Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आज तब्बल चार लाख लिटरपर्यंत दूध संकलन करत आहे. प्रत्येक टप्प्यावर दूध संघाने यशस्वी वाटचाल केली असून, मुक्त संचार गोठा आणि मुरघास ही या संघाने संपूर्ण राज्याला दिलेली मोठी देण आहे. संगमनेर तालुका दूध संघाचे भक्कम संरक्षण पाठीशी असल्यामुळेच आज खाजगी व्यावसायिक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देत आहेत. निर्भेळ आणि गुणवत्तेचे दूध हेच वैशिष्ट्य असल्याने राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड बनला आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे काम असून औषधांपेक्षा हास्याचे डोस अधिक गुणकारी आहेत, असे प्रतिपादन संगमनेर फेस्टिवलचे प्रणेते व उद्योगपती मनीष मालपाणी यांनी केले. राजस्थान युवक मंडळ, मालपाणी उद्योग समूह, संगमनेर नगरपरिषद, शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि संगमनेरकरांच्या सहभागातून आयोजित १८ व्या संगमनेर फेस्टिवलचे शानदार उद्घाटन संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते मालपाणी लॉन्स येथे पार पडले. पहिल्याच दिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौगुले यांच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री प्रयोगाने संगमनेरकरांना हसवून जिंकून घेतले. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सागर…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ या विचाराला कृतीची जोड देत आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘महावादन सोहळा’ बुधवारी अत्यंत जल्लोषात पार पडला. परंपरेचा आणि संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो संगमनेरकरांनी गर्दी केली होती. पाच प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण संगमनेर शहर मंत्रमुग्ध होऊन गेले. महावादन सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. या सांस्कृतिक सोहळ्यात तांडव, हिंदूराजा, रुद्र प्रतिष्ठान, छावा आणि एकलव्य गर्जना या पाच ढोल-ताशा पथकांनी आपल्या उत्कृष्ट वादनाचे प्रात्यक्षिक सादर केले. पथकांच्या पारंपरिक कौशल्यामुळे, शिस्तीमुळे आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटात…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. तिची काळजीपूर्वक जपणूक करताना काळाची गरज ओळखून धाडसी, दूरदृष्टीचे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सायखिंडी येथील श्री मनोहरबाबा विद्यालयात आयोजित ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’तून विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयातील रंजकता अनुभवली. मंगळवारी पार पडलेल्या या सत्रात प्रसिद्ध व्याख्याते डॉ. निवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर भर न देता तर्कशुद्ध आणि चिकित्सक विचारसरणी स्वीकारण्याचे आवाहन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमधील गणित-विज्ञानाची भीती दूर होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. नाशिक येथील निवृत्त प्राध्यापक तथा राज्य पुरस्कार विजेते डॉ. निवास पाटील यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे आणि प्रयोगांच्या माध्यमातून कठीण मानले जाणारे विषय अत्यंत सोप्या भाषेत मांडले. कोणत्याही संकल्पनेचा अभ्यास करताना ‘का?’ आणि ‘कसे?’…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारींमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास येणारा चौकशी अहवालच पुढील कारवाईची दिशा ठरवणारा ठरणार आहे. यापूर्वी प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गांभीर्याने चौकशी झाल्यास मुख्याध्यापकांकडून पालकांवर दबाव आणणे, नियमबाह्य पद्धतीने समितीची निवड करणे किंवा शासकीय निर्देशांचे उल्लंघन करणे असे गंभीर आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास सक्षम प्राधिकरणाकडून संबंधित मुख्याध्यापकांवर नियमानुसार प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणात चौकशी निष्पक्ष होणार का, पालकांचे जबाब नोंदवले जाणार का, तसेच सभेचे प्रोसिडिंग आणि उपस्थितीपत्रक यांची अचूक तपासणी केली जाणार…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या काळातच संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते ९ या महत्त्वाच्या वेळेत नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नियोजित लोडशेडिंगमुळे विद्यार्थी, महिला, व्यापारी आणि दुग्ध व्यावसायिकांचे मोठे हाल होत असून, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, अशी जोरदार मागणी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केली आहे. सायंकाळची हीच वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, महिलांच्या स्वयंपाकाची, व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची आणि दुग्ध व्यावसायिकांच्या दूध संकलनाची असते. याच काळात वीज घालवून महावितरण ग्रामीण जनतेच्या अडचणी वाढवत असल्याचा आरोप शेलकर यांनी केला. सरकारच्या २४ तास अखंड वीज…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जापूर्ण ठरेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी अंगावर पडू शकते, ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि जवळच्या लोकांकडून सहकार्य लाभेल. आरोग्याची उत्तम साथ मिळेल, तरीही आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. वृषभ- आज मानसिक समाधान लाभेल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मित्रांशी भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा आणि घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. मिथुन- आज बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंग सहज हाताळू शकाल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात घाबरून न जाता, नागरिकांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी युवकांनी नेहमी तत्पर राहणे गरजेचे आहे. अपघातात किंवा आजारपणात वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो आणि योग्य प्राथमिक उपचारामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. एसएमबीटी दंत महाविद्यालय येथे संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ करावयाच्या उपचारांचे सविस्तर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे तब्बल ३३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात मका, सोयाबीन, बाजरी आणि विविध कडधान्यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली होती. सुरुवातीला पावसाने दिलेली साथ आणि पिकांची झालेली उत्तम उगवण यामुळे शेतकरी आशावादी होते; परंतु त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे पिके कोमेजून जळण्याच्या मार्गावर आहेत. पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली असून,…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कर्जत येथील सोनारगल्लीतील ‘ओम ज्वेलर्स’ हे दुकान फोडून चांदीचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला आणखी एक गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. दिनांक ८ ते ९ सप्टेंबर २०२६ च्या दरम्यान कर्जत येथील सोनारगल्लीत राहणारे व्यापारी उमेश प्रदीप कुलथे (वय ४०) यांच्या ‘ओम ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरांनी चांदीचे दागिने चोरून नेले होते. या घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील चोरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजापूर ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत गंभीर तक्रारी समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. थेट पिण्याच्या पाण्यातच जीवजंतू आढळत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या या अस्वच्छ आणि बेजबाबदार कारभारामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासक आदित्य सदगीर आणि ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांनी तात्काळ या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पाण्याच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पाणीपुरवठा…
Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते निष्पाप नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. बस स्थानक ते तीनबत्ती चौक, तीनबत्ती चौक ते प्रवरा नदी पूल आणि तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका या शहरातील अत्यंत मध्यवर्ती अन् वर्दळीच्या मार्गावर एका निष्पाप महिलेला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जीव गमवावा लागला. ही केवळ एक साधी अपघात दुर्घटना नसून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे घडलेला बळी आहे. वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे संगमनेरकरांचा संयम आता सुटला असून, शहरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (P.W.D.) कार्यकारी अभियंत्यांना…
आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचे कौशल्याने केलेले काम वरिष्ठांच्या पसंतीस पडेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. आर्थिक बाबतीत नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, परंतु कोणताही घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आज मनात प्रसन्नता राहील आणि मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात चांगल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. मित्रांशी झालेली भेट मनाला नवीन उभारी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि डीजेच्या कर्कश आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून उद्या, बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळेत संगमनेर बस स्थानक परिसरात भव्य ‘महामेळा व महावादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे संगमनेरमधील ढोल-ताशा पथकांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या आनंद पर्वाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात शहरातील नामांकित पथकांतील ७५० हून…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या प्रस्तावावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये संगमनेर आणि अकोले तालुक्यातील उपद्रवी घटकांवर संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजूर, घारगाव आणि आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह दोन्ही तालुक्यांच्या सीमा क्षेत्रात प्रवेश मनाई (तडीपारी) करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा मनाई आदेश १३ सप्टेंबर २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेर उपविभागीय पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. संगमनेर शहर, तालुका आणि अकोले परिसरातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सात जणांवर अहिल्यानगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सिन्नर व जुन्नर तालुक्यांतून ६ महिने ते २ वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. सण-उत्सवांच्या काळात परिसरात दंगा-धोपा, शस्त्रांचा वापर आणि गुन्हेगारी कारवाया करून कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिले होते. त्यानुसार संगमनेर उपविभागातील माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम…
Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कंटेनरखाली चिरडून सुमया मतीन तांबोळी (वय 40) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संगमनेर शहराला बाह्यवळण रस्ता उपलब्ध असतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात ट्रक, कंटेनर आणि इतर अवजड वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल जोशी परिसर ते जोर्वे नाका, तीन बत्ती चौक ते दिल्ली नाका या मार्गावर यापूर्वीही मोठ्या वाहनांच्या अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासोबतच ख्रिस्ती समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (१९ सप्टेंबर) दुपारी २ वाजता हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पक्षाच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी दिली. या परिषदेमध्ये ख्रिस्ती समाजावर आणि प्रार्थना स्थळांवर येणारे निर्बंध, चर्चना बजावण्यात आलेल्या नोटिसा, अल्पसंख्याक समाजावरील अन्याय-अत्याचार आणि धार्मिक संस्था चालविण्याच्या संविधानिक हक्कांवर सविस्तर मंथन केले जाणार आहे. संविधानाने नागरिकांना…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. मिथुन- आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरेल. संवादातील गोडव्यामुळे बिघडलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, पण घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. संध्याकाळच्या वेळी…
