अध्यक्ष), रोशन कोथमिरे, प्रदीप रहाणे (उपाध्यक्ष), प्रशांत राऊत (सचिव), सर्जेराव वाघ, माधव वाळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमची कामे सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला थोडे शांत राहावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. कर्क: आज तुम्ही भावनिक राहाल, पण…

Read More