Author: Annant Ppangarkar
शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटीकरण थांबवा थांबविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह संघटनांचे पदाधिकारी उतरले रस्त्यावर… शिक्षणाची प्रयोगशाळा थांबवा- आमदार तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णयाविरोधात संगमनेर तालुका समन्वय समितीच्यावतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्यावतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय असा विराट जनआक्रोश मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. यामध्ये विधान परिषदेचे युवा आमदार सत्यजित तांबे, माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज समन्यायी पाणी वाटपाचे तत्व हे तत्कालीन काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरविले गेले होते. हे तत्व आपल्याला देखील मान्य नसल्याने या विरोधात सर्वप्रथम संगमनेरनेच आंदोलने करीत आवाज उठविला असल्याचे स्पष्ट करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचा प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि व्हाट्सअपसारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात वाहवत जाऊ नका. यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट आणि बुद्धिमत्तेला पर्याय नाही. म्हणूनच आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा, असा सल्ला प्रेरणादायी वक्त्या व समुपदेशक डॉ. एकता वाबळे यांनी दिला. येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकूसा हायस्कूल येथे ‘नव्या युगाच्या नव्या दिशा’ या व्याख्यानावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे होते. वाबळे म्हणाल्या, आपल्या मनाला दररोज सकारात्मक सूचना द्या आणि जीवनात चांगले बदल घडवून आणणाऱ्या माणसांविषयी आणि परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभासी सामाजिक माध्यमांच्याद्वारे चांगलेही घेता येते तेवढेच घ्या. स्क्रीन टाईम कमी करा. आपण जे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचे उदाहरण समोर आले आहे. पोलिसांच्या तपासाअभावी एका खून प्रकरणाचा उलगडा होण्यास विलंब लागत असल्याने मृत व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींची लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणीसुद्धा केली आहे मात्र तरीही पोलिसांना अद्यापही खुनी सापडला नसून यामुळे पोलिसांचे अपयश उघड झाले आहे. फक्त गुन्हे दाखल करून पुढील तपासात काहीही निष्पन्न होत नसल्याचे प्रकार अथवा निष्पन्न न करण्याचा निष्काळजीपणा संगमनेर पोलिसांकडून होत आहे. यात संगमनेर उपविभागातील सर्वच पोलीस…
आर्थिक गुन्हे शाखा चार संचालकांची आज करणार चौकशी महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर आदर्श सहकारासाठी राज्यात दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकाराला कलंकित करणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि अन्य काही राजकीय प्रतिष्ठित आरोपी पोलिसांना सापडत नसतानाच आता आता आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेच्या चार संचालकांना गुरुवारी (ता. १९ ऑक्टोंबर) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस धाडली आहे. या चारही संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यात संगमनेरमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संचालक राहिलेल्या सर्वांनाच राजकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर आरोपींना अटक होत नसल्याने, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला असतानाच आता या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याने त्याने आता अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद हायकोर्टात धावपळ सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील कर्जदार आरोपी देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल दोन महिन्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर ठेवीदारांनी सुरू केलेले जन आक्रोश आंदोलन व उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच होते. दूधगंगा अपहार प्रकरणी मुख्य 15 आरोपींसह…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी (ता. 20 ऑक्टोंबर) सकाळी 10 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई थोरात यांच्या हस्ते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे. काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 10 लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. शेतकरी,सभासद,…
खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे डिवायएसपी कमलाकर जाधव, पी.आय. बाळासाहेब राठोड, पी.आय. शेख, शहर पी.आय. भगवान मथुरे, पी.एस.आय. बाळासाहेब यादव, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमोल वाघमारे, सदस्य नवनाथ बोडके यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर नगर जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि इतर आरोपींना अटक करावी या प्रमुख मागणीसह ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने संगमनेरचे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी शिर्डी…
