Author: Annant Ppangarkar
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२५ तब्बल २९१ कोटी रुपयांच्या नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातून बँकेच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून काय माहिती समोर येते हे लवकरच समजणार आहे. डोळे याला पुण्यातून गुरुवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिराने त्याला नगरमध्ये आणण्यात आले होते. आर्थिक घोटाळा प्रकरणी राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व त्या पाठोपाठ आलेल्या फॉरेनसिक ऑडिटच्या अहवालानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे. यातील काही संचालक, अधिकारी व कर्जदारांना गुन्हे शाखेने अटक केली असून काही अधिकाऱ्यांचे जबाब…
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच कर्जदार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहे. यात संगमनेरमधील तिघा जणांचा समावेश आहे. नगर पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या व उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जामीन मंजूर केलेल्या अमित पंडित याची पत्नी सपना पंडित, मुलगा सात्विक पंडित, भागीदार सत्येंद्र रावत यांच्यासह संजय सारडा व सुशील सारडा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती. या संदर्भात न्यायाधीश सित्रे यांनी गुरुवारी (१३ जून) निर्णय देत पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले. ठेवीदार व तपास अधिकाऱ्यांसाठी ही…
नाशिक शिक्षक मतदार संघासाठी अहमदनगर जिल्ह्यात २० मतदान केंद्र, सर्वाधिक केंद्र संगमनेर, अहमदनगरमध्ये
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी २६ जूनला मतदान होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या मतदान केंद्रातून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात वीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे. सर्वाधिक प्रत्येकी तीन-तीन मतदान केंद्र संगमनेर आणि अहमदनगरमध्ये आहेत. या मतदान केंद्रात सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान पार पाडणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजपाचे विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांचे अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे बघावयास मिळाले. कोल्हे…
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार व नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या भावजय सुनेत्रा पवार यांची शुक्रवारी राज्यसभेवर अजित पवार गटाकडून बिनविरोध निवड झाली. यामुळे आता बारामतीच्या नणंद-भावजयीची जोडी एकाच वेळी राजकारणात दिसणार आहे. नणंद सुप्रिया सुळे लोकसभेत तर भावजय सुनेत्रा पवार राज्यसभेत दिसणार आहे. महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून अजित पवार गटाचा सुनेत्रा पवार यांनी आज दुपारी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु, ३ वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांशिवाय कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध झाली. सुमित्रा पवार…
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारपासून उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतल आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यांनी केली मध्यस्थी… महायुती सरकारमधील मंत्री शंभूराजे देसाई, राणा जगजीतसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी गुरुवारी जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणार्थ जरांगे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती…
गुरुवार दिनांक १३ जून २०२४ नाशिक शिक्षक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर झाली आहे. नाशिकच्या जागेसाठी तब्बल २१ उमेदवार मैदानात उतरले आहे. त्यातच महायुतीत अजित पवार गटाकडून बंडखोरी झाल्याने आता ही निवडणूक चौरंगी बनली आहे. महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माघारीच्या अंतिम दिवशी नाशिकमध्ये येऊन विनंती केल्यानंतर त्यांचे बंधू प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. याच दरम्यान काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांनीही माघार घेतली. मात्र अजीत पवार गटाचे महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीत बंडखोरीचे वारे कायम आहे. असे असले तरी नाशिकमध्ये शिंदे सेनेचे किशोर दराडे,…
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ संगमनेरच्या उपनगरातील मालदाड रोडवरील रहिवासी असलेला तरुण महेश अरुण पडघलमल (वय ३४ वर्षे) हा गाडीवर क्लीनर म्हणून गुजरातमध्ये गेला. तो अंकलेश्वर येथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्या कुटुंबीयांनी अंकलेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. सात दिवसांचा कालावधी उलटून देखील अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. महेश पडघलमल हा मालवाहतूक गाडीवर क्लीनर म्हणून काम करत असून सोमनाथ माधव सातपुते याच्याबरोबर तो ३ जूनला गुजरातच्या अंकलेश्वर येथे गेला होता. मात्र पाच तारखेला तो बेपत्ता झाल्याची माहिती सोमनाथ सातपुते यांनी महेश पडघलमल याच्या घरी दूरध्वनी करून कळविली होती. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने अंकलेश्वर येथे जात…
गुरुवार दिनांक १३ जून २०२४ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली इर्टिका कार सोडून देण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लाच लुचपत विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी, तक्रारदाराविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची इर्टिका कार जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली कार सोडून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ठाकूर याने प्रथमत: पंधरा…
गुरुवार दिनांक १३ जून २०२४ वेतनश्रेणीच्या फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला नगरच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. श्रीमती संगीता नंदलाल पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव आहे. नगरच्या श्रीरामपूरमध्ये लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हेडमास्तरला शेजारच्या बीड जिल्ह्यात पकडले होते त्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील मुख्याध्यापिकेवर लाचेची कारवाई झाली आहे. तक्रारदाराची पत्नी श्रीरामपूरच्या सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा अनुदानित असून तक्रारदाराच्या पत्नीला २०१५ ते २०२२ या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम…
