Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यंदा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी रब्बी पिकांची उभारणी करणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुधनाचे हित लक्षात घेऊन निळवंडे धरणातून रब्बी हंगामासाठी तसेच जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध होण्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्राला मिळाले होते. मात्र, या पाण्याला जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. दरम्यानच्या काळात परिसरात अपेक्षित पाऊस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी विचार आणि राजकीय प्रवाह एकत्र आणत सहकाराच्या माध्यमातून नवी राजकीय समीकरणे जुळविणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यापासून ते जिल्ह्याच्या अर्थवाहिनीचे नेतृत्व करण्यापर्यंत डॉ. विखे पाटील यांनी केलेला प्रवास या निवडीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. या निवड प्रक्रियेवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र संगमनेरमधील स्थानिक कलाकार अतिशय दर्जेदार सादरीकरण करत असल्याने येथील ‘दिवाळी पहाट गाणी’ हा कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम ठरतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. भंडारी मंगल कार्यालय येथे संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि वाचन कट्टा समूहाच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात ते बोलत होते. या विशेष मैफलीतून दिग्गज कलावंत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना सांगितिक अभिवादन करण्यात आले, तसेच भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त धरणाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली. या सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शिक्षकांची शाळेप्रती असलेली निष्ठा, ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान एकत्र आले, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचाही कायापालट घडू शकतो, याचा आदर्श अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने निर्माण केला आहे. एकेकाळी अवघ्या नऊ विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या या शाळेची विद्यार्थीसंख्या आज समाधानकारक वाढली असून, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधांच्या बाबतीतही शाळेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलग आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या समर्पित कार्याला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थ्यांची भक्कम साथ लाभल्याने शिंदेवाडी शाळा ग्रामीण शिक्षणाचे प्रेरणादायी केंद्र बनत आहे, असे गौरवोद्गार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले. गणोरे…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल आणि महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवली जाईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हिवाळा ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस आर्थिक घडामोडींसाठी अनुकूल आहे. धनलाभ होण्याची शक्यता असून जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक प्रवासाचे आयोजन होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. मिथुन – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक पदवीधर मतदारसंघात आमदार सत्यजित तांबे यांच्याविरोधात आक्रमक लढा देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या शुभांगीताई पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने थेट धुळ्याहून संगमनेर गाठत आमदार अमोल खताळ पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शुभांगी ताईंनी आमदार खताळ यांचे औक्षण करत त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आणि राजकीय वातावरणात एक वेगळाच संदेश दिला. नात्यांमधील जिव्हाळा आणि आपुलकी ही राजकीय मतभेदांपेक्षा कितीतरी मोठी असते, याची प्रचिती भाऊबीजेच्या मुहूर्तावर संगमनेरकरांना आली. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते परस्परांवर टीकास्त्रांची झोड उठवत असतात. राजकीय विरोध आणि मतभेद उफाळून येत असतानाच, सण-उत्सवांच्या काळात हे वैर बाजूला ठेवून नात्यांचे स्नेहबंध जपणे ही महाराष्ट्राची मोठी राजकीय परंपरा मानली जाते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भारतीय संस्कृतीमध्ये भाऊबीज या सणाला विशेष महत्त्व असून बहीण-भावाच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि अतूट नात्याचे प्रतीक म्हणून हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी व सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणे आणि भावाने बहिणीच्या सुख-दुःखात कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही या सणाची खरी शिकवण आहे. बहिणीचे हे पवित्र नाते आयुष्यभर जपले पाहिजे. तिचे संरक्षण करणे, तिला सन्मानाची वागणूक देणे आणि तिच्या स्वप्नांना बळ देणे हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे, असा संदेश आमदार अमोल खताळ यांनी भाऊबीज सणानिमित्त दिला आहे. शहरातील घुलेवाडी रोड येथील आमदार खताळ यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साही राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र खाण्यापिण्याची काळजी घ्यावी, अन्यथा पोटदुखीचा त्रास उद्भवू शकतो. वृषभ- आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत शुभ फलदायी ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे मनाला मोठा दिलासा मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल आणि नवीन ओळखी लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन- आज आपले मन विविध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संगमनेर शहरातील जमजम कॉलनी आणि मदिनानगर परिसरात छापा टाकून एका बेकायदेशीर कत्तलखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८०० किलो गोमांसासह ५ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार गणेश…