रविवार विशेष लेख महाराष्ट्र संवाद न्यूज @ प्रवीण पुरो आजवर देशातील विधानसभेच्या अर्थात कायदेमंडळाच्या एकाही अध्यक्षाला सुनावलं नसेल असे खडेबोल महाराष्ट्राचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. मुस्कट फुटेल अशी टिपण्णी करत सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांचा पुरता पारा उतरवला आहे. नार्वेकर हे स्वतः पेशाने वकील आहेत. वकिली पेशा जसा त्यांना कळतो तशी वकिली भाषाही त्यांना कळते. पण कधीकधी वकीलही वाह्यात वागतात. अशिलही कंटाळतो. नार्वेकर वकील असताना त्यांना इतके बोल खावे लागतात याचा अर्थ त्यांच्या एकूणच वर्तनाची चिकित्सा व्हायला हवी. पिठासनावरचा वकील तर त्याहून पुढची पायरी चढतो. तिथे बसला की अध्यक्षाला वाटतं मीच हायकोर्ट आणि मीच सुप्रीम. आपल्याला पंख…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : गरबा हा फक्त डान्स आणि इव्हेंट नाही तर देवीची भक्ती आणि श्रद्धा असल्याचं सांगत विहिंपने इतर धर्मियांना या ठिकाणी येण्यास विरोध केला आहे. दांडिया आयोजनात फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजित करणाऱ्या मंडळांकडे केली आहे. दारावर आधारकार्ड तपासण्यासाठी कार्यकर्ते नसल्यास विहिंपचे कार्यकर्ते उपलब्ध करून देऊ आणि पोलिसांनाही आम्ही बोलवू असं विश्व हिंदू परिषदेने सांगितलं आहे. गरबा उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्यावे, त्यासाठी गरबामध्ये येणाऱ्यांची आधार कार्ड तपासण्यात यावीत अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून…
महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी (14 ऑक्टोंबर) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला. डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी महसूलमंत्र्यांचे निळवंडे येथे आगमन झाल्यावर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट जमीनीवर बसून चर्चा केली. कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. यावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर : दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे यांच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण सुरू केले आहे. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही आरोपी अटकेत असून काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तात्काळ माहिती दिली नाही याचा राग येऊन ग्रामसेवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या आरोपीस संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, तालुका अकोले) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. करंडे गावचे ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे, पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे सर्व ग्रामपंचायत करंडी येथे कार्यालयात दैनंदिन काम पहात होते. रोजगार हमी योजनेचा फेर सर्व्हे करावयाच्या असल्याने कृषी सहाय्यक अनिल फापाळे यांच्यासोबत या सर्वांना जायचे होते. त्याचवेळी गावातील दत्तात्रय…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे… शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला हॅप्पी हायवेवर आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाला असून संगमनेरकरांच्या आनंदात भर पडली आहे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व संगमनेरकरांनी एकत्र येत हॅप्पी हायवेचा लोकार्पण सोहळा भर पावसात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. यामध्ये शहरातील बालक, नागरिक, युवक, युवती, महिलांनी अत्यंत आनंदाने सहभागी होऊन रस्त्याच्या दुतर्फा सजावट करून सर्वांनी रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात व भर पावसात फटाक्यांच्या आतिषबाजीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये झुम्बा डान्स, लेझीम, कबड्डी, लावणी नृत्य, पारंपारिक ड्रेपरी, तायकोंदो ,रांगोळी अशा विविध स्पर्धांमधून अनेकांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण मागितले, मात्र हॉटेल मालकाने जेवण दिले नाही या कारणावरून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, वॉचमन यांना मारहाण करून हॉटेलमध्ये गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक करीत हॉटेल मालकाची सोन्याची चैन आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या चौघा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे डमाळे व दीपक रणसुरे (पूर्ण नाव पत्ते माहित नाही सर्व रा. संगमनेर) अशी चौघा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघा जणांविरोधात हॉटेल व्यवसायिक अंकुश सुरेश अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 394, 452, 427, 323,…
गोवंश कत्तलीसाठी कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याचे शेड केली नेस्तनाबूत! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांनी लक्ष घातलेले बेकायदेशीर कत्तलखाने आता चोरी-चुपके सुरू आहेत. अशाच एका कत्तलखान्यावर बुधवारी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे पोलिसांना आढळून आले. तब्बल तीन हजार किलो गोवंश जनावरांच्या कत्तल केलेल्या मांसासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याची शेड प्रथमत:च या कारवाईमध्ये नेस्तनाबूत करण्यात आली आहे. पोलिसांच्या शेकडो कारवायानंतर देखील सुरू संगमनेर मधील कत्तलखाने सुरूच…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे यांच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदार-खातेदार शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण करणार आहे. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावच्या शिवारात एका बेकायदेशीर डिझेल विक्री केंद्रावर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा सोमवारी टाकण्यात आला. या छाप्यात या डिझेल पंपाच्या माध्यमातून अवैधरित्या, असुरक्षित अवैध चोरटी डिझेल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नासिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी शिवारात असलेल्या हॉटेल पांडुरंग समोर एका बंद ढाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. नासिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ‘संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज’ या हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र हा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद…
