Author: Annant Ppangarkar

एखाद्या सत्तेसाठी इतके लाचार झालेले पोलीस महाराष्ट्राने आजवर कधीच पाहिले नाहीत. यंत्रणा जेव्हा अशी लाचार बनते तेव्हा लोकं रस्त्यावर उतरतात. कायदा हातात घेतात. मग त्यांना दोष द्यायला सत्ता मोकळी असते. बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राला हेच दाखवून दिलं आहे. सत्तेचा माज आणि मी म्हणजे सत्ता, अशा तोर्‍यातील सरकारची लाज अखेर उच्च न्यायालयाला काढावी लागते, याचा अर्थ ज्यांनी त्यांनी घ्यावा. पण काळ सोकावतो तेव्हा जे घडायचं ते घडतं आणि राज्य वेठीस धरलं जातं. एका पोलीस अधिकार्‍याच्या मुर्खपणाची ही फळं महाराष्ट्र भोगतो आहे. उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले म्हणून हे थांबेल अशा भाबड्या मनस्थितीत कोणी राहू नये. कारण न्यायालयाला गृहित धरणारे सरकारमध्ये आणि सरकारच्या…

Read More

आजचे राशीभविष्य रविवार २५ ऑगस्ट २०२४ मेष— कर्म करत रहा. विजय तुमचाच आहे. आज मनातील गोष्ट कुणालाही सांगु नका. वृषभ— जोडीदार समजुतदारपणा दाखवेल. नवीन वास्तु प्रवेशाचा योग. मिथुन— बुद्धिवादात अग्रेसर रहाल. हुशारीने आज आर्थिक फायदा वाढवत रहाल. कर्क— आज खिसा पाकीट सांभाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आज कोणालाही जामीन राहू नका. सिंह— वादावादीत जिंकण्याचा दिवस. आज कामानिमित्ताने दिवसभर प्रवास घडेल. कन्या— पत्नीबरोबर वादावादी होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कटकटीचा दिवस. तुळ— अतिशय आनंदी दिवस. मानसन्मान वाढविणारा दिवस. दुपारनंतर मात्र निराशावादी व्यक्तीच्या भेटीमुळे उदासी जाणवेल. वृश्चिक— बाहेरचे खाणे टाळा. पोटदुखीने हैरान व्हाल. आर्थिक विवंचनेचा दिवस. धनु— आज एखादा जमिनीचा व्यवहार यशस्वी…

Read More

★ आठवडाभरात अत्याचाराच्या अनेक घटना ★ राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत  ★ कायदा व सुव्यवस्था ढासळली  ★ बदलापूर प्रकरणात मंत्रालयातून दबाव होता काय?  ★ संस्थाचालकांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला  ★ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन तर दुसरीकडे त्यांचे रक्षण करण्यास सरकार अपयशी  ★ मंत्रालय टक्केवारीत गुंतले  ★ राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप चुकीचे शनिवार, २४ ऑगस्ट  गेल्या आठवडाभरात महिला, मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. प्रशासनाचा धाक राहिला नसून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा…

Read More

शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी राज्यात महाविकास आघाडीने सरकार विरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरविल्याने मविआने निषेध आंदोलन केले. संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी बस स्थानक चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मौन आंदोलन केले. त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात सहभागी झाले होते. बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची…

Read More

शनिवार, २४ ऑगस्ट जमिनीचे कायदेशीर निर्वाणीकरण झालेले  नसताना न्यायालयाला अंधारात ठेवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि तथाकथित  लाभार्थ्यांनी संगनमत करून संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावातील राखीव वन जमीनीचे वाटप करून टाकण्याचा बेकायदेशीर प्रताप करून ठेवला असल्याचा आरोप करीत, इतर शेतकऱ्यांचे, वनविभागाचे, पर्यावरणाचे त्यामुळे नुकसान होत आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या प्रधान सचिवांना त्वरित चौकशी करून दहा दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील राखीव वन जमीन (रिझर्व फॉरेस्ट)…

Read More

शनिवार, २४ ऑगस्ट  बदलापूरसह राज्यात आणि देशात घडत असलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ संगमनेरमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेत, तोंडाला काळी पट्टी बांधून बस स्थानकासमोर ११ वाजता करणार आंदोलन करणार आहे. महिला अत्याचाराविरोधात समाजातील जनभावना लक्षात घेत महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. मात्र या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत बंदला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने देखील बंद बेकायदेशीर ठरवत बंद करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. भारतीय न्यायव्यवस्था संविधानिक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून शनिवारचा बंद…

Read More

शनिवार, २४ ऑगस्ट  गणेशोत्सव ईद-ए-मिलादसह आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत व एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, म‍हापालिका आयुक्‍त डॉ. यशवंत डांगे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भरती यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते. जिल्‍हाधिकारी सालीमठ म्‍हणाले, सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई शनिवार, २४ ऑगस्ट महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही तयारी केली जात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाहून पहिलं लक्ष्य हे युतीचं सरकार पदच्युत करणं हे पाहिलं ध्येय असेल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नाहीे, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्रीपदाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला…

