Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअपसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात घडली. दरम्यान काही वेळानंतर पोलीस पथकासह पिकअपचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये जवळच कासारवाडी मध्ये आढळून आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अधिक माहिती अशी, महेश रतीलाल पंचाळ हा वाहन चालक पिकअप घेऊन गुजरातहून नासिक-पुणे मार्गाने कर्नाटकला जात असताना सोमवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिकअप घेऊन गुंजाळवाडी शिवारातून उड्डाणपूल पास करून जात असताना लघुशंकेसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अशी घटना घडली, तेव्हा सर्वांनी त्यांना सांभाळून घेतले होते, त्यामुळे विरोधकांनी आळंदीतील प्रकरणावरून राजकारण करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरून रविवारी आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. तर वारकऱ्यांवर कोणताही लाठीहल्ला करण्यात आलेला नाही, असे राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संगमनेरमध्ये देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने सरकार विरोधात सोमवारी सकाळी निषेध आंदोलन केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त १२ ते २६ जूनपर्यंत ‘नशामुक्ती भारत पंधरवडा’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत जिल्हाभर व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली आहे. भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त ‘भारत’ चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ जाहीर करून त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अंमली…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -रविवारी आळंदी येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याविरोधात सोमवारी सकाळी संगमनेरमध्ये शिवसेनेने (ठाकरे) शिंदे-फडणवीस सरकारविरोधात निषेध आंदोलन केले. शिवसेना वारकरी भजनी मंडळाच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ व राजीनामाच्या मागणीसाठी संगमनेर बस स्थानकासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी वारकऱ्यांच्या वेशात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह केलेल्या या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते. रविवारी आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज “तुझा लवकरच नरेंद्र दाभोळकर होणार”, अशी धमकी शरद पवारांना देणाऱ्या सागर बर्वेच्या मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुसक्या आवळल्या आहे. बर्वे ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने फेसबुक पेज चालवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून ही धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. “शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार”, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली. जेवत असताना त्याचे हात…
संगमनेर तालुक्यातील 45019 शेतकऱ्यांना 7 कोटी 72 लाखाचा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून फायदा
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम शंभर टक्के बँकेची वसुली दिली आहे. शून्य टक्के व्याज देण्याच्या जिल्हा बँकेच्या निर्णयातून संगमनेर तालुक्यातील नियमित कर्ज फेड करणाऱ्या 45019 सभासदांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 7 कोटी 72 लाख 21 हजार 749 रू व्याज सवलत मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आदर्श परंपरा लाभलेल्या संगमनेर तालुक्याने जिल्हा बँकेची कायम शंभर टक्के वसुली दिली आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर…
थोरात-कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक – करण ससाणे तुम्हाला गाळप करता आले नाही म्हणून संगमनेर संजीवनी शेतकऱ्यांच्या मदतीला आले – सचिन गुजर महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांचे गणेश कारखान्यावर आणि गणेश परिसरावर विशेष प्रेम होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याने सुवर्णकाळ अनुभवलेला आहे, कोल्हे साहेबांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाच्यावतीने युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोंडेगाव येथे प्रचार बैठक घेतली. बैठकीत बोलताना त्यांनी या निवडणुकी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.…
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्राचा विपर्यास करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम काही रिकामी टाळकी करत आहे भाजपने स्वतःच्या नावाने थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी करावी सकल हिंदू समाज व हिंदू युवकांचे नाव घेऊ नये आम्ही असा कोणताही ठेका संगमनेर भाजपला दिलेला नाही महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिंदू समाजावरील वाढते अत्याचार, महिला, शेतकरी, व्यापारी यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गोरक्षणाच्या मुद्द्यावरून संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट मोर्चा पार पडला. राजकीय पक्ष विरहित हा मोर्चा असल्याने यात सर्वपक्षीय हिंदुत्ववादी पदाधिकारी, कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. मात्र मोर्चाच्या यशस्वीततेनंतर त्याचे श्रेय घेण्याचा तसेच त्याला राजकीय वळण देण्याचा भारतीय जनता पक्षाने केविलवाना प्रयत्न सुरू केला असल्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मानव विकास संस्थेचे संस्थापक वसंत घोगरे यांनी दिली. याप्रसंगी जेष्ठ नेते सहकार महर्षी दिलीप देशमुख, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पद्मश्री तात्याराव लहाने उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज हिरालाल पगडाल साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला. आयुष्यभर अज्ञान, विषमता, पारतंत्र्य याच्याविरोधात संघर्ष करणाऱ्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले. साने गुरुजी क्रांतिकारक होते, लढवय्ये होते, व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते पण त्यांचे व्यक्तिमत्त्व रणझुंजार असतांना, करुणा वात्सल्य नम्रता प्रेम या चौकटीत गुरुजींची प्रतिमा बंदिस्त करण्यात येथील व्यवस्थापती यशस्वी झाले. साने गुरुजी म्हंटले की सगळ्यात अगोदर समोर येते ती म्हणजे श्यामची आई. याच श्यामची आईमुळे साने गुरुजींची प्रतिमा मातृहृदयी अशी निर्माण झाली. आजही मराठी सारस्वतात श्यामची आई हेच सर्वाधिक लोकांनी वाचलेले पुस्तक आहे. आचार्य अत्रेंनी १९५२ साली श्यामची आई…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | ज्ञानेश्वर गायकर देशाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन कार्यकारी अध्यक्ष मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देऊन अन्य खासदारांना काय जबाबदारी देता येईल, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली असली तरी, संघटनात्मक जबाबदारीमध्ये अजित पवार यांना कोणतेही स्थान मिळाले नाही. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी ह्या सर्व बाबींचे स्वागत केले आहे. पुढे अजितदादाच राज्याचे मुख्यमंत्री असणार हेही पवारसाहेबांनी अधोरेखित केले. याबद्दल मीडिया, अंध भक्त आणि घाणेरडा आयटी सेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो, मुंबई सारं काही माझ्यामुळेच घडतं. विश्वाचा निर्माता मीच, अशा अहंकारात वावरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार बालासोरच्या भीषण रेल्वे अपघाताने लोप पावला तर चांगलंच. पण घमेंडी माणसाची देहबोली तसं होऊ देत नाही. शाबासकी घ्यायची असेल तर मी आणि संकट आलं की दुसर्याला पुढे करण्याची हिकमत मोदींनाच शोभते. इतरांच्या ती अंगलट आली असती. स्वातंत्र्यानंतर आजवरच्या भीषण अपघातातील एक अशा बालासोरच्या तिहेरी रेल्वे अपघाताने हाह:कार माजला नसता तर नवलच. या घाताने भारत सरकारचा, सरकार चालवणार्या भाजपचा आणि भाजपचं नेतृत्व करणार्या मोदी-शहांच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटला. तरी निर्लज्जासारखी ही माणसं लोकांना फसवताहेत. भाजप सत्तेच्या…
नासिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यात सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत तरुणांना विनंती केली आहे की… बघा व्हिडिओ
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या आ. बाळासाहेब थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी असल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, अमोल खताळ, गोकुळ दिघे, राहुल दिघे, राहुल भोईर, बापूसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जोर्वे आणि पंचक्रोशीतील गावांमधून संगमनेर शहरात येणाऱ्या शेतकरी, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना होत असलेल्या त्रास तसेच संगमनेर मध्ये सुरु असलेले लव्ह जिहाद प्रकरणे, लँड जिहाद, पोलिसांवरील हल्ले, नुकतेच जोर्वे गावातील शेतकरी यांच्यावर झालेला हल्ला या त्रासाची स्वाभाविक प्रतिक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही वर्षात संगमनेर गांजा विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी नगर-कल्याण हायवेवर ओतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक करताना संगमनेरातील दोघांना पकडले आहे. यातून गांजाचे पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले. सिद्धार्थ किशोर टेकाडे (वय ३१ वर्ष, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर) आणि संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७ वर्ष, रा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाजवळ, संगमनेर) अशी पोलिसांनी गांजासह पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. नगरच्या दिशेकडून कल्याणकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती ओतूर पोलिसांना समजली होती. आळेफाटा पास झाल्यानंतर संशयित बोलेरो कल्याणच्या दिशेने मार्गस्थ…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने राजरोसपणे सुरूच आहेत. याच कत्तलखान्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे सहाशे किलो गोमांस वावी (नाशिक) पोलिसांनी नासिक-पुणे महामार्गावर गोंदे फाटा शिवारात पकडले. समृद्धी मार्गाने हे गोमांस जाण्यापूर्वीच पोलिसांनी पकडत दोघांना ताब्यात घेतले. संगमनेरमधून मुंबईच्या दिशेने एका आलिशान कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना मिळाली होती. नाशिक-पुणे महामार्गावरून सिन्नर जवळील गोंदे फाटा येथील टोल नाक्यावरून समृद्धी महामार्गाने ही कार जाणार होती. मात्र तत्पूर्वीच समृद्धी महामार्गावर चढणाऱ्या रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन जगताप, प्रवीण आढांगळे, भास्कर जाधव, एन. सी. मैंद, रत्नाकर तांबे, शैलेश शेलार आदींनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये मोठी पक्षीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करत त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी पवार यांनी सोपविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी दिल्लीमध्ये वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात पवार यांनी ही घोषणा केली. कार्यकारी अध्यक्षपदी दोघांची निवड करताना या दोघांकडे त्यांनी वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे तर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्षात भाकरी फिरविण्याचे संकेत देणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सोलापूर – समाज माध्यमात अथवा एखाद्या ठिकाणी धार्मिक अथवा जातीय ते निर्माण होईल अशा पोस्ट वायरल केल्यास अथवा वक्तव्य केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन संबंधितास किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना विशेषतः तरुणांना अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या राज्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असून सायबर पोलिसांकडूनही संशयास्पद व्यक्तींच्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरील खात्यांवर वॉच ठेवला जात आहे. सोशल…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना आठ लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या (CBI) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली. त्यात सीबीआयच्या हाती मोठे घबाड लागले. रामोड यांच्या पुण्यातील तीन घरांमध्ये सुमारे तब्बल ६ कोटी रुपयांची रोकड सीबीआयच्या हाती लागली आहे. हाती लागलेली रक्कम मोजण्यासाठी मशीन आणण्यात आले होते. अनेक तासानंतर हे पैसे मोजून झाले आहेत. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील घरातच १४ स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली आहेत. रामोड यांच्या बँक खात्याची तपासणी अद्याप बाकी आहे. स्थावर मालमत्ता ही रामोड…
