Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे, तर निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन रविवार, दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. पाण्याचा अपव्यय टाळून अतिशय संवेदनशीलपणे या आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विखे पाटील यांची भेट घेऊन नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई विचारात घेऊन तातडीने आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी आज लोणी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या उपाययोजनांच्या सूचनांची नेमकी किती अंमलबजावणी झाली, याचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येत्या २२ नोव्हेंबरपासून प्रत्येक तालुक्याचा पुन्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते थेट शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून राहिलेल्या समस्यांवर तातडीने मार्ग काढणार आहेत. प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित जनता दरबारात ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची व विविध गावांच्या शिष्टमंडळांची निवेदने स्वीकारून त्यांनी समस्या जाणून घेतल्या व अनेक प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक कामांबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ती वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेताना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन, आता रेशन वितरणाच्या वेळी दिव्यांगांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग सारथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार खताळ पाटील यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत संगमनेर तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांबाहेर दिव्यांगांना रेशन घेताना प्राधान्य देण्याबाबतचे फलक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन घेताना दुकानांमध्ये रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन अडीअडचणी समजून घेत त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आज (शनिवारी) संगमनेर येथील ‘प्रभानिवास’ येथे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत काही प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट ऐकून घेण्यासाठी आमदार तांबे हे सातत्याने भेटीगाठी घेत असतात. आजच्या या भेटीदरम्यान शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित कामे आणि स्थानिक समस्या आमदार तांबे यांच्यासमोर मांडल्या. आमदार तांबे यांनी प्रत्येक नागरिकाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आफताब कलीम शेख याला अखेर न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. घटनेच्या दिवसापासून तुरुंगात असलेल्या शेख याला तब्बल २४९ दिवसांनी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने १४ फेब्रुवारीला जामखेडमध्ये छापा टाकला होता. या छाप्याच्या कारवाईत तिघा जणांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीसोबत त्या ठिकाणी नकली दूध बनवण्याच्या साहित्यापासून बनवलेले ४ ड्रम रसायन जप्त करण्यात आले होते. सदरचे रसायन बनवण्यासाठी लागणारे पॅराफिन ऑइल, पावडर, इमल्सीफायर यांचा मोठ्या प्रमाणावर साठा त्या ठिकाणी जप्त करण्यात आला होता. सदरचे सर्व…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले जुने गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात. वृषभ – आर्थिक स्तरावर आजचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. धनलाभाचे नवे मार्ग खुले होतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन भागीदारीचे योग जुळून येतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग येईल. मिथुन – आज मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. कला,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- जग 5G तंत्रज्ञानाच्या पुढे जात सॅटेलाइट इंटरनेटच्या नव्या पर्वात प्रवेश करत असताना, संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी गावातील नागरिकांना साध्या मोबाईल नेटवर्कसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणापासून शासकीय योजनांच्या लाभापर्यंत अनेक सुविधांपासून वंचित राहणाऱ्या कुंभारवाडीकरांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल भारत निधीअंतर्गत गावातील 4G मोबाईल नेटवर्क प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावात नेटवर्क सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही केवळ संपर्काची सुविधा राहिलेली नसून शिक्षण, शेती, आरोग्य, शासकीय सेवा आणि दैनंदिन व्यवहारांची महत्त्वाची गरज बनली आहे. मात्र, कुंभारवाडी गावात…
अमोल शेलकर – प्रेम, विरह, कौटुंबिक नाती, संघर्ष आणि राजकीय जबाबदारी यांचा अनोखा प्रवास; एका सामान्य इटालियन मुलीपासून भारतीय राजकारणातील प्रभावशाली नेतृत्वापर्यंत पोहोचलेल्या सोनिया गांधी यांच्या जीवनाचा भावस्पर्शी दस्तऐवज! काही व्यक्तिमत्त्वे त्यांच्या पदामुळे ओळखली जातात, काही त्यांच्या कर्तृत्वामुळे, तर काही त्यांच्या आयुष्यातील संघर्षामुळे इतिहासात अढळ स्थान निर्माण करतात. सोनिया गांधी हे असेच एक व्यक्तिमत्त्व. भारतीय राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून केंद्रस्थानी असलेल्या सोनिया गांधी यांच्या आयुष्याचा एक वेगळा, भावनिक आणि काहीसा खासगी पैलू त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मकथनातून समोर आला आहे. 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित झालेले हे पुस्तक केवळ एका राजकीय नेत्याचे आत्मचरित्र नाही,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांसोबत स्नेहाचे क्षण अनुभवण्याचा सण. मात्र, परिस्थितीमुळे वृद्धाश्रमात आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा आजी-आजोबांच्या आयुष्यात आपुलकीचे आणि मायेचे क्षण निर्माण करण्याच्या सामाजिक भावनेतून लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने राजूर-भंडारदरा रोडवरील कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमात ‘वृद्धाश्रमात दिवाळी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ, विविध भेटवस्तू, दिवाळी विशेषांक तसेच वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकले. दिवाळीच्या आनंदात त्यांना सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी एक संवेदनशील आणि माणुसकीचा अनुभव देणारा ठरला.…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि ऊर्जेने भरलेला असेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा. वृषभ – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. कौटुंबिक जीवनात काही लहान-सहान कारणांवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणे हिताचे राहील. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांची साथ मिळेल. मिथुन – आज तुम्हाला मानसिक शांतता आणि आत्मविश्वासाची अनुभूती…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सन २०२६-२०२७ या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल देण्याचा महत्त्वाचा निर्णय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून, अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी पावसाच्या व दुष्काळी परिस्थितीत यामुळे ऊस उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची सविस्तर माहिती देताना व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली कारखान्याने नेहमीच तालुक्याच्या सर्वांगीण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बायोसीबीजी प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्याना दिलेले पाठबळ आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वपूर्ण असून, उर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास प्रकल्पाची निश्चित मदत होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातवतीने केंद्र सरकारच्या गोबर्धन योजनेअंतर्गत प्रतिदिनी १६ टन क्षमतेच्या बायोसीबीजी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रकल्प ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. शेतातील वाया जाणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यंदा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी रब्बी पिकांची उभारणी करणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुधनाचे हित लक्षात घेऊन निळवंडे धरणातून रब्बी हंगामासाठी तसेच जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध होण्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्राला मिळाले होते. मात्र, या पाण्याला जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. दरम्यानच्या काळात परिसरात अपेक्षित पाऊस…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी विचार आणि राजकीय प्रवाह एकत्र आणत सहकाराच्या माध्यमातून नवी राजकीय समीकरणे जुळविणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यापासून ते जिल्ह्याच्या अर्थवाहिनीचे नेतृत्व करण्यापर्यंत डॉ. विखे पाटील यांनी केलेला प्रवास या निवडीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. या निवड प्रक्रियेवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र संगमनेरमधील स्थानिक कलाकार अतिशय दर्जेदार सादरीकरण करत असल्याने येथील ‘दिवाळी पहाट गाणी’ हा कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम ठरतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. भंडारी मंगल कार्यालय येथे संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि वाचन कट्टा समूहाच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात ते बोलत होते. या विशेष मैफलीतून दिग्गज कलावंत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना सांगितिक अभिवादन करण्यात आले, तसेच भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त धरणाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली. या सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शिक्षकांची शाळेप्रती असलेली निष्ठा, ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान एकत्र आले, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचाही कायापालट घडू शकतो, याचा आदर्श अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने निर्माण केला आहे. एकेकाळी अवघ्या नऊ विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या या शाळेची विद्यार्थीसंख्या आज समाधानकारक वाढली असून, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधांच्या बाबतीतही शाळेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलग आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या समर्पित कार्याला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थ्यांची भक्कम साथ लाभल्याने शिंदेवाडी शाळा ग्रामीण शिक्षणाचे प्रेरणादायी केंद्र बनत आहे, असे गौरवोद्गार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले. गणोरे…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल आणि महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवली जाईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हिवाळा ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस आर्थिक घडामोडींसाठी अनुकूल आहे. धनलाभ होण्याची शक्यता असून जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक प्रवासाचे आयोजन होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. मिथुन – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक पदवीधर मतदारसंघात आमदार सत्यजित तांबे यांच्याविरोधात आक्रमक लढा देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या शुभांगीताई पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने थेट धुळ्याहून संगमनेर गाठत आमदार अमोल खताळ पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शुभांगी ताईंनी आमदार खताळ यांचे औक्षण करत त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आणि राजकीय वातावरणात एक वेगळाच संदेश दिला. नात्यांमधील जिव्हाळा आणि आपुलकी ही राजकीय मतभेदांपेक्षा कितीतरी मोठी असते, याची प्रचिती भाऊबीजेच्या मुहूर्तावर संगमनेरकरांना आली. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते परस्परांवर टीकास्त्रांची झोड उठवत असतात. राजकीय विरोध आणि मतभेद उफाळून येत असतानाच, सण-उत्सवांच्या काळात हे वैर बाजूला ठेवून नात्यांचे स्नेहबंध जपणे ही महाराष्ट्राची मोठी राजकीय परंपरा मानली जाते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भारतीय संस्कृतीमध्ये भाऊबीज या सणाला विशेष महत्त्व असून बहीण-भावाच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि अतूट नात्याचे प्रतीक म्हणून हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी व सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणे आणि भावाने बहिणीच्या सुख-दुःखात कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही या सणाची खरी शिकवण आहे. बहिणीचे हे पवित्र नाते आयुष्यभर जपले पाहिजे. तिचे संरक्षण करणे, तिला सन्मानाची वागणूक देणे आणि तिच्या स्वप्नांना बळ देणे हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे, असा संदेश आमदार अमोल खताळ यांनी भाऊबीज सणानिमित्त दिला आहे. शहरातील घुलेवाडी रोड येथील आमदार खताळ यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साही राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र खाण्यापिण्याची काळजी घ्यावी, अन्यथा पोटदुखीचा त्रास उद्भवू शकतो. वृषभ- आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत शुभ फलदायी ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे मनाला मोठा दिलासा मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल आणि नवीन ओळखी लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन- आज आपले मन विविध…
