Author: अनंत पांगारकर

संगमनेर – भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे हे दोघेही पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तित्व पुढच्या अनेक पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल असे आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले. रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, पुरस्कारार्थी माजी मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संभाजीराव कडू यांच्यासह शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे आमदार…

Read More

संगमनेर – आनंदी आणि उत्साही कार्यक्रमात आपले चेहरे खुललेले दिसत नाही. या चेहऱ्यावर जे हास्य आणि आनंद असायला पाहिजे तो आनंद मला कुठेतरी कमी दिसतो. कदाचित काही लोकांना आपली चूकही मान्य झाली असेल. आकाश देखील ज्यांच्या कर्तुत्वाला गवसणी घालेल असे काम भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे. झाड वाढवायला, जगवायला त्याला सातत्याने पाणी द्यावं लागतं. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रात काम करतो. भाऊसाहेबांनी लावलेले हे झाड कधी सुकू देऊ नका, या झाडाला सातत्याने पाणी देत राहा, असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व…

Read More

संगमनेर – आपला सहकार, आपलं संगमनेरच जग, सहकाराचे विश्व तीर्थरूप भाऊसाहेबांनी मनापासून रक्ताचे पाणी करून वाढविल आहे. ते पुढच्या कालखंडात काळजीपूर्वक जपण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे. हे लक्षात ठेवावे लागेल. काही मोडण्याचे प्रयत्न नक्की होतील. काही शक्ती असं काम करतील, पण त्यांना कोणत्याही पद्धतीचा थारा न देता आपल्याला हा सहकार, तालुका, राजकारण पुढे न्यायच आहे. त्याकरता तुम्ही सर्वांनी या स्मृतिदिनी भक्कमपणे निश्चित राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, असं आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात…

Read More

श्रीरामपूर – लोकहक्क फाउंडेशन श्रीरामपूरच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ज्येष्ठ पत्रकार स्व.अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना जाहीर झाला असल्याची माहिती लोकहक्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार लहू कानडे व समन्वयक माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांनी दिली. लोकहक्क फाउंडेशनच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून स्व. अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार देण्यात येते आहे. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी दै.लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक मोहनिराज लहाडे व दुसऱ्या वर्षी दै. सार्वमतचे वृत्तसंपादक अशोक गाडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यंदा श्री. लंके यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी, ता. १६ जानेवारी रोजी सकाळी ११.३०…

Read More

राज्यातील महायुतीचं सरकार सत्तेवर बसून महिना उलटत नाही, त्याआधीच सरकारपुढच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणार्‍या आंदोलनांनी सरकार बॅकफूटवर असताना आता नितेश राणेंसारख्या मंत्र्यांमुळे सरकारच्या नाकातली नथ जणू जड होऊ लागली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना नाकीनऊ आलेल्या युतीला मोठ्या फरकाने विजय मिळाला खरा, पण तो आनंद फारकाळ टिकला नाही. मंत्रिपदाचं वाटप, त्यानंतर खातेवाटप, पुढे बंगले वाटप या वाटपांनी होता तो आनंदही झोकाळून गेला. सरकार मोठया फरकाने सत्तेवर आल्यावर यापुढे बदला नव्हे तर बदल घडवणारं सरकार देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कधी नव्हे ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजिवांनी फडणवीसांची भेट घेऊन आणि…

Read More

स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची व समाजकार्याची आवड होती. त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचे वातावरण स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेले होते. देश स्वतंत्र्यलढ्यासाठी एकवटला होता. सर्वच तरुण देश प्रेमाने आणि देशासाठी त्याग करण्याच्या उद्देशाने भारावून गेले होते. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात भाऊसाहेबांनी भाग घेतला त्यावेळेस त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते. अत्यंत साहसी व धाडसी वृत्तीने त्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. मात्र आजच्या तरुणांना असे वाटते आहे की राजकारण हे आपले क्षेत्र नाही परंतु असे नाही चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले राजकारण गरजेचे असते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाऊसाहेबांनी डावी व साम्यवादी विचारसरणी जोपासत…

Read More

अहिल्यानगर – शेअर ट्रेडिंग व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिर्डी येथील सेवानिवृत्त व्यक्तीची ‘कांचन’ नावाच्या महिलेने सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात कांचन नावाच्या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० सह आयटी ॲक्ट कलम ६६(ड) नुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीमध्ये संबंधित कांचन नावाच्या महिलेचा व्हाट्सअप नंबर नमूद करण्यात आला आहे. समाज माध्यमातील शेअर ट्रेडिंगच्या माहितीवरून संपर्कात आलेल्या अनोळखी महिलेने ही फसवणूक केली आहे. फिर्यादी महावितरण विभागातून सेवानिवृत्त झाले असून शिर्डीतील रहिवासी आहे. फसवणुकीचा हा प्रकार १२ एप्रिल २०२४…

Read More

अहिल्यानगर – युवतीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या तरूणासह त्याला मदत करणाऱ्या पती-पत्नीविरोधात अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या संदर्भात नगर शहरातील पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. रोहिदास तुपे (रा. मातुलठाण, ता. श्रीरामपूर), हर्षदा तुपे व अभिषेक कानडे (दोघे रा. वळणपिंप्री ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हर्षदा व अभिषेक पती-पत्नी असून त्यांनी फिर्यादी युवतीची रोहिदाससोबत ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो फिर्यादीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. रोहिदास वारंवार फिर्यादी युवतीला त्रास देत होता. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहे.

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उडी घेतली आहे. यामुळे पोलीस आणि सीआयडी तपासाची सारी माहिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला द्यावी लागणार आहे. खा. बजरंग सोनावणे यांनी दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मस्साजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. संतोष देशमुख कुटुंबीयांना मदत मिळवून देणेबाबत आयोगाला त्यांनी विनंती केली. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोश देशमुख यांची महिन्याभरापूर्वी म्हणजेच ९ डिसेंबरला अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा आपल्या पद्धतीने सर्व…

Read More

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले. या खटल्याची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वाद सातत्याने माध्यमांत चर्चिला जातो. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा…

Read More