Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी जोरदार आवाज उठवला. संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची गरज याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार खताळ यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये पोलीस निवासस्थानांच्या दुरवस्थेचा प्रश्न अत्यंत कळीचा ठरला. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, ज्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वीही हा प्रश्न शासनासमोर मांडूनही अद्याप ठोस आर्थिक तरतूद न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…
आजचे सविस्तर राशिभविष्य: शुक्रवार, १३ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल आहे, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ आज आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे जाईल. अनावश्यक…
संगमनेर, प्रतिनिधी – सध्या समाजामध्ये वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच सामाजिक बांधिलकीतून शनिवारी (दिनांक १४ मार्च) एकविरा फाउंडेशन, इंडियन कॅन्सर सोसायटी आणि एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवतींसाठी विशेष मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली असून जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – देशात सध्या निर्माण झालेली भीषण गॅस टंचाई आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केंद्र सरकारवर कडक टीका करत तातडीने दरवाढ कमी करण्याची मागणी केली. संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, प्रमिला अभंग, पद्माताई थोरात, राजू…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील प्रलंबित विकासकामे आणि म्हाळुंगी नदीच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर संगमनेर नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा संयम सुटला. बुधवारी सकाळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक शैलेश कलंत्री आणि योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनातच जोरदार ठिय्या आंदोलन केले. तर दुसरीकडे, विरोधी शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात केल्याने, ‘आंदोलनाशिवाय प्रशासन हलत नाही का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील प्रलंबित कामे आणि म्हाळुंगी नदीच्या किनाऱ्यावर साचलेली प्रचंड अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार निवेदने देऊनही मुख्याधिकारी दाद देत नसल्याचा आरोप करत नगरसेवक कलंत्री आणि जाजू आक्रमक झाले. “अधिकारी…
संगमनेर, प्रतिनिधी- राज्यभरात सध्या घरगुती गॅसचा संभाव्य तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी होताना दिसत असून, यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने पुढाकार घेत राज्य शासनाकडे विशेष उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गॅस वितरणातील विस्कळीतपणा आणि एजन्सीबाहेर उसळणारी गर्दी यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, संतापलेल्या जनतेमुळे सार्वजनिक शांतता भंग…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संगमनेर परिसरात ६.६५ कोटींचा गंडा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर, प्रतिनिधी- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते ११ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील सुमारे ६० ते ६२ नागरिकांची ६ कोटी ६५ लाख ३९ हजार ८३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील फिर्यादी योगेश रामदास जऱ्हाड (रा. आश्वी बु।।, ता. संगमनेर) यांना त्यांचे मित्र राहुल शिंदे आणि ओळखीचे विजय काळे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले होते. ‘अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा.लि.’ आणि ‘प्रथम वेल्थ मॅनेजमेंट’ या कंपन्यांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळेल, असे…
संगमनेर: विशेष प्रतिनिधी संगमनेर शहर, तालुका ग्रामीण, घारगाव आणि आश्वी या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या तपासात मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जात असून, तपासाच्या नावाखाली केवळ धूळफेक सुरू आहे की काय, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीने तरुणाईला विळखा घातला असतानाच, आता या संपूर्ण काळ्या धंद्यात चक्क खाकीचाच वरदहस्त असल्याचे समोर आले आहे. यातून जिल्हा पोलीस दलातील एलसीबीच्या एका कर्मचाऱ्याला तुरुंगात जाऊन निलंबनाला तर दोघांना गुटखा प्रकरणी बदलीला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, विधानसभेत आमदार अमोल खताळ व काशिनाथ दाते यांनी अहिल्या नगर जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न लावून धरल्यानंतर पोलीस…
संगमनेर, प्रतिनिधी – मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील पाणी प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. निळवंडे धरण आणि भोजापूर पूरचारी योजनेचा लाभ न मिळालेल्या गावांच्या व्यथा त्यांनी सभागृहात मांडल्या. विशेषतः सायखिंडी, चिकणी आणि परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून सिंचना अभावी शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आमदार खताळ यांनी या भागासाठी उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. ग्रामीण भागातील ही तीव्र पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेमुळे केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा…
आजचे सविस्तर राशिभविष्य: गुरुवार, १२ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. घरात मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी…