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ अहमदनगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे मात्र बियाण्यांची खताची साठेबाजी, लिंकिंग होत असेल तर शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या मोफत टोल फ्री क्रमांकावर किंवा ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करत तक्रार करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बुधवारी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले यांच्यासह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निविष्ठांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकऱ्यांना अडचण…
बुधवार दिनांक १२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे चित्र अस्पष्ट झाले असून निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या मैदानात २१ उमेदवार राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. निवडणूक घडविण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना संधी देण्यात आली असून ॲड. संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. याशिवाय भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे अपक्ष…
विशेष प्रतिनिधी / मुंबई काश्मीर आणि मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्यानं घेणार माहिती नाही. आता तरी ते मणिपूरला जाणार का? मागील आठ दिवसात तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय. याला जबाबदार कोण? जरी केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असलं तरी काश्मीरमधील हल्ले काही थांबत नाहीत? काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतरसुद्धा लोकांचे जीव जात आहेत. याकडे केंद्र सरकार गांभीर्यानं का बघत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मणिपूर मुद्यावर एक वर्षानंतर सरसंघचालक मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. एक वर्षानंतरही मणिपूर अजून धुमसतंय. परंतु केंद्राकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. मात्र…
विशेष प्रतिनिधी / मुंबई प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बीड लोकसभा निवणुकीच्या मतदानात महायुतीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी केलेल्या मदतीमुळे आपल्याला यश मिळू शकले, या विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या दाव्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. अशात बजरंग सोनवणे यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा आहे, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. आमचे नेते शरद पवार यांच्या कुशल नेतृत्वाने माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्या संस्थांवर शासनाच्या विविध विभागाकडून छापे टाकण्यात आले असून शासनाची विविध पथके कोपरगावात कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांची चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांची गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग आदींसह शासनाची विविध पथके या संदर्भात चौकशी करत असून कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने ही कारवाई झाल्याचे…
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याच्या कारणावरून प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांच्या निलंबनाला काही तास उलटत नाही तोच आता विधान परिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्ष विरोधी काम करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून कारवाई सत्र सुरू झाले आहे. गावंडे पाठोपाठ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन…
बुधवार, दि.१२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी दाखल केलेल्यापैकी तब्बल १५ जणांनी माघार घेतली असून यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील या दिग्गज उमेदवारासह काँग्रेसच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २१ उमेदवार उरले असून या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक मतदार संघासाठी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतली. यात मंगळवारी चौघांचा तर आज ११ जणांचा माघार घेणाऱ्यात समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीत आता महाविकास आघाडी कडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ उत्तरप्रदेशमधून संगमनेरमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीकडून एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार समोर आला असून पकडलेल्या आरोपीने सुरुवातीला पोलिसांना खोटे नाव सांगून तक्रारदार व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपले खरे नाव पोलिसांना सांगितले. प्रकाश रामनरेश निसाद (रा. पावबाकी रोड, संगमनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, ४२ वर्षीय पीडित महिला वेडसर असून ती आपल्या आईसह शहराच्या उपनगरात राहते.…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेली टोळी संगमनेर पोलिसांनी बुधवारी पहाटे पकडली. टोळीतील चौघेजण पोलिसांच्या हाती लागले तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. बबलू अनिल निकाळे (रा. आंबेडकर नगर, राहता) याच्यासह तिघा अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश असून रितेश सदाफळ व बुट्ट्या सदाफळ (दोघे रा. गणेश नगर, राहता) अशी पसार झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील अमरधाम जवळील एका चिंचेच्या झाडाच्या आडोशाला पोलिसांना संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला मात्र त्यापैकी चौघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. तर दोघे पसार झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून…
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या सचिवाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. प्रदेश काँग्रेस सचीव प्रशांत गावंडे यांच्यावर ही कारवाई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने करण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. बुधवारी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी पटोले यांच्या आदेशावरून गावंडे यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहे.
बुधवार दिनांक १२ जून २०२४ संगमनेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशाल संपत बोऱ्हाडे (रा. माधवनगर, राजापूर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो पसार झाला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा विशाल बोऱ्हाडे याने गैरफायदा घेतला. मुलीला त्याच्या घरी घेऊन जात त्याने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. ४ जून संध्याकाळी…
