Author: Annant Ppangarkar

संगमनेर – सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या विखे घराण्याचा पक्ष बदलांचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे दल बदलून प्रसिद्ध असलेल्या मंत्री विखे यांनी पक्षनिष्ठेबाबत इतरांना न शिकविता स्वतः आत्मपरीक्षण करावे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या जिवावर मोठ्या झालेल्या विखेंनी ज्या आईने वाढविले तिला शिव्या देण्यासारखे काम केले असल्याचे टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. दिवटे म्हणाले, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा वेगवेगळ्या पक्षांचा प्रवास करणाऱ्या विखेंनी पक्षनिष्ठा किंवा विचार याबाबत राज्यात कुठेही बोलू नये. कारण पक्षबदलूमध्ये राज्यात पहिला क्रमांक हा विखे घराण्याचा लागतो. २०१९ पर्यंत भाजपा व मोदी यांच्यावर विखे टीका करत होते मात्र असा त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज…

Read More

संगमनेर – तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे श्रीक्षेत्र देवगड यात्रे निमित्ताने शनिवारी (ता. २४ फेब्रुवारी) सारंगखेडा नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्व बाजार, अश्व प्रदर्शन व अश्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, सारंगखेडापाठोपाठ संगमनेरमध्ये होत असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार आहे. प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष असून या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आमदार विनय कुलकर्णी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जयहिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, हिवरगाव…

Read More

एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक-एक छानस चॉकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली. मुलांनो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो. तोपर्यंत तुम्ही तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत, असे सांगून ते शिक्षक वर्गातून बाहेर गेले. नंतर वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येक मुल त्याच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत:ला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला. आणि आपण वर्गात वाटलेल्या चॉकलेटचा आढावा घेतला. संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि त्याच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत…

Read More

मुंबई :- नासिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या रेखांकनात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून यामुळे या मार्गाच्या अंतरात देखील मोठी वाढ होणार आहे. संगमनेर मार्गे जाणारी ही रेल्वे आता शिर्डीहून जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या रेखांकनात कोणत्याही स्वरूपाचा बदल नको. रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याप्रमाणेच संगमनेर मधील मेला जावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रश्नात तांबे यांनी लक्ष घातले आहे. हाय स्पीड रेल्वेचे घोंगडे गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडले असून आता या मार्गात सत्ताधाऱ्यांकडून नव्यानेच पुन्हा बदल सुचवत ही हायस्पीड…

Read More

संगमनेर – राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुधवारी (ता. २१ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्या दरम्यान विखे यांच्या हस्ते म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पूलाच्या कामासाठी भूमिपूजन होत आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या या पुलाचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी म्हाळुंगी पूल बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उपोषणकर्त्यांवर प्रशासनाकडून दडपशाही सुरू असून उपोषणकर्त्यांचा मंडप हटविण्यात आला आहे. पूलासाठी आवश्यक निधीची उपलब्धता न करता सुरू असलेल्या विकास कामांचा निधी संबंधित काम बंद करून या पुलासाठी वर्ग करण्यात आला आहे. पूलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता…

Read More

अहमदनगर – सोनईजवळ चर्चच्या धर्मगुरूने दोन अल्पवयीन मुलींच्या अंगात सैतान आल्याचे सांगत या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी मंगळवारी पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच सोनई पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना पुढील तपासा संदर्भात सूचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रूपवते यांनी बालिका आणि महिलांवर होणारे अशा प्रकारचे आघात संतापजनक असल्याचे सांगत अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या व झाल्या प्रकाराने हादरलेल्या पीडित गरीब दोन्ही अल्पवयीन मुलींना लवकरात लवकर जिल्हा बालकल्याण समिती पुढे नेण्याचे व संरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.…

Read More

नाशिक – पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच स्वतःच्या डोक्यात सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अशोक नजन (वय ४० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव असून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. नजन काल रात्री शिवजयंतीचा बंदोबस्त करून उशिरा घरी परतले होते. सकाळी साडेनऊ वाजता अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या नजन यांनी आपल्या केबिनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या हजेरी मास्टरच्या लक्षात आला. नजन…

Read More

संगमनेर – शहर आणि लगतच्या उपनगरांना जोडणारा तसेच गंगामाई घाटाकडे जाणारा स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल खचून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. स्थानिक नागरिकांसह संगमनेरकर पूल दुरुस्तीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे, मात्र या पुलाचे बांधकाम भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळेच रखडल्याचा व नागरिकांच्या त्रासाला पालकमंत्री विखे पाटीलच जबाबदार असल्याचा आरोप संगमनेर नगर परिषदेतील माजी युवा नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे. या संदर्भात कलंत्री म्हणाले, ऑक्टोंबर २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली. या पुलाच्या बांधकामासाठी निधी…

Read More

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ‘एक्स’द्वारे आभार मानले आहे. तांबे सोमवारी संगमनेरमध्ये असताना त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुचार केला. शिक्षक बांधवांना विद्यार्थांना ज्ञानदान करण्याचं काम सोडून इतर शिक्षणेत्तर कामांत जुंपवल्यास हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ही भूमिका मी वारंवार मांडत आलो आहे. आज राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा शिक्षक बांधवांच्या या मागणीला दुजोरा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार ! काय म्हणाले तांबे… ऐका व्हिडिओ… जे विद्यार्थी उद्याचा उज्ज्वल भारत घडवणार आहेत, त्यांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असलेल्या शिक्षक बांधवांना ज्ञानदानाचं सोडून इतर कामांतून कायमस्वरूपी दिलासा…

