Author: Annant Ppangarkar

लोकशाही प्रणालीतील अनेक संस्था या व्यक्तीमुळे सरस ठरत असतात. तर बदनाम प्रमुखामुळे चांगल्या संस्थाही बदनाम ठरतात. देशाच्या निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं ती उंची केंद्रातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या निवडणूक आयुक्तांनी मातीमोल करून ठेवली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदावर विराजमान झालेला व्यक्ती हा भाजपसाठी दलाली करण्यात मश्गूल बनला असल्याचा आरोप होतो आहे. या आयुक्तामुळे टी. एन. शेषन यांच्या काळातील आयोगाचा मानमरातब कधीच लोप पावला आहे. आपण कोणाला तरी विकलो गेलो आहोत, असा उघड आरोप तरी होऊ नये, असंही या आयोगाच्या आयुक्तांना वाटत नाही. एकाच्या बाजूने निकाल दिला की दुसरा दोष द्यायला मोकळा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries)  आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या कामात शिस्त आणि नियमितता राखणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील प्रश्न सामंजस्याने सुटतील. व्यवसायात काही नवीन सौदे निश्चित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ (Taurus) आज तुम्हाला कामात काही अडथळे जाणवू शकतात, ज्यामुळे मन थोडे उदास होऊ शकते. तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायातील सुधारणांसाठी अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. प्रेम जीवनात काही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. मिथुन (Gemini) आज तुमच्या कामात काही बदल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: सध्या संगमनेर तालुक्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आपल्या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस देण्याचं आवाहन केलं आहे. दूध संघात स्वयंरोजगार केंद्राधिकारी यांचे आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. देशमुख यांनी लम्पी चर्मरोगाची काही प्रमुख लक्षणे सांगितली. जर जनावरांच्या शरीरावर, विशेषतः डोके, मान, पाय, कास, आणि तोंडात २ ते ५ सेमी आकाराच्या गाठी आढळल्यास, किंवा डोळ्यांमध्ये जखमा झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. देशमुख यांनी या वेळी बोलताना शासनाकडेही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ (Taurus): आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. पैशांची आवक वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो. मिथुन (Gemini): आज महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer): आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल. कामाच्या ताणामुळे थोडे अस्वस्थ वाटू शकते. ध्यान आणि योगामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. सिंह (Leo): आज तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | अनंत पांगारकर  संगमनेर – पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये बोलविण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. चर्चेत शांतता समिती संदर्भात मुद्दे उपस्थित झाल्यानंतर गणेश मंडळांमधील वादावरून शाब्दिक गुद्द्याची बाचावाची आणि नेहमीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांवर जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर दोन मंडळांमधील वाद सामंजस्याने मिटणार नसेल तर दोघांनाही परवानगी देऊ नका अशा स्पष्ट सूचना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला दिल्या.  येत्या बुधवारी (२७ ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, शासकीय विभागाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा उपक्रम आहे. या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे.  या पत्रात आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे की मूळ मार्गानुसार नाशिक – पुणे या दरम्यान सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव व राजगुरुनगर अशा भागातून जातो. या सर्व भागांना औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी मिळावी यासाठीच मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीकडे वळविण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हा भाग वंचित राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड यांना लाच प्रकरणी एसीबी ने ताब्यात घेतले आहे. गांजा प्रकरणात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गांजा प्रकरणात तक्रारदाराला आरोपी न बनवता साक्षीदार बनवण्यासाठी सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम १.५० लाख रुपये निश्चित झाली. पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरच्या रोटरी क्लब आणि रोटरी आय केअर ट्रस्टने, दर्शन रोटरी नेत्र रुग्णालया अंतर्गत एक अत्याधुनिक ‘रोटरी डोळ्यांचा फिरता दवाखाना’ सुरू केला आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) मालपाणी लॉन्स येथे एका शानदार कार्यक्रमात या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे, आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या व्हॅनचे अनावरण करण्यात आले. संजय आणि गिरीश मालपाणी यांच्यासह संपूर्ण मालपाणी परिवार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता. प्रकल्प प्रमुख रो. संजय राठी यांनी या फिरत्या दवाखान्याची गरज आणि महत्त्व विशद केले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीवाटपात होणारा भेदभाव आणि मनमानी थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणामुळे पालकमंत्र्यांचे निधी वाटपाचे सर्वाधिकार मर्यादित झाले आहेत. आता निधी वाटपात अधिक पारदर्शकता आणि समानता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवीन धोरणाची गरज का – आतापर्यंत डीपीडीसी निधीचे वाटप पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत होते. अनेकदा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना अधिक निधी मिळतो, तर विरोधी पक्षांच्या आमदारांकडे दुर्लक्ष होते, अशा तक्रारी समोर येत होत्या. यामुळे निधीचा वापर समान आणि योग्य पद्धतीने होत नव्हता. या वाढत्या तक्रारींमुळे सरकारने निधी वाटपाचे नवीन धोरण तयार केले आहे. नवीन धोरणातील प्रमुख बदल पालकमंत्र्यांच्या अधिकाराला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज कामामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल. खर्च जपून करा. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होऊ शकते. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. आज शांत राहणे फायदेशीर ठरेल. सिंह: तुमच्यासाठी आजचा दिवस खूप उत्साहाचा आहे. तुमची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आजच्या शांती मोर्चा नंतर आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदारांवर हल्ला चढवला आहे. जनतेने पराभव करून तुमचा खुळखुळा केला आहे, आता तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, अशी टीका खताळ यांनी केली. तालुक्यातील विकासकामांची घडी बसत असल्यानेच तुम्हाला मोर्चे काढावे लागत आहेत, मात्र जनतेला तुमचे बेगडी हिंदुत्व ओळखता आले आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी निघालेल्या शांती मोर्चानंतर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले यात खताळ यांनी माजी आमदारांवर कटकारस्थानाचा आरोप करत, त्यांच्या स्विय सहायकानेच कीर्तनात गोंधळ घातला आणि आता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधक भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीत नाही, असे ठामपणे सांगत, गरजणारे ढग बरसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तोंडी राम आणि बगलेत सुरी ही भाजपची कार्यपद्धती – या प्रकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “तोंडी राम आणि बगलेत सुरी” ही भाजपची जुनी कार्यपद्धती आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यापूर्वी नथुराम गोडसे त्यांच्या पाया पडला आणि नंतर त्याने तीन गोळ्या झाडल्या, हा इतिहास आहे. आजही भाजप गोडसेच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे होऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला. हजारो नागरिकांनी एकत्र येऊन भव्य शांती मोर्चा काढला. या वेळी, संगमनेरच्या शांततापूर्ण विकासाला खीळ घालू पाहणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची हाक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी  स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, आध्यात्मिक व वारकरी संप्रदाय आणि इतर राजकीय पक्षांच्या वतीने हा भव्य सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. व्यक्तिगत बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाल्याने संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  बाळासाहेब जगन्नाथ रोकडे (वय ३२ वर्ष रा. श्रीरामनगर संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी निर्णय जाहीर करत आरोपीला खटल्यात दोषी ठरविले. १७ मार्च २०१९ रोजी पीडित अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणी मैत्रिणीचे बँकेत काम असल्याचे कारण सांगून तिच्यासोबत संगमनेर मधील युनियन बँकेत गेली होती. मात्र ही घरी न परतल्याने मैत्रिणीकडे चौकशी केली असता…

