Author: अनंत पांगारकर
गुरुवार, ३१ ऑक्टोबर मुंबई – राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली. महाविकास आघाडी महायुती सह सर्वच पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असले तरी बंडखोरांचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. बंडोबांचे बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाने आपल्या चोवीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे पक्षाचे हे स्टार प्रचारक असलेले नेते विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात सभांच्या माध्यमातून मैदान गाजवत महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील. सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या तोफा मैदानावर धडकणार असून ठाकरेंची शिवसेना देखील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेनेने राज्यभरात ९० हून अधिक उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठी आता राज्यात शिवसेनेचे दिग्गज नेते स्टार…
गुरुवार, ३१ ऑक्टोंबर संगमनेर – मराठा आरक्षण आंदोलनाने चर्चेत आलेले आणि लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत देखील निर्णायक ठरणार असल्याचे चिन्ह आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले दत्तात्रय रावसाहेब ढगे हे जरांगे यांचे उमेदवार असतील. छात्र भारती संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राज्य स्तरावर काम करणारे, सातत्याने व्यवस्थेची झगडणारे ढगे विधानसभा निवडणुकीत उतरले असून संगमनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात, सत्ताधारी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना फाईट देतील. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ढगे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी एक सर्वसामान्य…
दीपावली नरक चतुर्दशी, आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – कुटुंब परिवारातील मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. एखादा जवळचा प्रवास सहकुटुंब सहपरिवार करू शकाल. वृषभ – व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. काही नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. सार्वजनिक तसेच सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल. मिथुन – आपल्या रोजच्या जीवनातील दैनंदिन कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण कराल. जमिनी विषयक किंवा स्थावर मालमत्तेच्या विषयक असलेले व्यवहार गतिशील होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कर्क – आजचा दिवस अनुकूल जाईल. महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या. वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांची शक्यता असल्यामुळे वादग्रस्त बाबींवर…
बुधवार, ३० ऑक्टोबर विशेष प्रतिनिधी / मुंबई सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात अजित पवारांची खुली चौकशी करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी फाईलवर सही केल्याची माहिती उघड करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात राज्यपालांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. खासदार राऊत म्हणाले, आर. आर. पाटील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती…
बुधवार, ३० ऑक्टोंबर विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसात १६ जणांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आता पंधरा उमेदवार शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात, महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ, वंचित बहुजन आघाडीचे अजीज व्होरा, वंचित बहुजन आघाडीचे योगेश सूर्यवंशी आधी प्रमुख उमेदवारांचा यात समावेश आहे. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासमोर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. या छाननीमध्ये अल्ताफ इब्राहिम शेख या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. या उमेदवाराचे अफिडेव्हीट अपूर्ण होते.…
बुधवार, ३० ऑक्टोंबर अहिल्यानगर – निवडणूक आयोगाने अकोले आणि संगमनेर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय प्रशासन सेवेतील हौलीनलाल गौईटे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निरीक्षक हौलीनलाल गौईटे यांच्याशी ८७८८४९१६४१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार असून त्यांना शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे सकाळी ११ ते ११.३० या वेळेत भेटता येईल. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे कार्यकारी अभियंता प्रदिप हापसे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७३५००७८८७७, ९९७०६२४०३५ असा असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
प्रवीण पूरो | मुंबई राज्यातील आदर्श राजकारणी समजल्या जाणाऱ्या तत्कालीन उप मुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जोरदार हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला. भाजपने सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांवर आरोप करत रान उठवलं होतं. मात्र, सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्यासाठी आर. आर. पाटील यांनी फाइलवर सही केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. हा केसानं गळा कापण्याचा धंदा आहे, असं सांगत अजितदादांनी आर. आर. आबांचे तासगावातील राष्ट्रवादीचे काँग्रसचे (अजित पवार) संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) उमेदवार म्हणून आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी अर्ज भरला आहे.…
आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – एखादी महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंद द्विगुणित होईल. उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभाचे योग. वृषभ – एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल. मिथुन – व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल. जुने मित्रमंडळी भेटतील. काही महत्त्वाचे नियोजन करू शकाल. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते. कर्क – अनेकांशी सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल. सिंह…
मंगळवार, २९ ऑक्टोबर संगमनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाखेर १६ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात, महायुतीकडून अमोल खताळ, वंचित बहुजन आघाडीचे अजीज व्होरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश सूर्यवंशी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीकडून संगमनेरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली असून या जागेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या विठ्ठल घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे. नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या…
मंगळवार, २९ ऑक्टोबर संगमनेर – सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. ती मी स्वीकारली नाही. शिंदे गटाची जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली होती परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रामाणिक सैनिक असल्याने मी या ऑफर नाकारल्याने विखे यांनी रागातून माझ्यावर सूड भावनेतून कारवाई केली असल्याची टीका शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. अमर कतारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु मी एकनिष्ठ शिवसैनिक असलेले ती ऑफर नाकारली. काही दिवस गेल्यानंतर लोकसभेच्या काळामध्ये मला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर…