Read More

विशेष लेख | प्रवीण बागडे भारतीय संस्कृतीत काही नाती रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन मनाच्या गाभाऱ्यात घर करतात. भाऊ आणि बहिणीचे नाते त्यापैकीच एक! कधी बालपणीच्या भांडणांतून उमललेले, कधी एकाच ताटात जेवताना घट्ट झालेले, तर कधी संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहत अधिक समृद्ध झालेले हे नाते आयुष्यभर माणसाला भावनिक आधार देत असते. दिवाळीच्या उत्सवात भाऊबीज हा दिवस या नात्याच्या प्रेमाला, विश्वासाला आणि आपुलकीला उजाळा देतो. बहीण भावाला ओवाळते, कपाळावर टिळा लावते, औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो, तिच्या सुखाची काळजी घेण्याचे आश्वासन देतो; पण या सगळ्या विधींच्या पलीकडे एक प्रश्न महत्त्वाचा आहे, भाऊबीजेला दिलेले प्रेम आणि…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर बनतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वृषभ – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, ज्यामुळे थोडे मानसिक ताणतणाव जाणवेल. परंतु आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही सर्व आव्हानांवर मात करू शकाल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राची अचानक भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मिथुन – आजचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- श्रीरामपूरच्या टिळकनगर भागातील कामगार चौक परिसरात फटाक्याचे पैसे मागण्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत दोन मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. रविवारी (८ नोव्हेंबर २०२६) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोईनुद्दीन शकील पठाण हे त्यांच्या कामगार चौक, टिळकनगर येथील फटाक्याच्या दुकानात असताना आरोपी सागर राहुल गुंजेकर, अक्षय राहुल गुंजेकर, आनंद अमर पवार, अमित रविकांत पटारे, उमर शेख (सर्व रा. श्रीरामपूर परिसर) यांच्यासह इतर आरोपी दुकानावर आले. आरोपींनी फिर्यादीकडे फटाक्याच्या पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी हा आनंद आणि आपुलकीचा सण असला तरी, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील स्व. विकास हासे यांच्या कुटुंबासाठी यंदाची दिवाळी दुःखाची सावली घेऊन आली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने विकास हासे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, कुटुंबाचा मुख्य आधार हरवल्याने या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या कठीण काळात राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने (RGSS) हासे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करत एक आदर्श सामाजिक बांधिलकी जपली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजापूर येथे जाऊन हासे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत सुपूर्द केली. याशिवाय कुटुंबाला दिवाळीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ऐन दिवाळीच्या सणात रविवारी संगमनेर शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि थरारक घटना समोर आली आहे. संगमनेर शहरातील गजबजलेल्या अकोले रोडवर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. फटाक्यांची ठिणगी पडल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, आगीचे रौद्ररूप पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सणाचा दिवस असल्याने अकोले रोड परिसरात सायंकाळी मोठी वर्दळ होती. याच दरम्यान एका बॅटरीच्या दुकानातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. दुकानात बॅटरी आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही वेळातच अत्यंत भयानक रूप धारण केले. ही आग…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साही राहील. नोकरीच्या क्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला सुखद शांतता लाभेल. वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक लाभाचा ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांति नांदेल आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. मिथुन – आज आपल्याला संमिश्र फळे मिळतील. व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी काळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असताना आमदार अमोल खताळ पाटील यांनी थेट बाजारपेठेत उतरून जनसंपर्क साधला. कोणताही औपचारिकतेचा बडेजाव न करता त्यांनी पायी फिरून व्यापारी, खरेदीसाठी आलेले नागरिक, महिला आणि लहान मुलांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. प्रत्येकाची भेट घेऊन हस्तांदोलन करत त्यांनी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार खताळ यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या वागण्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत ग्राहकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि छोट्या व्यावसायिकांपासून…

Read More

रविवार विशेष लेख — बौद्ध धम्मात दिवाळी साजरी करावी की, विवेकाचा दीप प्रज्वलित करावा? प्रवीण बागडे दिवाळी आली की सर्वत्र प्रकाशाचा उत्सव सुरू होतो. घराघरांत पणत्या उजळतात, आकाशात आतषबाजी होते, मिठाईची देवाणघेवाण होती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. मात्र, या झगमगाटात एका मूलभूत प्रश्नाकडे आपण कधी गांभीर्याने पाहिले आहे का? आपण तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीचा वारसा अभिमानाने मिरवतो, मग बौद्ध समाजाने दिवाळी नेमकी कोणत्या विचाराने आणि कोणत्या धार्मिक संकल्पनेतून साजरी करावी? हा प्रश्न कुणाच्या श्रद्धेला दुखावण्यासाठी नाही, तर स्वतःच्या वैचारिक भूमिकेचा प्रामाणिक शोध घेण्यासाठी आहे. कारण धम्म म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर विचार,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात यंदा दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असून शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलावे या सामाजिक बांधिलकीतून महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार खताळ यांनी कर्जुले पठार येथील येठेवाडी, गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी आणि डोळासणे येथील दुबेवाडी परिसरातील आदिवासी व गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा, साड्या, मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करून त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मशागतीदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने मोटारीची केबल तुटल्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन ६५ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला शिवीगाळ करत दगडाने व कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या घोडेवहाळ शिवारात शनिवारी (७ नोव्हेंबर) सकाळी ११.४५ ते दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील ६५ वर्षीय शेतकरी बाळू गणपत फापाळे हे आपल्या शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी गणेश भाऊराव गोपाळे यांच्या मोटारीची केबल जेसीबीच्या कामादरम्यान अडकून तुटली. यावरून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पवित्र मतदानाच्या माध्यमातून जनतेने लोकशाही मार्गाने आपले प्रतिनिधी निवडले, परंतु याच लोकप्रतिनिधींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खोके सरकारने नवनवीन कायद्यांची खोडसाळ ढाल पुढे केली आहे. ही सरळसरळ लोकशाहीची क्रूर हत्या असल्याचा घणाघाती आरोप आता राज्यभरातून होत असून, संगमनेरमध्ये याविरोधात संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघावर शासननियुक्त सदस्य ठोकण्याच्या या हुकूमशाही निर्णयाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये ‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) आक्रमक झाला आहे. शहरातील ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या रोखठोक फ्लेक्समुळे सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही कारभाराविरोधात संपूर्ण नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघात सभासदांनी परिवर्तनाचा कौल देत माजी…

Read More