Author: Annant Ppangarkar
संगमनेर- संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सातत्याने दोन दिवसात गांजा संदर्भात कारवाई झाल्याने शहरातील अवैध व्यवसायाचे मोठे नेटवर्क समोर येत आहे. या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. संगमनेर शहरात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी केलेली ही महत्त्वाची आणि धडक कारवाई मानली जात आहे. गुरुवारी नाशिकच्या नार्कोटिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरालगत असणाऱ्या सुकेवाडीमध्ये अशाच प्रकारे मध्यरात्रीपासून छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये सव्वा कोटी रुपयांचा ४५६ किलो गांजा जप्त…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्यांना थांबा देण्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय आणि पायपीट आता थांबणार आहे. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातून नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कामांसाठी पुणे व नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्या संगमनेर शहरात प्रवेश न करता थेट बाह्यवळण मार्गाने पुढे जात होत्या. त्यामुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेर उतरावे लागत होते आणि तिथून त्यांना मोठा…
संगमनेर – संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात नाशिक नार्कोटिक्स विभागाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संगमनेरमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरी, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारवाईनंतर मुख्य आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) हा फरार झाला आहे. नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडी गावात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपअधिक्षक पाटील यांनी तातडीने एक पथक तयार करून सुकेवाडी येथे धाड टाकली.…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगर परिषदेच्या 15 प्रभागांमधील 30 जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीतील प्रभाग 1 ब, 2 ब, 15 ब या उर्वरित तीन जागांसाठीचे निवडणूक चित्र बुधवारी संध्याकाळी अखेर स्पष्ट झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या या जागांसाठी आता शनिवारी, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने लढतींचे स्वरूप निश्चित झाले आहे. यात प्रभाग 1 ब मधून लोंढे संकेत सुभाष, तर प्रभाग 15 ब मधून शेख रेहाना सिराजोद्दीन आणि सईदा गफ्फार शेख यांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग 2 ब मधून मात्र कोणीही माघार घेतली नाही. माघारीनंतर उर्वरित तीन जागांवर खालीलप्रमाणे लढती होणार…
संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या सहकारमहर्षी टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे २६ वे पर्व लवकरच सुरू होत आहे. माजी आमदार डॉ. तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा १ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेची अधिक माहिती दिली. राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागपूर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना तातडीने चालना देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मागणीनुसार, १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय, घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम आणि कामगार रुग्णालय उभारणीच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. नागपूर विधान भवनातील जुने कामकाज समिती कक्षामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेरच्या आरोग्य सुविधांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी बैठकीसाठी राज्याचे आरोग्यसंचालक डॉ.नितीन अंबाडेकर सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा डॉ. संजय घोगरे…
संगमनेर/नागपूर – संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल अभिलेखात मणियार कुटुंबाची मालकी असतानाही प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या या जमिनीच्या नोंदी रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. या किचकट कायदेशीर प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची नावे कमी करून रहिवाशांना ‘कन्फरमेशन डीड’ करून देण्याची विनंती केली होती. मणियार कुटुंबीयांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल बाजूने लावण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांची सिन्नर तालुक्यातील दोडी शिवारात जमीन आहे. या जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी नायब तहसीलदार संजय धनगर याने त्यांच्याकडे सुरुवातीला १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. वाटाघाटीनंतर लाचेची…
अहिल्यानगर – घारगांव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकून दिलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बालकाचे खुनी अखेर जेरबंद झाले आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवांशचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीनेच त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये अंदाजे ०३ ते ०४ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ७४/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात…
संगमनेर- नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे महत्त्व ओळखून, संगमनेर रेल्वे कृती समितीने येथील लोकप्रतिनिधींना केवळ छायाचित्रांसाठी स्टंटबाजी न करता, नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे वळवल्याबद्दल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आणि पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. समितीने शहरातील नवीन लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला असून, मागील एका वर्षात शहरात अमली पदार्थ आले पण विकासाची रेल्वे पळाली, असा थेट आरोप केला आहे. शिर्डीमार्गे वळवलेल्या रेल्वेला विरोध करा- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता, मात्र विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवली आहे. हा निर्णय संगमनेर, अकोले परिसराच्या औद्योगिक, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांच्या नोकरी-व्यवसायासाठी अत्यंत नुकसानदायक ठरणारा आहे.…