Read More

महाराष्ट्र सह्याद्री न्यूज ऑनलाईन अकोले: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण अखेर पूर्णपणे भरले आहे. आज पहाटे ३ वाजता धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू – सकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या स्पीलवेमधून ११,४०६ क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी ८५० क्युसेक, असा एकूण १२,२३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याच्या आवकेनुसार, सकाळी ८ वाजता विसर्ग वाढवून २०,७६३ क्युसेक इतका करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाची पूर्ण साठवण क्षमता १०,७६३ द.ल.घ.फू. आहे. धरण भरल्यानंतर, येणारे अतिरिक्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अकोले: अकोले शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो, मटका आणि डॉलर जुगाराच्या अड्ड्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले शहरातील बसस्थानकासमोरील नवले कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या छाप्यात बिंगो, मटका आणि डॉलर या जुगारांचे साहित्य आणि साधने जप्त करण्यात आली. या प्रकरणी नितीन निवृत्ती गायकवाड, अमोल मारुती मोहिते, वैभव राजेंद्र गायकवाड,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ: काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला गती मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. कर्क: तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वैवाहिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये गुरुवारी (२१ ऑगस्ट) एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेरमधील सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, वारकरी संप्रदाय आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाची माहिती देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या कामातून संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही त्यांची संकल्पना राज्यात आदर्श मानली जाते. अशा संयमी आणि सर्वधर्म समभाव जपणाऱ्या नेत्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तथाकथित महाराजाच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आपण तत्वासाठी आणि विचारांसाठी जगणारे असून, नथुराम गोडसेसारख्या व्यक्तीकडून मारले जाण्याची धमकी मिळाली, तर असे बलिदान मी आनंदाने स्वीकारेल, असे विधान थोरात यांनी केले. मी महात्मा गांधी नाही, मात्र विचारांसाठी बलिदान देण्यास तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादानंतर गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर राजकीय वादाने धुमसत आहे. संगमनेरमधील शांततेला गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली असतानाच कीर्तनकार म्हणविणाऱ्या आणि वादाला कारणीभूत ठरलेल्या संदेश भंडारे या महाराजाकडून माजी मंत्री थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर घटनेनंतर संगमनेरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तांबे यांनी समाज माध्यमांवर एक सविस्तर पोस्ट लिहून ही धमकी संगमनेरची सामाजिक घडी आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता असल्या विकृत मानसिकतेचा निषेध करते, असेही त्यांनी म्हटले आहे. राजकीय टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात- आपल्या पोस्टमध्ये सत्यजीत तांबे म्हणतात, ‘संत-महात्म्यांच्या परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यावर टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात. पण स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी…

Read More