Read More

जाणून घ्या… आपलं शनिवारच (२४ ऑगस्ट) राशिभविष्य मेष— राशीस्वामी आज स्वस्थानी असल्याने अचानक धनलाभ दर्शवतो. स्वतःचा इगो बाजुला सारुन आपले काम करुन घ्या. वृषभ— व्ययातील चंद्र आज प्रवासामधुन आर्थिक लाभ दर्शवतो. आज आपण अतीशय हुशारीने समोरच्याकडून आपले काम करुन घ्याल. मिथुन— व्ययातील गुरु मंगळ हर्षल अतीशय मेहनत करायला लावेल तर अन् तरच आपले आज कल्याण होईल नाहीतर अपमान होण्याचीच शक्यता जास्त आहे. कर्क— कर्मस्थानी असलेला राशीस्वामी आज मेहनतीचा पुरेपूर मोबदला मिळवुन देईल. सिंह— व्ययातील बुध व धनातील केतु कोर्ट कचेरीच्या कामात अडकवून ठेवतील. पुर्वी केलेल्या चांगल्या कर्मामुळे आज कोर्ट केसमधून सुटकारा मिळेल. कन्या— आज अपमानित होण्याचा दिवस. साठविलेले पुण्य आज…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट  नाशिक रोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाल्याने या जल कुंभावरून उपनगरात होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यातच भोजापूर धरण भरल्यामुळे म्हाळुंगी नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीला मंगळवारी पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे नाशिकरोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. संगमनेरकर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेने या जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. लिकेज झालेली…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट महाराष्ट्र बंद संदर्भात मुंबई हायकोर्टाचा निर्णय समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील बडे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पवार यांनी यासंदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर ही भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले, सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. X वर पवार यांनी म्हटले आहे की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट  कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने दिले आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बंदच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने धक्का देणारा निर्णय देताना बंद बेकायदेशीर ठरवला आहे. मुंबई हायकोर्टाने निकाल देतांना म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शनिवारी (२४ ऑगस्ट) महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत ठाकरे नेमकं काय म्हणाले…

Read More

डिजिटल प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करून घेण्याचे शिर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन शुक्रवार, २३ ऑगस्ट शिर्डी – महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला वितरीत केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे (रा. कोपरगाव) यांचेविरूध्द भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६६, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट नाशिक – नाशिकच्या पंचवटीत पोलीस पुत्राच्या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चौघांना पकडले असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे २५ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव आहे. पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे (२५) आणि भावना कदम (३९) यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी…

Read More

आजचे राशीभविष्य शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४ मेष— बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थीक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ— रागावर नियंत्रण ठेवा. आज सर्व काम संथगतीने होतील. आज वाहन सांभाळा, चोरी होण्याची शक्यता. मिथुन— जितका लाभ तितकाच खर्चिक दिवस. चिडचिड, संताप यावर नियंत्रण ठेवा. कर्क— अतिशय फायदेशीर दिवस. जिथे जाल तिथे तुमचा सत्कार केला जाईल. भावबंदकीपासुन चार हात लांब रहा. सिंह— अतीशय प्रेमळ आपुलकीने जपणारी व्यक्ती आज आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करु नका. कन्या— रडका, रडविणारा दिवस. मित्रांपासून सावध रहा. पैशाचे व्यवहार करु नका. तुळ— मामाकडुन आर्थिक भेट मिळण्याचा दिवस. जे बोलाल ते खर होणारा दिवस,…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. बदलापूरच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना तीन पक्षांच्या युती सरकारच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचं वास्तव पुढे आलं आहे. बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही असं उघडपणे बोललं जातं. आजवरच्या अशा घटना भाजपाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग असल्याने गुन्हे दाखल करताना पोलीस आखडतं घेत असल्याच्या तक्रारी केल्या जातं होत्या. …

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट ‘हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो,’असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी गुरुवारी पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आरोपींचा येरवडा जेलमधील मुक्काम वाढला आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी, ‘ससून’च्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड हे सर्वजण सध्या येरवडा कारागृहात आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या सर्व आरोपींनी जामीनासाठी…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट  बदलापूर येथील नामांकित शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांतील सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र सीसीटीव्हीसाठी निधी न देता शिक्षण विभागाकडून शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे केवळ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. त्यातच शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदेही भरली जात नसल्याने, त्यासाठीही निधी दिला जात नसल्याने शाळांतील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बदलापूर येथील घटनेनंतर आता शाळांमध्ये विशाखा समितीची स्थापना, सीसीटीव्ही प्रणालीची सद्य:स्थिती याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागवण्यात येत आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शिक्षण विभागाने २०१६ मध्ये दिले…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट नगर : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी वृद्धाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीत ज्याचा खून झाला त्याची पत्नी, फिर्यादी व पुतण्या असे दोन साक्षीदार फितूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. दिनकर अण्णाजी गव्हाणे (६५, अल्हणवाडी, पाथर्डी, नगर) या वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. दिनकर गव्हाणे व त्याचा भाऊ मधुकर गव्हाणे या दोघांमध्ये शेतीच्या कारणावरून भांडण झाले होते. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी…

Read More