नागपूर – पुणे–नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे, या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (महायुती) आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एक आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी ‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे’ या मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान केला तसेच हातात फलक घेऊन थेट विधानभवनात प्रवेश केला. या कृतीने विधानभवनातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि संगमनेरकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या. शिर्डी मार्गे मार्गाला विरोध; संगमनेरकरांमध्ये संताप – नारायणगाव जवळील ‘जीएमआरडी’ (दुर्बीण) च्या तांत्रिक अडथळ्याचे कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत हा रेल्वेमार्ग शिर्डी मार्गे करण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संगमनेरकरांमध्ये…
संगमनेर- ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कल्चर फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत संगमनेरच्या संस्कार-बालभवनच्या नृत्यांगणांनी नेत्रदीपक यश संपादन करत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. पारंपरिक भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकारांवर आधारित या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, ओडिशा, केरळ अशा विविध राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, संस्कार-बालभवनची विद्यार्थिनी वेदीका हासे हिने उत्कृष्ट लोकनृत्य सादर करत ज्युनिअर गटात सुवर्णपदकासह पहिला क्रमांक पटकावून संगमनेरचे नाव उंचावले. याव्यतिरिक्त, इतर दोन्ही गटांमध्ये रौप्यपदकासह दुसरे स्थान मिळवत बालभवनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली. देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन- भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारांना…
घारगाव (संगमनेर) – पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघा बाप-लेकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक ठप्प झाली असताना, पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे हे कुटुंबियांसह नाशिकहून पुण्याकडे प्रवास करत होते. घारगाव येथे वाडगे याने अचानक आपली गाडी आडवी लावली. यानंतर, झालेल्या वादातून अण्णासाहेब वाडगे याने लोखंडी रॉडने पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केली. या…
संगमनेर / पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप करत, धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी (व्होटचोरी) करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा बनला असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाहीची हत्या व व्होटचोरी यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. थोरात यांनी ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या शंकांवरही भाष्य केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातूनच झाला पाहिजे, या मागणीसाठी आपण लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सातत्याने पाठपुरावा करत असून, रेडिओ दुर्बिणीचे कारण न देता हा मार्ग संगमनेरवरूनच नेण्याचा आपला आग्रह कायम आहे, असे ठाम प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार वाकचौरे म्हणाले, २००९ ते २०१४ या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आम्ही या मार्गासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीमार्गे वळवल्यामुळे संगमनेर तालुक्यासह सिन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या भागांमध्ये आता प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासाठी जमिनी आरक्षित करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला होता, तो मार्ग अचानक बदलल्याने जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने हा मार्ग बदलण्याचा घाट घातल्याबद्दल रेल्वे जनआंदोलन समितीने महायुतीमधील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले असून, आता राजकारण न करता या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्वपक्षीय नागरिकांना केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही रेल्वे शिर्डीमार्गे जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांना…
संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमवरील सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळासाठी बंद पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल संगमनेरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही माहिती मिळताच उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका या घटनेमुळे आणखी गडद झाल्या आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये नगरपालिका निवडणुकीतील सर्व १५ प्रभागांतील ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सील करण्यात आलेल्या या स्ट्रॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात…
सिहंस्थ कुभमेळ्याच्या निमित्ताने नाशिककरांच्या पर्यावरण अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कुंभमेळ्यात उपस्थित राहणार्या साधूंच्या निवासासाठी सरकारला साधूग्राम उभारायचंय. यासाठी तपोवनाची अनेक वर्षांची शान बनलेली 1800 मोठाली झाडं तोडण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. आपल्या कारकिर्दीला एक वर्षाचा काळ पूर्ण होत असताना स्वत:चे ढोल बडवणार्या सरकारचा या प्रश्नावरून होत असलेला निषेध खूपच बोलका आहे. सरकारमध्ये सारं काही अलबेल नाही, हे दर्शवणारा हा विरोध आहे. वाढता विरोध लक्षात घेता झाडं तोडून साधूग्राम बनवण्याचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मागे घेतला पाहिजे. त्याऐवजी साधूग्राम न बनवल्यास कुंभमेळा कसा होईल, असले फालतू प्रश्न विचारत ते नाशिककरांच्या संतापात तेल ओतत आहेत. आपलं…
आजचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीचा असल्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. मेष : आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम आणि उत्साहवर्धक असेल. तुमच्या कामात नवीन ऊर्जा जाणवेल आणि अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिकदृष्ट्या हा दिवस लाभदायक ठरू शकतो, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. महत्त्वाच्या कामांची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कार्यपूर्तीचा असेल. हाती घेतलेले जुने प्रकल्प आणि कामे वेळेत व्यवस्थित पूर्ण होतील. घरात खरेदीचा किंवा महत्त्वाच्या वस्तू घेण्याचा योग आहे. आर्थिक बाबींमध्ये स्थिरता…
संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत, आयोग पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवत असून आयोग त्याची अंमलबजावणी करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला. तसेच, मतदान आणि मतमोजणीतील २० दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेत, EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) पेट्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि अचानक मतदान स्थगित केले जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नाही. सावळा गोंधळ…
