Author: अनंत पांगारकर

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशा वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले “वाकचौरे आता थांबणार नाहीत” हे विधान केवळ एक राजकीय टिप्पणी नसून आगामी राजकीय समीकरणांचे संकेत देणारे ठरले आहे. राजकारणात नेत्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती यालाही अनेक अर्थ असतात. मंगळवारी (२ जून) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना छेडले असता त्यांनी केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दलचे वक्तव्य यामुळे चर्चांना अधिक उधाण आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. ३० मे) पार पडलेल्या या शिबिरात ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ११८ कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जयपूर फूट, कृत्रिम हात आणि अत्याधुनिक ‘LN-4’ प्रोस्थेटिक हातांचा समावेश होता. या आधुनिक कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांना दैनंदिन कामे करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला एक नवी बळकटी मिळाली आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर, मुंबईचे रत्ननिधी फाऊंडेशन आणि रियांश मल्टिट्रेड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला लाभार्थी आणि संगमनेरकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेविका रचना मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या आपण कौशल्याने पार पाडाल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहील, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक क्षेत्रात केलेले जुने प्रयत्न आता यश देऊ लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली आर्थिक कामे मार्गी झाल्याने मनातील मोठी चिंता दूर होईल. व्यवसायात भागीदारांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील आणि नवीन योजनांवर काम सुरू करता येईल. समाजात मानसन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत घालवणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील ऐतिहासिक सर डि.एम. पेटीट हायस्कूल परिसरातील कष्टकरी भाजी विक्रेत्यांवर संगमनेर नगर परिषदेने अचानक केलेल्या या एकतर्फी आणि अन्यायकारक भूमिकेविरोधात संगमनेर नगर परिषदेतील एकमेव विरोधी शिंदे गटाच्या शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी थेट रस्त्यावर उतरत अनोखे आंदोलन केले. सर्व भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी स्वतः सोबत भाजीपाल्याची पाटी घेतली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. यावेळी नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात जोरदार निषेध घोषणा दिल्या. या गांधीगिरी आंदोलनाने लक्ष वेधून घेतले असून, जोपर्यंत प्रशासनासोबत सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत पालिकेने पुढील कोणतीही कारवाई थांबवावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी संगमनेर नगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनाकडून अन्न भेसळविरोधी विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून, या अंतर्गत राहुरी आणि नेवासा तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न विभागाचे सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिली आहे. या मोहिमेदरम्यान राहुरी येथील ‘शिवशक्ती आईस्क्रीम’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. तेथून ‘शिवशक्ती’ ब्रँडच्या गुलकंद आणि अमेरिकन नट्स आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. हे आईस्क्रीम दर्जाहीन असल्याच्या संशयावरून प्रशासनाने ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स जप्त केले आहेत. दुसऱ्या कारवाईत नेवासा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुरोगामी विचारांचे खंदे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि दीर्घ योगदानाची दखल घेऊन हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात येत आहे. येत्या ४ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डॉ. तांबे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पेशाने एम. एस. सर्जन असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी केवळ वैद्यकीय सेवाच केली नाही, तर संगमनेरचे नगराध्यक्ष पद सांभाळताना पालिकेच्या कारभाराला एक…

Read More

संगमनेर/पारनेर : पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील एका ४० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डोलनर वस्तीवरील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. २) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सुरुवातीला महिलेची ओळख पटली नव्हती. मात्र काही तासांच्या तपासानंतर मृत महिलेची ओळख जिजाबाई काशिनाथ जाधव (वय ४०, रा. मांडे बुद्रुक, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी पटली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संबंधित महिला विहिरीत कशी पडली, हा अपघात आहे की आत्महत्या अथवा अन्य काही कारण आहे, याबाबत…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदार मिळतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आज नको त्या वादात पडणे टाळा, अन्यथा मानसिक त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील अवैध व्यवसायांवर आणि अतिक्रमणांवर प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर नगर परिषद आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या तब्बल सात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून ते पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, कादरी नगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष मोहिमेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेने वेदांत वाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. मद्य खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हा मार्ग शहरातील प्रमुख व वर्दळीचा असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. तसेच काही मद्यधुंद व्यक्तींकडून परिसरात गोंधळ घालण्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या…

Read More