Read More

संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संगमनेर नगर परिषदेच्यावतीने सालाबाद प्रमाणे, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपालिका रांजणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत संगमनेरमधील विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांसह नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालिकेतील कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. प्रारंभी नगरपरिषद प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संगमनेरचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे,…

Read More

संगमनेर – समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच आदर्श लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे अभिवादन जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी होते. तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव, लोकशाही, गरिबांचे कल्याण ही शिकवण दिली. समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले. स्वाभिमानाची शिकवण दिली. बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे…

Read More

नवी दिल्ली – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून ३१ मार्च २०२४ पर्यंत घालण्यात आलेली कांद्यावरील निर्यात बंदी अखेर केंद्र सरकारने मागे घेतली आहे. त्यासोबतच मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. (MSP) एमएसपीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्यातीला मंजूरी देण्यात आली. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. मात्र सरकारने त्याआधीच निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय…

Read More

संगमनेर – नामांकित कंपनीच्या नावाने बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून संगमनेर पोलिसांनी ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त केले आहे. संबंधित विक्रेत्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. शहरातील सय्यद बाबा चौकात असलेल्या भारत स्टील नावाच्या दुकानात स्वयंपाक घरात नेहमीच वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीसाठीच्या बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. संबंधित ठिकाणी शनिवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून यासंबंधी खात्री करण्यात आली. बनावट ग्राहकाने रेग्युलेटर खरेदी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकानाची झाडाझडती घेतली…

Read More

येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवरून पाठविण्याचा संकल्प करा: काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही: काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचाराने अर्थव्यवस्थेची पिछेहाट: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोणावळा – काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर लोणावळा येथे पार पडले. या शिबिरात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार, आजी-माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार व…

Read More

प्रवीण पूरो (मुंबई) सार्वजनिक वा व्यक्तिगत जीवनात माणसाने स्वत:बरोबरच समाजासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं भले वाटत असेल. इतर प्राण्यांकडून तशी अपेक्षा नसते. उलट अनेकदा हे प्राणी मालकाशी इमान राखतात. माणूस नावाचा प्राणी हा त्याला सर्वाधिक अपवाद ठरतो. गेल्या काही काळापासून आपल्या राज्यात राजकीय उलथापालथीची प्रकरणं हाताळली की माणसाची बेईमानी किती खोलवर पोहोचलीय ते कळून येतं. या बेईमानीची झलक राजकारणातले एक प्यादे बनलेले अशोक चव्हाण यांच्याकडून नुकतीच राज्यातल्या जनतेला पहायला मिळाली. देशाचं भलं करण्यासाठी म्हणे ते भाजपत प्रवेश करते झाले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान चव्हाण यांच्याविषयी काय बोलले? चव्हाण यांच्यावर कोणत्या भाषेत कोरडं ओढलं? हे सार्‍यांनी ऐकलं. त्याच मोदींच्या…

Read More

संगमनेर – सहकार विभागाच्या छापेमारीत संगमनेर तालुक्यातील साकुर येथील दोन सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्त्वाचे दस्त लागल्याचे बोलले जाते. सावकाराच्या सततच्या तगाद्याला कंटाळून साकुरमधील एका दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आणि ही कारवाई झाली. सहकार खात्याचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पथकांनी राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे (रा. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्या दोघा सावकारांविरोधात सावकारी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आले आहे. यासंदर्भात साकुर येथीलच संगीता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्याने सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी बुधवारी (१४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी…

Read More

मंचर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतला. या भीषण अपघातात पेटत्या कारमधील तिघांचा होळपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे हा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्टकार जागीच जळून खाक झाली. यामुळे या गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून बचावले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मंचर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने…

Read More

संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात सोमवारी (ता. १९ फेब्रुवारी) साजरी केली जाणार आहे, अशी माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी दिली. सोमवारी सकाळी नगर परिषदेच्या प्रांगणात नऊ वाजता संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साडेनऊ वाजता मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. नगरपरिषदेच्या प्रांगणातून सुरू होणारी ही मिरवणूक शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येणार…

Read More

संगमनेर – महिला भगिनींचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. दुर्दैवाने ज्या महिला भगिनींवर एकलपणाचे दुःख आले, त्या सर्वांना आधार देत त्यांना आदर व सन्मान देण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांनी केले. स्वर्गीय नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने संगमनेर खुर्दमध्ये श्रीमती रोहिणी गुंजाळ यांच्या पुढाकारातून एकल महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे एकल महिलांना आवळा व जांभूळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होत्या. रोहिणी गुंजाळ यांच्यासह सरपंच श्वेता मंडलीक, जयश्री शिंदे, रोहिणी कदम, स्वाती गोसावी, दिपाली गडगे, श्रीमती पवार मॅडम यांच्यासह सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. थोरात म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती…

Read More

संगमनेर – दरोड्यासह विविध प्रकारच्या चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संगमनेरमधील विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर याला संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी सहा महिन्यांसाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर (रा. पंपिंग स्टेशन संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन आणि घारगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध स्वरूपाचे तब्बल नऊ गुन्हे दाखल असून यामध्ये दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, जखमी करणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव संगमनेर…

Read More