Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती. अनेकदा पाझर तलाव कोरडे राहत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असत. मात्र, आता राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – लोकशाहीमध्ये ग्रामसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे एका तरुणाला मूलभूत पाणी प्रश्नावर आवाज उठवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून बाजार समितीच्या संचालकाने तरुणाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धांदरफळ खुर्द येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना पियुष ठोंबरे या तरुणाने, आमच्या घरी नळाचे पाणी का येत नाही? असा साधा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे प्रश्न का विचारतो? तुला पाहून घेईन, अशी…
जगाला हादरवून सोडणार्या जेफ्री एपस्टिनच्या भुताने भारताला हैराण करून सोडलं आहे. बाहेर येणार्या एकेका गोष्टीने जग हदरतो आहेच. पण स्वत:ला संस्कृती आणि परंपरेचा पायिक समजणार्या भारताचं आणि इथल्या राजकारण्यांचं नाव बाहेर येऊ लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. फाईलमध्ये आपलं नाव येऊ नये म्हणून सत्ता ज्या प्रकारे अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहे, ते पहाता हे देशाच्या अस्तित्वासाठी अतिगंभीर होऊ शकतं. एपस्टिनच्या फाईलमध्ये अडकलेला एका राष्ट्राचा प्रमुख इतर देशांना कसा ब्लॅकमेल करतो, हे भारताच्या सत्ताधार्यांना लक्षात आलं नसेल तर दुर्देवच. असल्या विकृतीच्या मागे लागल्यावर देशाचं भलं होईल, असं ज्यांना वाटतं ते त्याहून अधिक विकृतीने पछाडलेत असंच म्हणायला हवं. ज्या महिला पत्रकाराने हे प्रकरण…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असला तरी, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मोठ्या नफ्याचा ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण…
संगमनेर, प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेल्या खंबीर पावलांमुळे संगमनेर नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील ‘अमृत’ शहरांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शहराला हा बहुमान प्रदान करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – दैनंदिन जीवनातील धावपळ विसरून नागरिकांनी आनंदाचे क्षण अनुभवावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘आनंदी रस्ते’ अर्थात ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा या उपक्रमाचे विशेष महत्त्व असून, हे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. हा उपक्रम उद्या रविवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी ७ ते १० या वेळेत स्व. ओंकारनाथ मालपाणी मार्गावर, राजपाल क्लॉथ स्टोअर ते जाणता राजा मैदान या दरम्यान पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध खेळ, गाणी, गप्पा आणि…
संगमनेर: घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात घारगाव पोलिसांना मोठे यश आले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, भोजदरी येथील शेतकरी महेश गणपत हांडे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १३ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या शेतातील आणि शेततळ्यातील विद्युत पंप तसेच कॉपरची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा…
अहिल्यानगर : शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेली संत्री चोरून नेणाऱ्या एका अट्टल चोराला नगर तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यामध्ये चोरीची संत्री, रिकामे कॅरेट आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दशमीगव्हाण येथील शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के यांनी त्यांच्या शेतात संत्री विक्रीसाठी नेण्याकरिता ११० रिकामे कॅरेट ठेवले होते. १९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून संत्र्यांची चोरी केली. २० फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता शेतकरी शेतात गेले असता, त्यांना ९८ कॅरेटसह झाडांवरील फळे चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेतात टेम्पोच्या टायरचे निशाण आढळल्याने त्यांनी…
अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या अभिषेक कळमकर फरार असल्याचे समजते. फिर्यादीनुसार, शिरूर तालुक्यातील पीडित युवती तीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधला होता. नोकरीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर कळमकर यांनी तिला कागदपत्रांसह भेटीसाठी बोलावले. एमआयडीसी परिसरातील स्वतःच्या शाळेत कामाला लावून देतो असे सांगून त्यांनी पीडितेचा विश्वास…
झरेकाठी वार्ताहर: संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे कामानिमित्त जात असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर अहिल्यानगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील मॅक्स सुपर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आकांक्षा बोल्हेगाव फाटा येथील एमआयडीसीमध्ये कंपनीच्या कामासाठी जात असताना, एका भरधाव मोटरसायकलने आणि विटांनी भरलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता मोठी असून डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर संबंधित मोटरसायकल चालक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आकांक्षाचे वडील रवींद्र चांगदेव निकम यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली…
