Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नैराश्याचा रंग हा काळा असून हे नैराश्य दूर करण्यासाठी स्वतः प्रकाशमान व्हा. स्वतःमधील गुण ओळखून प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार केल्यास नवनिर्मिती होईल आणि हाच सकारात्मक विचार तुमच्या जीवनात यश मिळवून देईल, असा मौलिक विचार आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी दिला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सवात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, आध्यात्मिक व कार्पोरेट प्रबोधनकार डॉ. पंकज गावडे, युवा व्याख्याते गणेश शिंदे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले: काँग्रेस पक्षात आता परत नको, झाला अन्याय आता ठीक आहे, पक्षापेक्षा सामाजिक कार्य करून युवक, पदवीधर, बेरोजगारासाठी कामं करू, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी करीत काँग्रेसमध्ये परत जाण्याचा मार्गाला पूर्णविराम दिला. कळस बुद्रुक येथे आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अर्थ, बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रिपाईचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक आण्णासाहेब ढगे, वीज कामगार पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम वाकचौरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेरमधून विविध कंपन्यांचे बिस्किटांचे बॉक्स घेऊन आळेफाटाच्या दिशेने जाणारा टेम्पो नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारामध्ये आडव्या जाणाऱ्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटल्याने टेम्पोसह बिस्किटांचे नुकसान झाले आहे. नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव नजीक माहुली गावच्या शिवारात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी देखील टेम्पो चालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चालक या अपघातातून बचावला. विलास श्रीपती मांजरे (रा. मांजरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हा आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये संगमनेरमधून विविध कंपन्यांची बिस्किटे घेऊन गुरुवारी रात्रीच्या वेळी आळेफाटाच्या दिशेने जात असताना रात्री नऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचं निदान होतं. तर, दर आठ मिनिटांना एका महिलेचा त्यामूळे मृत्यू होतो. इतर कोणत्याही कॅन्सरपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण आपल्या देशातील महिलांमध्ये वाढलं आहे. त्यामुळे याबाबत वेळीच जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. हे शिवधनुष्य शिक्षक पेलू शकतील, असे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ व संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. एकता वाबळे यांनी केले. येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर यांच्यावतीने सर्व वयोगटातील महिलांमधील कॅन्सरचे मोफत निदान या मार्गदर्शन शिबिरात डॉ. वाबळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हीलच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संध्या खेडेकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरला असून आज ‘केजी टू पीजी’ अशा अमृतवाहिनीतील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मेधा महोत्सवात रंग भरले. अमृतवाहिनीच्या मेधा मैदानावर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी आमदार सत्यजित तांबे, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी एका तक्रार अर्जाद्वारे शिवसेनेचे संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी शहर पोलिसांकडे केली आहे. काळे यांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने राऊत यांच्यावर शहर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रार अर्जाच्या माध्यमातून त्यांनी राऊत यांच्या विरोधात खोटी तक्रार करणे, खोटया गुन्हयामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणे, बदनामी करणे, राजकीय पक्षांमध्ये द्वेष भावना, तेढ व वैमनस्य निर्माण निर्माण करण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या माध्यमातून राज्यातील विकासाच्या दिशा स्पष्ट झाल्या असून, भविष्यात महसूल विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या सहकार्याने सर्व सुविधा ऑनलाईन पध्दतीने भर देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘अर्ज एक दाखले अनेक’ ही योजना सुरु करण्याचा निर्धार करण्यात आला असून, पानंद आणि शिव रस्त्यांबाबत कालबध्द कार्यक्रमाची अंमबजावणी करण्याचा निर्णय झाला असल्याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोणी येथील महसूल विभागाच्या दोन दिवसीय परिषदेचा समारोप झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून परिषदेत झालेल्या निर्णयांची माहीती माध्यमांना दिली. विखे पाटील म्हणाले, जमीनींच्या मोजणीसाठी आता रोव्हर पध्दतीचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसूली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’वर राबवाव्यात. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर इतिहासातील थोर पुरुष नायक हे युवकांसाठी सदैव आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पेमगिरी गडावर गेले असून अहमदनगर जिल्हा हा कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा आहे. या भूमीत होत असलेला अमृतवाहिनीचा हा मेधा महोत्सव उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवणारा असल्याचे गौरवउद्गार पानिपतकार व आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले . अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने मेधा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह अमृतवाहिनीच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, तुळशीनाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मॅनेजर प्रा. व्ही. बी. धुमाळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र सरकारने ही मान्यता द्यायला पाच महिने उशीर केला त्यामुळे लाभ क्षेत्रातील कामे रखडली, उशिरा का होईना सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार. मात्र आता तरी निळवंड्याच्या विरोधकांनी लाभधारक शेतकऱ्यांच्या वाटेत विघ्न आणू नये, असे म्हणत आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे स्वागत केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गतिमान झालेले निळवंडे कालव्यांचे काम शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर खोळंबले होते. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यात अडवून वाहन चालकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यास अकोले पोलिसांना यश आले असून पकडलेले सर्व आरोपी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे असल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते, लखन डेरासिंग माचरेकर, प्रेम विजय वाल्हेकर, प्रशांत मंगलदास गिर्हे (सर्व रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या लुटमार करण्याऱ्या टोळीतील आरोपींची नांवे आहेत. यातील अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. १६ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समशेरपुर येथून ठाणगांवकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी: महसूल विभाग काळानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन करतांना जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, खासदार सदाशिव…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेरमध्ये आरटीओ कार्यालय सुरू करावे, बसस्थानकास हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नांव देण्यास यावे, अशी मागणी संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. काळे यांनी शिंदे यांची भेट घेत दिलेल्या या निवेदनाबद्दल मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने संगमनेर येथे परिवहन विभागाचे कार्यालय होणे गरजेचे असून सध्या आम्हाला परिवहन विभागाच्या कामांसाठी श्रीरामपूर येथे ५५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. तसेच श्रीरामपूर आरटीओ येथे कामाचा व्याप वाढलेला असल्यामुळे बऱ्याच वेळेस संगमनेर येथील नागरिकांची कामे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत रात्री १० वाजल्यानंतरदेखील लाऊडस्पीकर वाजवत कार्यक्रम चालु ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी १० जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुसानिमीत्त १६ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यानंतर १७ फेब्रुवारीच्या रात्री पावणेदोन वाजेपर्यत सय्यदबाबा चौकामध्ये कव्वालीचा कार्यक्रम सुरू होता. वास्तविक रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर वाजवू नये, तसेच कार्यक्रम ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांनादेखील या आदेशाचे उल्लंघन झाल्याने याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचीन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमजद इब्राहीम पठाण उर्फ अन्नु व त्यांचे सहकारी, अफताप अमीनोद्दीन शेख, मुदस्सरअली मुस्ताकअली जहागीरदार, अन्सार मकबुल सय्यद,…
अनंत पांगारकर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क यापूर्वी असलेली दक्षिण-उत्तर अशी शहरप्रमुखांची विभागणी आता पक्षाच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असून विद्यमान दक्षिणचे शहराध्यक्ष प्रसाद पवार यांना पदावरून मुक्त करण्यात आले असून शहराचे संपूर्ण जबाबदारी अमर कतारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आठव्यांदा संधी मिळालेले कतारी शिवसेनेचे नवे शहर प्रमुख असतील. पवार यांच्यासह तालुकाप्रमुख असलेले जनार्दन आहेर यांना देखील पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागेवर नवे तालुका प्रमुख म्हणून भाऊसाहेब हासे आणि संजय फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फड यांना पठार भागाचे तालुकाप्रमुख म्हणून तर हासे यांना उर्वरित संपूर्ण तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. मुंबईतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयाकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई शिर्डीचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली निवडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला तत्कालीन जिल्हाप्रमुखांकडून हरकत घेण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात रखडलेल्या नियुक्त्याना अखेर मुहूर्त लाभला आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले तर काहींना थेट घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे नव्या निवडींना पक्षात महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत असताना शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्यांना देखील उत आल्याने अंतर्गत कलह माजला होता. यातून मार्ग काढण्याचे मोठे आव्हान पक्ष नेत्यांसमोर होते. अखेरीस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या नियुक्त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवी दिल्ली २०२३ च्या संसद रत्न पुरस्कारांची नामांकने मंगळवारी जाहीर करण्यात आली. यात देशातील तेरा खासदारांचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चौघेजण आहेत. तेरा खासदारांमध्ये आठ खासदार लोकसभेचे असून उर्वरित पाच खासदार राज्यसभेवर आहेत. येत्या २५ मार्चला या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संसद रत्न पुरस्कारांच्या निवडीसाठी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या निवड समितीने १३ खासदारांची नामांकने जाहीर केली. नामांकने मिळालेल्या लोकसभेतील खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी, कुलदीप राय शर्मा, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, हिना गावित,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर येथील प्रसिद्ध उद्योजक, मालपाणी उद्योग समुहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यात डोळ्यांसंदर्भात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या रोटरी क्लब संगमनेर संचलित रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी तब्बल २५ लाखांची मदत मालपाणी परिवाराने जाहिर केली आहे. उद्योजक संजय मालपाणी यांनी ही मदत मालपाणी परिवाराचे वतीने जाहिर केली. मालपाणी परिवाराने दिलेली ही मदत ओपीडी व्हॅनच्या स्वरुपात असणार आहे. ही व्हॅन अत्यंत आधुनिक असून सर्व साधनांनी युक्त अशी असणार आहे. यामुळे आता गावोगावी जाऊन तिथेच रुग्णांना तपासता येणार आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही हे सांगता येणार आहे. याआधी डोळ्यांची तपासणी करून निदान करण्यासाठी नेत्र रुग्णांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर आपल्या अधिकारांसाठी आपण रोजच संघर्ष करतो, मात्र जेव्हा इतरांच्या अधिकारांची रक्षा हे आपल्याला कर्तव्य वाटू लागते त्यावेळी आपण विजयाच्या मार्गावर अग्रेसर होतो. मालपाणी परिवारात सामाजिक बांधिलकी व अनेक सद्गुणांचे दर्शन पदोपदी होते. या परिवाराचे नेतृत्व करणारे राजेश मालपाणी स्वाध्यायशील उद्योगपती आहेत. त्यांच्या सानिध्यातून आपलीही दृष्टी अधिक व्यापक बनली आहे. अशा प्रकारचे अनमोल रत्न लाभणे ही संगमनेर व परिसरासाठी परमेश्वराची मोठी देणगीच असल्याचे गौरोवोद्गार राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी सोमवारी काढले. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त जाणताराजा मैदानावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोमवारी ‘रामायण’ या महानाट्यांच्या सादरीकरणाने समारोप झाला. यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे पिंपरी चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच निवडणूक आयोगाकडून भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघासाठी रविवारी पोट निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोर जाव लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने या दोन्ही पोट निवडणूक प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही जागा बिनविरोध न झाल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे. भाजप सोबतच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या दोन्ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रचारात उतरले आहे.…
