Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले: कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे व हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्यभर बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सध्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसैनिकांना आगामी संघर्षासाठी सज्ज करण्यासाठी शिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची तोफ या सभेत धडाडणार असून, त्यांच्या झंझावाती मार्गदर्शनामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे. ही सभा मंगळवारी, (२ जून) दुपारी बारा वाजता शिर्डी येथील एअरपोर्ट रोडवरील ‘साई किमया गार्डन लॉन्स’ येथे पार पडणार आहे. या सभेला माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, भंडारदरा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील पांजरे नाक्यावर काजवे महोत्सवासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. येथील टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना, ‘माझ्या मुलाला का थांबवले’ या कारणावरून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले लक्ष्मण बांगर आणि त्यांचा मुलगा साई बाळू बांगर यांनी वनरक्षक चंद्रकांत भरत तळपाडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांजरे नाक्यावर वाहनांची तपासणी आणि शुल्क आकारणीचे काम सुरू असताना एमएच ०५ ईक्यू २६५१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एक्सएल-६ कार तेथे आली. या कारच्या डॅशबोर्डवर ‘पोलीस’ अशी पाटी आणि लाल-निळ्या रंगाचा एलईडी लाईट लावलेला…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु जोडीदारासोबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि मानसन्मान लाभेल. घरातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि वातावरण शांत राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात जाईल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहाता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असणाऱ्या चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून एमबीए (MBA) शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा अंत झाल्याने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पुण्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर, घटनेच्या २८ दिवसांच्या आतच न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात ‘प्राईमा फेसी’ (प्रथमदर्शनी) सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आता या खटल्याची सुनावणी दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, लैंगिक चाचणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रियकराने केलेल्या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल सांगून लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबाचाही या विवाहाला होकार होता. मात्र, मे महिन्यात अचानक प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगत तिची फसवणूक केली. प्रियकराने केवळ आपला वापर केल्याचे समजल्याने ही तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली होती. भावाने तिला समजावून सांगण्याचा आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि आरोपी नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नाशिकमधून ताब्यात घेतले आहे. जयेश गांगुर्डे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, नुकतीच त्याची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती आणि त्याची नाशिक येथे बदलीही करण्यात आली होती. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी त्याने सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर, पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या संभाषणादरम्यान एक लाख रुपये लाच घेण्याचे तडजोडीअंती निश्चित झाले. दरम्यान,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, त्यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मामासह अन्य १५ नातेवाईकांवर दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईकांवर ११ मे २०२६ रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत होते. या तपासात सहकार्य करण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग येत आहेत. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. अचानक धनखर्च होण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन काळजीपूर्वक करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, पण सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत आनंदात जाईल. मिथुन: आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल.…

Read More